कविता II आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
29 Jun 2017 - 7:12 pm

आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला

विषाद नव्हता मनी तो कसला

ना होती मनीषा अन विजिगीषा

पाषाण शोधण्यातच हया गेली

अनभिज्ञ ,घन अन नाजूक बंधन

अक्षय संचयात किल्मिषे दाटली

पृथ्थककरणात अन निरूपणात

कैक अमावास्यां पौर्णिमा लोटली

भ्रमिष्ट अस्थिपंजर

शोध कूर्म गतीने पाषाणाचा

अनिर्वचनीय बंधनात अविरत

सोबतीने शोध अस्तित्वाचा

अनावृत वैचित्र्य अनाहूत गाठे

यथास्थित स्थितिस्थापक

क्षणभंगुर वाटे

शिरकाण बलिदान ती ज्येष्ठ नाती

पाषाण शोधण्यात दिली मूठमाती

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

कविता