ऐका वेड्याची कहाणी

Primary tabs

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
17 Jul 2017 - 2:10 pm

कोतं कोतं कोतं कोतं

त्याचं मन थोडं कोतं

तिच्यासंगे राहण्यासाठी

जागोजागी पळत होत व्हतं II

त्याला काय ठाव अग्नी

त्याला नाय ठाव पाणी

सात जन्मांची ती राणी

ऐका वेड्याची कहाणी II

शाळा मॉप त्यो हुंदडला

येऊन कॉलेजात पडला

सुंदरीला पाहताक्षणी

जागच्याजागीच थांबला II

हाती धरशी पुस्तकं

धरे लेखणी उगाच

मन खोळंबले तेथेच

जागी नाही रे मस्तक II

कुणी मित्र ते दिसेना

कुठे जीव तो रमेना

राघु असाच सुकला

दिसे जागो जागी मैना II

करे पाठलाग तिचा

कोण मामा अन भाचा

सारी माहिती जमवे

जन्मदिन तीचा "मे" चा II

राणी मॉप ती हुशार

करी भविष्याचा विचार

राजा पाळतीवर सदा

तरी नेहमी निर्विकार II

राजा गाठे तिज एकांती

सांगे सर्व त्याची प्रगती

राणी जाणे त्यास सर्व

टाकी नानाविध अटी II

राजा होता कर्तबगार

फक्त प्रेमाने बेजार

करी जय्यत तयारी

होई नियतीवर स्वार II

दिस-रात एक केले

सर्व विक्रम मोडले

एका शब्दाने राजाचे

पुरते नशीब पालटले II

राजा खुश मनोमनी

आता होणार ती राणी

सर्व आलबेल आता

सुरु होणार कहाणी II

राणी धूर्त लयी भारी

धुंडी पाताळ ती सारी

डाव टाकला टाकला

राजा विकला विकला

राजा चाले तिच्यासंगे

राजा डोले तिच्यासंगे

मानसन्मान विकूनि

घरजावई त्यो झाला II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

कविता

प्रतिक्रिया

ज्योति अलवनि's picture

18 Jul 2017 - 11:01 am | ज्योति अलवनि

फारच वाईट

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

18 Jul 2017 - 4:25 pm | सिद्धेश्वर विला...

फारच वाईट ,, कोण राजा कि कविता ?

मितान's picture

19 Jul 2017 - 12:40 pm | मितान

तुम्हाला अशा कविता लिहिल्यानंतर काहीतरी लिहीलं म्हणून आनन्द होतो की वाचकांचा सूड घेतल्याचा ???

सहज फुकट सल्ला - कविता लिहिण्या आधी किमान चार थोर कवींच्या कविता वाचा.
ते शक्य नसेल तर मिपा वर पण उत्तम कविता आहेत त्यांचा अभ्यास करा.
शुभेच्छा !

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

19 Jul 2017 - 4:12 pm | सिद्धेश्वर विला...

(संपादित)

लिखाणात वैयक्तिक टीका आणि/किंवा असभ्य भाषा येऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

: संपादक मंडळ

संपादकांना विनंती ! या आयडी ची वरील प्रतिसादातली भाषा वाचून योग्य ती कारवाई करण्यात यावी.

@सिद्धेश्वर......
आजारी असाल तर योग्य वेळी उपचार घ्या.
विकृतीच असेल तर ...... !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jul 2017 - 6:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ साहेब नीट बोला. मत पटत नसेल तर दुरल्क्ष करा पण भाषा नीट वापरा. किमान सभ्यपणा पाळता येत नसेल तर गटार बंद ठेवा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jul 2017 - 7:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ साहेब नीट बोला. मत पटत नसेल तर दुरल्क्ष करा पण भाषा नीट वापरा. किमान सभ्यपणा पाळता येत नसेल तर गटार बंद ठेवा.

मितान's picture

19 Jul 2017 - 7:53 pm | मितान

धन्यवाद संपादक मंडळ !

गावाचा राजा's picture

28 Aug 2017 - 1:39 am | गावाचा राजा

फारच वाईट.....