नविन लेखमलिका :’हॅरी पॉटर’

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
6 Jul 2017 - 1:30 pm

जगात सगळ्यात सुखी पिढी कुठली असेल तर ९० च्यां दशकात जन्माला आलेली, आमची पिढी...!!

ज्या काळात जन्माला आलो त्यात खरं तर नुकत्याच ब-याच नवनवीन गोष्टी आल्या होत्या ... मग टीवी असेल, कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल.....पण हे सगळ काही बालपणी जास्त शिवलं नव्हतं आम्हाला. भर उन्हाळ्यात अख्खी दुपार खेळण्यात घालवणे, सूर-पारंब्या, विटी-दांडू, कबड्डी, असे नानाविध खेळण्यात गेलं. सचिन-सौरभ-राहुल-अजहर हे हिरो असेल तरीही क्रिकेट सुद्धा फार मोठ स्थान काही बळकावू शकलं नव्हतं. जुन्या पारंपारिक मौज-मजेच्या गोष्टी अनुभवलेले आणि तितक्याच प्रेमानं सगळ्या तंत्रज्ञानाला आपलसं करणारी आमची पहिली पिढी..अन उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या मनसोक्तपणे जगलेली शेवटची पिढी...अस्तु.!! अशा अनेक गोष्टींसारखं एका अजून गोष्टीने वेड लावलं ते आजतागायत कायम आहे..एक कादंबरी-चित्रपट शृंखला जिच्यासोबत आम्ही llkid to adult हा प्रवास केला.....या पिढीतल्या कोणालाही एवढा सांगितलं तरी पुरेस आहे.......
’हॅरी पॉटर’

ही शृंखला संपून आता जवळपास अर्ध तप संपत आलंय तरीही त्यांनी मनावर घातलेलं गारुड संपण्याचे नाव घेईल तर शप्पथ ...!! २००१ साली जगासमोर आलेली ती तीन cute मुल आता चांगली २८-३० वर्षांची झाली पण डोळ्यासमोरून जात नाहीत. ते सगळ जादुई जग, हॉगवार्टचा परीसर साद घालतो. आम्हाला ‘हॅरी पॉटर’ दिल्याबद्दल जे.के.रोलिंग ला खरतर किती धन्यवाद द्यावेत हा गहन प्रश्नच.... जवळपास २० वर्षांचा कालावधी ह्या पात्रांनी व्यतीत केला असला तरी अजूनही अनेक गोष्टींबद्दलच कुतूहल आजही तसाच आहे. तेच कमी होण्यासाठी काही प्रमाणात मदत आणि आमच्या परमामित्रांच्या आग्रहावरून पुनश्च: लिहिते होण्यासाठी हा संपूर्ण दोन दशकांचा प्रवास, मग कादंबरी असेल किंवा चित्रपट , किस्से, पडद्यामागच्या गंमती-जंमती या निमित्ताने ही लेखमाला.....नियमित अर्थात ठराविक वेळी post करण जमेल असे नसल्याने नियमितपणे अनियमितता सांभाळून ही लेखमाला मी सुरु करतोय.......

ll श्रीजेकेरोलीन्गापर्णामास्तु ll

©अनिरुद्ध दिलीप प्रभू

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

हरी पुत्तरचं काय येवढं कवतिक नाय पन तुमच्या शिरिजबद्दल कौतुहल्य हाय. तवा पुभाप्र.

अद्द्या's picture

6 Jul 2017 - 1:43 pm | अद्द्या

येऊंद्या लवकर ..

आदूबाळ's picture

6 Jul 2017 - 3:03 pm | आदूबाळ

वा वा! बिग फ्यान. येऊद्या!

sagarpdy's picture

8 Jul 2017 - 7:17 pm | sagarpdy

+1

पिशी अबोली's picture

6 Jul 2017 - 4:12 pm | पिशी अबोली

हॅरी पॉटरने जो मित्रपरिवार दिला, तो दुसऱ्या कोणत्याच समान धाग्याने मिळाला नसता. हॅरी पॉटर बद्दल बोलल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. मिपावर हे बघून प्रचंड खुश आहे. तुमच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत.

