मुखपृष्ठ : दिवाळी अंक २०१७

Primary tabs

अभ्या..'s picture
अभ्या.. in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 6:16 pm

cover

कथा

प्रतिक्रिया

मुखपृष्ठाच्या कौतुकाला शब्द अपुरे आहेत. खूपच नेमके मुपृ! जियो अभ्या!

यशोधरा's picture

17 Oct 2017 - 6:51 pm | यशोधरा

सुंदर!

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 7:14 pm | जेम्स वांड

अतिशय सुंदर संकल्पना अन चित्रण आहे हे, तुमच्यातल्या कलाकाराला कोटी प्रणाम.

अवांतर भोचकपणा -
बेस ला चेहरा अशोक नायगावकरांचा ठेवलाय का? छपरी मिश्या वगैरे जबरीच जमल्ये भट्टी!!!

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 7:15 pm | जेम्स वांड

अतिशय सुंदर संकल्पना अन चित्रण आहे हे, तुमच्यातल्या कलाकाराला कोटी प्रणाम.

अवांतर भोचकपणा -
बेस ला चेहरा अशोक नायगावकरांचा ठेवलाय का? छपरी मिश्या वगैरे जबरीच जमल्ये भट्टी!!!

पिलीयन रायडर's picture

17 Oct 2017 - 7:19 pm | पिलीयन रायडर

ह्या वेळेसचे डिटेलिंग मला फार आवडतंय. मुखपृष्ठ सुंदरच झालंय! मॅच्युअर डिझाईन. हेडर फुटरही प्रसन्न आहेत. त्यातही पुन्हा हेडरमध्ये ज्या आकाशकंदिलाच्या झिरमाळ्या आहेत त्यात मिपा दशकपूर्ती लिहीलंय!

इव्हन आत्ता जे टिझर शेजारी आहे त्यातही मला बर्‍याच वेळाने क्लिक झालं ते म्हणजे ते सगळेजण ओंजळीमध्ये आहेत! जंगल जंगल वालं टिझरही तसंच.

मला तू उपक्रमाचा विषय काय आहे हे कधीही विसरत नाहीस आणि सुरूवाती पासून शेवट पर्यंत थीम न सोडता काम करतोस ते फार आवडतं. त्यामुळे तुझ्या डिझाईन्स मध्ये एक विचार दिसतो.. नेमकेपणा दिसतो.. एलिगन्स दिसतो! त्यासाठी ही दाद!

Ranapratap's picture

17 Oct 2017 - 7:20 pm | Ranapratap

1च नंबर

इरसाल कार्टं's picture

17 Oct 2017 - 7:28 pm | इरसाल कार्टं

झकास...

निशाचर's picture

17 Oct 2017 - 7:46 pm | निशाचर

मस्त! थीमला साजेसं.

एस's picture

17 Oct 2017 - 7:56 pm | एस

सुंदर मुखपृष्ठ!

कलाकृती म्हणून झकास पण लै गंभीर वैचारिक वाटतोय, उदा अबकड ई, स्पंदन समान दिसतोय.

हे संपूर्ण व्यक्तिगत मत आहे, राग नसावा

मिपा वाचाल तर वाचाल या नियमीत वाचक चळवळीचा सामान्य सभासद नाखु पत्रेवाला

अभिजीत अवलिया's picture

17 Oct 2017 - 8:09 pm | अभिजीत अवलिया

मुखपृृष्ठ आवडले.

सूड's picture

17 Oct 2017 - 8:26 pm | सूड

भारीच रे.

प्रचेतस's picture

17 Oct 2017 - 8:30 pm | प्रचेतस

एकच नंबर बे.

अभ्या खूप सिरीयस झाले आहे मुखपृष्ठ. आवडले पण.

ईश्वरदास's picture

17 Oct 2017 - 10:06 pm | ईश्वरदास

मस्तय भ्यादातदा,
भिडे गुरुजींच्या सारखं वाटतय जरा.

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2017 - 10:23 pm | स्वाती दिनेश

मुखपृष्ठ फार सुंदर!
स्वाती

पद्मावति's picture

18 Oct 2017 - 12:55 am | पद्मावति

अप्रतिम!

पैलवान's picture

18 Oct 2017 - 8:12 am | पैलवान

अभ्या...
कोणत्या शब्दांत कौतुक करायचे रे?

