वॉटर purifier घेताना काय काय पाहावे?

Primary tabs

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in तंत्रजगत
10 May 2017 - 11:26 am

एका मित्राने, नुकताच जांभूळवाडी, कात्रज तलाव येथे flat घेतला आहे. बोरिंगच्या पाण्याशिवाय तेथे पर्याय नाही. पाणी खूप जड आहे.
म्हटलं मिपाकरांचा जरा सल्ला घ्यावा, कारण मी water purifier कधीच वापरला नाही. मग अशावेळी त्यात काय काय फीचर्स असायला हवीत?
HUL चा साधा pureit वगैरे लगेच खराब होईलसं वाटत, शिवाय पाणी साठवून ठेवणाऱ्या purifier मध्ये क्षार अडकून तेही लवकर खराब होतात असं ऐकलं. मग करावं काय??
नुसता RO फिल्टर काम करेल का?
काही सल्ला देऊ शकलात तर उत्तम:)

टीप- पूर्वी असा धागा काढला असेल, तर त्याचा दुवा दिलात तरी फस्क्लास.

प्रतिक्रिया

नुसता RO फिल्टर काम करेल का?
ते फार पाणी वाया घालवतात.

आगाऊ म्हादया......'s picture

10 May 2017 - 1:00 pm | आगाऊ म्हादया......

धन्स!!

मार्मिक गोडसे's picture

10 May 2017 - 3:01 pm | मार्मिक गोडसे

बोरिंगचे पाणी जड आहे असे तुम्हाला वाटत असेल तर प्रथम पाण्याचा TDS(Total dissolved solids) तपासा. ते शक्य नसेल तर पाण्यात डिटर्जन पावडर टाकून बघा, पाण्याला फेस कमी येत असेल तर पाणी जड आहे हे समजावे. पाण्याचा TDS हा त्यात विरघळलेल्या क्षारांमुळे वाढतो. नेमक्या कोणत्या क्षारांमुळे पाण्याचा TDS वाढला हे TDS तपासणीत कळत नाही. त्यामुळे कधीकधी २०० TDS असलेले पाणी त्यात विरघळलेल्या विषारी क्षारांमुळे पिण्यायोग्य नसू शकते तर ५०० TDS असलेले पाणी आरोग्यास हानिकारक नसलेल्या क्षारांमुळे पिण्यायोग्य असू शकते. आजुबाजुला औद्योगिक रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरत असेल तर तेथील पाणी दुषित होण्याची शक्यता असते. शेतीतील पाण्यात खतातील व किटकनाशकातील विषारी द्रव्ये असतात ती जमीनीखालील पाण्याचे स्रोत दुषित करतात. त्यामुळे आजुबाजुल असे पाणी दुषित करणारे घटक आहेत का ह्याची खात्री करुन घ्यावी.

पाणी पिण्यास अयोग्य आहे अशी खात्री झाल्यास RO फिल्टर वापरणे हे योग्य राहील. पाण्याचे उर्ध्वपातन यंत्र वापरुनही पिणायोग्य पाणी मिळवता येते, परंतू त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकत नाही व त्यास जागाही जास्त लागते. RO फिल्टरचा TDS शक्यतो १००- १५० च्या आसपास ठेवावा त्यापेक्षा कमी नको.
१५० च्या TDS ला उत्कृष्ट प्री आणि पोस्ट फिल्टर वापरलेल्या RO तून दुप्पट पाणी वाया जाते.जितका कमी TDS ठेवाल तितके जास्त पाणी वाया जाते. आपली दिवसाला पिण्याच्या पाण्याची गरज ३० लिटर असेल तर फक्त ६० लिटर पाणी वाया जाते. अर्थात हे पाणी बागकामाला वापरता येते, बाथरूम, फरशी साफ करायला वापरता येते. क्षार अधिक असल्यामुळे हे पाणी कपडे धुण्यासाठी वापरता येत नाही.

बाजारात अनेक प्रकारचे अनेक कंपन्यांचे दर्जाप्रमाणे व पाणी फिल्टर करण्याच्या वा साठवण्याच्या क्षमतेप्रामाणे रु ५०००/- पासून RO फिल्टर उपलब्ध आहेत. आपली गरज ठरवून RO फिल्टर घेणे कधीही योग्य राहील. जेथे सरकारी पाणी शुद्ध करुन नळावाटे पुरवले जाते त्यांनी महागड्या RO फिल्टरच्या नादी लागू नये. त्यांच्या करता बरेच स्वस्त पर्याय उपल्ब्ध आहेत. पुढेमागे त्यावर सविस्तर लिखाण करेन.

