शेती बरोबरच वेळ जाण्यासाठी काय कामधंदा करावा?? काहीतरी सूचवा!!!!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
23 Aug 2017 - 5:28 pm

मी शेती करतो व त्यावर माझ्यापुरता चरीतार्थ चालवतो.सातारा शहराजवळच आमचे शेत असल्याने मला शेतात राहवे लागत नाही.आठवड्यातून दोन तीन चकरा होतात तेव्हढेच.शेतात पुर्वी गहू ,ज्वारी,मका हे पीक वडील घेत होते.गहू ज्वारी घरी खायला व्हायची.पण आजकाल असल्या भुस्कट पिकाच्या फंदात कोणच पडत नसल्याने आम्हीही उस हेच पीक घेतो.उसाला एकदा पक्की बांधणी (लागणीनंतर चार पाच महीन्याने) झाल्यानंतर फक्त पाणी द्यायला लागते.त्यासाठी एक माणूस ठेवला आहे.
तर!!! मी आठवड्यातले पाच दिवस रिकामटेकडाच असतो.पुर्वि मित्र असायचे त्यांच्यामुळे वेळ जायचा .पण सातारा एमआय्डीसीचे बारा वाजल्याने बरेच मित्र पुण्यात व काही परदेशात आहेत.इंटरनेटचे मला खूप आकर्षण होते ,अजुनही आहे.सुरवातीला वेळ चांगला जायचा नेटमुळे पण सध्या माझा वेळ जाता जात नाही.घर खायला उठते.बाहेर बोंबलत कीति फिरनार ,मग नेटवर काही कुचाळक्या करणे,एकटाच ट्रेकला जाणे असले खर्चिक उद्योग करत बसतो.माझे हे उद्योग आता खिशावरही ताण टाकत आहेत.माझे दिवसाला दहा सिगरेटचे प्रमाणही जैसे थे आहेच.(यावर एक धागा काढला होता)
मला काम करायचे आहे ,असे काहीतरी काम ज्याने वेळ जाईल आणि बर्यापैकी पैसे मिळतील.व नवीन मित्र जोडता येतील.पण मला सोशल फोबीया आहे,म्हणजे मला कामाच्या ठीकाणी भीती वाटते,मुल्यांकनाची(performance anxiety)प्रचंड भीती वाटते.पण यावर ट्रीटमेंट चालू असल्याने यावर कंट्रोल आहे.माझे शिक्षण बीएस्सी इतके झाले आहे.वय तीस आहे.
तर काय करता येईल मला?
पब्लिक रिलेशन जॉब अर्थातच नकोय. असे कोणतेतरी काम मला सूचवा जेणेकरुन् महीण्यातले वीस बाविस दिवस बसून राहणे कमी होईल.व्यवसाय सूचवला तरी चालेल.धन्यवाद.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

23 Aug 2017 - 5:38 pm | आदूबाळ

अवांतरः

सातारा एमआय्डीसीचे बारा वाजल्याने

सातारा एमायडीसीचे बारा का वाजलेत? काय झालं?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Aug 2017 - 5:45 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

एकही चांगली कंपणी नाही.आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांना घेतात.

पैसा's picture

23 Aug 2017 - 5:51 pm | पैसा

एखादे लहानसे जनरल स्टोर चालवा.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Aug 2017 - 6:03 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

Are you serious about it?>>>>by all means paitai

आदूबाळ's picture

23 Aug 2017 - 6:10 pm | आदूबाळ

+१

तुमच्या अंतर्मुख स्वभावावरही अनायसे इलाज होईल.

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Aug 2017 - 6:11 pm | माम्लेदारचा पन्खा

वेगळा धंदा कशाला पाहिजे ??

अवांतर - कमिशन बेसिसची कामं घेऊन बघा . . . .

साहना's picture

23 Aug 2017 - 6:20 pm | साहना

आठवड्याला किती तास काम करण्याची इच्छा आहे आणि (आठवड्याला) साधारण किती पैसे कमावण्याची अपेक्षा आहे ?

चाणक्य's picture

23 Aug 2017 - 6:21 pm | चाणक्य

काही नवीन प्रयोग करता येईल काय ? एखादे नवीन पीक किंवा कमी पाण्यात शेती किंवा आॅर्गॅनिक वगैरे. आॅर्गॅनिक भाजीपाल्याला मागणीही असावी. घरपोच वगैरे दिली तर सोने पे सुहागा. देशी गायी वगैरे प्रकारांचाही विचार करायला हरकत नाही. ए१ टाईप दुधाची मागणी हळूहळू उच्चवर्गीयांमधे मूळ धरू लागली आहे असे एेकिवात आहे. शहानिशा करायला लागेल. शक्यतो शेतीशी संलग्न काही केलेत तर तुमचा अनुभव, आेळखी यांचा उपयोग होईल असे वाटते.

