५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
9 Mar 2017 - 8:28 pm
गाभा: 

५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे.

तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे.

________________________________________________________________________________________________

१) उत्तर प्रदेश

अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी

भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०)

ब) टाईम्स नाऊ

भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४)

क) एबीपी न्यूज

भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२)

ड) सीएनएन-न्यूज १८

भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१)

ई) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस

भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२)

________________________________________________________________________________________________

२) उत्तराखंड

अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर

भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५)

ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी

भाजप+ (३८), काँग्रेस (३०)

क) न्यूज-२४

भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२)

ड) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस

भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१)

ई) टुडेज चाणक्य

भाजप+ (५३), काँग्रेस (१५)

फ) सीएनएन-न्यूज १८

भाजप+ (३८), काँग्रेस (२६)

________________________________________________________________________________________________

३) पंजाब

अ) इंडीया टुडे-अ‍ॅक्सिस

अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१)

ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी

अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५)

क) न्यूज-२४

अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३)

ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर

अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७)

ई) सीएनएन-न्यूज १८

अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१)

________________________________________________________________________________________________

४) गोवा

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर

भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४)

ब) इंडिया न्यूज- एमआरसी

भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८)

क) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस

भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९)

ड) सीएनएन-न्यूज १८

भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)

५) मणिपूर

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर

भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५)

ब) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस

भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५)

________________________________________________________________________________________________

इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल.

http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly-...

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2017 - 8:45 pm | श्रीगुरुजी

एकंदरीत या आकड्यांवरून खालील चित्र दिसते.

१) पंजाबमध्ये अकाली दल-भाजप युतीचा सुपडा साफ होण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही वृत्तसंस्थेने त्यांना ११७ पैकी १४ पेक्षा जास्त जागा दिलेल्या नाहीत. सलग १० वर्षे सत्तेत असल्याने पंजाबमध्ये या युतीविरोधात प्रस्थापित राजवटविरोधात जबरदस्त लाट आहे.

दुसरीकडे काँग्रेस व आआपमद्ये जबरदस्त चुरस आहे. या दोघांपैकी नक्की कोणाला बहुमत मिळेल किंवा कोणता पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल याविषयी सांगता येणे अवघड आहे.

भाजप हा पंजाबमध्ये अत्यंत दुय्यम भागीदार आहे. ११७ जागांपैकी भाजप फक्त २३ जागा लढवितो (१९%) तर अकाली दल ९४ जागांवर उमेदवार उभे करतात (८१%). त्यामुळे या युतीचे यशापयश बहुतांशी अकाली दलाच्याच कामगिरीवर अवलंबून आहे. भाजपने विशेषतः राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर अकाली दलाच्या छायेतून बाहेर पडून स्वतंत्र उभारणी करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने भाजपकडे आतापर्यंत दोनच शीख नेते होते (सिधू व अहलुवालिया). आता सिधू काँग्रेसमध्ये आहे तर अहलुवालिया फारसे प्रभावी नाहीत. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपला शून्यापासून सुरूवात करावी लागेल. तसेच अकाली दल व भाजप यांच्यातील युती तुटली तर पंजाबमध्ये पूर्णपणे काँग्रेस किंवा आआप हे दोनच पक्ष शिल्लक राहतील. त्यामुळे या दोन्ही पक्षांना रोखण्यासाठी युती टिकणे आवश्यक आहे. युती तुटली तर अकाली दल नामशेष होऊन आआप फोफावेल आणि टिकली तर आपली वाढ होणार नाही असे धर्मसंकट भाजपकडे आहे. काहीही असले तरी भाजपने अकाली दलाच्या जोखडातून मुक्त होणे आवश्यक आहे.

२) उ. प्र. चे चित्र अस्पष्ट आहे. अ‍ॅक्सिसचे आकडे वगळता इतर सर्वांनी हंग विधानसभेची शक्यता दर्शविली आहे. हे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच अखिलेश यादवने सांगितले की जरूर पडल्यास आपण सरकार बनविण्यासाठी बसपला पाठिंबा देऊ. त्यामुळे निकालानंतर उ. प्र. मध्ये नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. भाजप व बसप एकत्र येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही.

परंतु भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल यावर सर्वांचे एकमत आहे.

३) गोव्यामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळता भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल असे दिसते.

४) उत्तराखंडमध्ये काही आकड्यांवरून बरोबरीची चुरस वाटते तर काहींच्या निष्कर्षावरून भाजपला स्पष्ट बहुमत किंवा सर्वाधिक जागा अशी परिस्थिती दिसते.

५) मणिपूरमधील आकडे परस्परविरोधी आहेत.

या सर्व ५ राज्यात मिळून विधानसभेच्या एकूण ६९० जागा आहेत. २०१२ मध्ये भाजपकडे ६९० पैकी फक्त ११२ जागा होत्या व अकाली दलाकडे अंदाजे ५८ च्या आसपास जागा होत्या. म्हणजे रालोआकडे अंदाजे ६९० पैकी १७० जागा होत्या. २०१७ मध्ये अकाली दलाकडे एक आकडी जागा असण्याची शक्यता आहे तर भाजपचा स्वतःचा आकडा २००+ होईल असे वाटते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला या वाढीव जागांचा फायदा होईल. तसेच भाजप गोवा राखण्याची व उत्तराखंड, मणिपूर व उत्तरपदेश मध्ये स्वतः सरकार स्थापण्याची बरीचशी शक्यता आहे. पंजाब रालोआ गमावणार असे चित्र दिसत आहे. काँग्रेस पंजाब जिंकू शकते तसेच मणिपूर व कदाचित उत्तराखंड राखू शकते.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2017 - 8:57 pm | श्रीगुरुजी

नोव्हेंबर २०१५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीत व फेब्रुवारी २०१७ मधील मुंबई, ठाणे व नागपूर महापालिका निवडणुकांमध्ये इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसचे अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळपास होते. पुणे महापालिकेचे त्यांचे अंदाज काहीसे चुकले. म्हणजे भाजपला ७७-८५ ऐवजी ९८ व राष्ट्रवादीला ६०-६६ ऐवजी ३१ जागा मिळाल्याने त्यांचा अंदाज चुकला. अर्थात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील हा अंदाज बरोबरच होता. पण त्यांच्या अंदाजपेक्षा भाजपचा बर्‍याच जास्त जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला बर्‍याच कमी जागा मिळाल्या.

वरील ५ राज्यांचे अ‍ॅक्सिसचे अंदाज पाहिले तर उ. प्र. व उत्तराखंड मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसते तर गोव्यात भाजप बहुमताच्या अगदी जवळ दिसतो आणि उर्वरीत २ राज्यात काँगेसला बहुमत मिळताना दिसते.

गॅरी ट्रुमन's picture

10 Mar 2017 - 9:59 pm | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशातील इतर काही एक्झिट पोल/अंदाज

सुदर्शन न्यूजः भाजप-२५३, सपा+काँग्रेस- ७३, बसपा-५७, रालोद-५, इतर-१४
5dots.org: भाजप-२४३, सपा+काँग्रेस-५३, बसपा:१०१, इतर-५
डॉ. प्रवीण पाटील : भाजप-२०७, सपा-१२०, बसपा-६४, इतर-१२

उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. १५ मिनिटात अगदी पहिले कल यायला सुरवात होईल. मी नेहमीप्रमाणे मिपावर ऑनलाईन असणार आहेच आणि मधूनमधून कल/निकाल पोस्ट करणार आहे.

उद्या मिपा थोड्या वेळासाठीही गलपाटू नको दे रे म्हाराजा. उद्या थोड्या वेळासाठीही लाईट जाऊ नको देत रे म्हाराजा. उद्या थोड्या वेळासाठीही इंटरनेट बंद पडू नये रे म्हाराजा. उद्या निवडणुकांची मतमोजणी आहे. त्याला या असल्या गोष्टींचे गालबोट नको रे म्हाराजा!!

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2017 - 10:54 pm | श्रीगुरुजी

- झी न्यूजने भाजपला २१९ जागांचा अंदाज दिला आहे.

- Artificial Intelligence नावाखाली कोणीतरी भाजपला २२० जागांचा अंदाज दिला आहे.

- एका वाहिनीने ४ ज्योतिषांना बोलावून त्यांचे भाकित विचारल्यावर ४ पैकी ३ जणांनी भाजपला यश मिळेल असे संदिग्ध भाकित वर्तविले.

भाजपच्या बाजूने ज्या तर्‍हेने हवा निर्माण केली जात आहे त्यावरून दिल्ली व बिहार प्रमाणे यावेळीसुद्धा माध्यमांच्या सर्वक्षणाचा फुटेल अशी शक्यता वाटू लागली आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:01 am | गॅरी ट्रुमन

मतमोजणी सुरू होत आहे. १०-१५ मिनिटात पहिले कल हाती येतील.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:15 am | गॅरी ट्रुमन

पहिला कल उत्तर प्रदेशातून आला आहे. शामली मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे. २०१२ मध्ये ही जागा काँग्रेसने जिंकली होती.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:17 am | गॅरी ट्रुमन

शामली मतदारसंघ उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आहे. तिथून भाजप आघाडीवर असेल तर ती पक्षासाठी चांगली बातमी आहे.

आणखी एक कल आला आहे. मऊ (पूर्वांचल) मतदारसंघातून बसपाचा बाहुबली मुख्तार अन्सारी आघाडीवर आहे.

आतापर्यंतः

भाजप-१, बसपा-१

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:20 am | गॅरी ट्रुमन

ओराई (पूर्वांचल) मधून भाजप आघाडीवर, राजाभय्या (अपक्ष) कुंडामधून आघाडीवर, गुन्नौर या सपाच्या बालेकिल्ल्यातून अपेक्षेप्रमाणे सपा आघाडीवर

आतापर्यंतः भाजप-३, सपा+काँग्रेस-२, बसपा-१

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:21 am | गॅरी ट्रुमन

आतापर्यंत पोस्टल मतांची मतमोजणी सुरू झाली असण्याची शक्यता आहे. हे कल बदलू शकतात.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:23 am | गॅरी ट्रुमन

कुशीनगर आणि ओराई या सपाच्या सेफ जागांमधून भाजप आघाडीवर आहे.

आतापर्यंत जितके कल आले आहेत त्यात भाजपने ज्या जागांवर आघाडी मिळवली आहे त्यापैकी एकही जागा भाजपने जिंकली नव्हती. तर सपा मागच्या वेळेपेक्षा जागा गमावत आहे.

आतापर्यंतः

कल-१०, भाजप-५, सपा+काँग्रेस-३(राजाभय्या धरून) , बसपा-२

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:27 am | गॅरी ट्रुमन

मणीपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंग (काँग्रेस) आघाडीवर. त्यांच्याविरूध्द निवडणुक लढवत असलेल्या इरॉम शर्मिला मागे.

जसवंतनगरमधून शिवपालसिंग यादव आणि रामपूरमधून आझम खान आघाडीवर.

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 8:58 am | श्रीगुरुजी

आझमखान पडला पाहिजे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:32 am | गॅरी ट्रुमन

पंजाबमधील पहिला कल आला आहे. अमृतसर पश्चिममधून काँग्रेस आघाडीवर आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:34 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशात कल-३५ , भाजप-२० , सपा+काँग्रेस-११, बसपा-४
पंजाबः कल-१, काँग्रेस-१
मणीपूरः कल-२, काँग्रेस-१, इतर-१

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:38 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशात भाजपने आता थोडी आघाडी घेतली आहे. ४८ पैकी ३० जागांवर भाजप तर सपा+काँग्रेस ११ जागांवर तर बसपा ७ जागांवर आघाडीवर आहे.

वरुण मोहिते's picture

11 Mar 2017 - 8:38 am | वरुण मोहिते

सपा २१ आता . पंजाबमध्ये काँग्रेस सध्यातरी पुढे आहे .

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:44 am | गॅरी ट्रुमन

1

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:46 am | गॅरी ट्रुमन

1

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:49 am | गॅरी ट्रुमन

आतापर्यंतचे चित्र असे आहे की उत्तर प्रदेशात भाजपने चांगली आघाडी आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. अकाली दलाचा धुव्वा उडत आहे (अपेक्षेप्रमाणे) पण आआपला फार ठसा उमटवता आलेला नाही.

जलालाबादमधून सुखबीर बादल पिछाडीवर आहेत. तिथे आआपचे भगवंत मान नाही तर काँग्रेस आघाडीवर आहे.

हे लिहितालिहिता उत्तर प्रदेशातील ८० पैकी भाजपला ४९, सपा+काँग्रेसला २३ तर बसपाला ६ ठिकाणी आघाडी आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:53 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेश: ९६ पैकी भाजप ५८ , सपा+काँग्रेस २५ , बसपा-१०
पंजाब: २४ पैकी काँग्रेस १७, आआप ४ आणि अकाली+भाजपा ३
उत्तराखंड: ६ पैकी भाजप ४ आणि काँग्रेस २
मणीपूरमध्ये ४ पैकी काँग्रेस २, भाजप १ आणि इतर १

गोव्यातून अजून तरी एकही कल आलेला नाही. सगळे सुशेगाद चालू आहे असे दिसते.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:54 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशात भाजप ६२ (+४७) सपा+काँग्रेस २६ (-३८) असा कल आहे.

सपा+काँग्रेस २०१२ च्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त जागा गमावत आहे असे दिसते.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 8:58 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशः १२५ पैकी भाजप ७९ , सपा+काँग्रेस ३१ , बसपा-१२. भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे.
पंजाब: ३३ पैकी काँग्रेस २१, आआप ७ आणि अकाली+भाजप ४. काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली आहे. अमरिंदरसिंग पतियाळातून पिछाडीवर आहेत.
उत्तराखंड: १० पैकी भाजप ७, काँग्रेस ३
मणीपूरः ४ पैकी काँग्रेस २, भाजप १, इतर १

वरुण मोहिते's picture

11 Mar 2017 - 9:00 am | वरुण मोहिते

शी युती सपा ला महागात पडलीये असं वाटत आहे युपी मध्ये
उत्तराखंड भाजप ८ काँग्रेस ३ आता .