छान प्रतिसाद..यावर सविस्तर लिहाच..फिल्टर विषयी सर्व माहिती एकाच लेखात येऊ द्या..

आगाऊ म्हादया......'s picture

10 May 2017 - 8:46 pm | आगाऊ म्हादया......

बरेच अँगल कळाले, एवढा विचारच केला नव्हता. जरा खल करतो ह्याच्यावर.

सचिन काळे's picture

10 May 2017 - 9:35 pm | सचिन काळे

पुढेमागे त्यावर सविस्तर लिखाण करेन वाचायला आवडेल. वाट पाहतोय.

तुम्ही सांगत आहात त्या भागात पाणी जास्त जड असेल असे वाटत नाही, तलाव लागूनच आहे त्या भागाला. पण तरी योग्य ती काळजी म्हणून जलशुद्धी यंत्र असणे चांगलेच. पण आम्ही गेली 9-10 वर्ष तेथून जवळ असलेल्या नरहेचे बोरिंग पाणी पिऊन नीट जिवन्त आहोत बा!

*पाण्याचे दुष्परिणाम समोर येण्यासाठी किती ही कमी जास्त कालावधी लागू शकतो योग्य ती काळजी घेणे हे उत्तम.

आगाऊ म्हादया......'s picture

10 May 2017 - 8:50 pm | आगाऊ म्हादया......
आगाऊ म्हादया......'s picture

10 May 2017 - 8:50 pm | आगाऊ म्हादया......
आगाऊ म्हादया......'s picture

10 May 2017 - 9:13 pm | आगाऊ म्हादया......

काही ऑफर असेल तर तुम्हाला पण कळवतो

मार्मिक गोडसे's picture

10 May 2017 - 4:42 pm | मार्मिक गोडसे

पाण्याचे दुष्परिणाम समोर येण्यासाठी किती ही कमी जास्त कालावधी लागू शकतो योग्य ती काळजी घेणे हे उत्तम.

हे ज्याला समजते ती व्यक्ती दुषित पाणी शुद्ध करण्याची योग्य ती साधने वापरुन निदान पाण्यपासून होणारे आजार टाळू शकते.

अनुप ढेरे's picture

10 May 2017 - 5:14 pm | अनुप ढेरे

मलाही एक प्रश्न आहे. समजा माझ्याकडे बर्‍याचदा मनपाचं नॉर्मल पाणी येतं, ज्याला RO लागत नाही. पण कधी-कधी बोअरचं पाणी येऊ शकतं ज्याला RO लागेल. या RO-प्युरिफायर्सचा RO मोड ऑन/ऑफ करता येतो का? म्हणजे जेव्हा मला माहितिये की विहिरिचं पाणी येणार आहे तेव्हा ROमोडवर टाकायचा. एरवी साधा मोड.

पाणी वाया जाऊ नये म्हणुन खटाटोप हा.

मार्मिक गोडसे's picture

10 May 2017 - 8:01 pm | मार्मिक गोडसे

. या RO-प्युरिफायर्सचा RO मोड ऑन/ऑफ करता येतो का?

ह्याची गरज नाही. 2 Way Angle Cock वापरणे हा एक सोपा उपाय आहे. एक कनेक्शन RO-प्युरिफायर्सच्या इनलेटला व दुसरे नेहमीच्या नळाला द्यायचे. जेव्हा बोअरचे पाणी वापरायचे असेल तेव्हा RO च्या इनलेटचा Cock उघडायचा.

अनुप ढेरे's picture

11 May 2017 - 3:42 pm | अनुप ढेरे

नक्की उपाय नाही समजला. पाणी एकाच नळातून येणार आहे. जर मनपाचं पाणी असेल तरी प्युरिफायरमधुनच आलेलं पाणी हवं आहे. फक्त तेव्हा त्याने ROवालं काम केलं नाही तरी चालेल.(कारण पाणी वाया जाईल.) विहिरिचं असेल तर तोच प्युरिफायर ROचं काम करेल असं हवं आहे.

मार्मिक गोडसे's picture

11 May 2017 - 3:49 pm | मार्मिक गोडसे

. समजा माझ्याकडे बर्‍याचदा मनपाचं नॉर्मल पाणी येतं, ज्याला RO लागत नाही.

RO लागत नाही असं तुम्ही लिहिल्याने वरील उपाय सुचवला.

टवाळ कार्टा's picture

10 May 2017 - 5:45 pm | टवाळ कार्टा

एका मित्राने, नुकताच जांभूळवाडी, कात्रज तलाव येथे flat घेतला आहे. बोरिंगच्या पाण्याशिवाय तेथे पर्याय नाही. पाणी खूप जड आहे.
म्हटलं मिपाकरांचा जरा सल्ला घ्यावा, कारण मी water purifier कधीच वापरला नाही.

