उरल्या त्या फक्त आठवणी

RDK's picture
RDK in जे न देखे रवी...
23 Sep 2017 - 11:51 pm

सुखरूप आणि सुरक्षित अशा गावातून बाहेर पडलो
निघून आपल्या परिवारातून जगामध्ये आलो
नशीब आजमावण्या कठीण परिश्रमही केले
जगणे ना मजला कधीही कळाले

हसण्याचा आवाज माझाच माझ्या पडतोय कानी
जणू काही मलाच चिडवू पाहतोय
गाणी गायलेली शाळेतील माझ्या
माझ्या जखमांवर फुंकर घालताहेत

एकेक मित्र उडत येवून  हातांनी मोठा घेर बनवताहेत
बनून डोक्यातले विचारचक्र गरगर फिरताहेत
थंडीच्या दिवसातील थंडी उन्हाळ्यातही वाजतेय
"आजारी पडलो का ?" म्हणून  हात कपाळावर जातोय

उडता आले असते तर गावी उडून गेलो असतो
परतता आले असते  तर भूतकाळाला घट्ट बांधून ठेवले असते
भिंतीच्या कोपऱ्यात लपून बसावेसे वाटतेय
बाहेर पडले आहे ऊन कडक पण
कोनाड्यातील झोप हवीशी वाटतेय

मिळवून किती मिळवणार शेवटी होणार माती
हेच तथ्य डोळ्यासमोर फिरतेय
का कशासाठी जगतोय जर
जाणार हात रिकामेच

"जप हो बाळा" हा आवाज येतोय एका स्त्रीचा
हसण्याचा आवाज तर काही केल्या जात नाहीये
गायींच्या गळ्यातल्या नाजूक घंटांचा आवाज
पण मधेच येणारा कॉल तंद्री भंग करतोय

'बे -एक- बे' चा पाढा आठवतोय
आणि मस्त तीस पर्यंत जाताहेत
मधली सुट्टी कधी होईल म्हणून कान
घंटेच्या आवाजाकडे लागलेत

एकट्याने शाळेतून घरी जाण्याच क्षण
आठवता आठवत नाहीये
रमत गमत चालाण्याचेच क्षण आहेत सोबत
बाहेर खाल्येल्या बर्फाच्या गोळ्याची चव
अजूनही गेली नाहीये जिभेवरून

आज अबोला उद्या भांडण
मग पुन्हा एकत्र येणे ठरलेले
पण त्या अबोल्यातली गंमतही  काही औरच होती
पुन्हा गोड होण्याला वेळ लागायचा नाही तेव्हा
आतासारखी गंभीरता तेव्हा नव्हती

शाळेतल्या  मातीवर रंगायचा खेळ 'चिला-पाटी'चा
चिल्या मधल्या रेषेवर दिमाखात उभा राहायचा
कडक उन्हाचाही आस्वाद घ्यायचे सगळे
मग चिल्या  कधी शाउद व्हायचा ते कळायचेच नाही

मी खरच कुठला हा प्रश्न मोठा गहन आहे
याचे उत्तर कदाचित येणाऱ्या काळात मिळेल
घेईल कितीही वाकडीतिकडी वळणे
पण नदी तर शेवटी समुद्रालाच मिळेल

भूतकाळाची खोलून खिडकी जरा प्रकाश काळजात येऊ दिलाय
त्या प्रकाशात न्हाऊन निघालोय पूर्णपणे
भूताकालातला अंधारही येतोय
म्हणून खिडकी बंद करतोय
वर्तमानातला प्रकाश पुरेसा आहे

कविता