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:01 am | गॅरी ट्रुमन

आतापर्यंतचे चित्र---

उत्तर प्रदेशात आणि उत्तराखंडमध्ये भाजपने तर पंजाबमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. हे कल कायम राहिले तर भाजपचा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर पंजाबमध्ये काँग्रेसचा स्वीप असेल.

गोव्यात वाळपोई आणि सेंट अ‍ॅन्ड्रे या दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 9:01 am | श्रीगुरुजी

उ. प्र. - भाजप १०१/१८२ सप - ३४, बसप २३

पजाब - कॉंग्रेस ९/१८, आआप ५, अकाली ३

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:04 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशात १४६ पैकी भाजप ९७, सपा+काँग्रेस ३५ तर बसपा १३
पंजाबात ४१ पैकी काँग्रेस २५, आआप १० आणि अकाली+भाजप ६
उत्तराखंडमध्ये १५ पैकी भाजप १२, काँग्रेस ३
गोव्यात ३ पैकी ३ काँग्रेस
मणीपूरमध्ये ४ पैकी काँग्रेस २, भाजप १ आणि इतर १

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:08 am | गॅरी ट्रुमन

एन.डी.टि.व्ही वर म्हणू लागले आहेत की भाजपने हा स्ट्राईक रेट कायम ठेवल्यास भाजप २६० क्रॉस करेल. सपा+काँग्रेस आघाडीला जोरदार धक्का बसताना दिसत आहे. तसे झाल्यास ल्युटिन्स दिल्लीतील मिडियाला मोठा धक्का बसेल. उत्तराखंडमध्ये भाजपचा स्वीप दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. मणीपूरमध्ये काँग्रेस पुढे आहे. गोव्यात आतापर्यंत ४ पैकी ३ जागांवर काँग्रेस पुढे आहे.

रामपूरमध्ये आझमखान मागे, अपर्णा यादव (मुलायमसिंगाची सून) मागे, आझमखानचा मुलगा मागे.

आता उत्तर प्रदेशात भाजप १७१ पैकी ११६ ठिकाणी पुढे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:12 am | गॅरी ट्रुमन

गोव्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ८ पैकी ६ जागांवर काँग्रेस पुढे आहे तर भाजप अवघ्या २ जागांवर पुढे आहे. पंजाबमध्येही काँग्रेस आता बर्‍यापैकी पुढे आहे. काँग्रेसने पंजाब, गोवा आणि मणीपूर जिंकले तर तो विजय काँग्रेससाठी महत्वाचा मॉरल बूस्टर असेल हे नक्कीच.

आता उत्तर प्रदेशात १८९ पैकी १२६ जागांवर भाजप, ३८ जागांवर सपा+काँग्रेस तर २३ जागांवर बसपा पुढे.
उत्तराखंडमध्ये २५ पैकी २२ ठिकाणी भाजप आणि ३ ठिकाणी काँग्रेस.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:15 am | गॅरी ट्रुमन

पंजाबमध्ये काँग्रेस पुढे आहे आणि आआप मागे आहे याचा मला स्वतःला फार आनंद होत आहे. गोव्यात काँग्रेस पुढे असेल तर ते ही एका अर्थी चांगले आहे. गोव्यात दोनच लोकसभेच्या जागा आहेत आणि राष्ट्रीय राजकारणावर या निकालाचा काहीच परिणाम होणार नाही. पण आणखी एक राज्य जिंकले हे समाधान काँग्रेससाठी महत्वाचे आहे.

उत्तर प्रदेशात २१० पैकी १४० जागांवर भाजप पुढे आहे. सध्याचा स्ट्राईक रेट दोन-तृतीयांश आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:20 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशः २३२ पैकी भाजप १५६ , सपा+काँग्रेस ५० , बसपाला २४
पंजाबः ६६ पैकी काँग्रेस ३९, आअप १६ आणि अकाली-भाजपः १०
उत्तराखंडः ३६ पैकी भाजप २९, काँग्रेस ६, बसपा १
गोवा: ११ पैकी काँग्रेस ६, भाजप ३, इतर २

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:23 am | गॅरी ट्रुमन

अमेठीमधून भाजपच्या गरीमा सिंग आघाडीवर आहेत तर अयोध्या मतदारसंघातून सपाचा उमेदवार आघाडीवर आहे.

हे दोन कल खूपच प्रतिकात्मक आहेत. भाजपने रामनामाचा जप करू नये आणि काँग्रेसने गांधी कुटुंब सोडून इतरांना संधी द्यावी असा मतदारांचा संदेश आहे का?

या गरिमासिंगांची बॅक्सोरी फार रोचक आहे म्हणे.

सर्व वाहिण्यांवर आकडे कमालीचे वेगवेगवेगळे येत आहेत.
पण उप्र मध्ये भाजपा आघाडीवर,
पंजाबात कॉंग्रेस,गोव्यात कॉंग्रेस,उत्तराखंडात भाजपा,मणीपुरात भाजपा आघाडीवर.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:29 am | गॅरी ट्रुमन

उत्तराखंडमध्ये आता भाजप ३७ जागांवर आघाडीवर आहे आणि अजून २३ जागांवरील कल यायचे आहेत. भाजप उत्तराखंडमध्ये विजय मिळवला असे ९९% खात्रीने म्हणता येईल.

उत्तर प्रदेशात--- २७७ पैकी भाजप १८७, सपा+काँग्रेस ६३ आणि बसपा २४
पंजाबात-- ७९ पैकी काँग्रेस ४७, आआप १९ आणि अकाली+भाजप १२
गोव्यात १६ पैकी काँग्रेस ८, भाजप ५ तर इतर ३

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:33 am | गॅरी ट्रुमन

पंजाबमध्ये अकाली दल मागे आहे पण पूर्णच व्हाईटवॉश उडालेला दिसत नाही. ८५ पैकी १३ जागांवार अकाली+भाजप पुढे आहे. माझ्या अंदाजात मी अकाली २५ पर्यंत जातील असे म्हणले होते. तसे होईल का हे बघायचे. एन.डी.टी.व्ही वर पंजाबमध्ये भाजपचा धुव्वा उडत आहे असे म्हटले जात आहे. म्हणजे पंजाबमधील हिंदू मतदार अकाली दलाचा पराभव होणार असे चित्र उभे राहिले तर काँग्रेसकडे जातात हा इतिहास कायम राहणार असे दिसते. माझ्यासारख्या कित्येक भाजपच्या मतदारांना आआपपेक्षा काँग्रेस नक्कीच परवडली. कारण आआप अननोन डेव्हिल आहे तर काँग्रेस नोन डेव्हिल आहे. त्याप्रमाणे हिंदू मतदारांनी मते दिलेली दिसत आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पुढे दिसत आहे तर भाजपचा धुव्वा उडत आहे आणि आआपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.

वरुण मोहिते's picture

11 Mar 2017 - 9:36 am | वरुण मोहिते

भाजप विजयीच आहे .
मणिपूर आता काँग्रेस ९ आणि भाजप ६

उत्तर प्रदेशात ३०४ पैकी २०८ जागांवर भाजप आघाडीवर आहे. ही भाजपची त्सुनामी आहे. आणि भाजप आता बहुमताला लागणार्‍या २०२ पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये ९८ पैकी ५५ जागांवर काँग्रेस पुढे आहे. बहुमताला ५९ जागा हव्यात. म्हणजे काँग्रेस जवळपास 'तिकडे' आहे--- काँग्रेस इज ऑलमोस्ट देअर.

पंजाबात आता अकाली+भाजप २४ जागांवर तर आआप २१ जागांवर पुढे आहे. एकूणच आआपसाठी हे निकाल निराशादायक आहेत. एका वेळी जेवढी जमेल तितकीच उडी घ्यावी हा धडा आआपला परत एकदा मिळताना दिसत आहे. मला स्वतःला उत्तर प्रदेशमधील निकालांइतकेच पंजाबमधील निकालांचा आनंद आहे.

उत्तर प्रदेशात रामलाटेत १९९१ मध्ये भाजपने ४२५ पैकी २२१ जागा जिंकल्या होत्या. आता या क्षणी ३२६ पैकी २२७ जागांवर भाजप पुढे आहे. रामलाटेत मिळाले होते त्यापेक्षा मोठे यश उत्तर प्रदेशात भाजपला मिळताना दिसत आहे. तेव्हा रामनामापेक्षा विकास महत्वाचा आहे हा धडा भाजपलाही मिळावा.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:44 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशः ३३७ पैकी भाजप २३६ , सपा+काँग्रेस ६८ तर बसपा २९ जागांवर पुढे
पंजाबः १०३ पैकी काँग्रेस ५८, अकाली-भाजप २३ तर आआप २१ जागांवर पुढे
उत्तराखंडः ६० पैकी भाजप ४८, काँग्रेस १० तर इतर २ जागांवर पुढे
मणीपूरः २० पैकी काँग्रेस १२, भाजप ५ तर इतर ३ जागांवर पुढे
गोवा: १८ पैकी काँग्रेस ८, भाजप ७ तर इतर ३ जागांवर पुढे

या क्षणी उत्तर प्रदेशात ३५३ पैकी २४८ जागांवर भाजप पुढे आहे. अजून ५० जागांवरील कल येणे बाकी आहे. निकाल असेच लागले तर चाणक्य आणि अ‍ॅक्सिसचा इक्झिट पोल बरोबर होता असे म्हणायला हवे. यापुढे इतर संस्थांपेक्षा या संस्थांचा एक्झिट पोल अधिक गांभीर्याने घेतला जाईल. सी.एस.डी.एस, लोकनिती वगैरे सगळ्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे.

ही उत्तर प्रदेशात भाजपची त्सुनामी आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:54 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेश: ३६३ पैकी भाजप २५१, सपा+काँग्रेस ७३ , बसपा ३३
पंजाबः ११० पैकी काँग्रेस ६२, अकाली+भाजप २६ आणि आआप २१
उत्तराखंडः ६६ पैकी भाजप ५४, काँग्रेस १० आणि बसपा १
मणीपूरः २३ पैकी काँग्रेस १२, भाजप ७, इतर ४
गोवा: २० पैकी काँग्रेस ८, भाजप ८, इतर ४

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 9:58 am | गॅरी ट्रुमन

पंजाबमध्ये आता अकाली+ भाजप २९ जागांवर पुढे आहे. त्यापैकी २६ जागांवर अकाली दल तर अवघ्या ३ जागांवर भाजप पुढे आहे. अकाली दलाने ग्रामीण भागातील शीख मतदार राखले आहेत.

गोव्यात २ मिनिटांपूर्वी काँग्रेस आणि भाजप ८ जागांवर पुढे होते. हे लिहितालिहिता काँग्रेस ९ तर भाजप ७ जागांवर पुढे आहे. गोव्यात चुरस चालू आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:02 am | गॅरी ट्रुमन

१९८५ मध्ये अविभाजित उत्तर प्रदेशचे नारायणदत्त तिवारी मुख्यमंत्री असताना काँग्रेसने ४२५ पैकी २६९ जागा मिळवल्या होत्या. या क्षणी ३७८ पैकी २६७ जागांवर भाजप पुढे आहे. हा विजय १९८५ मधील काँग्रेसच्या विजयापेक्षाही मोठा विजय आहे.

ही नक्कीच भाजपची त्सुनामी आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:12 am | गॅरी ट्रुमन

आआपला चांगलाच झटका बसलेला दिसत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी आआपने पंजाबमध्ये ३३ विधानसभा मतदारसंघांमधून आघाडी घेतली होती. विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक पक्षांना फायदा होतो हा कल लक्षात घेता लोकसभा निवडणुकांपेक्षा यावेळी आआपची कामगिरी चांगली हवी होती. पण या क्षणी आआप २३ जागांमध्ये आघाडीवर आहे. हिंमतसिंग शेरगील आणि भगवंत मान हे आआपचे नेते पिछाडीवर आहेत. भगवंत मान हा विदूषक हरणार असेल तर ते फारच चांगले असेल. गोव्यात कुंकोळीमध्ये आआपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्व्हिस गोम्स पिछाडीवर आहेत.

वरुण मोहिते's picture

11 Mar 2017 - 10:14 am | वरुण मोहिते

प्रवक्ते पंजाबमधील विजय हा राहुल गांधींचा आहे असं म्हणत आहेत .
गोवा-काँग्रेस १० भाजप ८ .

विकास's picture

11 Mar 2017 - 10:39 am | विकास

आणि युपित काँग्रेसच्या पराभवासाठी पक्ष जबाबदार आहे (collective failure) ;)

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:42 am | गॅरी ट्रुमन

नाही या निवडणुकीत ५ पैकी ३ राज्ये काँग्रेस जिंकत आहे (पंजाब, गोवा आणि मणीपूर) तर भाजप केवळ दोनच राज्ये जिंकत आहे (उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड). म्हणजे हा राहुल गांधींच्याच करिष्म्याचा विजय आहे आणि मोदींना बसलेला जोरदार झटका आहे.

सगळे श्रेय राहुलजींचे

विकास's picture

11 Mar 2017 - 10:54 am | विकास

मला वाटते नोटबंदीचा निर्णय मोदींना आणि भाजपाला चांगलाच भोवला आहे! ;)

राहुल गांधींच्या शिरपेचात मानाचा तुरा.. वगैरे वगैरे..!

=))

भाजपची जोरदार मुसंडी उत्तर प्रदेशात. जबरदस्त. पंजाब काँग्रेसकडे परत जातोय. गोव्याचंच अजून चित्र स्पष्ट नाहीये.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:20 am | गॅरी ट्रुमन

गोव्यात आतापर्यंत ४० पैकी २१ जागांचेच कल उपलब्ध आहेत. मणीपूरपेक्षाही गोव्यातील कल कमी वेगाने येत आहेत. गोव्याच्या सुशेगाद परंपरेप्रमाणे सगळे चालू आहे असे दिसते.

मांद्रेमधून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पिछाडीवर आहेत हा भाजपला नक्कीच मोठा धक्का आहे. प्रियोळमध्ये भाजपने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. प्रियोळ हा म.गो.पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा म.गो.पक्षालाही बसलेला झटका आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:23 am | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेश: ३९८ पैकी भाजप २८६, सपा+काँग्रेस ७९ , बसपा २७
पंजाबः ११७ पैकी काँग्रेस ६५, अकाली+भाजप २८, आआप २४
उत्तराखंडः ७० पैकी भाजप ५३, काँग्रेस १, बसपा १
मणीपूरः ३२ पैकी काँग्रेस १६, भाजप ११
गोवा: २१ पैकी काँग्रेस ९, भाजप ८, इतर ४

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:28 am | गॅरी ट्रुमन

या क्षणी ४०१ पैकी २९० जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्रिशतक ठोकणे शक्य आहे का?