हॅरी पाॅटर लेखमालेच्या प्रतीक्षेत हॅरी पाॅटरची कट्टर फॅन ...
आम्ही घरच्या बोक्याला क्रुकशँक हाक मारायचो! समोर एक काका राहायचे त्यांना पिव्ह्ज म्हणतो अजूनही ;)

सच्चिदानंद's picture

6 Jul 2017 - 7:41 pm | सच्चिदानंद

अर्रे वा मस्तच.. आम्हीपण बिग्ग फॅन. ह्याबद्दल बोलतोच आहोत तर हे पण बघून घ्या.

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Jul 2017 - 9:38 am | अनिरुद्ध प्रभू

हे नाव आहे त्याच..... मागच्याच महिन्यात त्याची बातमी आली होति. पण ही फिल्म थिअटर मधे नाही होणार रिलिझ....आणि ट्रेलरवरुन तरि खास वतते आहे पण उत्तम नाही वाटत....बघु कळेल लवकरच....!!!

मुक्त विहारि's picture

6 Jul 2017 - 9:19 pm | मुक्त विहारि

वाचायला आवडेल....

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2017 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

हॅरी पॉटरचा इतका मोठा पंखा नाही. पण तुमच्या मालिकेच्या गारुडाची उत्सुकतेने प्रतिक्षा आहे !

जुइ's picture

7 Jul 2017 - 5:42 am | जुइ

तुमच्या हॅरी पॉटरवरच्या मालिकेच्या प्रतिक्षेत.

पॉटर आवडतोच पण फनाटिक फॅन नाही.

पुलेप्र.

हर्मायनी's picture

7 Jul 2017 - 9:08 am | हर्मायनी

हॅरी पॉटरची खूप मोठी फॅन ! मी तर माझ्या फोन मध्ये माझ्या मित्रमैत्रिणींची नावं हॅरी पॉटर कॅरेक्टर्सची नावं ठेवली आहेत.. :p आणि मी अर्थातच हर्मायनी आहे .. ;)

हॅरी पॉटर या कॉमन आवडीमुळेच आमचा फर्स्ट इयर ला ग्रुप बनला होता.. :) आणि आता माझ्या ऑफिस मध्येही रोज एकदा तरी हॅरी पॉटर चा संदर्भ निघाल्याशिवाय दिवस जात नाही.. (पर्क्स ऑफ हॅविंग पॉटरफॅन मॅनेजर.. :p )

नुकतंच फिलॉसॉफर्स स्टोन प्रकाशित होऊन २० वर्ष झाली.. ही लेखमाला सुरु करायला याहून चांगला मुहूर्त तो कोणता.. शुभेच्च्छा..!

--
(द ब्राइटेस्ट विच ऑफ माय एज)
हर्मायनी

या मुहुर्ताला समोर धरुनच मी लिहित होतो....

पुंबा's picture

7 Jul 2017 - 11:19 am | पुंबा

मि पण मोठा पंखा.. पण पुस्तकांचा हा.. अजून एक पण पिक्चर पाहिलेला नाहीये.. तुमच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत

पण सिनेमे जरूर बघा.

अर्थात, पुस्तकांची मजा वेगळीच.

पुस्तकातले काही भाग सिनेमात टाळले आहेत.

राघव's picture

10 Jul 2017 - 4:57 pm | राघव

चित्रपटां पैकी पहिले २ चित्रपट पुस्तकांच्या जवळ जाणारे होतेत. नंतर स्टोरीलाईन बर्‍यापैकी भरकटलेली आहे.
ग्राफिक्ससाठी मात्र जरूर बघावे असे आहेत सर्व चित्रपट.

मी पण पॉटरच्या पुस्तकांचा चाहता.
त्यात खरं म्हटलं तर अनेक चुका आहेत. अनेक अगदी ढोबळ आहेत.
कथाविस्तार हा पुढचे भाग लिहितांना बराच बदलत गेला हे स्पष्ट दिसतं.
पण रोलिंगच्या कल्पनाशक्तीपुढे स्तिमित व्हायला होतं. तसंच तिची निरिक्षणशक्ती, भाषेवरचं प्रभुत्व हे निश्चित ठळकपणे जाणवतं.