अभ्या..'s picture

23 Aug 2017 - 6:40 pm | अभ्या..

सेतू केंद्र काढा
महा ई सेवा केंद्र काढा
एसबीआय सध्या छोटे ग्राहक सेवा केंद्र चालवायला देते ते काढा
ऑनलाईन रिचार्ज सेंटर काढा
नेट कॅफे सोबत हे सगळे धंदे करता येतात सोबत बारकी कॅम्प्युटर इन्स्टिट्युट टाकून तिथं एमएससीयटी आणि डीटीपी कोर्सं शिकवा.
बचत गट काढा
कलर प्रिंटर टाकून झेरॉक्स, आधार, पॅन असले करायला एक होतकरु पोरगं बसवा.
दोन क्रुझर आणि इंडिका काढून भाड्याला लावा.
संध्याकाळी निवांत एकच कॅन्टीन पकडायचे. एकच जागा, एकच ऑर्डर, एकच वेळ असे नियमीत २ महिने करायचे. आपोआप पब्लिक रिलेशन्स बनायला सुरवात होते. मग तुम्ही हळूहळू लोकं जमायला लागतेत, सुरुवातीला श्रवणानंद घ्यायचा, हळूहळू तुमचे धागे असतात तशा विषयाच्या पुड्या सोडून द्यायच्या. एक ना एक दिवस समाजसेवक म्हणून तर मिरवाल नाहीतर लोकप्रतिनिधी म्हनून तरी.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Aug 2017 - 7:03 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

दोन क्रुझर आणि इंडिका काढून भाड्याला लावा>>>>
आयडीया काही वाईट नाहीए.धन्यवाद

Ranapratap's picture

23 Aug 2017 - 7:18 pm | Ranapratap

राजकारणात या तसेही सातारा शहरात दोन महाराजा शिवाय दुसरा नेता नाही.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Aug 2017 - 7:28 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

या साठी मला आधी रोज दारु पिऊन टाईट व्हायची सवय लावून घेतली पाहीजे.

Ranapratap's picture

23 Aug 2017 - 7:40 pm | Ranapratap

सिगारेट सुटायला मदत होईल

चष्मेबद्दूर's picture

23 Aug 2017 - 7:39 pm | चष्मेबद्दूर

उदाहरणार्थ जर्मन, चिनी, फ्रेंच. भाषा शिकण्यात आणि त्यात प्रावीण्य मिळवण्यात एखादं वर्ष आणि 60 एक हजार रुपये जातील पण त्यानंतर किंवा दरम्यान सुद्धा भाषांतराची कामे घेता येतील. तसही तुम्हाला इंटरनेट ची आवड आहे आणि घरबसल्या पैसे सुद्धा मिळतील.

अभिदेश's picture

23 Aug 2017 - 7:41 pm | अभिदेश

आत्ता कळलं तुम्ही एवढे सगळे निरर्थक धागे का काढता ते....वेळ घालवण्याचा उत्तम मार्ग.

जयंत कुलकर्णी's picture

23 Aug 2017 - 7:46 pm | जयंत कुलकर्णी

सातारा शहराचे सगळ्यात चांगले हे आहे की ते एक शहर आहे आणि पुण्यासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या जवळ आहे.
१ सातारा विभागात मला वाटते हळद, आल्याचे पीक प्रचंड होते. या दोन पीकांवर एखादी फूड इंडस्ट्री सहज चालेल. किंवा आल्याची पावडर करणे हाही एक चांगला उद्योग आहे.
२ अंजिराची शेतीही तशी जवळच आहे. सुकी अंजीर करण्याचा गृह उद्योगही करता येण्यासारखा आहे.
३ शिवाय आल्याची वाईन करणे हाही एक चांगला उद्योग आहे. तुमच्याकडे साखरही आहे मग तर काहीच प्रश्र्न नाही. तुमच्या वाटेला जी साखर येते त्यात बर्‍यापैकी वाईन तयार होऊ शकेल. याचा फक्त एक कोर्स करावा लागेल मिटकॉन मधे. म्हणजे तो केलेला बरा.
४ विक्री व्यवस्थेबद्दल तुम्ही विचारल्यावर सांगेन किंवा त्या वेळेस सांगेन.
५ ऑर्गॅनिक हळद आजकाल फार वापरली जाते. ती शेतकर्‍याकडून घेऊन तुमच्या नावाने पॅक करून पुण्यात विकता येईल

जयंतकाका, फार उत्तम प्रतिसाद..
ही आयडिया देतो एका मित्राला..

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2017 - 8:16 pm | श्रीगुरुजी

शेतात उसाच्या फडात मध्यभागी थोडी मोकळी जागा आहे का?

अभिदेश's picture

23 Aug 2017 - 8:22 pm | अभिदेश

गुर्जी काय विचार आहे?

सुबोध खरे's picture

23 Aug 2017 - 8:33 pm | सुबोध खरे

त्यांचं(ट फि) लग्न झालेलं नाही. बाकी तुम्ही समजून घ्या

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2017 - 9:04 pm | श्रीगुरुजी

LOL

हॅतिज्यायला, मला वाटले गांजा बिंजा लावा म्हन्तात की काय.

