"शेंडी लावणे"

विदेशी वचाळ's picture
विदेशी वचाळ in जनातलं, मनातलं
3 Sep 2017 - 5:56 am

एखाद्याला किंवा एखादीला किंवा समस्त जनतेला, "शेंडी लावणे", हा बहुदा आपला सगळ्यांचा जन्म सिद्ध हक्क असावा. आणि तो तसा नसेल, तर जगातल्या सगळ्या लोकशाही देशात घटना दुरुस्ती करून मान्य करून घ्यावा, अशा एका निर्णयाप्रत आम्ही सध्या पोहोचलो आहोत. तसे असले अनेक निर्णय आम्ही तडकाफडकी घेत आणि सोडत असतो तेव्हा त्याचे फार मनावर घेऊ नये.

तर त्याचे झाले असे कि आमचे मन उगाचच भरकटत आमच्या विद्यार्थी जीवनात डोकावते झाले आणि आमच्या काळी आम्ही लोकांना आणि लोकांनी आम्हाला लावलेल्या शेंड्यांची आठवण झाली. तसा मी एका ख्यातनाम संस्थेत शिकायला होतो. ते थोडेसे टेकाडावर वसवलेले होते. आणि टेकाडाखाली एक अत्यंत गचाळ थिएटर होते. त्यात सहसा चांगले चित्रपट येत नसत. पण कधी मढी एखादा चांगला यायचा आणि थिएटर भाव खाऊन जायचे.

पण आमच्या वसती गृहात मात्र हे थिएटर जॅम धमाल मजावयाचे.

दोन चार नग संध्याकाळचे वेळ घालवायला चित्रपट पाहून येत असत. त्यांना आपण भिकार चित्रपट पहिला आहे हे नक्की कळलेले असायचे. पण आपणच वेडे हे जगाला कळेल ना. मग असे कसे चालेल ? म्हणून हे नग वसती गृहात त्या चित्रपटाची तोंड पहाटे पर्यंत स्तुती करीत असत. अशी कि ऐकणाऱ्याला वाटावे कि असा दुसरा चित्रपट झालाच नसावा. मग काय दुसऱ्या संध्याकाळी अनेक जण जात आणि चित्रपट पाहून येत. आपला "पोपट झाला" आहे हे त्यांना पण कळलेले असायचे. पण ते परत येऊन पुन्हा चित्रपटाची तारीफ करीत सुटत. एका आठवड्यात जवळ पास वसती गृहातले सगळे जण वेडावलेले असायचे. बर असे पण नाही कि चांगला चित्रपट येणारच नाही. मग ओळखायचे कसे कि हि चाललेली चित्रपटाची तारीफ आहे कि आपल्याला "शेंडी लावणे" आहे? अस्मादिकांनी असे चार तरी चित्रपट पाहिलेले आहेत ज्यांना फुकट पाहणे पण परत होणार नाही.

आता संस्था हुशार मुलांचीच होती. येणारे सगळेच हुशार असायचे. आमच्यासारखे काही "भालचंद्र" पण असायचे. हो भालचंद्र ही पण तेथलीच व्युत्पत्ती. "संस्थेचा शिक्का बसल्याशी कारण, हुशारी गेली खड्यात" असे संस्थेचा कपाळावर शिक्का मारून घेणारे ते भालचंद्र. तर सांगतो काय कि लोक विदेश गमनाची तयारी करत असत. त्यासाठी जी आर ई वैगेरे परीक्षा देत असत. आणि पासपोर्ट पण लागणार असायचा. मग त्याचे पण फॉर्म भरायचे. ह्या फॉर्म वर फोटो लागायचा. कोणीतरी "टूम " काढली . म्हणे "तुझा आजचा चेहरा आणि विदेशात जाण्याचा चेहरा, हा सारखाच असेल का ? " .
उत्तर स्वाभाविकच "नाही".
"मग तुला बाहेर जाऊ देणार नाहीत".

झाले चार नग लोकांनी सांगायला सुरुवात केली कि , अमक्या तमक्या मुलाला म्हणे एअरपोर्ट वरून परत पाठवले का तर म्हणे कि फोटोत दाढी होती आणि केस लांब होते . आणि आता दाढी पण नाही आणि केस जवळपास नाहीतच .