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:32 am | गॅरी ट्रुमन

गोव्यात आता काँग्रेसने आघाडी घेतलेली दिसत आहे. २३ पैकी ११ जागांवर काँग्रेस पुढे आहे. देशात बर्‍यापैकी समर्थ विरोधी पक्ष हवा. मोदीलाटेत इतर राज्यात विरोधी पक्ष वाहून जात असताना गोव्यात काँग्रेसला विजय मिळाला तर ते थोड्या प्रमाणात तरी मनोबल उंचावणारे असेल.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:36 am | गॅरी ट्रुमन

गोव्यात म.गो.पक्षाने भाजपची सोडलेली साथ महागात पडलेली दिसते. म.गो.पक्षाला स्वबळावर फार काही करता आले नाही तरी अनेक मतदारसंघांमध्ये म.गो.पक्षाची ३% ते ५% मते आहेत. गोव्यासारख्या लहान राज्यात ही मते निकाल फिरवू शकतात. तसेच आआपने अपेक्षेइतकी ख्रिश्चन मते खाल्लेली दिसत नाहीत आणि दक्षिण गोव्यात ही मते काँग्रेसकडे जाताना दिसत आहेत. सुभाष वेलिंगकरांच्या आघाडीने किती मते घेतली हे बघायला हवे.

दुर्गविहारी's picture

11 Mar 2017 - 10:38 am | दुर्गविहारी

उत्तर प्रदेशात भाजप आला तर मुख्यमन्त्री कोण असेल ?

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 10:57 am | गॅरी ट्रुमन

नोटबंदीचा भाजपला जोरदार फटका बसेल असे ल्युटिन्स दिल्लीमधील अनेक मिडियावाल्यांचे म्हणणे होते. तसे काही होताना दिसलेले नाही.

भाजपने १९८५ मधील नारायणदत्त तिवारींचा विक्रम मोडलाच आहे. १९८० मध्ये काँग्रेसने अविभाजित उत्तर प्रदेशात ३०९ जागा जिंकल्या होत्या.त्यापैकी ११ जागा सध्या उत्तराखंड आहे त्या भागातून आल्या होत्या. म्हणजे सध्या उत्तर प्रदेश आहे त्यातून काँग्रेसने २९८ जागा जिंकल्या होत्या. या क्षणी भाजप २९६ जागांवर पुढे आहे. काँग्रेसचा २९८ चा विक्रमही मोडणार का हे बघायचे.

बागपत आणि छपरौली विधानसभा मतदारसंघांमधूनही भाजप आघाडीवर आहे. हा चरणसिंग-अजितसिंग यांचा बालेकिल्ला होता. स्वतः चरणसिंग छपरौलीमधून निवडून जायचे. तिथेही भाजप आघाडीवर असेल तर ते नक्कीच महत्वाचे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 11:00 am | गॅरी ट्रुमन

पंजाबमध्ये आता आआप अकाली दलापेक्षा पुढे गेला आहे. या क्षणी आआपला २७ आणि अकाली-भाजपला २२ जागांवर आघाडी आहे.

हे लिहिता क्षणी भाजपने ३०० जागांवर आघाडी मिळवली आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 11:09 am | गॅरी ट्रुमन

मागच्या १५-२० मिनिटात दोन महत्वाचे बदल झाले आहेत.

बसपा अजून खाली आली आहे. याच चर्चेत वर लिहिल्याप्रमाणे काहीकाळ बसपा ३० च्या आसपास जागांवर पुढे होती. पण आता तो आकडा १७ पर्यंत खाली आला आहे. भाजप या १०-१२ जागांवर आघाडी घेतलेली दिसते. भाजप आता २९०-२९२ पासून ३०५ पर्यंत पुढे गेला आहे.

पंजाबमध्ये आआप आता दुसर्‍या क्रमांकावर स्थिरावताना दिसत आहे. आआप २६ जागांवर तर अकाली-भाजप २० जागांवर पुढे आहे.

अनुप ढेरे's picture

11 Mar 2017 - 11:14 am | अनुप ढेरे

इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं पडली आहेत. डिपॉझिट जप्त :(

इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं पडली आहेत. डिपॉझिट जप्त :(

याचाच अर्थ ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियावाले ज्यांना डोक्यावर घेतात ते तितके लोकप्रिय असतात असे नाहीच.

अनुप ढेरे's picture

11 Mar 2017 - 11:47 am | अनुप ढेरे

सहमत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 11:23 am | गॅरी ट्रुमन

केजरीवालांनी इरॉम शर्मिलाच्या पक्षाला ५० हजाराची देणगी दिली होती. पनवती लागली म्हणायचे :)

वरुण मोहिते's picture

11 Mar 2017 - 11:15 am | वरुण मोहिते

भाजप पुढे
भाजप १३
काँग्रेस १२
गोव्यामध्ये मतविभागणी बरीच झाली आहे . सध्याच्या अंदाजांवरून कॅथलिक पट्ट्यात भाजप ला मतं कमी मिळत आहेत .

प्रसाद_१९८२'s picture

11 Mar 2017 - 11:31 am | प्रसाद_१९८२

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये भाजपाचा जबरदस्त विजय. पंजाब मध्ये केजरिवाल सारख्या विदुषकाच्या हाती सत्ता न देता, लोकांनी कॉंग्रेसकडे दिली हे एक चांगले झाले.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 11:36 am | गॅरी ट्रुमन

पंजाब मध्ये केजरिवाल सारख्या विदुषकाच्या हाती सत्ता न देता, लोकांनी कॉंग्रेसकडे दिली हे एक चांगले झाले.

अगणितवेळा सहमत.

केजरीवालसारख्या विदूषकाच्या कंपनीत राहिल्यामुळे की काय हरविंदरसिंग फुलका हा चांगला माणूसही सध्या पिछाडीवर आहे. भगवंत मान केजरीवालांची दुसरी कॉपी शोभावा असा आहे. त्यामुळे तो मनुष्य मागे आहे हे चांगलेच आहे. पण फुलका तरी जिंकायला हवेत असे वाटते.

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रे विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. नितीन गडकरींनी कोणालाही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहिर करणार नाही आणि पुढचा मुख्यमंत्री दिल्लीहून यायची शक्यता आहे असे संकेत दिले तोच पार्सेकर यांच्यासाठी धक्का होता. विद्यमान मुख्यमंत्री असताना निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर न करणे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर पक्षाने प्रकट केलेली नाराजीच असे म्हणायला हरकत नसावी. मतदारांनीही तोच निकाल दिलेला दिसतो.

वरुण मोहिते's picture

11 Mar 2017 - 12:06 pm | वरुण मोहिते

यांना पूर्ण यश आलंय . मतदारसंघात .
गोरखपूरला . तसेच वाराणसी मध्ये पूर्ण यश आहे भाजपाला . दावेदार कोण होणार भाजप कडून हि उत्सुकता आहे .
आज पंजाब मध्ये सिद्धू ची शेरोशायरी आवर्जून पहा :))

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 12:10 pm | गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष याक्षणी ५८ जागांवर आघाडीवर आहे. पक्षाचा हा फार मोठा पराभव झाला आहे. यापूर्वी सपा एकदाच १०० पेक्षा खाली गेला होता-- २००७ मध्ये ९७ जागा. त्यापेक्षाही प्रचंड मोठा पराभव झालेला दिसत आहे.

ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियामध्ये अखिलेख यादव कसे 'विकासपुरूष' आहेत, कसे लोकप्रिय आहेत इत्यादी इत्यादी लिहिले जात होते. आणि कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही तर सपा-काँग्रेस युती पहिल्या क्रमांकावर असेल असे वातावरण निर्माण केले जात होते. या मिडियाचा लोकांबरोबरचा कनेक्ट किती तुटला आहे हेच या निमित्ताने समजून येत आहे.

भाजप ३०० ते ३१० च्या मध्ये स्थिरावेल असे दिसते. दुपारी १२ नंतर आकड्यांमध्ये बहुतेक वेळा फार बदल होत नाहीत. हा अभूतपूर्व विजय आहे, त्सुनामी आहे वगैरे म्हणणेही अंडरस्टेटमेन्ट ठरेल.

विकास's picture

11 Mar 2017 - 12:14 pm | विकास

उत्तर प्रदेशात काँग्रेसला किती आणि सपला किती जागा मिळाल्या?

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 12:22 pm | श्रीगुरुजी

भाजप ३०८, सप ५८, कॉंग्रेस ११, बसप १८

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 12:20 pm | श्रीगुरुजी

वेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपचा पराभव होतोय. त्यांना मगोप व शिवसेनेने साथ दिली. शिवसेना या सापाला कितीही दूध पाजलं तरी तो भाजपला डसणारच हे भाजपच्या अजूनही लक्षात आलेलं दिसत नाही.

पैसा's picture

11 Mar 2017 - 2:38 pm | पैसा

गोव्यातले गणित वेगळे आहे. मगो आणि भाजपाची युती तुटली तेव्हाच काँग्रेस फायद्यात असणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच ८०% हून जास्त मतदान होते तेव्हा ते प्रस्थापित सरकारच्या बहुधा विरोधात जाते.

गोव्यात भाजपाची पीछेहाट होण्याची आणखी काही कारणे म्हणजे पार्सेकर हे पर्रीकरांसारखे अजिबात लोकप्रिय नाहीत. एखादेवीळी श्रीपाद नाईकांचे नाव पुढे आले असते तरी चित्र वेगळे दिसले असते.

माध्यम प्रश्नावरून भाजपाला वेगळा निर्णय घेणे शक्य नव्हते मात्र त्या निर्णयाचा जोरदार फटका भाजपाला बसला आहे. आणि यापुढच्या सर्व सरकाराना हा प्रश्न सतावणार आहे.

आताचे आकडे आणि नावे पाहता भाजपा अजूनही कडबोळे बांधून सरकार बनवू शकेल असे वाटते आहे. मात्र ते सरकार खूप अस्थिर असेल आणि इतर लहान पक्षांच्या ब्लॅकमेलला किती प्रमाणात तोंड देऊ शकेल सांगता येणार नाही. कदाचित ५ वर्षात पाच पन्नास सरकारेही बघायला मिळतील! =))

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 3:02 pm | गॅरी ट्रुमन

एखादेवीळी श्रीपाद नाईकांचे नाव पुढे आले असते तरी चित्र वेगळे दिसले असते.

हो ना. जर मिपावरील माझा हा प्रतिसाद भाजपच्या नेतृत्वाने वाचला असता तर आज ही वेळ आली नसती :) :) :)

जोक्स अपार्ट. मला वाटले होते की आआप भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि भाजपला निवडणुक त्यामानाने सोपी जाईल. अन्यथा या निवडणुका भाजपसाठी हरायच्याच निवडणुका ठरल्या असत्या. पण आआपने भाजपविरोधी मते फार खाल्लेली दिसत नाहीत.

कदाचित ५ वर्षात पाच पन्नास सरकारेही बघायला मिळतील! =))

१९९० च्या दशकात गोव्यात जी प्रचंड राजकीय अस्थिरता होती त्याची पुनरावृत्ती बघायला मिळणार का? :(

पैसा's picture

12 Mar 2017 - 8:02 pm | पैसा

पर्रीकर गोव्यात परत यावेत असे मात्र मला अजिबात वाटत नव्हते. कदाचित एखादे वर्ष दिले असेल. नंतर पुन्हा निवडणुका होतील. बघू.

मोहन's picture

11 Mar 2017 - 12:21 pm | मोहन

ट्रुमन साहेब - काँग्रेस करता प्रशांत किशोर पण चालले नाही म्हणावे काय ? पण पंजाबात तर चाललेले दिसतात यूपी मधे मात्र सफाया.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 12:28 pm | गॅरी ट्रुमन

ट्रुमन साहेब - काँग्रेस करता प्रशांत किशोर पण चालले नाही म्हणावे काय ? पण पंजाबात तर चाललेले दिसतात यूपी मधे मात्र सफाया.

याचे कारण या पूर्वी प्रशांत किशोरने मुळातली चांगली प्रॉडक्ट मार्केट केली होती-- २०१४ मध्ये मोदी आणि २०१५ मध्ये नितीश कुमार. त्यामुळे अनेकांना प्रशांत किशोरमुळे मोदींनी आणि नितीश कुमारांनी निवडणुक जिंकली असे वाटू लागले होते. अर्थातच सत्य परिस्थिती नक्कीच तशी नव्हती. असे वाटणार्‍यांना मी नेहमीच म्हटले होते-- २०१४ मध्ये मोदी लाट होती. ती प्रशांत किशोर लाट नव्हती. त्यामुळे प्रशांत किशोर या फॅक्टरला प्रमाणाबाहेर महत्व दिले जाऊ नये.

चांगले प्रॉडक्ट कोणीही मार्केट करू शकेल. खरे आव्हान होते राहुल गांधी हे प्रॉडक्ट कसे मार्केट करायचे हे. त्यातल्या त्यात पंजाबमध्ये अमरिंदरसिंग लोकप्रिय होतेच. २०१४ मध्ये त्यांनी मोदीलाटेत अरूण जेटलींचा स्वतःच्या पारंपारीक नसलेल्या मतदारसंघातून (अमृतसर) पराभव केला होता. त्यामुळे प्रशांत किशोरचा उपयोग पंजाबात झाला. पण मुळातले प्रॉडक्टच बोगस असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही :) त्यामुळे उत्तर प्रदेशात मार खावा लागला.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 12:38 pm | गॅरी ट्रुमन

गोव्यात कासवाच्या गतीने निकाल/कल येत आहेत. आता २८ जागांचे निकाल/कल उपलब्ध आहेत. त्यापैकी काँग्रेस १३ जागांवर तर भाजप ९ जागांवर पुढे आहे. इतर ६ जागांवर पुढे आहेत. या चार इतरांमध्ये बाणावलीमधून चर्चिल आलेमाव (यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहे) चा समावेश आहे. उत्तर गोव्यातील बरेच कल आले आहेत तर दक्षिण गोव्यातील बरेच कल यायचे आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (मडगाव) यांच्या जागेचाही समावेश आहे. एकूणच भाजपला दक्षिण गोव्यात फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकणार असे वाटते.