याला म्हणतात ताकाला जाउन भांडे लपवणे...भांडे का लपवता =))

त्यांनी प्युरीफायर वापरला असता तर त्यांनीच सल्ला दिला नसता का..?

(मुंबईवाले झाले म्हनून काय पायजे त्या टायली कराल का..? - धर्मा मांडवकर)

तिक्डं वाच्लं नै का? अंडं कसं लागतं ते सांगायला ते घालावं लागत नाही म्हणून..! :-)

सुबोध खरे's picture

10 May 2017 - 7:23 pm | सुबोध खरे

"मुंबईवाले झाले म्हनून"
ते सध्या बंगळुरू मध्ये असतात. हा "त्या" पाण्याचा गुण आहे

टवाळ कार्टा's picture

11 May 2017 - 12:39 pm | टवाळ कार्टा

=))

आगाऊ म्हादया......'s picture

10 May 2017 - 8:44 pm | आगाऊ म्हादया......

ते लिहिलेच नाही मी विचाराच्या नादात, मी त्याला प्युरीफायर भेट द्यावा म्हणतोय

दोन मोठे स्टीलचे टोप (पातेली) घ्या ( प्रत्येकी सुमारे ३ लिटर क्षमतेचे) यात उपलब्ध बोरिंगचे पाणी गाळून भरा, किमान तीन तास निवळू द्या. हे पाणी उकळून घ्या. पाण्याला उकळ फुटल्यावर पाच मिनटात आंच बंद करा. एका पाठोपाठ एक पिण्या करता वापरा हे पाणी नक्की शुद्ध आहे!
हे बिनधास्त प्या !!

आगाऊ म्हादया......'s picture

10 May 2017 - 9:17 pm | आगाऊ म्हादया......

होय सध्या हेच करतायत ते.

सुबोध खरे's picture

11 May 2017 - 10:22 am | सुबोध खरे

पाण्याच्या शुद्धीचे तीन आयाम आहेत
१) PHYSICAL -प्रत्यक्ष (डोळ्यांनी दिसते ते) स्वच्छ किंवा गढूळ इ
२) CHEMICAL रासायनिक
३) BACTERIOLOGICAL --जैविक
१)पाणी चांगल्या वॉटर फिल्टर मध्ये गाळून घेतले तर त्यातील गढूळपणा आणि तरंगणारे पदार्थ गाळले जाऊन पाणी पूर्ण स्वच्छ दिसते म्हणजेच ते PHYSICALLY शुद्ध आहे पण त्यात विरघळलेले रासायनिक पदार्थ आणि जिवाणू विषाणू आणि त्यांची अंडी हे मात्र नाहीसे होत नाहीत.
२)याची दुसरी पायरी म्हणजे पाणी उकळले कि त्यातील जिवाणू विषाणू आणि अंडी नष्ट होतात परंतु पाण्यातील विरघळलेले क्षार किंवा रसायने जात नाहीत
३) तिसरी पायरी बाष्पीभवन करून वाफ थंड करून तयार केलेले पाणी DISTILLED ( EVAPOURATION अँड CONDENSATION) हे मात्र सर्व तर्हेने शुद्ध असते. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत असे DISTILLED पाणी सर्व प्रयोगात याचसाठी वापरले जाते.
केवळ उकळलेलं पाणी हे PHYSICAL (प्रत्यक्ष) आणि BACTERIORLOGICAL(जैविक) शुद्धतेची खात्री देते पण त्यातील विरघळलेले क्षार मात्र काढू शकत नाही. ज्या ठिकाणी पाण्यात अतिरिक्त क्षार किंवा शिसे, अर्सेनिक सारखे धोकादायक पदार्थ असतात. तेथे हा उपाय कायम स्वरूपी काम करीत नाही कारण सूक्ष्म प्रमाणात शरीरात गेलेले हे क्षार गोळा होत राहतात आणि नंतर आपली विषबाधा दाखवतात.
जेथे ट्रक कारच्या बॅटरीचे काम चालते तेथील काम करणाऱ्या लोकांच्या हलगर्जीपणाने शिशाचे क्षार भूजलात मुरतात आणि तेथील विहिरीत किंवा बोअरवेल मध्ये हे क्षार दिसू लागतात.
रिव्हर्स ऑस्मॉसिस या प्रक्रियेत पाण्यातील विरघळलेले क्षार सुद्धा बाहेर काढता येतात आणि त्याच बरोबर त्याचा फिल्टर(गाळणी) इतकी बारीक असते कि त्यातून जीवाणू विषाणू आणि अंडी हि पण गाळली जातात. जेथील बोअरवेल मध्ये असे क्षार दिसत असतील त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मॉसिस सारखी यंत्रे पिण्याच्या पाण्यासाठी लावणे हे अंतिम हिताचे ठरेल.

