अँड्रॉपॉज.... एक दुर्लक्षित विषय!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
28 Aug 2017 - 11:47 pm

अलीकडच्या काळात किमान शहरांमध्ये मेनोपॉज बद्दल हळूहळू चर्चेला सुरवात झाली आहे. स्त्रियांच्यात साधारण चाळीशी नंतर होणारे बदल; त्यांचे ऋतुचक्र बदलणे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याची अलीकडे काही प्रमाणात दखल घेतली जात आहे; आणि हे चित्र समाधानकारक आहे यात प्रश्नच नाही.   पण ज्याप्रमाणे मेनोपॉजबद्दल मोकळेपणी बोलले जाते त्याचप्रमाणे अँड्रॉपॉज देखील थोडी चर्चा झाली पाहिजे. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषदेखील या विशिष्ट शारीरिक आणि मानसिक संक्रमणातून जात असतात.

अँड्रॉपॉजचे कारण पुरुषांमधील hormone testosterone कमी होणे हे असते. अर्थात हे टेस्टोस्टेरोन कमी होणे हा वाढत्या वयात शरीरात होणारा नैसर्गिक बदल असतो. काही मतांप्रमाणे हे टेस्टोस्टेरोन साधारणपणे वयाच्या तिशीनंतर प्रत्येक दशकात दहा टक्यांनी कमी होत असते. काही अभ्यासकांच्या मते साधारणपणे वयाच्या पन्नाशीमध्ये तीस टक्के पुरुष कमी होणाऱ्या टेस्टोस्टेरोनच्या प्रमाणामुळे अँड्रॉपॉज अनुभवतात. यामुळे अनेकजण शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवतात. अँड्रॉपॉजचा परिणाम अनेक प्रकारे होऊ शकतो. शक्ति कमी होणे, mood swings, चीडचीडेपणा, hot flashes, अस्वस्थपणा, depression, अतिरिक्त वजन वाढणे (पोट सुटणे), स्मरणशक्ती कमी होणे, केस गळणे आणि शरीरसुखाची इच्छा कमी होणे असे काही ठळक बदल पुरुषांना जाणवतात. टेस्टोस्टेरोन  कमी होण्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे किंवा हाडांची ठिसूळता वाढणे हे काहीसे सिरीयस त्रास देखील होऊ शकतात. 

यावर योग्य प्रमाणात व्यायाम करणे, योग्य आहार घेणे हे उपाय प्रत्येक डॉक्टर सांगतात. त्याशिवाय डॉक्टर्सच्या सल्ल्याने टेस्टोस्टेरोन replacement देखील करता येते. अर्थात हे सगळे उपाय आपण विविध माध्यमातून वाचू किंवा समजून घेऊ शकतो. 

मात्र मेनोपॉज काय किंवा अँड्रॉपॉज काय हे स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारे शारीरिक आणि पर्यायाने मानसिक बदल आहेत. जे वयापरत्वे होणारच आहेत. यावर डॉक्टर्सकडून मदत घेणे, योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेणे हे उपाय तर आहेतच. पण त्याचप्रमाणे एक चांगली lifestyle सुरु करणे हे आहे. कारण जर सुदृढ मन असेल तर शरीरात होणारे बदल आणि त्यामुळे होणारे त्रास सहन करणे कदाचित् थोडे सोपे जाईल. 

सर्वसाधारणपणे वयाच्या चाळीशी किंवा पंचेचाळीशीपर्यंत स्त्री-पुरुष दोघांनी त्यांच्या एकूण करियरमध्ये बऱ्यापैकी जम बसवलेला असतो. मुलं देखील तशी मोठी झालेली असतात. पण तरीही सतत पुढे पळण्याची इच्छा प्रत्येकातच असते. मग अजून चांगले काम... पुढची पोस्ट मिळवण्यासाठीची मेहेनत... यामुळे एक चांगले आयुष्य जगण्याचे राहून जाते आहे हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. लग्नानंतरचे गुलाबी दिवस सगळेच अनुभवतात. मग कधीतरी मुलं होतात आणि प्रपंच वाढतो. करीयरची घोडदौड आणि घरच्या वाढत्या जवाबदाऱ्या यामुळे जगणे मात्र राहून जाते. वर्षातून एकदा कुटुंबाला एक झकास टूर करून आणली की जवाबदारी संपली असा काहीसा दृष्टीकोन होतो. 

हळूहळू वाढत्या वयाबरोबर मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रोल वाढणे हे जगजाहीर आजार दोस्ती करायला लागतात. एकूणच वाढणाऱ्या ताणामुळे चिडचिड, अस्वस्थता वाढते. यातून एकमेकांना समजून घेणे कमी होते आणि मग संसार चालू राहातो पण मनं कायमची दुखावली जातात. याचं एक महत्वाच कारण म्हणजे मेनोपॉज आणि/किंवा अँड्रॉपॉज हे आहे; हा विचार मात्र कोणी करत नाही. पण जर खरच चाळीशी नंतर आपल्यात होणारे बदल आपण समजून घेऊन आपल्या साथीदाराबारोबरचा संवाद वाढवला आणि लहान लहान गोष्टींमधून आयुष्यातला आनंद मिळवायला लागलो तर कदाचित् आयुष्य जास्त सुंदर आणि परिपूर्ण असेल.