आआपने नेहमीप्रमाणे फेसबुक आणि ट्विटरवर जोरदार आघाडी उघडली होती. नुसते तेवढे फॉलो केले तर कोणाला वाटू शकेल की आआपमध्ये गोव्याची लाट होती. अर्थातच तसे काही नव्हते. नेहमीप्रमाणे मोदींच्या सभेला रिकाम्या खुर्च्या कशा आहेत हे दाखवून द्यायला सभा सुरू होण्यापूर्वी २-४ तास आधीचे फोटो ट्विटरवर पोस्टही करून झाले. पण अर्थातच अशा गोष्टींचा प्रभाव मतदारांवर पडत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 12:41 pm | गॅरी ट्रुमन

नुसते तेवढे फॉलो केले तर कोणाला वाटू शकेल की आआपमध्ये गोव्याची लाट होती.

हे गोव्यामध्ये आआपची लाट होती असे एखाद्याला वाटेल असे वाचावे. गलतीसे मिश्टेक हो गया.

वरुण मोहिते's picture

11 Mar 2017 - 12:39 pm | वरुण मोहिते

निवडणूक लढवली नसती तर पंजाब मध्ये फार फरक पडला असता भाजप ला .
उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक जिंकणं खायचं काम नाही आहे . अनेक जातीय समीकरण जुळवावी लागतात .
कारणं काहीही असो पण आज क्लीन स्वाईप भाजप कडून .
तेही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न करता . हे महत्वाचं
(व्यक्तिशः मला आज मणिपूर मध्ये भाजप जिंकावी असे वाटत आहे . )

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 1:10 pm | गॅरी ट्रुमन

याक्षणी पंजाबमध्ये आआप २५ जागांवर आघाडीवर आहे. या पराभवानंतर तरी केजरीवालांचे विमान जमिनीवर येईल का हा पण प्रश्नच आहे. दिल्लीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर सगळीकडे आपल्याला तसाच विजय मिळेल अशी अपेक्षा केजरीवालांची असावी. पण अर्थातच तसे काही झालेले नाही.

एन.डी.टि.व्ही वर थोड्या वेळापूर्वी आआपच्या एका नेत्याने म्हटले: "Virat Kohli can't hit a double century in every match he plays. If he fails to hit a double century, that doesn't mean that he is a bad batsman." त्यावर विक्रम चंद्राने म्हटले: "If someone hits a century in one match , we can't really call him Virat Kohli" त्यावर त्या आआपच्या नेत्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ल्युटिन्स दिल्लीमधील मिडिया अशी 'विटी' वक्तव्ये हजरजबाबीपणे देऊ शकतो :)

केजरीवालांपुढे आता पंजाबात पक्ष एकत्र ठेवायचे आव्हान आहे. इतकेच नाही तर पुढच्या महिन्यात दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान आहे. दिल्ली महापालिकांमध्ये भाजप गेल्या १० वर्षांपासून सत्तेत आहे आणि इतर कुठल्याही महापालिकेप्रमाणे दिल्लीतील महापालिकांचा कारभारही अकार्यक्षम आणि भ्रष्ट आहे. काँग्रेसची अवस्था दयनीयच आहे. अशा परिस्थितीत या तिनही महापालिका जिंकायची चांगली संधी आहे. या निवडणुका २०१५ प्रमाणे आआपने स्वीप केल्या नाहीत (आणि थोडक्यात विजय मिळवला) तरी तो एका अर्थी आआपचा पराभवच समजला जाईल. आणि समजा आआपला या निवडणुका जिंकता आल्या नाहीत तर मात्र तो फारच मोठा धक्का असेल.

एकूणच २०१५ नंतर केजरीवालांचे विमान उंचच उंच उडत होते. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे काम सोडून इतर सगळ्या गोष्टींमध्ये विनाकारण नाक खुपसणे त्यांनी सतत चालूच ठेवले होते. कधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे माग, कधी पंतप्रधान मोदींना सायकोपाथ म्हण, सतत मोदीनामाचा जप कर हे प्रकार केजरीवालांचे चालूच होते. कधीकधी वाटते की मोदीजी हे जर कुठल्या धर्मात देवाचे नाव असते तर तो देव सगळे कामधंदे सोडून केजरीवालांना दर्शन द्यायला धावत आला असता इतके मोदीजी या नावाचे नामस्मरण केजरीवालांनी केले असेल!! परवा महिलादिना निमित्तही ट्विटरवर शुभेच्छा देताना "मोदींनी स्त्रियांना आदर न देणार्‍या सगळ्यांना ट्विटरवर अनफॉलो करावे" असा अनाहूत सल्ला देऊन टाकला. अरे लेका, तुला कोणी विचारले आहे? तुझे काम सोडून इतर गोष्टींमध्ये कशाला नाक खुपसायला जातोस? मतदारांना हे सगळे समजत नव्हते असे अजिबात नाही. त्यामुळे आपण विश्वासार्ह नाही हे चित्र स्वतः केजरीवालांनीच उभे करायला मदत केली. पंजाबच्या मतदारांनी त्याला अनुसरूनच मत दिलेले दिसते.

यातून केजरीवाल काही धडा घेतात का हेच बघायचे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 1:18 pm | गॅरी ट्रुमन

गोव्यात आता ३१ जागांचे कल आले आहेत. काँग्रेस आणि भाजप दोघेही प्रत्येकी १२ जागांवर पुढे आहेत. तर अपक्ष आणि इतर ७ जागांवर पुढे आहेत. काँग्रेसचे गोव्यातील मोमेन्टम थोडे कमी झालेले दिसते. पोरिएममधून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, वाळपोईमधून त्यांचे पुत्र विश्वजित राणे, फोंड्यामधून माजी मुख्यमंत्री रवी नाईक, मडगावमधून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सगळे काँग्रेसचे नेते आघाडीवर आहेत किंवा विजयी झाले आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 1:24 pm | गॅरी ट्रुमन

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दोन जागांवरून निवडणुक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे.

प्रीत-मोहर's picture

11 Mar 2017 - 1:24 pm | प्रीत-मोहर

पार्सेकर हरल्याने दिल गार्डन गार्डन हो गयेला हय.
खांग्रेस गोवा फोरवर्ड आणि अपक्ष मिळून सरकार स्थापन करू शकतात

मगो उड्या मारण्यात एक्षपर्ट आहे

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 3:05 pm | गॅरी ट्रुमन

दिल गार्डन गार्डन हो गयेला हय.

वा वाक्प्रचार आवडला. वापरायला पाहिजे कधीतरी :)

प्रीत-मोहर's picture

11 Mar 2017 - 1:33 pm | प्रीत-मोहर

सध्या ९ ठिकाणी भाजप
९ ठिकाणी खांग्रेस
१ मगो
३ गोवा फोरवर्ड
जिंकलेत. बाकी काउंटिंग जारी हय

प्रसाद_१९८२'s picture

11 Mar 2017 - 1:42 pm | प्रसाद_१९८२

मायावतीने, स्वत:च्या पराभवाचे खापर EVM मशीन वर फोडले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे EVM वरिल कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपाला जात होते.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 1:57 pm | गॅरी ट्रुमन

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आल्यानंतरही असे आरोप झाले आहेत. फेसबुकवर पुरोगाम्यांनी ते शेअरही केले होते.

कसे असते की दिल्लीमध्ये, बिहारमध्ये भाजपचा सपाटून पराभव झाला तर ई.व्ही.एम एकदम परफेक्ट असतात.महाराष्ट्रातही ठाण्यातील ई.व्ही.एम परफेक्ट असतात. पण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने जोरदार विजय मिळवला तर मात्र मशीनमध्ये काहीतरी झोल असतो. ठाणे सोडून इतर शहरांमधील मशीनमध्येही झोल असतो.

याला म्हणतात गिरा तो भी टांग उपर.

>>> महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आल्यानंतरही असे आरोप झाले आहेत. फेसबुकवर पुरोगाम्यांनी ते शेअरही केले होते.

मिपावरही असले आरोप तिथूनच आले असावेत, पुरावे मागितल्यावर मात्र "चौकशी सुरु आहे" छाप उत्तरे मिळाली.

(निकालापुर्वी) पंजाबात आपची सत्ता आल्यास केजरीवाल, उप्र मध्ये अमित शहा मुख्यमंत्री होऊ शकतील असे वाचण्यात आले.

एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्‍या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची प्रोसेस काय असते?

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 2:03 pm | गॅरी ट्रुमन

एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्‍या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची प्रोसेस काय असते?

भारतात नागरिकत्व केवळ देशाचे नागरिकत्व असते. राज्यांचे नागरिकत्व नसते. त्यामुळे कोणीही २५ वर्षापेक्षा जास्त वय असणे वगैरे अटी पूर्ण करणारा भारतीय नागरिक कुठूनही निवडणुक लढवू शकतो. दुसर्‍या राज्यातून विधानसभेत निवडून गेल्यास इतर कोणत्याही आमदाराप्रमाणे मुख्यमंत्री/मंत्री व्हायचा अधिकार अशा आमदारांनाही असतो. आणि समजा मुख्यमंत्री होताना आमदार नसल्यास सहा महिन्यात निवडून यावे लागते.

सुषमा स्वराज १९७७ आणि १९८७ मध्ये हरियाणात देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्या १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या. एकेकाळी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री असलेल्या उमा भारतींनी २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील चरखारी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून उत्तर प्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर केले होते. १९९३ मध्ये हरियाणात माजी मंत्री असलेल्या एकाचा विजय राजस्थान विधानसभेवर झाला होता (त्या विजयी उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघ विसरलो). याव्यतिरिक्त इतर उदाहरणेही असतील ही शक्यता आहेच पण मला ती माहित नाहीत.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 2:18 pm | गॅरी ट्रुमन

गोव्यात आता ३६ जागांचे कल आले आहेत. त्यात १६ जागांवर काँग्रेस, १२ जागांवर भाजप आणि ८ जागांवर इतर आघाडीवर/विजयी झाले आहेत. या ८ मध्ये विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष ३, भाजपने पाठिंबा दिलेला अपक्ष १ , राष्ट्रवादी काँग्रेस १ (चर्चिल आलेमावची बाणावली) तर ३ जागांवर म.गो.पक्ष पुढे आहे. गोव्यात परत एकदा घोडेबाजाराचा काळ येणार असे दिसते. भाजपला १ अपक्षाचा पाठिंबा मिळेल तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या ३ आमदारांचा पाठिंबा मिळाला तर हा आकडा १६ वर जाईल. तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन काँग्रेस १७ वर जाईल. म.गो.पक्ष कुठल्या बाजूला जातो हे बघायचे.

मणीपूरमध्ये आता ५७ जागांपैकी भाजप २५ वर, काँग्रेस २४ वर तर इतर ८ जागांवर पुढे आहे. भाजपने काँग्रेसला मणीपूरमध्ये मागे टाकले आहे असे आताचे चित्र आहे.

प्रसाद_१९८२'s picture

11 Mar 2017 - 2:33 pm | प्रसाद_१९८२

उत्तर प्रदेश मध्ये 'राष्ट्रीय' पक्ष असलेल्या कॉंग्रेजची अवस्था, गठबधंन करुनही अतिशय दारुण आहे, १०० + जागा लढवून हि अवघ्या ७ जागा निवडणुन आल्यात त्यांच्या. कॉंग्रेजच्या ह्या पराभवाने एक गोष्ट सिध्द झाली की कॉंग्रेज ज्याही पार्टी बरोबर जाईल ती पार्टी बुडतेच.

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 2:39 pm | श्रीगुरुजी

गोवा - भाजप (१३), काँग्रेस (१३), मगोप+ (३), इतर (७)

मणिपूर - भाजप (२६), काँग्रेस (२१), इतर (९)

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 3:06 pm | श्रीगुरुजी

गोव्यात आता भाजप पुढे आहे. भाजप १४ व काँग्रेस १३ अशी स्थिती आहे.

पण पक्षाचा खरा अंदाज पाहायचा असेल तर आज मणिपूर मध्ये भाजप जिंकावी . काहीच नसताना अंदाज असा होता कि भाजप जिंकेल .

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 5:58 pm | गॅरी ट्रुमन

हो ना मणीपूर जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळे मोदींची लाट वगैरे असे काहीच नाही आणि ती लाट केवळ मिडियामध्ये आणि कॉर्पोरेटमध्ये आलेली आहे हे त्यातून सिध्द होत आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 3:40 pm | श्रीगुरुजी

पंजाबमध्ये आता काँग्रेस ७६, आआप २३ आणि अकाली दल-भाजप १८ अशी स्थिती आहे. बहुतेक सर्व सर्वक्षणांनी अकाली दल-भाजप युतीला जास्तीत जास्त ७ जागांचा अंदाज दिला होता. परंतु प्रत्यक्षात या युतीला थोड्याशा जास्त जागा आहेत. एका वृत्तसंस्थेने काँग्रेस व आआप यांना प्रत्येकी ५५ व दुसर्‍या वृत्तसंस्थेने दोन्ही पक्षांना प्रत्येकी ५४ जागा मिळतील असा अंदाज दिला होता. सुरजित भल्लांनी काँग्रेस ५६ व आआप ४८ असा अंदाज दिला होता. अजून काही अंदाजानुसार काँग्रेस (६२-७१) व आआप (४२-५१) आणि काँग्रेस (४१-४९) व आआप (५९-६७) असे अंदाज होते.

