श्री महेश गिरी आणि श्री विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे अभिनंदन.

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
1 Aug 2017 - 11:27 pm

वर्षां पासून "शिक्षणाचा अधिकार कायदा" रद्दबातल करावा आणि ९३वी घटनादुरस्ती रद्दबातल करावी ह्यावर आमचे बरेच काम चालू आहे.

ह्या संसदीय सत्रांत ह्या दृष्टीने बरीच प्रगती झाली (थोडी का असेना पण प्रगती आहे).

भाजपचे श्री महेश गिरी ह्यांनी खाजगी बिल आणून ९३वी घटनादुरुस्ती रद्दबातल करण्याची मागणी केली.

http://www.sadhana108.com/2017/07/23/mahesh-giri-bjp-shows-courage-no-one-mantris/

आज श्री विनय सहस्त्रबुद्धे ह्यांनी "शिक्षणाचा अधिकार कायदा" ह्यातील धार्मिक भेदभावाबद्दल मौन बाळगले असले तरी किमान बजेट खाजगी शाळांवर होणारा प्रतिकूल परिणाम ह्यावर बोलण्याचे धाडस दाखवले

http://vinaysahasrabuddhe.in/Video-View?id=5098

अजून पर्यंत सदर विषयापासून १० फुटांचे अंतर बाळगणाऱ्या पक्षांत किमान समस्या समजून घेण्याचे कष्ट घेतल्याबद्दल दोन्ही मेम्बरांचे अभिनंदन करावे असे वाटत आहे.

समाजविचार

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

2 Aug 2017 - 11:01 am | अनुप ढेरे

उत्तम प्रस्ताव. अभिनंदन सहस्रबुद्धे यांचं.

सत्या सुर्वे's picture

3 Aug 2017 - 11:53 am | सत्या सुर्वे

सहस्त्रबुद्धे ह्यांचे अभिनंदन. महेश गिरी ह्यांच्या धाडसाला दाद द्यावीशी वाटतेय. खरे तर हे प्रस्ताव मानव संसाधन मंत्र्या कडून यायला पाहिजे होते.

गामा पैलवान's picture

3 Aug 2017 - 12:51 pm | गामा पैलवान

श्री. महेश गिरी आणि श्री. विनय सहस्रबुद्धे यांचं यशस्वी लढा दिल्याबद्दल अभिनंदन. यांच्यासारखे जागरूक नागरिक जनतेचा आधार आहेत.

-गा.पै.