एस's picture

13 May 2017 - 3:13 am | एस

जिवाणू विषाणू आणि त्यांची अंडी??? ही मंडळी अंडी कधीपासून घालायला लागली? मिपावरच्या पाकृ वाचून? ;-)

सुबोध खरे's picture

13 May 2017 - 11:12 am | सुबोध खरे

जिवाणू विषाणू आणि त्यांची अंडी???
मी वापरलेल्या दोन्ही वाक्यात "त्यांची" अंडी असा कुठेही शब्द प्रयोग( मुद्दाम) केलेला नाही.
त्यातील जिवाणू विषाणू आणि अंडी नष्ट होतात
जीवाणू विषाणू आणि अंडी हि पण गाळली जातात.

दूषित पाण्यात कृमी आणि जंतांची ( PARASITES) "अंडी" किंवा बुरशी( FUNGUS) आणि जिवाणूंचे "SPORES" (याला अंडी सोडून दुसरा सामान्य माणसाला समजेल असा चपखल मराठी शब्द मला सापडला नाही.) असतात. त्यांचाही नाश होणे आवश्यक असते

आगाऊ म्हादया......'s picture

13 May 2017 - 7:14 am | आगाऊ म्हादया......

चांगलीच माहिती मिळाली

मार्मिक गोडसे's picture

11 May 2017 - 3:37 pm | मार्मिक गोडसे

सोप्या भाषेत छान माहीती.
अन्नातून शरीराला आवश्यक मिनरल्स मिळत असताना पिण्याच्या पाण्यात ते मिळवण्याचा अट्टाहास का केला जातो? माझ्यामते उर्ध्वपातनातून मिळालेल्या शुद्ध पाण्यात भले शरीराला लागणारे आवश्यक घटक नसले तरी फार काही बिघडत नाही.उगाच बाजारातील महागडे मिनरल वॉटर घेण्यात काही अर्थ नाही.

चित्रगुप्त's picture

13 May 2017 - 10:05 am | चित्रगुप्त

अन्नातून शरीराला आवश्यक मिनरल्स मिळत असताना पिण्याच्या पाण्यात ते मिळवण्याचा अट्टाहास का केला जातो?

नेमकी कोणकोणती खनिजे, किती प्रमाणात शरीराला आवश्यक असतात? त्यातील रोजच्या आहारातून कोणकोणती मिळतात ? मिनरल वॉटरात कोणकोणती असतात ? यावर विवेचन केल्यास फार चांगले होईल.
खनिजे ही जमिनीतून मिळतात ना ? शेकडो वर्षांपासून वापरात असलेल्या जमीनीत ती शिल्लक असतात का? भारतात कोणकोणत्या प्रदेशात कोणकोणती खनिजे वरच्या मातीच्या थरात उपलब्ध आहेत, यावर संशोधन झालेले आहे का?
खालील नकाशा अगदीच ढोबळ आहे:
.

सुबोध खरे's picture

13 May 2017 - 10:35 am | सुबोध खरे

गोडसे साहेब
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रिव्हर्स ऑस्मॉसिस चे काही तोटे आहेत.
However, there are disadvantages. Many reverse osmosis systems remove the good with the bad. Iron, calcium, manganese, and fluoride are a few of the beneficial chemicals that may be removed, depending on your system. Removing these essential elements from our drinking water doesn't pose much of a problem, since a well-rounded diet will provide these as well. However, many Americans do not eat a diet that is rich in vitamins and minerals. If these people also drink demineralized water, then they are more prone to vitamin and mineral deficiency.

Additionally, when used for cooking, demineralized water was found to cause substantial losses of all essential elements from foods such as vegetables, meat and cereals. Such losses may reach up to 60 percent for magnesium and calcium, 66 percent for copper, 70 percent for manganese, and 86 percent for cobalt. In contrast, when hard water (not treated with reverse osmosis) is used for cooking, there is minimal loss of these essential elements.

Kids also may lose out on fluoride protection for their teeth. According to the Centers for Disease Control, drinking municipal water that contains fluoride decreases cavities in kids by up to 60 percent. Reverse osmosis systems may remove this fluoride, thus putting kids at increased risk for cavities.