लवकर येऊ देत तुमचे लेखन! वाट पाहतो. :-)

त्यात खरं म्हटलं तर अनेक चुका आहेत. अनेक अगदी ढोबळ आहेत.
कथाविस्तार हा पुढचे भाग लिहितांना बराच बदलत गेला हे स्पष्ट दिसतं. >> याबद्दल अधिक वाचायला आवडेल.

राघव's picture

14 Jul 2017 - 4:11 pm | राघव

वानगीदाखल :-

त्यात खरं म्हटलं तर अनेक चुका आहेत. अनेक अगदी ढोबळ आहेत.
- वॉल्ड्मॉर्टचा वॉण्ड. कसा सलामत राहिला? कुणाजवळ होता?

कथाविस्तार हा पुढचे भाग लिहितांना बराच बदलत गेला हे स्पष्ट दिसतं.
- पहिल्या भागात शेवटी डंबलडोर ब्रूमस्टिकनं मिनिस्ट्रीत जातात.. का? फायरप्लेस का नाही वापरली? [कारण तेव्हा फायरप्लेसची कल्पना सुचलीच नव्हती. ती दुसर्‍या भागात सुचलीये!]

आणिकही बरेच आहेत.. पण तरीही वर लिहिल्याप्रमाणे मी स्वतः रोलिंगच्या लेखनाचा चाहता आहे! तिच्या कल्पनाशक्तीला नमन! :-)

अभिदेश's picture

14 Jul 2017 - 8:45 pm | अभिदेश

वॉल्ड्मॉर्टचा वॉण्ड वर्म टेल कडे असेल का ? शक्य आहे

वर्मटेल कडेच होता म्हणे
https://www.quora.com/In-Harry-Potter-on-the-night-that-James-and-Lily-a...

https://www.quora.com/Where-was-Voldemort’s-wand-after-he-killed-James-and-Lily-Potter-When-resurrected-in-the-GOF-he-has-it-so-where-has-it-be-all-these-years

आदूबाळ's picture

14 Jul 2017 - 9:31 pm | आदूबाळ

वॉल्ड्मॉर्टचा वॉण्ड

माझ्या आठवणीप्रमाणे रेझरेक्ट झाल्यावर वर्मटेल त्याला जो वॉण्ड देतो तो व्होल्डेमोर्टचा असल्याचा उल्लेख नाहीये. माझ्यामते तो कोणतातरी भलताच वॉण्ड असावा, आणि नंतर भाऊंनी ऑलिव्हँडरकरवी नवा बनवून घेतला असावा. (पै० व्होल्डे लैच पावरबाज असल्याने सामान्यांना येतात तसे 'हा वॉण्ड माझा नैच मुळी" टाईप प्रॉब्लेम त्यांना येत नसावेत.)

पहिल्या भागात शेवटी डंबलडोर ब्रूमस्टिकनं मिनिस्ट्रीत जातात

हे बाकी खरं आहे. हॉगवार्ट्सबाहेर हॉग्जमीडमध्ये जाऊन पार मिनिस्ट्रीच्या दारापर्यंत अ‍ॅपरेट होणं खरं तर सगळ्यात सोपं. कदाचित भलतीकडेच शिंदळकी करायला गेले असावेत.

वॉल्ड्मॉर्ट रेझरेक्ट झाल्यावर स्वतः म्हणतो "give me my wand".
पण तो वर्मटेल कडे गेला केव्हा आणि कसा? कारण वॉल्ड्मॉर्ट हॅरीला मारयला जातो आणि स्वतः नामशेष होतो, तेव्हा तिथे त्याच्यासमवेत कुणीच नसतं.