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 9:49 am | सविता००१

काय अप्रतिम मुखपृष्ठ केलं आहेस रे.. भारी.

मित्रहो's picture

18 Oct 2017 - 10:34 am | मित्रहो

सुंदर मुखपृष्ठ

ओरायन's picture

18 Oct 2017 - 12:08 pm | ओरायन

मुखपृष्ठ चांगले आहे.

बाबा योगिराज's picture

18 Oct 2017 - 3:56 pm | बाबा योगिराज

अभ्या भौ,
भाई कौन चक्की का आटा खाते हो? जबरदस्त कलाकारी. मान गये उस्ताद. __/\__.

नंदन's picture

18 Oct 2017 - 4:13 pm | नंदन

_/\_

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2017 - 5:01 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम मुखपृष्ठ ! अतिशय दर्जेदार !

चेहर्‍यातलं डिटेलिंग जबरदस्त आहे ! त्यात काही कहाण्या अन गुढताही दडलेली आहे !
अभ्यादादाच्या कलाकारीला कुर्निसात !

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2017 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा

बापमाणूस, बाप काम.

चौकटराजा's picture

18 Oct 2017 - 6:36 pm | चौकटराजा

आपल्याला वर्षोन वर्ष टिपिकल सुंदर बाई हातात तबक ,दिवा ई. किंवा मग रांगोळी काढताना बसलेली. अशी दिवाळी अंकाच्या मुखप्रूष्ठावर पहायची संवय . हे चित्र फार
कलात्मक वगैरे वालं . अभ्या साहेब आपल्याला चंद्रमोहन कुलकर्णी, भ मा परसावळे वा सुभाष अवचट यानी तुम्हाला झपाटलेलं असावं ! दिवाळी अंकाची मुख्य थीम " व्यक्ती व वल्ली असल्यामुळे हे युक्तच आहे.

आपल्याला वर्षोन वर्ष टिपिकल सुंदर बाई हातात तबक ,दिवा ई. किंवा मग रांगोळी काढताना बसलेली. अशी दिवाळी अंकाच्या मुखप्रूष्ठावर पहायची संवय . हे चित्र फार कलात्मक वगैरे वालं . अभ्या साहेब आपल्याला चंद्रमोहन कुलकर्णी, भ मा परसावळे वा सुभाष अवचट यानी तुम्हाला झपाटलेलं असावं ! दिवाळी अंकाची मुख्य थीम " व्यक्ती व वल्ली असल्यामुळे हे युक्तच आहे.

अगदी अगदी !! यातले डोळे फार आवडले मला...

आनंदयात्री's picture

18 Oct 2017 - 10:32 pm | आनंदयात्री

बेश्ट! व्यक्तिचित्र या थीमला अनुसरून मुखपृष्ठ बनवायचे म्हणजे कितीतरी क्लिशे कल्पना तुझ्या कुंचल्यातून उतरण्यासाठी घात लावून बसल्या असतील. पण तू जिंकलास भावा!

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 9:12 am | पाषाणभेद

गहीरं व्यक्तीमत्व दिसतंय या चित्रात. मिपा अन त्याचा प्रवासही प्रगल्भ झाल्याचं वाटतंय या चित्रावरून.
सुंदर मुखपृष्ठ. जिओ अभ्या!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2017 - 1:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्यासेठ, स.न.वि.वि.

मुख्यपृष्ठ लै सिरियस झालं राव. उच्च बिच्च वाटतं. मिपाचा जीवंतपणा नै दिसतच नै ये. त्यामुळे अभ्यासेठ, चलो गले लगे असे म्हणता येईना, हे नम्रपणे नमुद करतो. बाकी, तुम्ही हरहुन्नरी कलाकार आहात त्यामुळे तुम्हाला जे दिसतंय ते मला पोहचले नाही.

बाकी, दीपावली अंकातलं रंगकाम मस्त झालंय. दिवाळी अंकाचं काम मस्त झालंय. धन्स आणि अभिनंदन. बाकी, कलाकार म्हणून तुमच्यावर लव तर आहेच. :)

-दिलीप बिरुटे

स्नेहांकिता's picture

23 Oct 2017 - 11:59 am | स्नेहांकिता

सहमत !

