पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
4 Jun 2017 - 12:29 am

पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज

पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत असेही कुणाला वाटत नाही. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेच्या मानाने पुरुष नसबंदी फार सोपी, कमी वेळखाऊ वगैरे वगैरे फक्त जमेच्या बाजूच सांगितल्या जातात. पूर्ण माहीती स्वतः पेशंटला तरी असते की नाही शंका आहे. वास्तविक पेशंटला पूर्ण माहिती देऊन त्याने सारासार विचार करून निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. पण जाहीरात अशी होते. यूं गया यूं आया, आल्यावरही तोच जोष कायम इ.

पुरुषावर नसबंदी केल्यावर पुढचे तीन महीने आतमधे वीर्य तसेच असल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता असते. त्यानंतर तो आयुष्यात कधीही बाप होऊ शकत नाही. उद्या त्याची पहीली पत्नी गेली, त्याने दुसरे लग्न केले. त्या पत्नीला मूल हवे असेल तर तो स्वतः तिला मूल देऊ शकत नाही. पुरुष नसबंदी हा तात्पुरता उपाय नाही, तो कायमस्वरूपाचा आहे. जगात काही उदाहरणे घडली आहेत म्हणे(गूगल) जिथे ही शस्त्रक्रिया पुन्हा उलटवता आली आहे. पण शक्यता धूसर. या बाजू कुठेही सांगितल्या जात नाहीत.

पूर्वी तांबीबाबतही खूप जाहीरात होत असे. अगदी सरकारी बक्षिसेही दिली जात. मूल नको असेल तर तांबी बसवा. जेव्हा हवे असेल तेव्हा तांबी काढा. बाकी मुद्दे जनतेपर्यंत नीटपणे पोचवले जात नाहीत.

पुरुष नसबंदीही अशीच साधीसोपी असावी असा अनेकांचा समज करून दिला जातो. म्हणूनच याबाबतीतल्या सर्व उलट सुलट मुद्यांची जाणीव करून देणार्‍या लोकशिक्षणाची गरज आहे.

विज्ञानविचार

प्रतिक्रिया

मग तुम्ही त्यावर सविस्तर लिहा ना. नुसताच इथे अमुक तमुकची गरज आहे असा धागा काढून काय उपयोग आहे?

नर्मदेतला गोटा's picture

4 Jun 2017 - 2:56 pm | नर्मदेतला गोटा

एवढे का रागवताय

आनन्दा's picture

4 Jun 2017 - 4:15 pm | आनन्दा

खरेकाका इत्यादींच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
माझ्या माहितनुसार पुरुष नसबंदी दोन प्रकारची असते.
एकामध्ये नस तोडून टाकतात, तर एकात फक्त आवळून टाकतात. ही दुसर्‍या प्रकारची परिवर्तनीय असते.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jun 2017 - 6:04 pm | अत्रुप्त आत्मा

@खरेकाका इत्यादींच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. ››› +१

जेम्स वांड's picture

4 Jun 2017 - 8:33 pm | जेम्स वांड

मी तर बाबा अकुकाकांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. :D

नर्मदेतला गोटा's picture

9 Jun 2017 - 1:10 pm | नर्मदेतला गोटा

स्त्री आणि पुरुष यांच्या प्रजनन क्षमतेत मूळातही काही फरक आहेत.

सुबोध खरे's picture

9 Jun 2017 - 7:41 pm | सुबोध खरे

गैरसमज
१) त्यानंतर तो आयुष्यात कधीही बाप होऊ शकत नाही. उद्या त्याची पहीली पत्नी गेली, त्याने दुसरे लग्न केले. त्या पत्नीला मूल हवे असेल तर तो स्वतः तिला मूल देऊ शकत नाही. हे चूक आहे
जर नस परत जुळवण्याची शस्त्रक्रिया केली तर पहिल्या १० वर्षात याचा यशस्वी होण्याचा दर ५० टक्के असतो आणि १० वर्षानंतर तो ३० % पर्यंत खाली येतो. (जितका वेळ जास्त जाईल तितका हा दर कमी होतो.). http://www.webmd.com/infertility-and-reproduction/vasectomy-reversal-vas...
यशस्वी होण्याचा दर म्हणजे वीर्यात शुक्राणू सापडणे नव्हे तर बायको गरोदर राहण्याचा दर.
कारण नस परत जुळवली तर वीर्यात शुक्राणू दिसण्याचा दर बराच जास्त ९०-९५ % आहे पण प्रत्यक्ष गरोदर होण्याचा दर विविध कारणांनी कमी होतो.
पुरुष नसबंदी हि नक्कीच साधी आणि सोपी आहे कारण तुम्ही पोटाचा पेटारा उघडत नाही त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत नाही. फक्त पहिले तीन महिने किंवा १०० वेळा संबंध या कालावधीत इतर संतती प्रतिबंधक साधने वापरणे आवश्यक असते. या कालावधीत वीर्यात शुक्राणू येण्याची शक्यता आणि त्यामुळे बायको गरोदर राहण्याची शक्यता असते.
याचा एक किस्सा मी या लेखात लिहिला आहे. http://www.misalpav.com/node/24347
आणि त्याच्या वर लोकांनी माझ्यावर बऱ्यापैकी टीका हि केली होती.

नर्मदेतला गोटा's picture

11 Jun 2017 - 1:05 am | नर्मदेतला गोटा

सत्यं ब्रूयात हा धागाही वाचला

नर्मदेतला गोटा's picture

12 Jul 2017 - 9:01 am | नर्मदेतला गोटा

गर्भनिरोधक या विषयात अजून काही
गर्भधारणा रोखण्यासाठी देण्यात येणा‍ऱ्या इंजेक्शनचा प्रभाव तीन महिने राहतो. हाच प्रभाव इम्प्लांट पद्धतीमध्ये अडीच ते तीन वर्षांपर्यंत राहणार आहे.