सांज मुकी

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
26 May 2017 - 9:55 am

सांज मुकी आक्रंदताना
ह्रदयाची उदास वाणी
पाखरांची हरवून वाट
सांजकीनारी ना साजणी

ओढून आसवांत रात्र
अंबरात केविलवाणे दिवे
या चिरेबंदी अंधारात
अवचित मिटून जावे

सर्वस्व उधळून तरीही
झेलीत शापांचे चांदणे
आयुष्याचा दाटून काळोख
धूसर पडसाद जुने

असुरी अनाहत दिशा
गहिवरला अंतरी गुंजारव
हेलावतो अतूट बंध
दिठीत तेवतो जन्म तुझ्यास्तव

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

अरूण गंगाधर कोर्डे's picture

26 May 2017 - 11:36 am | अरूण गंगाधर कोर्डे

शेवटचे कडवे महत्वाचे वाटते. पुलेशु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2017 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख.

-दिलीप बिरुटे

चांदणशेला's picture

27 May 2017 - 7:07 pm | चांदणशेला

धन्यवाद