मला तो केशरी/पिवळा रंग आवडत नाही. त्याऐवजी राखाडी किंवा टॅन रंगातली एखादी शेड कशी वाटली असती विचार करतेय....

चौकटराजा's picture

21 Oct 2017 - 7:19 pm | चौकटराजा

मग केशरी ऐवजी जुन्या कागदपत्रांचा रंग वापरला तरी चालला असता. सेपिया...... !

बबन ताम्बे's picture

19 Oct 2017 - 4:09 pm | बबन ताम्बे

मस्त !

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 1:06 pm | माम्लेदारचा पन्खा

दंडवत घ्या !!

धर्मराजमुटके's picture

20 Oct 2017 - 2:59 pm | धर्मराजमुटके

मस्तच झालेय ! मला तर चक्क उजव्या भिवईजवळ 'गाढव' असा शब्द असल्याचा भास झाला. अर्थात कदाचित मीच असेन :)
तुम्ही फारच उजवे दिसताय बुवा :)

केशरी रंगाच्या ऐवजी लाल रंग वापरला असता तर अजुन चांगला वाटला असता. कदाचित तुमच्याकडे हे साठवून ठेवले असेल तर एक प्रयोग म्हणून इथे प्रतिसादात टाकून प्रतिक्रिया आजमावून बघा !

बाकी माझ्या नकारार्थी प्रतिक्रियांना लै सिरियसली घेऊ नका.

अंक सवडीसवडीने वाचीन.

नेहमीचे रडगाणे गातोय पण संपादक मंडळी 'पीडीएफ' कधी ??

लाल रंग :O घाबरले....मला लाल आणि त्याच्या आसपासच्या रंगांचे रंगांचे फारच वावडे आहे! तो केशरी-पिवळापण त्यामुळेच आवडला नाही. पण

कदाचित तुमच्याकडे हे साठवून ठेवले असेल तर एक प्रयोग म्हणून इथे प्रतिसादात टाकून प्रतिक्रिया आजमावून बघा !
>> यालामात्र +१

वरच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे मला राखाडी किंवा टॅन रंग पायजे :D

अभ्या..'s picture

21 Oct 2017 - 1:59 pm | अभ्या..

हम्म्म
घ्या हे, पाहिजे तो कलर पकडा.
cp

पैलवान's picture

21 Oct 2017 - 2:06 pm | पैलवान

जिकलंस!!

वरीजनल कलरच ब्येष्ट आहे.

अॅमी's picture

21 Oct 2017 - 2:39 pm | अॅमी

:D ठान्कु.
काळ्यापांढऱ्या कॅमेराने काढलेला फोटू वाटू लागला तो आता. डोळ्यांना सुदिंग आहे पण पैलवान यांच्याशी सहमत. याच्यापेक्षा ओरिजनलच चांगलाय.

धर्मराजा मी भगवा उजवा किंवा लाल डावा दोन्ही नाही रे, किंबहुना कुठल्याच रंगाचे वावडे मला नाही. नवजात पानाचा चकाकता हिरवा पोपटी जेवढा सुरेख तितकाच झेंडूचा मखमली पिवळा, भगवा.
यंदाचा विषय होता व्यक्तिचित्रे. व्यक्ती म्हणले की वल्ली जोडून येते. व्यक्ती जन्मजात वल्ली नसते. जन्मजात असतो एखादा पिंड, बाकी परिस्थिती, अनुभव, आवड, संस्कार त्याला वल्ली बनवते. असे म्हणतात की व्यक्तीच्या चेहर्‍यावरच्या प्रत्येक सुरकुती म्हणजे एक कहाणी असते. अशा कहाण्या रचत रचत माणूस चेहर्‍याचा रंग बदलवून घेतो. रापतो. रापलेला रंग पक्का लाल गुलाबी नसतो. आयुष्याचा मावळतीचे रंग त्याला अजून भगवी पिवळी छटा देतात. नुसती छटा नाहीतर चेहर्‍याचा कॉन्ट्रास्ट अजून वाढवतात. डोळे दिसतात न दिसतात इतक्या अंधारात जिवंतपणा झळकून जातो. पांढर्‍या शुभ्र दाढीमिशा पण सर्फएक्सेलची कळा नाही आणत. तो विषेषाधिकार संपन्नतेचा. तशी शुभ्रता इथे नाही. आयुष्याची लढाई त्या पिकलेल्या दाढीमिशांना अजून जून बनवते. पिवळट करडी छटा देऊन जाते. मला ह्या चित्रात इतकेच साधायचे होते. माझ्या परीने प्रयत्न केला. कितपत उतरलेय ते ठरवणार तुम्ही सारे.
धन्यवाद