त्यामुळे एकमेकांबरोबर वेळ घालवणे, थोड्या अवांतर गप्पा मारणे जास्त महत्वाचे आहे. आपण तरुण वयात आठवणीने एकमेकांच्या आवडी लक्षात ठेऊन एकमेकांना गिफ्ट्स देतो. तेच वयाच्या पंचेचाळीशीनंतर करायला काय हरकत आहे. पत्नीला/पतीला I LOVE YOU या वयात म्हणून तर बघा... मुरलेल्या लोणच्या प्रमाणे त्याची चव ओठांवर रात्रभर रेंगाळेल. 

विचार

प्रतिक्रिया

हा धागाही तसा दुर्लक्षित राहिला. असो.

विषय गंभीर आहेच. पण मेनोपॉजप्रमाणे अँड्रॉपॉजची लक्षणे तितक्या चटकन ओळखू येणं हे त्या पुरुषालादेखील शक्य होत नसावं. स्त्रियांचं प्रजननक्षम होणं हे जसं पहिली पाळी येते ह्या घटनेनं सुरू होतं आणि पाळी यायची बंद होते ह्या घटनेनं संपतं त्याप्रमाणे पुरुषांच्या आयुष्यात सरळ जाणवतील अशा 'घटना' अँड्रॉपॉजमध्ये घडत नसाव्यात. हा बदल त्यामानाने हळूहळू होतो. अर्थात यावर वैद्यकीय तज्ज्ञ जास्त प्रकाश टाकू शकतील.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

29 Aug 2017 - 5:36 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

ॲंड्रोपॉज एक सुडोसायंटीफीक गोष्ट आहे.टेस्टोस्टीरॉन कमी होत जाते हे खरेच पण त्याच बरोबर ॲन्ड्रोजन रिसेप्टर्स सेन्सीटिव्ह होत जातात.त्यामुळे कमी झालेले टेस्टोस्टीरॉनही परिणाम साधते.
ॲन्ड्रोपॉज हा निओफेमिनिस्टांनी फेकलेली पुडी आहे.
पुरुष आयुष्यभर स्पर्म तयार करत असतो.

टेस्टोस्टीरॉन कमी होत जाते हे खरेच पण त्याच बरोबर ॲन्ड्रोजन रिसेप्टर्स सेन्सीटिव्ह होत जातात.त्यामुळे कमी झालेले टेस्टोस्टीरॉनही परिणाम साधते.
इतकं साधं सहज आणि सोपं नसतं हो.

डॉक्टर साहेब,

तुम्ही या विषयांवर लिहिलं तर हे आम्हाला समजायला साधं, सहज आणि सोपं होईल अशी मला खात्री वाटते.

चामुंडराय's picture

30 Aug 2017 - 2:58 am | चामुंडराय

टफि,

जल्ला काय बी कल्ला नाय.

सुडोसायंटीफीक काय, रिसेप्टर्स काय, निओफेमिनिस्ट काय, पुडी काय अन काय...

पैसा's picture

29 Aug 2017 - 6:30 pm | पैसा

असे काही असते आणि ते आपल्याला होऊ शकेल हे स्वीकारणे बरेचजणांना कठीण जात असावे.

मराठी कथालेखक's picture

29 Aug 2017 - 6:37 pm | मराठी कथालेखक

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि इतर भौतिक गोष्टींत (गाडी, बंगला, भटकंती, उच्च राहणीमान, पार्टी वगैरे) मन गुंतल्याने तसाही प्रणयातला रस कधीच निघून जातो..लग्नानंतरचा थोडा काळ सोडला तर त्यानंतर प्रणय एक उपचार बनून जातो.. त्यामुळे ॲंड्रोपॉज झाला काय किंवा न झाला काय सारखंच !!

जव्हेरगंज's picture

29 Aug 2017 - 7:15 pm | जव्हेरगंज
ज्योति अळवणी's picture

30 Aug 2017 - 12:44 am | ज्योति अळवणी

आपल्या सर्वांच्या प्रतिसादांना धन्यवाद

ज्योती ताई,

तुमच्या मेनोपॉजच्या धाग्यावर मी लिहिलं होत कि स्त्रियांच्या मेनोपॉज बद्दल जेव्हढं लिहिलं, वाचलं किंवा बोललं जातं तेव्हढं पुरुषांच्या अँड्रोपॉज बद्दल होत नाही.
अँड्रोपॉज हा मेनोपॉज इतका शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर नाट्यमय नसतो आणि त्याचा कालावधी देखील खूप जास्त असतो त्यामुळे कदाचित असं होत असावे.

