हृदयांतर

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
28 Jul 2017 - 9:58 pm

हृदयांतर
.

एक मुलगी लहान असताना(अडीच तीन वर्षाची) आजारी पडते. आई वडील तिच्या टेस्ट करून घेतात. ब्लड कॅन्सर डिटेक्ट होतो. उपचार होतात. सर्व गोष्टी नियंत्रणात येतात. व्यवस्थित शाळा स्पोर्ट्स ग्राऊंड सुरु होते. मधल्या काळात तिला एक लहान बहीणही होते.
वडील या मुलीची शक्य ती सर्व काळजी घेत असतात. तिला देशाबाहेर फिरायलाही नेतात. तिचा आहे तो काळ आनंदाचा जावा यासाठी. परत येतात तोच काही महीन्यांनी आजारपणाची लक्षणे दिसायला लागतात. आजार उलटलेला असतो. मग हॉस्पिटलमधे दाखल व्हावे लागते. पण हे हॉस्पिटल म्हणजे नामांकित वन-वे असतो. तिथे गेलेला पेशंट परत येत नाही. म्हणूनच लोक म्हणतात वैकुंठाची नाही वाटत एवढी त्या हॉस्पिटलची भिती वाटते.
असो. तर खरी घडलेली स्टोरी अशी. पण तिला मागे आणि पुढे इतकी शेपटे लावली आहेत की कथा कुठून उचलली आहे याची शंकाच येऊ नये. तर असा सुरु होतो हृदयांतर- हृदय परिवर्तन.

वर वर जगाला छान दिसणारे जोडपे. दोन गोड मुली. तो हॉटेल बिझिनेसमधे अत्यंत यशस्वी. तीही कुठेतरी हौशी नोकरी करणारी. सकाळी मुलींचे आवरावे, त्यांना शाळेत सोडावे. येताना घेऊन यावे इ. सुरु असते. तो मात्र भयंकर बिझी. कामावरून रात्री घरी आला तरी ऑफीसचे फोन सुरुच. घरातल्यांशी नीट बोलताही त्याला येत नसते. हिला प्रश्न पडतो. मी एकटीनेच का करायचे हे सगळे. मुली याच्या पण आहेत ना ? घरातल्या कुठल्याच गोष्टीत त्याची इन्वॉल्वमेंट नाही. हेच तिला डाचत असते. मग आपण एका छताखाली तरी का रहायचे ? मग घटस्फोटासाठी अर्ज केला जातो. शेवटी तो मिळतोही. मधल्या काळात ही आजारपणाची कथा. त्याच्या आगेमागे घटस्फोटाचा अर्ज आणि घटस्फोट मंजूर ही शेपटे जोडली आहेत. बाकीही अनेक मुलामे दिले आहेत जेणे करून सोर्स सत्य घटनेचा पत्ताच लागू नये. यातले लोक मराठी असले तरी मधे मधे इंग्लिश, हिंदी, हिंग्लिश बोलताना दाखवले आहेत. त्यमुळे बर्थडे, मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरी साजरे करणे इ सुरु असते. छोट्या मुलीही अधून मधून इंग्लिशमधेच व्यक्त होतात. यांची आज्जीही त्या मुलींना भिती वाटली तर भीमरुपी नाही तर हनुमान चालिसा म्हणायला शिकवते. असे अनेक मुलामे दिले आहेत. मुलगी आजारी पडल्यावर मात्र तो घराकडे मुलींकडे लक्ष द्यायला लागतो, बाप म्हणून जबाबदारी पार पाडायला लागतो. त्यात मुलींच्या बरोबर त्यांच्यासाठी एकदा स्वयंपाक करतानाही दाखवला आहे. ते त्याला जमत नाही मग पत्नी म्हणते जाऊ दे राहू दे मी करते. हॉटेल बिझनेसमधे मग हा नेमकं काय करतोय ? प्रत्यक्ष आचारी कामात नसावा. त्यामुळे हे मुलामे सोडले तर हा श्वासच आहे फक्त आजारपण वेगळे. मुलींची कामे अत्यंत सुंदर आहेत. मुक्ता बर्वे ठीक, सुबोध भावे पाट्या टाकल्यात. डॉक्टर लोक डॉक्टर वाटणार नाहीत याची पुरेशी काळजी घेतली आहे. मुलीला आवडणारा क्रिश-हृतिक रोशन मधेच दर्शन देऊन जातो. मुलगी खूश होउन जाते. असं आहे एकूण !

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

29 Jul 2017 - 9:34 am | सिरुसेरि

हि तर काशची स्टोरी वाटते आहे .

आशु जोग's picture

29 Jul 2017 - 2:09 pm | आशु जोग

होय

इज इट

हायला, बघू की नको? मुक्तेसाठी बघणार होते... पण आता हे वाचल्यावर जरा साशंक वाटते आहे!

आशु जोग's picture

30 Jul 2017 - 10:28 am | आशु जोग

मुक्ताने लग्न, पती-पत्नी नाते या विषयावर याहून चांगले सिनेमे केले आहेत.
मंगलाष्टक वन्स मोअर अधिक चांगला होता. त्यात स्वप्निल जोशीचाही उत्तम अभिनय आहे.

इथे मात्र दाखवण्याचा विषय एक आणि खरी कथा दुसरीच आहे. संशय येऊ नये म्हणून त्या मूळ कथेला बाकी पॅकींग . . .

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2017 - 10:00 pm | पिलीयन रायडर

मला शंका होतीच, आणि मी ती कन्फर्म केली आहे, पिक्चर महाबोअर आहे. पाहु नका.
मुक्ताने कशाला हा फाल्तु पिक्चर केला काय माहिती. बॅनर मोठे असावे. खुप लोकांनी प्रमोशन केले होते.

शंका होतीच! मुक्तासाठी पाहणार पण घाई नाही. जेंव्हा प्रचंड वेळ हाताशी असेल, काय करायचे ते समजत नसेल आणि शिनेमा जालावर उपलब्ध असेल तर पाहणार. ;)