हॅरी पॉटर’: कास्टिन्ग (भाग २)

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
26 Jul 2017 - 4:28 pm

जेनेट कडून हक्क विकत घेतल्यानंतर पुढच्या काही काळात जवळजवळ ८० टक्के कलाकारांची निवड झाली होती.. दिग्दर्शक म्हणून ख्रिस आणि त्याची टीम एकाच चिंतेत होती.....कथा सुरु होते तेव्हा हि सगळी मध्यवर्ती आणि त्यांच्या आजूबाजूला वावरणारी पात्र ११-१२ या वयातली असतात.. एवढी सगळी मुलं तेही अभिनय करू शकणारी आणायची कुठून असा तो प्रश्न होता. मग प्रवास सुरु झाला...वेगवेगळ्या शाळांना, ड्रामा स्कूल्सना डेविड आणि ख्रिस भेटी देऊ लागले, मुलांना ओडीशनला बोलावू लागले.. जवळपास २२०० मुलांची ओडीशन घेण्यात आली आणि काही चेहरे सापडले. त्यातलाच एक म्हणजे रुपर्ट ग्रींत अर्थातच 'द विझली' रोनाल्ड ...!! याचा लूक पाहूनच स्टीवन ला वाटलं कि हा फक्त रॉनच होऊ शकतो आणि त्याला तशी वेगळी स्क्रीन टेस्टसुद्धा द्यायला लावली. अर्थात स्टीव्हन खरा ठरला हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच.एवढं असलं तरी आजून बरेच कलाकार निवडायचे होते. द गोल्डन त्रिओ पैकी फक्त एकच निवडला गेला होता.. अजून हॅरी आणि हर्मायनी कुठे आणि कशी असेल याचा कुणालाच पत्ता नव्हता.
अशाच निवडीच्या प्रवासात डेविड आणि ख्रिस एका शाळेत गेले. त्या शाळेत अगदी योगायोगने एका नाटकाची रिहर्सल चालू होती,
नाटक होत.....द हैप्पी प्रिंस.
या नाटकात एक १० वर्षांची मुलागी काम करत होती. थोडेसे ब्लोंड असलेले केस, तरतरीत नजर आणि काहीशी चुणचुणीत अशी ती मुलगी डेविड ला पसंद पडली आणि त्याने तला ओडीशनला बोलावलं. ते आली सुद्धा पण बात नही बन राही थी . म्हणतात ना ' दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम' ...अगदी तसच काहीस तीचं झाल.. तब्बल २२ वेळा ओडिशन दिल्यानंतर तीच सिलेक्ट झाली. ते पात्र होतं ' हर्मायनी ग्रेंजर' आणि ती मुलगी होती .....आजची फेमस ब्रिटीश अक्ट्रेस आणि मॉडल एमा वाट्सन...!!
ती ला सिलेक्ट केल्यानंतर काही वेळाने ख्रिस ने जेनेट रोलिंगला फोन केला आणि सांगितलं कि तू जशी लिहिली आहे अगदी तशीच हर्मायानी मी शोधली आहे. उद्या भेटवतो तुला. एमाच आणि जेनेटच थोड संभाषण ही झालं. जेनेट त्यावर एके ठिकाणी म्हणते,

मला तिच्या आवाजावरून तरी असं वाटलं नव्हतं कि हि मुलगी हर्मायनीला सुट होईल.. मी तिला पाहिलं नव्हतं आणि मला ख्रिस ची निवड फार आवडली नव्हती (रुपर्ट) . हर्मायानी हे पात्र माझं स्वत:चं आहे जेव्हा मी १०-११ वर्षांची होते. त्यामुळे कदाचित मी तिच्यात मला शोधात होते.'

पण जेव्हा जेनेट आणि एमा भेटले जेनेटच्या मते हिच्यापेक्षा उत्तम हर्मायानी असू शकणार नाही असचं तीच मत पडलं.
ही हर्मायानी पुढे एमाच्या इतकी अंगवळणी पडली कि यासाठी तिला तीच शिक्षणही सोडावं लागल.

पुढे काय झाल हा इतिहास आहे अन तो आपल्याला ठाऊकच आहे.

अनिरुद्ध दिलिप प्रभू

क्रमशः

चित्रपट

प्रतिक्रिया

उगा बाळाला चाटवल्यासारखे काय लिहायलाव. का टोटल सामानच कमी आहे?
लिव्हा की जोरकस, दाबून, पुरेसे.
वाटल्यास चार भागाचा एक भाग करा.

उगा काहितरीच's picture

26 Jul 2017 - 7:22 pm | उगा काहितरीच

"उगा बाळाची" पण हीच तक्रार आहे ;-)

ज्योति अळवणी's picture

27 Jul 2017 - 10:38 am | ज्योति अळवणी

खरच मोठे भाग टाका. मस्त लिहिताय. पण सुरू केल्या केल्या संपतंय