हे सर्व अंदाज बर्‍याच प्रमाणात चुकले. काँगेसला अंदाजापेक्षा बर्‍याच जास्त जागा मिळत आहेत तर आआपला खूपच कमी जागा मिळत आहेत. आपल्याला किमान ९०-१०० जागा मिळतील असा प्रचार मागील वर्षभर केजरीवाल करीत होते. गोव्यात सुद्धा आपल्या पक्षाला किमान ३० जागा मिळतील असा त्यांचा दावा होता. गोव्यासाठी अत्यंत जातीयवादी भूमिका घेऊन त्यांनी मुद्दाम जाहीररित्या आपण ख्रिश्चन मुख्यमंत्री देत आहोत असे सांगितले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री असताना सुद्धा विशेषतः मागील ७-८ महिन्यात ते फार थोडा काळ दिल्लीत होते. त्यांनी पंजाब, गोवा व गुजरात मध्ये बरेच दौरे केले. सुवर्णमंदीरात पहाटे ४ वाजता जाऊन आधीच घासून ठेवलेली ताटे विसळण्याची नौटंकी केली. पंजाबला नशामुक्त करण्याचे आश्वासन देताना भगवंत मान सारख्या दारूड्याला प्रमुख प्रचारक म्हणून नेमले याच्यात त्यांना काहीही विसंगती वाटली नाही. रोज ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर व्यक्तिगत हल्ले करणे, सिनेमांबद्दल अभिप्राय लिहिणे, मोदींचे कपडे मोजणे, पुराव्याशिवाय वाटेल ते बेछूट आरोप करणे, मोदींनी आपल्या पत्नीला व आईला आपल्या घरी आणून ठेवावे असे अनाहूत व्यक्तिगत सल्ले देणे आणि हे करताना दिल्लीकडे पूर्ण दुर्लक्ष करणे अशा त्यांच्या उचापत्या सुरू होत्या. आपल्या पक्षाला एखाद्या टॅब्लॉईडच्या पातळीला त्यांनी आणले आहे.

जेटलींविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप (अर्थातच बिनबुडाचे) केल्यानंतर जेटलींनी बदनामीचा खटला दाखल केल्यानंतर केजरीवालांनी न्यायालयात आधी भूमिका घेतली की जेटली निवडणुक हरल्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठाच नाही आणि त्यामुळे माझ्या आरोपांमुळे त्यांची बदनामी होऊच शकत नाही. इतका विचित्र बचाव आजवर कोणीही केल्याचे ऐकिवात नाही. हा बचाव न्यायालयात चालत नाही हे समजल्यावर त्यांनी एक नवीनच मागणी केली. जेटलींनी १९९९ पासून आजतगायत भरलेले आयकर रिटर्न्स, त्यांच्या सर्व बँक खात्याची माहिती व त्यात किती शिल्लक आहे ही माहिती, त्यांनी बॅक खात्यातून केलेल्या मागील १५ वर्षातील सर्व व्यवहारांची माहिती मला हवी आहे अशी मागणी त्यांनी सत्र न्यायालयात केली. ही माहिती अत्यंत व्यक्तिगत असून ती तुम्हाला मिळणार नाही हे सांगतानाच 'तुम्ही मुद्दाम वेळकाढूपणा करून खटल्याला विलंब करीत आहात' असा न्यायालयाने शेरा मारला. या निर्णयाविरूद्ध केजरीवाल उच्च न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयाने देखील ही मागणी नाकारली. आता ते बहुतेक सर्वोच्च न्यायालयात जातील व खटल्याला अजून विलंब करण्याचा प्रयत्न करतील. ज्या आधारावर तुम्ही जेटलींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आधी पुढे आणा ना. परंतु अत्यंत सडकी मनोवृत्ती आणि जन्मजात नौटंकी अंगात असलेला हा माणूस या जन्मात सुधारेल असे वाटत नाही.

अशा माणसाच्या पक्षाचा पंजाब व गोवा या दोन्ही ठिकाणी पराभव होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पंजाबमध्ये आआपला बहुमत मिळाले तर केजरीवाल दिल्लीच्या गादीवर मनीष सिसोदियांना बसवून आपल्याला पंजाब मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवतील असे देखील बोलले जात होते. पंजाबी लोकांना शीख नसलेला मुख्यमंत्री अजिबात मान्य झाला नसता. पंजाब व हरयानामध्ये सतलज-यमुना कालवा पाणीवाटप हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे. केजरीवाल पंजाबमध्ये जाऊन पंजाबची हरयानाला पाणी न देण्याची भूमिका योग्य आहे असे प्रमाणपत्र द्यायचे तर हरयानात जाऊन कालव्याचे पाणी हरयानाला मिळालेच पाहिजे अशी पूर्णपणे विरूद्ध भूमिका घ्यायचे. यांच्या या परस्परविरोधी भूमिका जनता पाहत होती.

आआपला ज्या २३ जागांवर आघाडी आहे त्यातील २१ जागा माळव्यातील आहेत. पंजाबमधील ११७ जागांपैकी माळव्यात ६९ जागा असून उर्वरीत दोन भागात ४८ जागा आहेत. उर्वरीत ४८ जागांपैकी फक्त २ जागांवर आआपला आघाडी आहे. म्हणजे माळवा वगळता पंजाबमध्ये आआपला स्थान मिळालेले नाही.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 6:05 pm | गॅरी ट्रुमन

तसेच राम जेठमलानी अरूण जेटलींना कसे प्रश्न विचारत आहेत हे केजरीवाल आणि राघव चढ्ढासारखे फालतू लोक ट्विटरवर पोस्ट करत होतेच पण आआपचे समर्थकही शेअर करत होते. गंमत म्हणजे राम जेठमलानीसारखा माणूस एकेकाळी भाजपमध्ये असताना असा माणूस भाजपला कसा चालतो हे विचारणारेच लोक राम जेठमलानी कसा केजरीवालांचा बचाव करत आहेत याचे गुणगान करत आहेत. म्हणजे असे करण्यात काही विसंगती आहे हे त्यांच्या गावीही नसते.

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 3:47 pm | श्रीगुरुजी

ताजी स्थिती -

१) गोवा - काँग्रेस १६, भाजप १५, मगोप+ ३, इतर ४
२) मणिपूर - काँग्रेस २३, भाजप २२, इतर ८
३) पंजाब - कॉंग्रेस ७८, अकाली दल १४ + भाजप ३, आआप २०
४) उत्तराखंड - कॉंग्रेस ११, भाजप ५७
५) उत्तर प्रदेश - भाजप ३२२, सप + कॉंग्रेस ५५, बसप २१

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 3:52 pm | श्रीगुरुजी

काँग्रेस १०५ जागा लढवून फक्त ६ जागांवर पुढे आहे. २०१२ मध्ये सर्व ४०३ जागा लढवून काँग्रेसला २८ जागा मिळाल्या होत्या. २००७ मध्ये २२ तर २००२ मध्ये २५ जागांवर काँगेसला विजय मिळाला होता. एकंदरीत उ. प्र. मध्ये काँगेस संपल्यातच जमा आहे. सपने काँगेसला लायकीपेक्षा खूप जास्त जागा दिल्या हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसची लायकी जास्तीत जास्त ४०-५० जागांची असताना अखिलेशने तब्बल १०५ जागा देऊन घोडचूक केली होती.

उ.प्र. च्या इतिहासात ३००+ जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या असतील का याविषयी शंका आहे.

घ्या तुमच्या शंकेचे निरसन करा ............
३०० च्या वर जागा मिळालेल्या आहेत की नाहीत आजवर कोणाला .

source : आजचा दि.११ मार्च दै. लोकमत

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 4:00 pm | श्रीगुरुजी

गोव्यात आता काँग्रेस १७, भाजप १४, मगोप+ ३ व इतर ४ अशी स्थिती आहे. भाजपने हे राज्य गमावले आहे असे चित्र आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व मगोपचे तगडे नेत दीपक ढवळीकर पराभूत झाले. सुभाष वेलिंगकरांनी कॉन्व्हेंट शाळांना दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या विरूद्ध भूमिका घेऊन रा. स्व. संघ व भाजपविरूद्ध बंड करून स्वतःचा वेगळा पक्ष निर्माण करून त्यात मगोप व शिवसेनेला सामील करून भाजपची मतपेटी फोडण्याचे काम केले. यात त्यांना पराभव पत्करावा लागलाच पण भाजपचाही पराभव करण्यात ते यशस्वी झाले. आता भाजपऐवजी काँग्रेस सत्तेवर आली तरी हे अनुदान बंद होण्याची सुतराम शक्यता नाही. उलट ख्रिश्चन मतदारांना चुचकारण्यासाथी ख्रिश्चन मतदारांना अजून जास्त प्रलोभने दाखविली जातील. भाजपविरूद्ध बंड करून वेलिंगकरांनी काय मिळविले याचा आता त्यांनी विचार करावा.

केजरीवालांप्रमाणे उधोजींना मोदी जळीस्थळीकाष्ठीपाषाणी दिसतात. त्यामुळे त्यांनी लगेच गोव्यात उडी घेऊन भाजपविरूद्ध निवडणुक लढविली. २०१५ मध्ये बिहारमध्येही सेनेने ५० उमेदवार उभे केले होते. शिवसेना हा शरद पवारांप्रमाणेच अत्यंत विश्वासघातकी पक्ष आहे. या निवडणुकीच्या अनुभवावरून निदान आता तरी भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेची व पंजाबात अकाली दलाची साथ पूर्ण सोडून स्वबळावर वाटचाल करावी.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Mar 2017 - 4:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपाचे अभिनंदन. चांगलीच बाजी मारली म्हणायची.

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 5:49 pm | श्रीगुरुजी

'हे' कोठे असतात हल्ली?

निष्पक्ष सदस्य's picture

11 Mar 2017 - 6:45 pm | निष्पक्ष सदस्य

ब्रेकिंग न्यूज : 105 पैकि 63 प्रतिसाद देवून गॅरी ट्रुमन यांचा दणदणीत विजय,गुरूजींच्या बालेकिल्याला खिंडार!

हतोळकरांचा प्रसाद's picture

11 Mar 2017 - 7:03 pm | हतोळकरांचा प्रसाद

ह्याह्याह्या!

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2017 - 7:18 pm | गॅरी ट्रुमन

:))

राज्यसभेत विधेयके पास होण्यात आता अड्चण येणार नाही.
भाजप राज्यसभेत मजबूत, राष्ट्रपतीपदही सोपे

निष्पक्ष सदस्य's picture

11 Mar 2017 - 7:21 pm | निष्पक्ष सदस्य

पाच राज्यांपैकि तीन राज्यांत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे,पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत तर गोवा आणि मणिपूर मध्ये सरकार बनवण्याची संधी आहे.
पण उत्तर प्रदेश ही सर्वात मोठी विधानसभा असल्याने आणि तिथे भाजपने तीनशेच्या पार मजल मारल्याने इतर ठिकाणचे काँग्रेसचे यश झाकोळले गेले आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

11 Mar 2017 - 7:21 pm | हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन यांचे हार्दिक आभार! टीव्हीवरच्या आकड्यांपेक्षा फास्ट तुमचे आकडे अपडेट होत होते!

उत्तरप्रदेशच्या निर्णयाने एक गोष्ट स्पष्ट आहे, यापुढे कुठल्याही निवडणूकीत पक्षांनी मतदारांना गृहीत धरू नये. पंजाबमध्ये आआपचा उडालेला धुव्वा आवडल्या गेलेला आहे. उत्तराखंडात अपेक्षित निकाल! गोवा - तुला न मला घाल काँग्रेसला असा प्रकार! मणिपूर, अजून थोडा जोर लावला असता तर भाजपला जमलं असतं पण बहुदा ऊत्तरप्रदेशवर लक्ष केंद्रित केल्यामुळे असेल. असो भाजपचं आणि काँग्रेसचं अभिनंदन!

प्रीत-मोहर's picture

12 Mar 2017 - 3:26 pm | प्रीत-मोहर

अहं, गोव्यातही मतदारांना गृहीत धरू नये हेच सांगितले लोकांनी :)

(गोवन) प्रीमो

सचु कुळकर्णी's picture

11 Mar 2017 - 8:38 pm | सचु कुळकर्णी

त्सुनामि नाहि हो हे त्यापेक्षा जबरदस्त काहि तरी आहे,.

आज ईतनि मयस्सर भि नहि मयखाने मे.....जितनि हम छोड दिया करते थे पैमाने मे.... १०५ जागा काँग्रेस साठि सोडुनहि सपा + काँग्रेस ६० चा आकडा पार नाहि करु शकले.

प्रतिक्रिया तर बहनजी ह्यांचि पाहण्यासारखि होति..... अखिलेश ने त्यामानाने बरिच परिपक्वता दाखवली पत्रकार परिषदेत.

पण आस्मादिकास आज सगळ्यात जास्त आनंद दिला तो पंजाब विधान सभा निकालाने. १) पुर्ण बहुमताच सरकार तयार होतय आणि २) युगपुरुष आणि मंडळिना पंजाबि जनतेने ठेंगा दाखवुन जबरदस्त तोंडघशी पाडलय. आसुरी आनंद म्हणा हव तर... पण बेक्कार हलकलानछाप्पु केलय आपटार्ड ना. ह्या सुरक्षेच्या द्रुष्टिने संवेदनशिल राज्यात जर युगपुरुष आणि मंडळिं सारखे थोर विचारवंत (जंत ?) आले असते तर ह्यानि काय धिंगाणा घातला असता कल्पनाही करवत नाहि.

लोकशाहित जसे कठिण निर्णय घ्यायला सरकार कडे डिसिजिव्ह मेजॉरिटि आवश्यक असते तसाच एक सक्षम विरोधि पक्ष हि आवश्यक असतो पण सध्यातरी असा कोणि दावेदार दिसत नाहि आहे. काँग्रेस आपल्या रा.रा. राहुल प्रेमामुळे ते पोटेंशियल कधिच गमावुन बसलिय, आणि आज जसे काँग्रेस चे थोर विचारवंत श्रियुत दिग्विजय सिंग म्हणाले कि आता राहुल गांधि ह्यांनि पक्षाचे अध्यक्षपद स्विकारुन पक्षाला दिशा दाखवावि तेव्हा NDTV वर रविश आणि ते पाहताना आणि ऐकताना मि फक्त बेशुध्द व्हायच बाकि होतो. रा.रा. राहुल गांधि म्हणजे लिमिट है यार ...माणसाने किति हस करुन घ्याव ह्याला काहि मर्यादा असतात :))

गॅरी ट्रुमन's picture

13 Mar 2017 - 3:12 pm | गॅरी ट्रुमन

पण आस्मादिकास आज सगळ्यात जास्त आनंद दिला तो पंजाब विधान सभा निकालाने.

पूर्ण सहमत आहे. मलाही उत्तर प्रदेशइतकाच पंजाबचाही आनंद झाला आहे.