एक मात्र खरं, मिपा वरच्या डॉक्टर मंडळींनी या विषयावर लिहायला हवे. या निमित्ताने अँड्रोपॉजची कारणे, परिणाम आणि त्याला कसं सामोरं जायचं याबद्दल मिडॉं कडून जाणून घ्यायला आवडेल.

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2017 - 8:34 am | ज्योति अळवणी

अगदी खरं चामुंडराय जी,

मी केवळ उत्सुकतेपोटी माहिती वाचली. त्यातून मला जे समजलं ते इथे दिल आहे. मुख्य म्हणजे मानसिक तणाव, चिडचिडेपणा यातून भावना दुखावल्या जातात आणि नाती दुरावतात; हे मला अधोरेखित करायचं आहे. मी family councelling विषयाचा एक वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अर्थात या अभ्यासक्रमात असे विषय फक्त सांगितले जातात. त्यावर डॉक्टर जास्त योग्य आणि अधिकाराने सांगतील. मी केवळ भावनिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्याकडे अनेक चांगले डॉक्टर्स आहेत. मला खात्री आहे कोणी ना कोणी लिहितीलच

प्रकाश घाटपांडे's picture

30 Aug 2017 - 9:10 am | प्रकाश घाटपांडे

डॉ सुबोध खरे यांच्या सुबोध प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत. खर तर त्यांनी यावर वेगळा धागा काढावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2017 - 3:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ सुबोध खरे यांच्या तपशीलवार प्रतिसादाच्या प्रतिक्शेत.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

30 Aug 2017 - 8:30 pm | सुबोध खरे

अँड्रोपॉज
मेनो म्हणजे महिना आणि पॉज म्हणजे थांबणे.मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी थांबणे.
पुरुषांमध्ये मासिक पाळीच येत नाही मग ती थांबणार कशी? म्हणजे मग अँड्रोपॉज आहे कि नाही? याबद्दलच बरेच मतभेद आहेत.
मुळात स्त्रियांची पाळी पाहिल्यान्दा येणे(रजोदर्शन) आणि पाळी कायमची थांबणे(रजोनिवृत्ती) हे एक "दृश्य" असा प्रसंग/ घटना असते. पुरुषाच्या बाबतीत ते हळूहळू वर जाणारे आणि हळूहळू खाली येणारी घटना असते त्यामुळे नक्की अँड्रोपॉज केंव्हा होतो हे मुलगा वयात कधी आला हे सांगणे कठीण आहे तसेच आहे. साधारण आवाज घोगरा झाला मिसरूड फुटू लागलं कि मुलगा वयात येऊ लागला असे मानले जाते पण हा बदल काही महिन्यांवर किंवा वर्षावर होतो. मुलींना एकदम एका दिवशी पाळी येते असे होत नाही.
क्रमशः

त्याच लग्नाच्या बायकोचा कंटाळा येणे यास अँड्रोपॉज म्हणत नसावेत ना? कोणी काहीही नवीन शब्दप्रयोग सुरू करतो.

मराठी कथालेखक's picture

30 Aug 2017 - 11:32 pm | मराठी कथालेखक

:)
झालंच तर 'कामा'चा कंटाळा येवू लागला की त्यालाही अँड्रोपॉज म्हणत असावेत

माझीही शॅम्पेन's picture

1 Sep 2017 - 12:18 pm | माझीही शॅम्पेन

लोकांना कामाचं कंटाळा नसतो हो , कामाच्या पूर्वतयारीचा आणि कामगाराला कारखान्या पर्यंत आणण्याचा जाम कंटाळा असतो :)

त्याच लग्नाच्या बायकोचा कंटाळा येणे यास अँड्रोपॉज म्हणत नसावेत ना? कोणी काहीही नवीन शब्दप्रयोग सुरू करतो.
परदेशात लकवा यास मोटर बिघडली म्हणतात तसं काही असावं.

टेस्टोस्टेरोन कमी होणे हा वाढत्या वयात शरीरात होणारा नैसर्गिक बदल असतो परंतु काही संशोधकांच्या मते मागील वीस वर्षांच्या तुलनेत हल्ली पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन कमी होण्याचे प्रमाण २०% नी वाढले आहे. तसेच प्रत्येक ४ पुरुषांमधील एकाचा टेस्टोस्टेरोनचा स्तर हा सरासरी पेक्षा कमी असून अगदी पंचविशीतल्या तरुणांमध्येही ही समस्या आढळून आली आहे व बदलती लाईफ स्टाईल सुद्धा ह्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे.
टेस्टोस्टेरोनच्या वाढीसाठी आहारात भरपूर सॅच्युरेटेड फॅट्स आणि प्रोटिन्स चा समावेश आणि अतिरिक्त फॅट्स बर्निंग साठी व्यायाम केल्यास नक्कीच फायदेशीर ठरते असा निष्कर्षही काढण्यात आल्याचे वाचनात आलेले आहे.
अर्थात मिपा वरील तज्ज्ञ डॉक्टर्स ह्यावर अधिक प्रकाश टाकतीलच...