तुम्ही आहात का सुपरटेस्टर????????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
5 Apr 2017 - 6:24 pm

माणुस हा असा प्राणी आहे जो फक्त पोट भरण्यासाठी खात नाही,जे खातो त्याची चव कशी आहे याचा सखोल विचार करणारा माणुस हा एकमेव प्राणी असावा.पण प्रत्येक माणसाला एखाद्या पदार्थाची चव सारखीच लागते असा आपला समज आहे.पण तो खरा नाही.याचा शोध म्हणावा असा प्रकार १९३१साली लागला. डॉ.ए.एल.फॉक्स हे अमेरीकन वैज्ञानिक आपल्या dupont chemistry lab मध्ये काम करत असताना अपघाताने त्यांच्या हातून PTC(phenylthiocarbamide) हे रसायन लॅबमध्ये पसरले ,लॅबमध्ये या केमिकलचा धुरळा उडाला.फॉक्स यांच्याजवळ थांबलेल्या त्यांच्या सहकार्याला तोंडात खूप कडवट चव जाणवली ,पण फॉक्स यांना कोणतीही चव जाणवली नाही.फॉक्स यांच्या सहकार्याने ही चव PTCची आहे हे खात्रीने सांगितले.
या प्रकारानंतर फॉक्स यांनी अनेकांना PTC ची चव घ्यायला सांगितले ,काहींना अत्यंत कडवट ,काहींना थोडीशी कडवट तर काहींना ते केमिकल चवहीन वाटले.यावरुन फॉक्स यांनी अंदाज बांधला की प्रत्येकाचे चव घ्यायची क्षमता वेग वेगळी असते.
१९९० साली लिंडा बर्टोशुक या संशोधीकेने यावर एक सखोल अभ्यास केला ,PTC हे केमीकल काही प्रमाणात विषारी असल्याने तिने PROP(6n propilthiouracil) या नवीन केमिकलचा वापर करुन संशोधन केले.या अभ्यासाअंती असे आढळुन आले की २५% लोकांना PROP खूप कडवट लागते ,यांना सुपरटेस्टर असे नाव दिले गेले.या लोकांच्या जीभेचा अभ्यास केल्यावर असे आढळले की यांच्या जीभेवर चव संवेदक खूप जास्त प्रमाणात असतात,या संवेदकांना इंग्रजीत fungiform papillae असे म्हणतात,सामान्य भाषेत यांना taste buds असेही म्हणतात.हे मशरुमच्या आकाराचे जीभेवरचे उंचवटे सहज मोजता येतात.ज्यांना PROP कमी कडवत लागते त्यांच्या fungiform papillae ची संख्या मध्यम असते,यांना मेडियम टेस्टर्स म्हणतात .ज्यांना PROP चवहीन लागते त्यांच्या जीभेवर अत्यंत कमी चव संवेदक असतात.अश्या लोकांना नॉन टेस्टर्स म्हणतात .
सुपरटेस्टर्स हे कडवट पालेभाज्या ,गोड पदार्थ ,अतितिखट खाणे टाळतात,त्यामुळे ते बर्याचदा तब्येतीने स्लीम असतात.जी लहान मुले पालेभाज्या अजिबात खात नाहीत ते सुपरटेस्टर्स असण्याची शक्यता असते.त्यांना फोर्स करुन उपयोग नसतो.
याउलट मेडीयम टेस्टर्स व नॉन टेस्टर्स हे अनेक पदार्थ ,पालेभाज्या ,गोड,अतितिखट आवडीने खातात,त्यामुळे ते हेल्दी असतात.
आता,आपण कोणत्या कॅटेगरीत आहोत हे कसे समजणार?.यावर PROP paper टेस्ट करता येते.यामध्ये आपल्याला एक कीट मिळते ,यात PROP या केमीकलने युक्त असा पेपर मिळतो,तो जीभेवर ठेवल्यावर आपल्याला त्याची चव कशी लागते वा लागत नाही यावरुन आपण सुपरटेस्टर्स ,नॉन टेस्टर्स की मेडीयम टेस्टर्स आहोत हे कळते.
भारतात हे कीट मागवता येत नाही.पण अमेरीकेत राहणार्यांना सहज मागवता येईल.toung
दुसरा पण सोपा उपाय आहे.जीभेवरचे उंचवटे अर्थात fungiform papillae मोजणे.यात निळ्या रंगाचा फूड कलर आपल्या जीभेवर पसरवायचा ,हा रंग उंचवट्यांवर लागत नाही ,त्यामुळे उंचवटे गुलाबी रंगाचेच राहतात व निळ्या ब्यागराऊंडवर उठुन दिसतात.एका कार्डबोर्ड वा पुठ्ठ्यावर ७मीलीमीटर व्यासाचे वर्तुळ कापून घ्यायचे.जीभेवर हे वर्तुळ ठेवून या वर्तुळात कीती उंचवटे अर्थात taste buds आहेत हे कुणाला तरी मोजायला सांगायचे ,भिंगाचा वापर करु शकता.
जर ३५ पेक्षा जास्त उंचवटे(taste buds) असतील तर तुम्ही सुपरटेस्टर आहात
जर १५ ते ३५ दरम्यान उंचवटे असतील तर तुम्ही मेडीयम टेस्टर आहात.
जर १५ पेक्षा कमी उंचवटे असतील तर तुम्ही नॉन टेस्टर आहात.
सुमारे ४०% भारतीय नॉन टेस्टर्स आहेत.मी स्वतः सुपरटेस्टर आहे.
आंतरजालावर खादाडी हा एव्हरग्रीन विषय आहे,त्याच्या जवळ जाणारा हा विषय आहे म्हणून हा प्रपंच.