मिपावर दोनेक महिन्यांपूर्वीच पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय व्हावा असे मला वाटते असे लिहिले होते. माझ्यासारखे वाटणारे कित्येक लोक होते/आहेत. या सगळ्यांवरच आपटर्ड्स टिका करायला लागले आहेत. कसे असते, बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला याचा या पुरोगाम्यांना आणि आपटर्ड्सना आनंद झाला नव्हता का? लालूसारख्या तद्दन फालतू माणसाला यांच्याच युगपुरूषांनी जाहिरपणे मिठी मारली होती त्याचे काय? मग यांचीच दवा यांना कोणीतरी कधीतरी खिलवणारच. मग तक्रार करून चालायची नाही.

पंजाबमध्ये आपचा पराभव का झाला यामागे आपल्यासारखे वाटणारे अनेक लोक सामील आहेत. अकाली दलाचा विजय होणे जवळपास अशक्य होते हे पंजाबी हिंदू मतदारांना समजले नव्हते असे नक्कीच नाही.अशावेळी काँग्रेस आणि आआप हे दोन पर्याय यापूर्वी भाजपला मते देणार्‍या पंजाबी हिंदू मतदारांपुढे होते. केजरीवाल कट्टर खलिस्तानवाद्यांविषयी सहानुभूती बाळगून आहेत असे चित्र उभे राहिलेच होते. प्रचारादरम्यान एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी त्यांनी रात्रभर मुक्काम ठोकला होता हे पण सगळ्यांना समजले. तसेच मतदानाच्या ४-५ दिवस आधी बठिंडाजवळ बॉम्बस्फोट झाला. १९८० च्या दशकात खलिस्तानी दहशतवादाचे चटके पंजाबी हिंदूंनीच सोसले होते. त्यामुळे तसे काही परत व्हायची थोडीशीही शक्यता निर्माण झाली आहे हे बघता पंजाबी हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मते दिली आहेत.

अनन्त अवधुत's picture

13 Mar 2017 - 10:57 pm | अनन्त अवधुत

.

सचु कुळकर्णी's picture

11 Mar 2017 - 8:44 pm | सचु कुळकर्णी

आणि हो लवकरच युगपुरुष "बद्रिनाथ कि दुल्हनिया" ह्यावर आपले अमुल्य समिक्षण ....ओके ओके रसग्रहण म्हणा हव तर...तेच ते देणारा आहेत :))

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2017 - 9:07 pm | श्रीगुरुजी

कॉंग्रेसचा अमेठीतील सर्व ५ जागांवर व रायबरेलीतील ५ पैकी ३ जागांवर पराभव. १० पैकी ६ भाजपने, २ जागा कॉंग्रेसने व २ सप ने जिंकल्या.

अनुप ढेरे's picture

12 Mar 2017 - 7:43 pm | अनुप ढेरे

मायवतींची राज्यसभा टर्म संपतिये फुडल्या वर्षी. परत निवडून येण्याइतके आमदार नाहीत त्यांच्याकडे.

दुश्यन्त's picture

12 Mar 2017 - 8:18 pm | दुश्यन्त

गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरून पण भाजप सत्तेत येईल असं दिसतंय. पर्रीकर गोव्यात परत येणार आणि त्यांना मगोप / फॉरवर्ड आदी पक्ष पाठिंबा देणार. माझ्या मते भाजपने काही काळ तरी विरोधात बसायला हवे होते. काँग्रेस कडे पण स्पष्ट बहुमत नाही आणि अंतर्गत गटबाजी आहे तेव्हा काँग्रेस ने सरकार बनवले असते तरी ते ५ वर्ष टिकेल याची शाश्वती नव्हतीच. केंद्रात सरंक्षण मंत्री (कॅबिनेट) हे केव्हाही गोव्या सारख्या लहान राज्याच्या मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे पद आहे मात्र खुद्द पर्रीकरच गोव्यात परंतु इच्छितात तर कोण काय करणार ? त्यांना परत आमदार होणे हेही आलेच. २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यावर बरेच दिवस फुल टाइम सरंक्षण मंत्री नव्हता (जेटलींकडे अतिरिक्त पदभार होता). आता पर्रीकर गेले तर लवकर नवीन मंत्री नेमावा.

पैसा's picture

12 Mar 2017 - 8:23 pm | पैसा

लहान पक्ष पर्रीकरांच्या नावावर अडून बसले असणार हे एक. आणि हे सरकार पाच वर्षे रहाणार नाही. लोकसभेसोबत गोव्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. ही तात्पुरती व्यवस्था वाटते आहे. या लोकांनी पुन्हा निवडणुका होईपर्यंत सरकार भाजपचे असावे हा विचार केलेला असणार.

दुश्यन्त's picture

12 Mar 2017 - 8:32 pm | दुश्यन्त

हे जे लहान पक्ष आहेत ते लोकसभेबरोबर निवडणूक घ्यायला तयार होतील का? समजा बीजेपीने २०१९ ला राजीनामा दिला तर हे पक्ष काँग्रेसला पाठिंबा देऊन नवीन सरकार कशावरून आणणार नाहीत? आता काही ठिकाणी पर्रीकरांनी अजून राजीनामा दिलाच नाही अशी पण बातमी आहे. भाजपने उत्तराखंड /अरुणाचल मध्ये केली तशी घाई इथे करू नये. ४० आमदार असणाऱ्या सभागृहात कधी कुठले सरकार येईल हे खरे नसते. गोव्याला तर मोठा इतिहास आहे अल्पावधी सरकारांचा !

पैसा's picture

12 Mar 2017 - 8:42 pm | पैसा

आतातरी येणार्‍या बातम्यांवरून हा माझा प्राथमिक अंदाज आहे.

अजून एक शक्यता म्हणजे काँग्रेसच्या निवडून आलेल्या मंडळीत किती माजी मुख्यमंत्री आहेत याचा विचार केला तर काँग्रेसमधल्याच काहीजणांना सरकार बनवण्यात किंवा टिकवण्यात स्वारस्य नसावे अशी शंका येत आहे. कारण कोणा एकाला मुख्यमंत्री केले तर दुसरे कोणीतरी पक्ष फोडतील ही शक्यता काँग्रेसच्या बाबतीतही आहे. त्यामुळे हा सगळ्यांनाच सोयीचा पर्याय दिसतो आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2017 - 8:37 pm | श्रीगुरुजी

गोव्यातील मतदारांनी स्पष्टपणे भाजपच्या विरूद्ध कौल दिलेला आहे. मतदारांनी भाजपच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांबरोबर इतर ४ मंत्री व एकूण ८ आमदारांना घरी पाठविले आहे. जरी काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट कौल नसला तरी भाजपच्या विरूद्ध स्पष्ट कौल आहे. त्यामुळे गोव्यात भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल. सत्तेसाठी धडपड करणे ही चूक ठरेलच, परंतु मुख्यमंत्रीपदासाठी पर्रीरकरांना केंद्रातून परत बोलाविणे ही घोडचूक ठरेल.

पर्रीकर संरक्षण मंत्रीपदावर चांगले काम करीत आहेत (फक्त त्यांनी आपले तोंड बंद ठेवायला हवे कारण गेल्या काही महिन्यात ते अनेक वादग्रस्त विधाने करीत आहेत). जॉर्ज फर्नांडिस यांच्या नंतर तब्बल १० वर्षांच्या कालावधीनंतर भारताला एक कार्यक्षम संरक्षणमंत्री लाभला आहे. मोदी सरकारमध्ये जे काही मोजके कार्यक्षम मंत्री आहेत त्यात पर्रीकरांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना केंद्रातून परत पाठवून गोव्यासारख्या अत्यंत लहान राज्यात सीमित करणे योग्य होणार नाही.

गोव्याप्रमाणे मणिपूरमध्ये देखील भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल.

दुश्यन्त's picture

12 Mar 2017 - 11:53 pm | दुश्यन्त

गोव्याप्रमाणे मणिपूरमध्ये देखील भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल.+१ सहमत.

बाकी पर्रीकर खूप धडाडीचे नेते आहेत ,आयआयटीयन आहेत पण काही वेळेस नाही ते बरळून टीकेचे धनी झाले आहेत. त्यांनी गडकरींचा आदर्श ठेवावा ते पण बोलायला मोकळे ढाकळे आहेत पण केंद्रात गेल्यापासून तोंडावर कंट्रोल आहे आणि कामाला वाघ तर आधीपासूनच आहेत. कदाचित पर्रीकरांना कुणाच्या हाताखाली काम करायला नको वाटत असेल.पण जोडतोड सरकारमध्ये त्यांना मागच्या टर्म सारखे स्वातंत्र्य असणार नाही. मुळात देशाचा सरंक्षण मंत्री ते २०-२२ आमदार घेऊन मुख्यमंत्री ही पदावनतीच आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2017 - 8:41 pm | श्रीगुरुजी

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2017 - 8:52 pm | श्रीगुरुजी

गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त १३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला १७ मिळाल्या. परंतु काँग्रेसला एकूण मतांपैकी २८.४% मते मिळाली असून भाजपला काँग्रेसपेक्षा तब्बल ४.१% जास्त मते मिळाली आहेत (३२.५%). तरीसुद्धा भाजपला काँग्रेसपेक्षा ४ जागा का कमी मिळाल्या हे समजत नाही. २०१२ च्या तुलनेत काँग्रेसने २.४% मते गमाविली तर भाजपने २.२% मते गमाविली. मगोपने २०१२ मध्ये ६.७% मते मिळविली होती, परंतु २०१७ मध्ये ११.३% मते मिळविली. परंतु २०१२ प्रमाणे २०१७ मध्ये सुद्धा मगोपचे फक्त ३ आमदार निवडून आले. वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांच्याबरोबर युती असूनसुद्धा व मतांमध्ये ४.६% वाढ करूनसुद्धा मगोपला आपल्या आमदारांच्या संख्येत अजिबात वाढ करता आली नाही. एका बातमीनुसार शिवसेनेने ४ जागा लढवून एकूण ७०० पेक्षा कमी मते मिळविली. हे जर खरे असेल तर शिवसेनेने विनाकारण गोव्यात भाजपच्या विरूद्ध लढून काय मिळविले हे समजत नाही. सुभाष वेलिंगकरांनी मुद्दाम गोवा सुरक्षा मंच स्थापन करून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून भाजपला पाडण्याचे काम केले. त्यांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आला नाही. आता तर त्यांनी आपला पक्ष विसर्जित केल्याचे वाचले. मग इतका अट्टाहास करून काय मिळविले? इंग्लिश माध्यमांच्या शाळांना दिले जाणारे अनुदान थांबवावे या मागणीसाठी त्यांनी संघातून बाहेर पडून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून 'न तुला न मला घाल काँग्रेसला' अशी स्थिती निर्माण केली. नवीन येणारे सरकार काँग्रेसचे असले तरी त्यांची मागणी मान्य होण्याची सुतराम शक्यता नाही. एकंदरीत सुभाष वेलिंगकर, मगोप आणि महाराष्ट्राचे केजरीवाल/पप्पू यांनी गोव्यात भाजपचे पाय ओढण्यातच धन्यता मानली.

शिवसेना ही भाजपाची एमायएम आहे. एमायएम काँग्रेस/सपाची मुस्लिम मतं फोडते असा समज आहे. सेना तेच काम भाजपाविरुद्ध करते. उत्तर प्रदेशातपण सेनेने निवडणुका लढवल्या आहेत. एका ठिकाणी हजारहून जास्तं मतं घेतली हे पाहिलय.

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2017 - 9:15 pm | श्रीगुरुजी

बरोबर. बिहारमध्येही सेनेने ५० जागा लढवून एका जागेवर दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवून भाजप उमेदवाराच्या पराभवाला हातभार लावला होता.

भाजपने महाराष्ट्रात शिवसेना व पंजाबमध्ये अकाली दलाच्या जोखडातून मान सोडवून घेऊन पूर्णपणे स्वतंत्र उभे राहिले पाहिजे. शिवसेना जुलै २०१७ मधील राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपबरोबर दगाबाजी करून भाजपविरोधी उमेदवाराला मते देणार हे निश्चित आहे. २०१९ मध्ये सुद्धा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार हे नक्की. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचे पप्पू व केजरीवाल (उधोजी आणि राऊत) 'सामना'तून भाजपविरूद्ध विखारी प्रचार सुरू ठेवणार हे नक्की. काँगेस व राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन शिवसेना महाराष्ट्रात स्वत:चे सरकार स्थापन करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण या तीनही पक्षांचे एकत्रित १४६ आमदार आहेत.

अशा पक्षाला तातडीने ठोकर मारून गरज पडल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीला सामोरे जायची तयारी भाजपने ठेवली पाहिजे.

दुश्यन्त's picture

13 Mar 2017 - 12:03 am | दुश्यन्त

महाराष्ट्रात सेनेला बरोबर घेणे हि भाजपची मजबुरी आहे. सेनेला वगळून सुरुवातीला सरकार चालवून पाहिले पण लोकांच्या रोषाला सामोरे गेल्यावर फडावणीसांनी सेनेला सरकारमध्ये घेणे गरजेचे आहे हे दिल्लीला पटवून दिले. आतापण सेनेला जास्त डिवचायला नको म्हणून मुंबई मधून भाजपने माघार कशासाठी घेतली ? मध्यावधी लागल्या तर भाजपला पण सोप्या नाहीत. नगरपालिका महानगरपालिका वगैरे मध्ये सत्तारूढ पक्षाला अनुकूल मतदान झाले पण झेडपी मध्ये काँग्रेस -एनसीपीची कामगिरी इतकी पण वाईट नाही. २०१४ ला भाजप एनसीपीच्या सेटिंग मुळे सगळे वेगळे लढले आता काँग्रेस -एनसीपी एकत्र लढतील तर भाजप (+ छोटे पक्ष) आणि शिवसेना (कदाचित सेना मनसे ) वेगवेगळे लढतील यात भाजपला आहे त्या जागा राखणे अवघड होईल . सरकार मध्ये परत भाजप सेनाच येईल.भाजप एवढी रिस्क घेणार नाही .
दुसरीकडे सेनेला खरेतर विरोधी पक्षात राहणे जास्त फायद्याचे होते मात्र सलग १५ वर्ष सरकार बाहेर आणि आमदार एकजूट ठेवण्यासाठी उद्धवना सरकारमध्ये जावे लागले. एकत्र राहणे भाजप आणि शिवसेनेची मजबुरी आहे.

