५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
9 Mar 2017 - 8:28 pm
गाभा: 

५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे.

तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे.

________________________________________________________________________________________________

१) उत्तर प्रदेश

अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी

भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०)

ब) टाईम्स नाऊ

भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४)

क) एबीपी न्यूज

भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२)

ड) सीएनएन-न्यूज १८

भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१)

ई) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस

भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२)

________________________________________________________________________________________________

२) उत्तराखंड

अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर

भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५)

ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी

भाजप+ (३८), काँग्रेस (३०)

क) न्यूज-२४

भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२)

ड) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस

भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१)

ई) टुडेज चाणक्य

भाजप+ (५३), काँग्रेस (१५)

फ) सीएनएन-न्यूज १८

भाजप+ (३८), काँग्रेस (२६)

________________________________________________________________________________________________

३) पंजाब

अ) इंडीया टुडे-अ‍ॅक्सिस

अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१)

ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी

अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५)

क) न्यूज-२४

अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३)

ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर

अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७)

ई) सीएनएन-न्यूज १८

अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१)

________________________________________________________________________________________________

४) गोवा

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर

भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४)

ब) इंडिया न्यूज- एमआरसी

भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८)

क) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस

भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९)

ड) सीएनएन-न्यूज १८

भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)

५) मणिपूर

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर

भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५)

ब) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस

भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५)

________________________________________________________________________________________________

इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल.

http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly-...

प्रतिक्रिया

दुश्यन्त's picture

14 Mar 2017 - 1:52 pm | दुश्यन्त

हे आप'वाले 'खाईन तर तुपाशी'वाले आहेत आणि झटपट'च्या आजच्या काळात त्यांचे समर्थक आणि विरोधक पण तसच वागतात. एखाद्या नवख्या पक्षाला पंजाब मध्ये लोकसभेत ४ जागा आणि आता काही का असेना क्रमांक २ च्या जागा / विरोधी पक्ष नेतेपद हे तसे काही कमी यश नाही पण पहिल्या झटक्यात पंजाब /गोव्यात ८५-९०% जागा मिळवू वगैरे वल्गना बिनबुडाच्या असतात. पंजाबमध्ये जे मिळवले त्यावर आता सक्षम विरोधी पक्षच काम करायला हवे पण हे लोक निवडणूक एक वर्ष असताना जागे होऊन फक्त आरडा ओरडा करतात. पंजाबमध्ये आपचे ४ खासदार निवडून आले त्यातले किती बाहेर गेले / हाकलले आणि कोण पक्षात आहे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना पण माहीत नसेल.

वरुण मोहिते's picture

13 Mar 2017 - 5:59 pm | वरुण मोहिते

च्या विश्लेषणाच्या प्रतीक्षेत .
समजतच नाही काही >>> आकडेवारी च्या अपेक्षेत

वरुण मोहिते's picture

13 Mar 2017 - 7:13 pm | वरुण मोहिते

का हरतेय काही राज्यात )
सहज म्हणून विश्लेषण कोण करेल का ??
आकडेवारी वैग्रे

भाजपने गोवा आणि पंजाबात सत्ता गमावली आहे. त्यापैकी पंजाबात भाजप तसाही युतीतीलछोटा भाऊ आहे (२०१२ मध्ये सत्तेत असताना सुद्धा भाजपचे १२ आमदार होते. त्यांनी २३ मतदारसंघात निवडणूक लढवली होती. २०१७ मध्ये १२ चे ३ झाले) मुळातच भाजप पंजाबात छोटा पक्ष आहे. गेली १० वर्षे सातत्याने सत्तेत असल्यामुळे मतदारांची नाराजी त्यांना भोवली, आणि नाराजी ओढवून घेण्यात अकाली दलाने (मोठा पक्ष म्हणून) मोठाच हातभार लावला.
भाजपने अकाली दलाच्या छायेतून बाहेर पडावे हेच उत्तम.

गोवा: गोव्यात भाजपने ८ जागा गमावल्या (आधी २१ आमदार होते आता १३, विधानसभेच्या एकूण जागा ४०) . लक्ष्मीकांत पार्सेकर काही लोकप्रिय नव्हते. शिवाय अंतर्गत लाथाळ्यांचा, मगोप ने साथ सोडल्याचा त्यांना फटका बसला.

उ. प्र आणि उत्तराखंड मध्ये तर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.
मणिपूर मध्ये त्यांची गेल्या निवडणुकीत एक पण जागा नव्हती, आता २१ जागा मिळवून तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. आणि इतर काही पक्षांच्या मदतीने भाजपने तिथे बहुमताचा दावा केलाय. भाजपला गोव्यात पण इतर पक्षांनी साथ दिली आहे.

तर निवडणूक झालेल्या ५ पैकी ४ राज्यात भाजप सत्ता स्थापन करणार आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपचा आधी काही जोर नव्हता. (तसाच तो दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पण नाहीय). पण आता अरुणाचल प्रदेश , आसाम , नागालँड , सिक्कीम, आणि आता मणिपूर या ५ राज्यांमध्ये एकतर भाजपचा मुख्यमंत्री आहे किंवा भाजप सत्तेत भागीदार आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2017 - 2:27 pm | श्रीगुरुजी

दिल्ली महापालिकेची निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे न वापरता जुन्या पद्धतीने मतपत्रिका वापरून घेतली जावी अशी मागणी २१ व्या शतकातल्या अवतारी महापुरूषांनी केली आहे. नाचता येईना *गण वाकडं!

गामा पैलवान's picture

14 Mar 2017 - 6:17 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

कशावरनं ही यंत्रं बाधित (कॉम्प्रमाईझ्ड) नाहीत?

आ.न.,
-गा.पै.

संरक्षणमंत्री पदासाठी फडणवीस आणि शिवराज यांची नावे चर्चेत आहेत. फडणवीस आता कुठे जम बसवत आहेत त्यांना काढू नये आणि काढलेच तर मग गडकरींनाच राज्यात पाठवावे. चंद्रकांत पाटील हे बाकी सगळे ठीक असले तरी लोकांतून निवडून आले नाहीत आणि राज्यभर त्यांना कुणी ओळखत नाही. खडसे संकटात नसते तर ते चालले असते बाकी प्रदेश भाजपमध्ये तावडे, पंकजा हे सगळे मुख्यमंत्रीपदासाठी अननुभवी लोक आहेत. तावडे, दानवे तर बोलबच्चन आहेत.
बाकी जर शिवराज केंद्रात गेले तर मध्य प्रदेशची पण हालत गोव्यासारखी होऊ शकते !
भाजपकडे काय लायक लोक कमी आहेत काय कि मोदींना बरेच लोक चालत नाहीत? सुरुवातीला पण संरक्षण खात्याला ५-६ महिने पूर्ण वेळ मंत्री नव्हता आता पण राज्यातले लोक घ्यायला पाहत आहेत.

ravpil's picture

14 Mar 2017 - 8:15 pm | ravpil

Anybody has mobile number of vattel te WhatsApp group ? Please share.