चिगो's picture

23 Oct 2017 - 5:14 pm | चिगो

क्या बात.. मुखपृष्ठ आवडले तर होतेच पण त्यामागची कारणमिमांसा वाचल्यावर तर सॅल्युटच राव..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2017 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदा बाळ जन्माला आलं की आलं. मग तो सावळा कृष्ण असो की गोरी राधा, बाळाचं नाक चपटे असो की सरळ एका रेषेतलं गोड, गुटगूटीत असो की कुपोषित, वजन जास्त असो की कमी. आपलं बाळ ते आपलं बाळ असतं आणि त्याच्यापेक्षा जगात सुंदर काही नसतं. :)

आता कशाला त्या गर्भसंस्काराच्या गोष्टी. उगाच आम्ही त्याला तेव्हा ना खुप कविता ऐकवल्या होत्या, पाणी पूरी खाल्ली होती तेव्हा त्याने लाथ मारल्याची चक्क आठवते, गोरा रंग यावा म्हणून प्रवाळपिष्टी किंवा सुवर्णमाक्षिक भस्म, मंडूर भस्म, केशर वगैरे दिलं होतं....! ;)

जे केलं ते मन लावून उत्तमच केले आहे, गोड मानुन पब्लिकवर सोडून द्यावे. कशाला हवीत स्पष्टीकरणे म्हणतो मी....! ;)

-दिलीप बिरुटे
(लंबर एकचा खोडसाळ आणि काड्या सारू)

अभ्या..'s picture

26 Oct 2017 - 1:07 pm | अभ्या..

ते कसंय ना सर, अपत्य लैच सिरियस झालंय, खानदानी देखणेपणा नाहीये म्हनून उगा हुर्हुर लागती हो काही जणांना.
डव्हाळ्यात काय कमी पडलं का? चाटवायला सोनं नव्हतं का? असल्या शंका येण्याआधी पोरगं बापाच्या गुणावर गेल्याचा निर्वाळा दिलेला बरा.
जे केलं ते मन लावून उत्तमच केले आहे, इतके जरी म्हणालाव तरी पावले म्हणायचे.
बाकी खूप काही स्पष्टीकरणे अन शंकानिरसनासाठी तुम्ही आहात तवर तर काही काळजी नाही बघा.

अभ्या, मुखपृष्ठ ग्रेट झालय. एरवी लेखनाला पूरक चित्र किंवा चित्राला पूरक लेखन पाहिलय पण हे मुपृ पाहताना लेखनाबद्दल अपेक्षा वाढल्यात.
क्या बात है!

स्रुजा's picture

21 Oct 2017 - 5:24 am | स्रुजा

+१११ अगदी, अगदी.

आणि पणत्या, फटाके, बॉर्डरी चा क्लिशे मोह ( तुला झालाच नसेल म्हणा) टाळल्याबद्दल खास अभिनंदन !

सिरुसेरि's picture

21 Oct 2017 - 10:41 am | सिरुसेरि

मस्त मुख्यपृष्ठ . साहित्यातील अनेक उन्हाळे , पावसाळे आणी चढ उतार अनुभवलेला कोणी पुराणपुरुष मिपा वाचकांकडे भेदक नजरेने बघत आहे असा काहिसा अर्थ सुचला .

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2017 - 11:10 am | श्रीरंग_जोशी

प्रथमदर्शनी दिवाळी अंकाचं वाटणार नाही असं मुखपृष्ठ खूप भावलं. काही तरी खोल अर्थ आहे असे जाणवते. काय ते मात्र अजुन कळले नाही.
काही तरी सामाजिक संदेश द्यायचा असावा अशीही शक्यता मनात येते.

या कलाकृतीला मानाचा मुजरा __/\__.

अभ्या, यू आर सिम्पली ग्रेट.

अत्युत्कृष्ट. पूर्णविराम.

Duishen's picture

21 Oct 2017 - 9:25 pm | Duishen

मुखपृष्ठ छान काढले आहे. चित्रकाराचे कौतुक!!!