सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...

Primary tabs

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
10 Oct 2017 - 3:12 pm

सध्या रोज संध्याकाळी येणार्या पावसावर मी केलेली कविता...

आता कशाला पावसा
तू उगाच कोसळतोस
उभी राहिली पिके ही
का त्यांना भिजवतोस

नक्षत्रे पावसाची सारी
संपली ती आता रे
सरला आश्विन आता अन्
आली आली दिवाळी रे

असा अवेळी तू येता
उडे खूपच धांदल
मेघ गर्जना विद्युत
काळे काळे हे बादल

नको रागाने बरसू
नको आणू रोगराई
दिवस सण उत्सवाचे
आहे लगबग घाई

निरोप घेऊन धरणीचा
पुढल्या वर्षी रे तू यावे
आगमन होईल शिशिराचे
तू आता उगी राहावे

-- शब्दांकित (वैभव दातार )

वाङ्मय

प्रतिक्रिया

किती सुंदर लिहीता तुम्ही, प्रत्येक ऋतुवर असं काव्य का नाही करत? उदा. लांबलेली थंडी, मुक्कामी राह्यलेला उन्हाळा असं काहीतरी?

चांगली आहे कविता. आवडली. एकूणच ऋतुचक्र बदलले आहे हे नक्की.

वैभवदातार's picture

11 Oct 2017 - 11:20 am | वैभवदातार

तुमच्या कंमेंट बद्दल आभारी आहे. मी उन्हाळ्यासाठी पण शीच कविता केली होती मे महिन्यात.

सूड's picture

11 Oct 2017 - 12:52 pm | सूड

वाह, टाका ना ती पण!!

वैभवदातार's picture

11 Oct 2017 - 7:20 pm | वैभवदातार

धरणीचे मनोगत हि कविता मी पोस्ट केली आहे.