अस्पृश्य

ओ's picture
in जे न देखे रवी...
30 Mar 2017 - 10:52 pm

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या शरीराच्या गरजा भागवण्या साठी वेगवेगळी सोंग नाचवतो,ह्या संसाराच्या शर्यतीत ,आपली लाईफ स्टाईल मेनटेन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो,पण ह्या शर्यतीत पळत असताना आपल्या आत असलेल्या परब्रम्हाला मात्र विसरून जातो,आणि आणि आपला इग्नोरन्स त्या आत्म्याला कायम अस्पृश्य ठेवतो,देहाला नटवताना आणि रंगवताना,अंतरीचा वेगळा रंग पाहायला मात्र आपण कधी कधी विसरतो.....त्या आत्म्याने जर स्वतः बद्दल काही सांगितले तर तो काय सांगेल बर ?

अंतरीच्या गूढ गर्भात मी अस्पर्शित च राहिलो
संसाराच्या शर्यतीत मी दुर्लक्षितच राहिलो

पंचकोशांचे लेणे लेऊन मी आत बंधिस्त जाहलो
पंचेंद्रियांचे संधान बांधून मीच व्यक्त होऊ पाहतो

शरीराच्या पिंजऱ्यात अडकलेला स्वछंदी एक पक्षी मी
श्वासा वाटे आत येणारा आवश्यक प्राणवायू मी

बंधिस्त असलो पिंजर्यात शरीराच्या तरीही आहे मुक्त मी
अनंताचा अंश घेऊन त्यातच जळणारा एक दीप मी

शरीराच्या लखलखत्या तेजाचा स्रोत असलेला सूर्य मी
खोट्या रंगरंगोटीत देहाच्या अस्पृश्य राहिलेला आत्मा मी

---© ओंकार जोशी

कविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2017 - 11:40 am | अत्रुप्त आत्मा

@त्या आत्म्याने जर स्वतः बद्दल काही सांगितले तर तो काय सांगेल बर ?››› सांगू का? http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

ओ's picture

31 Mar 2017 - 4:00 pm |

कृपया सांगा

पद्मावति's picture

31 Mar 2017 - 11:47 am | पद्मावति

सुरेख!

ओ's picture

31 Mar 2017 - 4:02 pm |

धन्यवाद

यात दोन गैरसमज आहेत :
१) आत्मा म्हणजे प्राणवायू नाही.
२) आत्म्याला प्राणवायू लागत नाही.

अगदी बरोबर आहे तुमचं,आपला अभिप्राय लक्षात घेतला आहे,धन्यवाद,पण ही केवळ एक कल्पना आहे,आणि कल्पनेत काहीही अतर्क्य गोष्टी होऊ शकतात ह्या अनुषंगाने हे मला सुचलं असावं….आपण वेळ काढून हे वाचलं आणि अभिप्राय ही दिला त्या बद्दल खूप खूप आभार