From an environmental perspective, household reverse osmosis units do help the environment by curbing the purchase of bottled water, and thus creating less plastic waste in our landfills. However, because household units are unable to produce much back-pressure, they may collect as little as 5-15 percent of the water as "pure water" for drinking. Therefore, depending on the system, for each gallon of purified water produced, between 2 to 5 gallons are wasted (sometimes more), and discarded to the septic system.
बाकी बाजारातील मिनरल वॉटर आणण्यात अर्थ नाही याच्याशी मी संपूर्ण सहमत आहे. मुळात बाजारात मिळणारे बाटलीबंद पाणी (बिसलेरी इ) हे मिनरल वॉटर नाही. बाटलीबंद पानि विकले जाते त्यातील २५ ते ७० % हे नकली असून नुसते नळाचे पाणी असते. जितके उत्तरेत जल तितके नकली पाणी असण्याची शक्यता जास्त. http://food.ndtv.com/food-drinks/shocking-over-10-000-illegal-bottled-wa...
मिनरल वॉटर म्हणून जे मुद्दाम विकले जाते ते ६० रुपये लिटर या दराने आहे आणि त्याची मुळीच आवश्यकता नाही. (फॅडसाठी कितीही पैसे मोजा)

चित्रगुप्त's picture

13 May 2017 - 9:55 am | चित्रगुप्त

डॉ. खरे यांनी विस्तृत माहिती दिलेली आहेच, त्याप्रमाणे RO खरेदीपूर्वी (वा च्या ऐवजी) सध्या खात्रीलायक पिण्याचे पाणी विकणार्‍या (बिसलेरी, माउंट कैलाश इ सारख्या) कंपनीचे पाणी विकत घेऊन पीणे सुरू करावे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत हयगय नको. बाटल्या अगदी स्वच्छ असण्याबद्दल आगावूच आग्रह धरावा.
काही कारणाने पंधरा दिवसाहून जास्त दिवस बंद ठेवल्यास RO वा तत्सम उपकरणातील फिल्टर नवीन टाकणे अगत्याचे असते.

सुबोध खरे's picture

13 May 2017 - 11:20 am | सुबोध खरे

ज्या ठिकाणी पाण्यात अतिरिक्त फ्ल्युओराइड, अर्सेनिक किंवा शिसे असेल किंवा जेथे पाणी अतिशय जास्त क्षारयुक्त किंवा केमिकलयुक्त असेल ( म्हणजे जवळपास रासायनिक कारखाने असून तेथील "भूजल" दूषित झाले आहे) तेथेच RO फिल्टर वापरावेत अन्यथा साधे "टाटा स्वच्छ" सारखे शुद्धीकरण फिल्टर वापरणॅ पुरेसे आहे. साधारण जेथे महानगर पालिकांचे पाणी मिळते तेथे पाण्यातील क्षारांचे प्रमाण नियंत्रित केलेले असते( ३०० mg/ lit) त्यामुळे अशा ठिकाणी RO फिल्टरची गरज नाही.

आगाऊ म्हादया......'s picture

20 May 2017 - 6:03 pm | आगाऊ म्हादया......

आता आधी टीडीएस मोजता येतो का ते पाहतो मग पुढचं.घ्यावा तर लागेलच

अवांतर- परवा एक विक्रेत्याने १७०००, चा प्युरीफायर दाखवून फेफरं आणलं होतं
८ स्टेज प्युरीफिकेशन म्हणे

पाण्याच्या शुद्धीचे आणखी एक प्रकार आहे.

Ecoclean 2300 Liquid reagents is Multitasking having properties of Flocculation, Coagulation, Sedimantation & Disinfection and very useful for STP/ETP water treatment, Cooling Tower water descaling, Swimming Pool water treatment and drinking water Purification Plants.

This water, after filtration is colourless, clear, odour-free, bacteria-free and fit for re-use. The process involves the use of E C O C L E A N - 2 3 0 0 a proprietary reagent developed by Ecohealth, which is made from herbal extracts – totally organic, safe, non-toxic and extremely effective.

The ingredients used in the manufacture of the reagents are all of herbal origin. Organic, non-toxic, safe and with no side-effects. Does not require any major investment on infrastructure. Can easily be structured nto existing STPs with minimal infrastructural changes. Does not require elaborate network of aerators, blowers and other gadgetry like UF/UV/RO. Non-power-intensive process

Totally eliminates all harmful bacteria, particularly the most difficult E-coli, which is the cause for a large variety of water-borne disease particularly in children of developing nations. The residual effect of disinfectant ensures days of bactericidal action. Re- contamination does not happen for days. Very versatile process – Can be used for drinking water.