कपिलमुनी's picture

14 Mar 2017 - 1:04 pm | कपिलमुनी

तुमच्या एवढा विखार इतर कोणाच्याही प्रचारात पाहिला नाहीये .

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2017 - 2:25 pm | श्रीगुरुजी

काय सांगताय! अभिनंदन!!!

काय मुनी.. असे एकदम ठरवून दिल्यासारखे का प्रतिसाद येत आहेत..? मोघम आरोप करण्याची पद्धत जुनी झाली आता.

विखारी प्रचाराची व्याख्या काय..?

गुरुजी कोणत्याही परिस्थीतीमध्ये भाजपाचे समर्थन करत असले तरी त्यांनी पातळी सोडली आहे किंवा शिवीगाळ केली आहे असे दिसून आले आहे का..?

वाट्टेल ते लॉजिक लाऊन निष्कर्ष काढणे, त्याच लॉजिकने निघालेले पण स्वतःला अडचणीत असणारे निष्कर्ष नाकारणे, शिवीगाळ करणे, खोटी माहिती देवून मुद्दाम दिशाभूल करणे वगैरे प्रकार मिपावर झाले आहेत.
स्वत:ला न आवडणारी पार्टी जिंकल्यावर हवेत आरोप करायचे आणि पुरावे मागितले की वैयक्तीक हल्ले करून पळून जायचे असलेही प्रकार झाले आहेत.

हे तुमच्यालेखी विखारी प्रचारात येत नाहीत का..?

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2017 - 3:12 pm | श्रीगुरुजी

मागे एका धाग्यात केजरीवालांचे जोरदार समर्थन करताना त्यांनी किमान १०-१२ वेगवेगळ्या प्रतिसादात माझा "खोटारडा" असा सातत्याने उल्लेख केला होता. मला कावीळ झाली आहे असादेखील त्यांनी निष्कर्ष काढला होता. अर्थातच त्यांच्या दृष्टीने यात विखारी काहीही नसावे.

गॅरी ट्रुमन's picture

13 Mar 2017 - 4:36 pm | गॅरी ट्रुमन

गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त १३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला १७ मिळाल्या. परंतु काँग्रेसला एकूण मतांपैकी २८.४% मते मिळाली असून भाजपला काँग्रेसपेक्षा तब्बल ४.१% जास्त मते मिळाली आहेत (३२.५%). तरीसुद्धा भाजपला काँग्रेसपेक्षा ४ जागा का कमी मिळाल्या हे समजत नाही.

सर्वात जास्त मते मिळणारा उमेदवार विजयी होतो या पध्दतीमध्ये अनेकदा हे बघायला मिळते. एखाद्या पक्षाची मते थोड्या प्रदेशात एकत्रित झाली असतील तर त्या पक्षाला कमी मते मिळूनही जास्त जागा मिळू शकतात. पण त्याउलटे मते अधिक प्रमाणात विखुरलेल्या पक्षाला जास्त मते मिळूनही कमी जागा मिळू शकतात. २००९ मध्ये लोकसभेत भाजपला देशात १८% मते पण जागा ११६ पण २०१४ मध्ये काँग्रेसला देशात १९% मते तरी जागा ४४ च मिळाल्या. याचे कारण भाजपची मते काही राज्यांमध्ये एकवटली आहेत तर काँग्रेसची मते बर्‍याच राज्यांमध्ये विखुरलेली आहेत. उत्तर प्रदेशातही सपा पेक्षा बसपाला एक टक्का मते जास्त आहेत तरी जागा बर्‍याच कमी आहेत कारण बसपाची मते विखुरलेली आहेत.

गोव्याचा विचार केला तर असे का झाले हे समजून येईल. भाजपला काँग्रेसपेक्षा ४% मते जास्त दिसत असली तरी गोवा हे लहान राज्य आहे हे लक्षात घेता या दोन पक्षांमधील मतांमध्ये अंतर ३७,८३० मते आहे. त्यापैकी भाजपने काँग्रेसपेक्षा सुमारे ८,४०० मते एकाच मतदारसंघात-- कुंभारजुआ मतदारसंघात घेतली आहेत (एकूण ४१% चे मताधिक्य). एकंदरीतच भाजपचे उमेदवार जिंकले आहेत ते बर्‍याच मताधिक्याने जिंकले आहेत (अल्डोनामध्ये सुमारे २१% नी, कळंगूटमध्ये १९% नी, कुडचाडेमध्ये ४२% नी, मये मध्ये २०%, म्हापसामध्ये ३५% नी वगैरे). भाजपचा पराभव झाला आहे त्या मतदारसंघांमध्ये इतक्या मताधिक्याने पराभव झालेला नाही (काणकोणमध्ये साडेसात टक्क्यांनी, कुंकोळीमध्ये ६% नी, फातोर्ड्यात ६% नी वगैरे). नाही म्हणायला भाजपचा मुरगावमध्ये विजय १% पेक्षा कमी मतांनी झाला तर मान्द्रेमध्ये २५% नी पराभव झाला. पण अशा मतदारसंघांची संख्या त्यामानाने कमी. त्यामुळे जिथे जास्त मताधिक्याने विजय मिळाला तिथे तेवढी जास्त मतांची टक्केवारी वाढली. पण जिथे पराभव झाला तिथे काँग्रेसला थोड्याच अधिक मताधिक्यामुळे एक जागा पदरात पडली.

सुभाष वेलिंगकरांनी मुद्दाम गोवा सुरक्षा मंच स्थापन करून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून भाजपला पाडण्याचे काम केले.

गोवा सुरक्षा मंचाचा भाजपला त्रास होईल असे वाटले होते. पण तसे निकालात दिसत नाही. गोवा सुरक्षा मंच किंवा शिवसेनेमुळे भाजपला एकही जागा गमावावी लागलेली नाही.

म.गो.पक्षाने मात्र आपली मते लक्षणीय प्रमाणात वाढवली आहेत. इतकी वर्षे म.गो.पक्ष उतरणीला लागलेला पक्ष होता आणि गेली काही वर्षे ढवळीकर बंधूंवरच त्यांची भिस्त होती. यावेळी प्रियोळमधून दीपक ढवळीकरांचा पराभव झाला तरीही मडकईमधून सुदीन मडकईकरांनी आपला गड राखला. इतकेच नव्हे तर पेडणे आणि सावर्डे या दोन आणखी जागाही त्यांनी जिंकल्या. या दोन जागांवर १९९४ नंतर प्रथमच म.गो.पक्षाने विजय मिळवला आहे. १३% मते मिळाल्यास फार जागा मिळत नाहीत. तिरंगी लढतीत बर्‍यापैकी जागा मिळवायच्या असतील तर किमान २५% ते २७% मते हवीत.

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2017 - 9:09 pm | श्रीगुरुजी

उ.प्र. मध्ये २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने फक्त १५% मते मिळवून फक्त ४७ जागा जिंकल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल ४२% मते व ८० पैकी ७३ जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये भाजपने ३९.८% मते मिळवून तब्बल ३२४ जागा जिंकल्या आहेत.

भाजपची अंदाजे २.२% मते घटली. बसपने २०१४ च्या तुलनेत २% मते जास्त मिळविली. सपने सुद्धा २% मते जास्त मिळविली, परंतु काँग्रेसने २०१२ च्या तुलनेत (७.५%) दीड टक्का मते गमाविली (६%). सप + काँग्रेसने एकूण एकत्रित २८% मते मिळविली तर बसपने २२% मते मिळविली. परंतु भाजपने सप-काँग्रेसच्या तुलनेत तब्बल १२% मते जास्त मिळविल्याने त्यांना तब्बल ८०% जागा जिंकता आल्या.

२०१९ मध्ये विधानसभेची व मुख्यमंत्रीपदासाठी मारामारी नसल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उ. प्र. मध्ये सप व बसप यांची युती होईल असे मला वाटते. काँग्रेस अर्थातच त्यांच्यात सामील होईल. सप व बसप या दोघांसाठीही आता अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही पक्षांच्या नाकापर्यंत पाणी आलेले आहे. दोघे विरूद्ध लढले तर पुन्हा एकदा २०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकेल या भीतिने दोन्ही पक्ष राजद व संजद प्रमाणे लोकसभेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ शकतील. कदाचित २०१८ मध्ये मायावतीच्या राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर युतीची पूर्वतयारी म्हणून सप आपल्याकडील जास्तीची मते बसपला देऊन मायावतीला राज्यसभेवर निवडून यायला मदत करेल. २०१८ मध्ये उ. प्र. चे राज्यसभेतील १० खासदार मुदत संपल्यामुळे निवृत्त होत आहेत. त्यात मायावतीचा समावेश आहे. राज्यसभेवर पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला विधानसभेतील किमान ३७ खासदारांची मते मिळवावी लागतील. सपकडे ४७ व काँग्रेसकडे ७ आमदार असून मायावतीकडे १९ आमदार आहेत. या तिघांची एकूण संख्या ७३ असून त्यांचे जास्तीत जास्त २ खासदार निवडून येऊ शकतात. सप व काँग्रेसचा एकत्रित एकच खासदार निवडून येऊ शकतो. जर हे तीन पक्ष एकत्र आले नाहीत तर दुसरा खासदार भाजपचा असेल. ते टाळण्यासाठी सप मायावतीला मते देऊन निवडून आणू शकतो. मायावतीचे खरे शत्रुत्व मुलायम सिंहशी आहे. अखिलेशबरोबर तिचे तेवढे शत्रुत्व नाही. त्यामुळे अखिलेश व मायावती आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात व तसे झाले तर भाजपला २०१४ ची पुनरावृत्ती करणे अत्यंत अवघड असेल कारण या तिघांची एकत्रित मते ५०% हून अधिक आहेत.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2017 - 12:00 am | श्रीगुरुजी

पर्रीकर मुख्यमंत्री होणार.

http://indianexpress.com/elections/election-results-2017-live-updates-bj...

माझ्या मते हे अयोग्य आहे.

मला देखील पहिले धक्का बसला होता, पण आता मला फार काही अयोग्य वाटत नाही. मझ्या मते ती परिस्थिती अशी होती.
१. मगोप हे तसेही भाजपाचे भागीदार होते. यावेळी त्यांनी युती मोडली, पण ते तसेही सत्तेतील भागीदारच होते, त्यामुळे त्यांचा पाठिंबा अपेक्षित होताच. त्यामुळे भाजपा मुळातच १३ + ३ =१६ होताच.
२. गोवा फोरवर्ड वगैरे पक्षांना भाजपाबरोबर जाणे तसे हिताचे होते. त्यामुळे त्यांनी जर स्वतःहून भाजपाला संपर्क करून पाठिंबा देऊ केला असेल तर तो भाजपाने नाकारणे किंवा आडमुठी भूमिका घेणे (केवळ आम्ही फार नैतिक आहोत म्हणून) हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरला असता. त्यामुळे भाजपाने केले त्यात फार काही चुकीचे केले असे वाटत नाही

दुश्यन्त's picture

14 Mar 2017 - 1:38 pm | दुश्यन्त

दोन्ही बाजू आहेत. काँग्रेसवाले पण वेळेत नेता निवड /आघाडी करू शकले नाहीत ती त्यांची चूक आहेच. बाकी भाजपने पण कुणाला फोडले नाही. छोटे पक्ष स्वतः येतात कोण काय करणार पण ते नंतर वाटेल तेव्हा कोलांटी पण मारू शकतात. प्रतिष्ठा आणि काहीहीकरून जास्तीत जास्त राज्ये काबीज करायची हा भाजपचा प्लान असू शकतो म्हणून पर्रीकर फौजदारकी सोडून हवालदार होत आहेत.
पर्रीकर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या विजय सरदेसाईना 'फिक्सर' म्हणतात त्यांनीच हे सरकार पण फिक्स केले असेल तर नैतिकता वगैरे गप्पा मारू नयेत. नाहीतरी महाराष्ट्रात पण प्रचारात 'एनसीपी - न्याचुरली करप्ट पार्टी' म्हणत सेटिंग केलेलेच होते आता गोव्यात पण 'फिक्सर'ला बरोबर घेतलेच आहे, शिवसेना-भाजप प्रचारात एकमेकांना दूषणे देताना काही हातचे ठेवत नाहीत मात्र नंतर एक होतात. थोडक्यात सब घोडे बारा टक्के!

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2017 - 2:39 pm | श्रीगुरुजी

१) गोव्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या मंत्रीमंडळातील ६ मंत्र्यांना मतदारांनी पराभूत केले आहे.

२) भाजपला दुसर्‍या क्रमांकाच्या म्हणजे १३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला त्यापेक्षा अधिक म्हणजे १७ जागा आहेत.

३) काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले नसले तरी मतदारांनी अतिशय स्पष्टपणे भाजपला नाकारले आहे. भाजपने सत्ताधारी पक्ष न होता विरोधातच बसावे असा मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे.

४) ज्या गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा भाजपने मिळविला आहे त्याच पक्षाने 'भाजप हटाव' अशी मोहीम उघडून भाजपविरोधात निवडणुक लढविली होती. नैतिकदृष्ट्या अशा पक्षाबरोबर सरकार स्थापन करणे योग्य नाही.

५) केंद्रातील संरक्षण खात्याचे मंत्री हे अत्यंत महत्त्वाचे व मोठे पद सोडून गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परत येणे ही पर्रीकरांची पदावनती आहे.

६) फडणविसांना महाराष्ट्रातून केंद्रात आणून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री करणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत. फडणविस महाराष्ट्रात उत्तम काम करीत आहेत. त्यांना हलविणे चुकीचे ठरेल. त्यांनी शिवसेनेला नेस्तनाबूत करत आणले असून मुंबई-ठाणे या दोन शहरांच्या आत शिवसेनेला बंदिस्त करून टाकले आहे. तसेच चंद्रकांत पाटील, गडकरी, दानवे, मुनगंटीवार इ. नेत्यांना शिवसेनेबद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळे ते उद्धव ठाकर्‍यांसमोर दबून राहतील व शिवसेनेला भाजपपेक्षा वरचढ होऊन देतील. उद्धव त्यांच्यासमोर प्रचंड माज करून दबाव आणेल.

