नासाच्या जवळी

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जे न देखे रवी...
14 Sep 2017 - 2:19 pm

(चाल : आजीच्या जवळी घड्याळ कसले..)

कवितेचा कालावधी - सन 1996

नासाच्या जवळी यान कसले आहे चमत्कारिक
पुढे पुढे ते जाते अचूक कोणास कसे ठावुक
त्याची पीरपीर चालते कधीतरी त्रास फार टाकते
परंतु मोठ्या ग्रहाजवळ जाऊनी माहिती ते आणते

गॅलिलिओ नाव ठाऊक असे मला तयाचे
गरगर फिरत स्वताभोवती माहिती सारखे पाठवते
तीन दोन एकच्या तणावात उडते ते पृथ्वीवरून
सरसर उंच जाऊन विराजते चंद्रापासून

आज इकडे तसेच उद्या त्या तिकडे जायता
पाठवते झरझर ते चित्रांच्या गंमती सदा
होऊनी गेली वर्षे पाठवूनी त्यास पत्ता कधी न लागला
संपत आले काम तयाचे पुढे ते जाई आता एकला

पायोनियर व्हॉयेजर ती पुढे शांतपणे गेली
पाठवत राहिली नवनवी माहिती अनंते विलीन झाली
तसेच होणार याचे असे मला वाटते
म्हणून मी म्हणतो अजुनी थोडे त्यास जगू दे

कविता

प्रतिक्रिया

वा! या विषयावर कवितादेखील होऊ शकते असे स्वप्नातही वाटले नव्हते. आता कॅसिनी अंतराळयानाच्या आजच्या शेवटच्या प्रवासाबद्दल कविता करा!