नंतर भाऊंनी ऑलिव्हँडरकरवी नवा बनवून घेतला असावा.
नाही. पुढील कथा तसं दर्शवत नाही. वॉण्ड महत्त्वाचा दुवा आहे, कारण twin cores मुळे हॅरीला विशेष संरक्षण मिळालेलं आहे! म्हणूनच म्हणतो, खूप ढोबळ चूक आहे.

अभिदेश's picture

14 Jul 2017 - 11:45 pm | अभिदेश

आठवल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. वॉन्डची गडबड झाली आहे. ह्यानिमित्ताने एक आठवण झाली , मागे एडिंबरो फिरायला गेलो होतो तेव्हा जे के रोलिंगबाई ज्या कॅफेमध्ये (मला वाटत एलिफंट हाऊस )बसून पहिले पुस्तक लिहीत होती ते पाहिल्याचं आठवले. मला वाटत तिथे तसा बोर्डही लावला आहे.

हो, तिथे आपल्या मुलासह उभ्या असलेल्या एका मिपाकराला मी पाहिलेले आहे.

अभिदेश's picture

17 Jul 2017 - 7:38 pm | अभिदेश

आठवलं. मी पण तुला कॅफेच्या बाहेर उभा राहून सोलापुरी चिवडा खात , 'हिरवळी' कडे टक लाऊन बघताना पाहिल्याचं आठवतंय.

आदूबाळ's picture

15 Jul 2017 - 6:59 am | आदूबाळ

हो, बरोबर आहे! प्रायॉरीचा विसर पडला होता! बकार चूक झालीय की म्हणजे!

इज्या's picture

8 Jul 2017 - 12:52 pm | इज्या

हरी पाटील चा पुढील भाग प्रकट भव....

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 2:22 pm | मुक्त विहारि

मी "हरी कुंभार" ऐकले होते...

नाय वो .... ८-१० वर्षांपूर्वी "हॅरी पॉटर" बघत असताना माझ्या आजीने त्याचा उल्लेख "हरी पाटील" असा केला. बोलायला सोपं पडतंय म्हणे. तिला potter म्हणजे कुंभार हे समजावण्यात दिवस संपला आणि सिनेमा पण. बाकी विसरलो, पण लक्षात राहिला फक्त "हरी पाटील'.

म्हातारी माणसे आणि लहान मुले, ह्यांना समजावून सांगू नये, ते काय म्हणतात ती पूर्व दिशा, इति आमचे बाबा महाराज....

अनिरुद्ध प्रभू's picture

8 Jul 2017 - 2:43 pm | अनिरुद्ध प्रभू

मला वाट्ल पिडितो चा वापर करताय कि काय...........

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 2:47 pm | मुक्त विहारि

तुमच्या ह्या लेखमालेला होणार नाही.

"हॅरी पॉटर" हा विषयच तसा अजातशत्रू आहे.

इज्या's picture

8 Jul 2017 - 5:29 pm | इज्या

मुविंना दिलेल्या प्रतिसादात सापडेल माझा किती 'पिडितो' झाला ते. पण आजी नक्कीच विजयी भव झाल्या. :)

मनिमौ's picture

8 Jul 2017 - 7:31 pm | मनिमौ

आहे लेखांची. पुस्तकांची किती पारायण झालीत त्याला गणती नाही. दरेक वेळी पुस्तक वाचताना नव्या पैलूने ऊलगडत गेलेल्या गोष्टी. मिथक आणी प्रतीकांचा सुरेख वापर यामुळे आजन्म पंखा आहे मी हॅरी चा

अनिरुद्ध प्रभू's picture

10 Jul 2017 - 10:20 am | अनिरुद्ध प्रभू

टाकावा का पहिला भाग का अजुन वाट बघावी.....??

इज्या's picture

10 Jul 2017 - 4:34 pm | इज्या

हॅरी पॉटर चा एक भाग वाचून झाल्यावर जशी पुढील भागाची उत्सुकता लागते तसं व्हायल. पुढील भाग लवकरात लवकर येऊ द्या.

आदूबाळ's picture

10 Jul 2017 - 2:21 pm | आदूबाळ

प्रभुजी, येऊ द्या भाग. वाट कसली पाहताय?