जेथे लेख वाचून लोक म्हणतात वॉव,
सर्वांना असतो येथे खेळायचा आपल्या लेखाचा डाव,
जेथे मराठी माणुस घेतो लेख वाचन्यासाठी धाव,
अशी आहे आपली साइट 'मिसळपाव',
येथे सर्वांचे आहे वेगवेगळे गांव,
पण सर्वांना आहे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यांची ठाव,
वाईट काही समाजात घडले तर सर्वांच्या कालजात बसते घाव,
सर्वांचे सुख-दुःख शेयर करणारी आपली साइट मिसळपाव,
येथे सर्व आहेत एक से बढ़कर एक पण जगाला नव्हतं ते ठाव,
आता वृत्तवाहिंन्या पन शोधत येतात हे कुठले लेख आहेत राव,
जगात प्रसिद्ध केलाय महराष्ट्राच नाव,
कोणी विचारल तर सांगा आपली साइट आहे 'मिसळपाव'.
-विकास नरभवर.
(हा माझा मित्र अलीकडेच मिपा वाचू लागलाय. मी जे काही खरडत इथे किंवा जे आवडते त्याच्या लिंक देत असतो व्हाट्सअँप ग्रुपात त्यातूनच त्याला मिपाची आवड लागली आणि आलं रात्री अचानक हि कविता ग्रुपवर धडकली.)
प्रतिक्रिया
11 Mar 2017 - 10:58 am | पैसा
एक काम करा. तुमच्या मित्राला मिपाचे सदस्यत्व घ्यायला सांगा आणि स्वतःच्या आयडीने कविता पोस्ट करू द्या.
11 Mar 2017 - 11:48 am | इरसाल कार्टं
हो नक्कीच
11 Mar 2017 - 11:42 am | जव्हेरगंज
भारीच की!!
11 Mar 2017 - 11:57 am | हरवलेला
तुमचा मित्र कितवीत आहे ?
11 Mar 2017 - 12:05 pm | इरसाल कार्टं
विंजिनेर हाये तो. ; )
कविता हा त्याचा प्रांत नाही.
11 Mar 2017 - 11:18 pm | चांदणे संदीप
पाव्हणं?? घ्या डबल!
12 Mar 2017 - 12:33 am | जव्हेरगंज
चुनाच लावलाकी!!
12 Mar 2017 - 8:35 am | ज्योति अळवणी
काहीतरी वेगळ वाचायला मिळेल असं वाटल होत
12 Mar 2017 - 11:25 am | डॉ सुहास म्हात्रे
हितसंबंध आणि जवळिक नसल्याने अश्या अमिपाकराने व्यक्त केलेल्या भावनांचे मोल खूप असते !
धन्यवाद ती कविता इथे टाकल्याबद्दल. त्यालाही मिपा सभासद बनवून आपल्यातलाच एक करून टाका राव. :)
12 Mar 2017 - 1:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१००
-दिलीप बिरुटे
12 Mar 2017 - 7:09 pm | इरसाल कार्टं
मलाही असेच वाटले म्हणून इथे खरडली.
वाचल्यानंतर बऱ्याच जणांचा भ्रमनिरास झाला असेल याची कल्पना आहेच.
पण एक अमिपाकर मिपाबद्दल लिहितो याचे मला कौतुक वाटले.
12 Mar 2017 - 1:19 pm | मार्मिक गोडसे
अगदी मनातले बोललात.
12 Mar 2017 - 8:29 pm | टवाळ कार्टा
भारीये