चेटकीण

ओ's picture
in जे न देखे रवी...
1 Apr 2017 - 12:29 pm

आमच्या लहान पणी म्हणे एक चेटकीण असायची
जी मुलं मस्ती करतात त्यांना ती पकडून न्यायची

गावाबाहेर नदीच्या पल्याड तिची झोपडी असायची
नाही म्हटलं तरी आम्हाला तिची मनापासून भीती वाटायची

मोठे लोक म्हणायचे मुकाट्याने जेवा नाही तर ती येईल
वेदना असह्य होतील अशा गरम तेलाच्या कढईत ती टाकील

हि चेटकीण आम्हाला विविध रूपात भेटायची
कधी हडळ बनून तर कधी बुआ बनून यायची

मस्तीखोर मुलांना पकडून नेणच जणूं तीच काम होत
आमच्या आयुष्यात मात्र तिला बागुलबुवा च स्थान होत

आमच्या बालपणाच्या गोष्टीत तिला एक खास जागा होती
अगदी आई बाबांच्या लहान पणी सुद्धा ती अशीच म्हातारी होती

तिच्या भीतीने का होई ना आमचे बालपण घडले
चांगल्या सवयी लहानपणी लागव्यात म्हणून तिनेच भाग पाडले

तिने घातलेल्या भीतीतला प्रेमाचा ओलावा मात्र कळाला नाही
तिला त्या वळणावर सोडून कधी मोठे झालो कळलंच नाही

आज मागे वळून पाहतो तेव्हा तिची झोपडी काही दिसत नाही
भीतीपोटी निर्माण झालेली तिची ओढ काही केल्या जात नाही

काय जादू करायची की मुलांना प्राण्यात बदलून टाकायची
अल्लड खट्याळ बालपण तिच्या जादूने मंत्रमुग्ध करायची

----© ओंकार जोशी

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

2 Apr 2017 - 3:02 am | पद्मावति

फारच मस्तं.

तिच्या भीतीने का होई ना आमचे बालपण घडले
चांगल्या सवयी लहानपणी लागव्यात म्हणून तिनेच भाग पाडले

हे खासच!

ओ's picture

2 Apr 2017 - 8:38 pm |

धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

2 Apr 2017 - 5:26 am | प्राची अश्विनी

आवडली कविता.

ओ's picture

2 Apr 2017 - 8:38 pm |

धन्यवाद

पैसा's picture

3 Apr 2017 - 9:37 am | पैसा

कविता आवडली

ओ's picture

3 Apr 2017 - 12:51 pm |

धन्यवाद

बरखा's picture

3 Apr 2017 - 3:33 pm | बरखा

आवडली कविता.