पाकक्रियाप्रकटन

प्रतिक्रिया

टेस्टच्या अगोदर किती तास काय खाता कामा नये?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

5 Apr 2017 - 11:30 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

साधारण एक तास

Ranapratap's picture

5 Apr 2017 - 8:15 pm | Ranapratap

मी स्वतः chocolate टेस्टर चे काम केले आहे. पण आता पर्यंत हि माहिती मिळाली नाही. धन्यवाद

हैला हे भारीय की! चॉकलेट टेस्टर कसं बनायचं?

===
छान माहिती. लेख आवडला.

Ranapratap's picture

13 Apr 2017 - 8:33 pm | Ranapratap

यासाठी प्रथम चॉकोलेट तयार करण्याची माहिती असायला हवी. मी स्वतः 22 वर्षे एका चॉकोलेट कंपनी मध्ये काम करत आहे. यासाठी प्रथम कोमट पाण्याने खळखळून चुळा भरून तोंड स्वच्छ करायचे, नंतर चॉकोलेट चा एक तुकडा तोंडात नेऊन चवीने चघळायचा, यामध्ये तुमाला, कडू, गोड, जळकट, मडी, ओईली आशा चवी लागतील, याची लॉग बुक मध्ये नोंद करायची. तसेच फ्लेवर सेन्स होणे ही थोडी अनुभवाची गोष्ट आहे.

हम्म. अप्लाय करावं का विचार करतेय :P

सुबोध खरे's picture

5 Apr 2017 - 8:43 pm | सुबोध खरे

आपल्याला करता येणारी एक सोपी चव म्हणजे कोथिंबीर. सुपर टेस्टर लोकांना कोथिंबीर (आणि तिचा वासही) आवडत नाही.
याच्या शिवाय एका वेळेस दोन प्लेट मामलेदाराची ( पुण्यात रामनाथची इ इ) तिखट मिसळ खाणाऱ्या लोकांची जीभ हि कमी संवेदनशील( नॉन टेस्टर) असते.
तेंव्हा मी "किती" तिखट खाऊ शकतो म्हणून दर्पोक्ती करणाऱ्या माणसांनी जरा विचार करावा.

अभिजीत अवलिया's picture

5 Apr 2017 - 10:36 pm | अभिजीत अवलिया

नवीनच माहिती कळाली.

रुपी's picture

7 Apr 2017 - 4:27 am | रुपी

+१

रेवती's picture

5 Apr 2017 - 11:46 pm | रेवती

नवीन माहिती आवडली.