मग ह्यावर उपाय म्हणून फोटो काढायच्या आधी लोक आपापले डोकं आणि चेहरे भादरून घेत आणि फोटो काढत. अट्टल आंधळे लोक पण चष्मा ना घालता फोटो काढत. कहर म्हणजे जर का पास आऊट होताच बाहेर देशी जायचा चान्स मिळाला तर लोक एअरपोर्ट वर पण भादरुनच जात.

असे मिरांडा छाप चेहरे आठवले कि आत्ता पण भरल्या मीटिंग मध्ये हसू अवरेनासे होते हो.

असे कित्येक गमतीशीर किस्से आहेत. तुमचे पण सांगा. मजा येईल.

विदेशी वाचाळ

विनोद

प्रतिक्रिया

Ranapratap's picture

3 Sep 2017 - 10:02 am | Ranapratap

हा लेख म्हणजे वाचकांना शेंडी

गामा पैलवान's picture

3 Sep 2017 - 10:13 pm | गामा पैलवान

एकजण पहिल्यांदा ऑनसाईट चालला होता. मनीष म्हणूया त्याला आपण. तर आम्ही बनचुके लोकं मनीषला पिडंत होतो. मनीष, साल्या, तू कुठेतरी उभा राहशील आणि तुझं विमान चुकेल. माझं विमान आलंच नाही असं म्हणून बाहेर येशील. तुझा काय भरंवसा!

मनीषबुवा हादरले. चेहऱ्यावर अजीजीचा आणून अधिक माहिती विचारू लागले. तेव्हा अस्मादिक उद्गारले की अरे वेड्या, तू जरी अमेरिकेत पोहोचला नाहीस तरी चिंता नको. तुझं सामान जरूर पोहोचेल. कारण की तू ते आधीच चेकीन केलेलं असेल. तू पुढचं विमान पकडून जा.

यावर मनीषमहाराज अक्षरश: रडकुंडीस आले. मग एकजण म्हणाला की अरे मनीष तू सामानासोबत कार्गोनेच का जात नाहीस? पुढच्या वेळेस बुकिंगवाल्यांना तुझं कार्गो तिकीट बुक करायला सांग.

यानंतर इतका हशा उसळला की मनीषची खेचायचं सगळेच विसरले.

-गा.पै.

बाजीप्रभू's picture

3 Sep 2017 - 10:48 pm | बाजीप्रभू

:-):-):-):-):-):-)

पैसा's picture

3 Sep 2017 - 10:40 pm | पैसा

:)

बाजीप्रभू's picture

3 Sep 2017 - 10:46 pm | बाजीप्रभू

मिरांडा छाप चेहरे

म्हणजे काय?

ट्रेड मार्क's picture

5 Sep 2017 - 11:28 pm | ट्रेड मार्क

आमच्या टीममधला एक जण सिंगापूरला जाणार होता. व्हिसा वगैरे आला आणि प्रवासाच्या आदल्या दिवशी महाराजांनी गजनी कट केला. पहिलाच परदेश प्रवास असल्याने झाडून सगळे नातेवाईक विमानतळावर सोडायला आले होते. याच्या बरोबर कंपनीतले अजून एक मुलगा आणि एक मुलगी पण प्रवास करणार होते.

बोर्डिंग काउंटर वर गेल्यावर आमच्या गजनीचा चेहरा पासपोर्ट आणि व्हिसावरील फोटोशी जुळेना. म्हणून त्या ऑफिसरने नीट बघितलं तर नावात सुद्धा चूक निघाली. त्याबरोबर ऑफिसरने याच्या बरोबरचे दोघे पुढे गेले होते त्यांना सुद्धा परत बोलावून घेतलं. त्यांचे व्हिसा परत चेक करताना एकाच्या नावात चूक सापडली. मग काय दोघांनाही बाहेर काढलं.

दुसऱ्या दिवशी गजनी ऑफिसमध्ये दिसल्यावर म्हणतो आता मित्राकडे राहतोय. घरी हा प्रकार सांगितला नाहीये कारण एवढे जण सोडायला आले होते त्यामुळे सांगायची लाज वाटते.

पुढे व्हिसामधील चूक दुरुस्त झाल्यावर २-३ आठवड्यांनी महाराजांची रवानगी झाली. तोपर्यंत केसही वाढले असल्याने त्रास झाला नसावा.