मला आजवर कधीच रडू आलं नाही निपचित पडलेल्या कलेवरांच

Primary tabs

गरजू पाटिल.'s picture
गरजू पाटिल. in जे न देखे रवी...
9 Jul 2017 - 12:47 am

मलाआजवर कधीच रडू आलं नाही निपचित पडलेल्या कलेवरांच
कि कधी चिड आली नाही त्या देहधारी नामधारी आत्म्यांची
मला कधीच राग आला नाही त्या बंदुकाधाऱ्यांचा
कि मला कधी भिती वाटली नाही हिंस्र झालेल्या श्वापदांची
ना मला कधी घृणा वाटली त्या बलात्कारी अंगांची
मी रडले मानवतेच्या र्‍हासामुळे, खुप रडले
मला चिड आली माझ्या षंढ राहण्याची तुमच्या षंढ असण्याची
मला राग आला त्या बंदुकधाऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या भावांचा, त्यांच्या मानसिकतेचा, त्यांच्या गळ्यात पट्टे होते त्यांना ओळखी होत्या
मला भिती वाटली त्या पट्टे धरणाऱ्यांची
मला घृणा वाटली त्या बलात्काऱ्यांच्या संस्कारांची, संस्कृतीची, मानसिकतेची त्यांच्या जातीची, धर्माची त्यांच्या मनुष्य असण्याची आणि तुम्हा अखंड मानव जातीची
विधाता विधाता सारं काही झूठ असतं, मला ठाऊक आहे
मी आजवरच्या साऱ्या संहारांची साक्षी आहे, अगदी तुमच्या असण्याच्या हजारो लाखो वर्षांपूर्वीच्या
ना आजवर तो कधी आला ना येईल, नाही येणारच नाही, तेव्हा त्याच्या नावे गळे काढणारांनो, गळे कापनारांनो, कालची गोष्ट सांगू.
तो आला इवलसं रोपटं घेऊन, त्याच्या इवल्याश्या हातांनी त्यानं माझी कुस उजवलीं
पण माघारी येऊन त्यानं माझ्या पदरात पाणी नाही, दोन थेंब सांडले रक्ताचे, रोपट्यासाठी
की फोफावावं रक्त पिऊन त्यानहीं तुमच्यासारखं
पण नाही. पुरेसा रंग ही नसलेलं रक्त मुळांशी आलं अनं त्यांनही शोषणं श्वास घेणं बंद केलं
अनं ते रोपटही उन्मळून पडलं माझ्या कुशीत
मलां रडू आलं आज ही दोन्हीं कलेवरं पाहून
मला चिड आली राग आला तुमचा त्या बंदुकधाऱ्यांचा
मला घृणा वाटली वर्षानुवर्षे मला बलात्कारणाऱ्या अंगांची
मला खरंच आज भिती वाटली हिंस्त्र झालेल्या श्वापदांची तुम्हा अखंड मानव जातीची

प्रतिक्रिया

गरजू पाटिल.'s picture

9 Jul 2017 - 12:54 am | गरजू पाटिल.

२०१४ च्या पेशावर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्यात १३४ लहानग्यांचा जीव घेतला गेला तेव्हा लिहीलेला खर्डा