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2017 - 9:03 pm | श्रीगुरुजी

समझनेवालोंंको इशारा काफी है.

वरुण मोहिते's picture

23 Aug 2017 - 8:23 pm | वरुण मोहिते

तर सल्ला देणार का ?? का त्यांचे त्यांनीच समजायचे ?

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2017 - 9:02 pm | श्रीगुरुजी

जागा तासावर भाड्याने देता येईल.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Aug 2017 - 9:08 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

श्रीगुरुजी,तुमच्याशी मतभेद असले तरी व्यक्तीगत आदर आहे.तो गमावू नका!

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Aug 2017 - 8:53 pm | अमरेंद्र बाहुबली

सातारा शहराच्या आजूबाजूला अनेक पवनचक्क्या आहेत. मी ही पवनचक्की वरच काम करतो. हवं तर तिथे कामाची सोय करून देतो. बोला.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Aug 2017 - 9:09 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

धन्यवाद ,संपर्क करेन .

खेडूत's picture

23 Aug 2017 - 9:22 pm | खेडूत

इंट्रेस्टिंग!
पवनचक्की या विषयावर- चालते कशी, कामाचे स्वरूप, उलाढाल, अर्थिक भाग हे काय असते ते सवडीने सविस्तर लिहा एकदा!
नाहीतर आपोआप वार्‍याने वीज निर्माण होते म्हणजे उसासारखं निवांत काम आहे असं वाटू शकतं आमच्यासारख्या गाववाल्यांना..

हां मला पण हे समजून घ्यायचं आहे.

मला वाटतं असं असावं: सरकारी सब्सिडी वापरून आणि स्वतःचे पैसे टाकून एक कंपनी पवनचक्क्यांचं शेत तयार करते. (त्यासाठी जागा शेतकर्‍याकडून लीजवर घेत असावी.) निर्माण होणारी उर्जा ग्रिडला विकते. त्याबदल्यात एमेशिबी कॅश द्यायच्या ऐवजी तेवढ्या रकमेची विजेची क्रेडिट्स देत असावी. (म्हणजे मी एमेशिबी असतो तर असं केलं असतं.) ती क्रेडिट्स कंपनी कारखान्यांना विकत असावी. शिवाय ग्रीन एनर्जी निर्माण केल्याबद्दल वेगळी कार्बन क्रेडिट्स मिळत असावीत, तीही विकता येतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Aug 2017 - 9:43 pm | अमरेंद्र बाहुबली

हो बरोबर! खेडुत साहेब व आदुबाळ सर! मी लवकरच पवनचक्की वर संपुर्ण माहिती देणारा लेख लिहीतो.

वरुण मोहिते's picture

23 Aug 2017 - 9:43 pm | वरुण मोहिते

काम करता का???

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Aug 2017 - 9:45 pm | अमरेंद्र बाहुबली

आधी होतो. आता बदलली. दुसरी कंपनी देखील पवनचक्क्यांचीच आहे. मला पवनचक्क्यां बद्द्ल माहिती शेअर करायला आवडेल. त्यासाठी मीपासारखी दुसरी जागा नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Aug 2017 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

याबाबत कुतुहल आहे. तुमच्या माहितीपूर्ण लेखाची प्रतिक्षा आहे !

सुचिता१'s picture

24 Aug 2017 - 12:06 am | सुचिता१

असं कुणी रिकामं / कामाशिवाय राहु शकतं, यावर विश्वास बसत नाही .
तुम्ही खरच काही करत नाही की उगीच शतकी प्रतीसादा साठी धागा काढला आहे ?

वाल्मिकी's picture

24 Aug 2017 - 12:29 am | वाल्मिकी

ब्लॉगिंग करा

Ram ram's picture

24 Aug 2017 - 6:03 am | Ram ram

मलाही प्रचंड फोबिया असल्याने मी सरकारी नौकरी सोडली वर्ष झाले घरी बसुन पण काही काम करायला मन धजत नाही.

सुबोध खरे's picture

24 Aug 2017 - 9:42 am | सुबोध खरे

हायला
मग सरकारी नोकरीत काम "करत" होतात कि काय?
मला काम करायचे होते म्हणून मी सरकारी नोकरी सोडली.
हलके घ्या हो.
सुबोध ( एक माजी सरकारी नोकर)

Ram ram's picture

25 Aug 2017 - 3:36 am | Ram ram

Subodh ji I like it.

कुंदन's picture

25 Aug 2017 - 9:41 am | कुंदन

मका जरा कमी खात जा

गुरूप्रसाद बाचल's picture

25 Aug 2017 - 2:44 pm | गुरूप्रसाद बाचल

आठवड्यातून फक्त पाच दिवस वेळ द्या.शनिवार रविवारी स्वतः साठी ठेवा