महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

समांतर

Primary tabs

ओ's picture
in जे न देखे रवी...
18 Mar 2017 - 8:46 am

त्याची आणि तिची आज अचानक भेट झाली
दोघांच्या हि डोळ्यांना एकमेकांची ओळख पटली

त्याची आणि तिची कधी काळची घट्ट मैत्री होती
एकमेकांना एकमेकांची हवीहवीशी सलगी होती

पण आज मात्र ते होते एकमेकांसाठी जसे अनोळखी
होती त्यांच्यात जवळ जवळ एका तपाची खोल दरी

कधी काळी त्यांनी ही एकमेकांसाठी स्वप्न पहिली होती
कधी काळी त्यांची ही राधा कृष्णा सारखी निखळ मैत्री होती

पण आज राधा होती अनय ची आणि तो होता रुख्मिणीचा
तरीही आज त्यांच्या नात्यातला एक रेशमी धागा तसाच होता

आता त्यांच्या संवादात वैखरी ला देखील जागा नव्हती
कारण डोळ्यांनी त्यांच्या कधीचीच परा वाणी साधली होती

कि मैत्री पेक्षा हि पुढे अजून काही होते त्यांचे नाते ?
हो मैत्री सोबत होते निरपेक्ष प्रेमाचे अंतरात झरे

दोघांनी हि एकमेकांना वृंदावनाच्या वेशी पर्यंत साथ केली होती
पण कृष्णाची वाट मात्र त्याला मथुरे कडे नेणारी होती

ती ही मग त्या वळणावर येऊन जरा वळली
आणि मग मात्र दोघांची वाट समांतर झाली

एक तपा नंतर आज पुन्हा दोघे भेटले
एका क्षणात दोघांच्या मैत्री चे कोनाडे उजळले

आता नव्हतं त्यांच्या जवळ एकमेकांशी बोलायला काही
पण रेशमाचा तो धागा अजूनही प्रेमाची देत होता ग्वाही

दोघांनीही मग डोळ्यांनाच बोलू द्यायचे ठरवले
आणि न बोलताच एकमेकांना डोळ्यात साठवून घेतले

अर्धवट राहिलेल्या प्रेमाच्या गोष्टीतले ते राजा राणी होते
प्रेम अपूर्ण असले तरी मैत्री ने त्यांना पूर्ण केले होते

----© ओंकार जोशी

कविता