पर्रीकरांना गोव्यात आणणे ही चू़क ठरेल. तसेच फडणविसांना दिल्लीत नेणे ही देखील चूकच ठरेल.

७) मुंबईत शिवसेनेसमोर उभे राहून संघर्ष करण्याची आवश्यकता होती. जमल्यास फोडाफोडी करून आपला महापौर निवडून आणायला पाहिजे होता. परंतु भाजपने तिथे शेपूट घातली आणि गोव्यात फोडाफोड करणे अयोग्य असताना तिथे व मणिपूरमध्ये जनादेशाचा अवमान करून स्वतःचे सरकार आणण्याची निषेधार्ह धडपड सुरू आहे.

मोदक's picture

14 Mar 2017 - 2:50 pm | मोदक

गुरुजी..

शिवसेनेमुळे फडणवीस आणखी १० वर्षे कुठे जात नाहीत. काळजी करू नका.

तसेच तुमचीच विधाने बघा..

३) काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले नसले तरी मतदारांनी अतिशय स्पष्टपणे भाजपला नाकारले आहे. भाजपने सत्ताधारी पक्ष न होता विरोधातच बसावे असा मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे.

४) ज्या गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा भाजपने मिळविला आहे त्याच पक्षाने 'भाजप हटाव' अशी मोहीम उघडून भाजपविरोधात निवडणुक लढविली होती. नैतिकदृष्ट्या अशा पक्षाबरोबर सरकार स्थापन करणे योग्य नाही.

(i) मुंबईत शिवसेनेसमोर उभे राहून संघर्ष करण्याची आवश्यकता होती. जमल्यास फोडाफोडी करून आपला महापौर निवडून आणायला पाहिजे होता.

(ii) गोव्यात फोडाफोड करणे अयोग्य असताना तिथे व मणिपूरमध्ये जनादेशाचा अवमान करून स्वतःचे सरकार आणण्याची निषेधार्ह धडपड सुरू आहे.

पहिली दोन आणि नंतरची दोन विधाने परस्पर विरोधी नाहीत का..? फोडाफोडी निषेधार्ह असेल तर सगळीकडेच निषेधार्ह असली पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2017 - 3:21 pm | श्रीगुरुजी

१) गोव्यात भाजप सत्ताधारी पक्ष होता. मुंबईत भाजप शिवसेनेबरोबर सत्तेत असला तरी भाजपची भूमिका दुय्यम होती. त्यामुळे मुंबईत मतदारांनी भाजपला नाकारले असे अंशतः म्हणता येईल. अर्थात मोठा भागीदार असलेल्या शिवसेनेबद्दल हे जास्त प्रमाणात म्हणता येईल.

२) गोव्यात एकूण फक्त ४० आमदार आहेत. ४० आमदारांच्या तुलनेत भाजप व काँग्रेसमधील असलेला ४ आमदारांचा फरक बर्‍यापैकी मोठा आहे (एकूण आमदार संख्येच्या १०%). त्या तुलनेत मुंबईत २२७ नगरसेवक असून भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या एकूण संख्येत फक्त २ इतकाच फरक आहे. २२७ च्या तुलनेत २ हा फरक खूप कमी आहे. भाजप व शिवसेनेला जवळपास समान जागी विजय मिळालेला आहे व त्यांच्यातील फरक अत्यल्प आहे (एकूण नगरसेवकांच्या १% पेक्षाही कमी). त्यामुळे खरं तर मतदारांनी दोघांना जवळपास समान कौल दिला आहे. एकतर दोघांनाही नाकारले आहे किंवा दोघांनाही स्वीकारले आहे असे म्हणता येईल. गोव्यात भाजपला मतदारांनी स्पष्ट्पणे नाकारले आहे हे नक्की.

३) शिवसेनेने भाजपविरूद्ध प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली होती. शिवसेना हा सातत्याने राज्य सरकारच्या कामात अडथळे आणत आहे. अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे. गोव्यात भाजप व काँग्रेसमधील वैरभावना इतक्या टोकाला गेलेली नव्हती.

हे लॉजिक मला पटले नाही. पण असो, यावर आपले एकमत होणार नाही.

अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे

याला किमान दोन पिढ्या लागतील, एकवेळ १० - २० वर्षात क्रमाने उतरत जाऊन निष्प्रभ होतील पण इतक्या लवकर नेस्तनाबूत होणार नाहीत.

गॅरी ट्रुमन's picture

14 Mar 2017 - 3:30 pm | गॅरी ट्रुमन

यात काय नैतिक आहे आणि काय अनैतिक आहे यावर भाष्य करत नाही. कारण कोणाही राजकारण्याची नैतिकतेच्या मुद्द्यावरून बाजू घेऊन वादावादी करणे म्हणजे तोंडघशी पडायची रेसिपी आहे. राजकारणात कोणी नैतिक असेल असे वाटत नाही. अगदी अटलबिहारी वाजपेयींनीही कल्याणसिंगांच्या मंत्रीमंडळात राजाभय्यासारखे लोक होते त्याचे 'ते आमदार म्हणून निवडून गेले आहेत तेव्हा त्यांना मंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही' असे म्हणत एका अर्थी समर्थन केले होते.

तेव्हा भाष्य राजकीय आणि कायदेशीर बाजूंवर करतो. पर्रीकरांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रण देण बेकायदेशीर नाही हे आजच न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढील प्रतिसाद राजकीय बाजूंवरच करत आहे.

सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेबाहेर ठेऊन इतर पक्षांनी हातमिळवणी करून सरकार स्थापन करायचे प्रकार यापूर्वीही कित्येकवेळा झाले आहेत. देवेगौडा आणि गुजराल यांची संयुक्त मोर्च्याची सरकारे हे त्याचे मोठे उदाहरण आहे. आताही उत्तर प्रदेशात जर मतदारांनी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आणली असती तर परत सपा-बसपा-काँग्रेस यांचे सरकार आलेच असते. म्हणजे त्यावेळी अस्पष्ट जनादेशाचा या पक्षांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावलाच असता. प्रत्येकवेळी इतर पक्षांनी असे करून भाजप मात्र 'रिसिव्हिंग एन्डला' का? कधीतरी काँग्रेसलाही तीच दवा खिलवायला हवी या उद्देशाने हा निर्णय घेतला असेल ही शक्यता आहेच.

दुसरे म्हणजे २०१४ मध्ये लोकसभेत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, आसाम, केरळ या राज्यांमध्ये जोरदार मार खाल्ला होता. आताही उत्तराखंडमध्ये असाच मार खाल्ला आहे. अशावेळी जर पंजाबबरोबरच गोवा आणि मणीपूर ही दोन राज्ये ताब्यात आली असती तर ते बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने काँग्रेससाठी मोठे मानसिक समाधान झाले असते. ते पण मिळवू द्यायचे नाही असे भाजपने ठरविलेले दिसत आहे. त्यातूनही या दोन राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असते तर काहीच प्रश्न नव्हता.पण यावेळी त्रिशंकू विधानसभा आली आहे आणि भाजपच्या पाठीशी बहुमत उभे राहू शकत आहे. मणीपूरमध्ये तर एन.पी.एफ हा पक्ष शेजारच्या नागालँड राज्यात भाजपचा मित्रपक्षच आहे. त्या पक्षाचे चार आमदार भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहेत. काही कारणांनी पासवानांच्या लोकजनशक्तीनेही मणीपूरमध्ये विधानसभेची एक जागा जिंकली आहे. तो पक्ष भाजपचा मित्रपक्षच आहे. तो पक्षही पाठिंबा द्यायला तयार आहे. असे करून बहुमत बनू शकत असताना काँग्रेसला तडाखा द्यायचा असे भाजपने ठरविले आहे असे दिसत आहे.

याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतील? कदाचित या दोन्ही राज्यात भाजपची सरकारे अस्थिर राहतील. जर का ही सरकारे पडली तर त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकेल. पण ही राज्ये लहान असल्यामुळे तिथे काहीही झाले तरी राष्ट्रीय पातळीवर भाजपवर फार परिणाम होऊ नये. पण काँग्रेसची अवस्था सध्या इतकी वाईट आहे की ही दोन सरकारे ताब्यात असणेही मोठी दिलासादायक स्थिती असती. भरपूर पैसे राखून असलेल्याला हजार रूपये गेले तर त्याचा फार परिणाम होणार नाही पण तेच हजार रूपये फार पैसे नसलेल्याला खूप महत्वाचे असतील. काँग्रेसची अवस्था सध्या तशा फार पैसे नसलेल्यासारखी झाली आहे.

त्यातूनच काँग्रेसमध्ये या प्रकारामुळे स्थानिक नेते नाराज आहेत अशा बातम्या आल्या आहेत. म्हणजे इतर राज्यांमध्ये निवडणुका होतील तेव्हा केंद्रीय नेतृत्व आपल्याकडे पाहिजे तितके लक्ष देईल की नाही हा किडा त्यातून इतर राज्यांमधील काँग्रेस नेत्यांमध्ये सोडता येऊ शकतो. त्यातून ते निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरतीलच असे नाही.

हा प्रकार बॅकफायर झाला तर फार तर या दोन राज्यात काँग्रेस परत सत्तेत येऊ शकेल. पण जर का ही खेळी सफल झाली तर काँग्रेसला आणखी दणका मिळू शकेल. तेवढी राजकीय जोखीम उचलायची भाजपने ठरवलेले दिसते. आणि मोदी हा नेता अशा जोखमी घ्यायला तयार असतो हे वेळोवेळी दिसून आले आहेच.

या निर्णयाचे केंद्र सरकारच्या कामावर काही प्रमाणात परिणाम नक्कीच होतील. ती पण जोखीम भाजपने घ्यायची ठरविलेले दिसते. एकूणच या निर्णयाचे राजकीय पैलू बघायला हवेत आणि ती जोखीम पक्ष घ्यायला तयार आहे असे दिसते.

आनन्दा's picture

14 Mar 2017 - 8:43 pm | आनन्दा

सहमत आहे.
तसेही माझ्या मते गोव्यात भाजपाला मतदारांनी नाकारले वगैरे नाहीये. हे सगळे अंतर्गत दुफळीचे परिणाम अहेत. विशेषतः वेलिंगकरांचा फत़आ भाजपाला बर्‍यापैकी बसला असे ऐकून आहे. त्यामुळे पर्रीकर जर परत येणार असतील तर गोव्याचे लोक पण त्यांचे स्वागतच करतील.

दुश्यन्त's picture

14 Mar 2017 - 6:04 pm | दुश्यन्त

मुंबईमध्ये सेना आणि भाजपला जवळपास समान संधी होती मात्र भाजपने राज्य सरकारवर संकट येऊ नये म्हणूनच शेपूट घातले. पारदर्शी पहारेकरी वगैरे बोलायच्या गोष्टी असतात. सिंचन घोटाळ्याचे ढीगभर पुरावे (सोमय्या ,फडणवीस, गिरीश महाजन यांच्या मते) असून पण अजित पवार आणि तटकरेवर कारवाई होत नाही तर मग ज्या मुंबई पालिकेमध्ये मिळून सत्ता भोगली तिथली प्रकरण कशाला भाजप बाहेर काढेल हे सेनेला माहीत आहे. फडणवीसांनी राज्य सरकार स्थिर राहावे म्हणून मुंबईच्या लढाईमधून माघार घेतली यात खरी गोची झाली ती सोमय्या, आशिष शेलार वगैरेंची!

वरुण मोहिते's picture

13 Mar 2017 - 3:20 pm | वरुण मोहिते

चिक्कार उदाहरणं आहेत कि पक्ष आणि त्यासाठी त्याग करायची . पर्रीकर का अयोग्य . सरंक्षण मंत्र्याच्या हातातून राज्य जात कामा नये . केंद्रात परत येणार ते नक्की .

गॅरी ट्रुमन's picture

13 Mar 2017 - 4:42 pm | गॅरी ट्रुमन

गोव्यात आम आदमी पक्षाचा पूर्ण बोर्‍या वाजला आहे. राणा भीमदेवी थाटात आपला पक्ष गोव्यातील ४० पैकी ३५ जागा जिंकेल असे केजरीवालांनी जाहिर केले होते. प्रत्यक्षात त्यांना अवघी ६.४% मते मिळाली आहेत. केवळ बाणावली मतदारसंघात त्यांचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. इतर सर्व मतदारसंघात आआपच्या उमेदवारांनी आपले डिपॉझिट गमावले आहे. यात कुंकोळीतून निवडणुक लढविणार्‍या आआपच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्विस गोम्स यांचाही समावेश होतो. तिथे ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होऊन तो चौथ्या क्रमांकावर फेकला जाणे ही कोणत्याही पक्षासाठी फार उत्साहवर्धक गोष्ट नाही :)

दिल्लीत एकदा अभूतपूर्व यश मिळाले म्हणजे आपण जाऊ तिथे सगळीकडे तसेच यश मिळेल असा त्यांचा गैरसमज झाला होता. मग त्यातून विविध इंटर्नल सर्व्हे प्रसिध्द केले जात होते. अशाच एका सर्व्हेमध्ये पंजाबमध्ये ११७ पैकी १०० जागा आआप जिंकणार तर गोव्यात तब्बल ४१% मते मिळणार असे इंटर्नल सर्व्हेंचे आकडे त्यांनी प्रसिध्द केले होते. या दणक्यानंतर थोडा तरी डोक्यात प्रकाश पडायला हवा.

विकास's picture

13 Mar 2017 - 6:59 pm | विकास

या दणक्यानंतर थोडा तरी डोक्यात प्रकाश पडायला हवा.

कुणाच्या डोक्यात प्रकाश पडायला हवा? केजरीवालांच्या? ते तर "स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा" ! ;)

वास्तवीक प्रकाश पडायलाच हवा असेल तर तमाम आपसमर्थकांच्या डोक्यात पडला पाहीजे आणि जे अगदी आपसमर्थक नसतील पण "स्वयंप्रेरीत बुद्धीवादी" असतील त्यांच्या देखील डोक्यात प्रकाश पडला पाहीजे. त्याचा अर्थ असा देखील नाही की त्यांनी मोदीसमर्थक व्हावे. पण नुसती बदनामी करून, दुसर्‍या बाजूस तुच्छ लेखून, सामान्यांना चिथावून तुम्ही टिआरपी मिळवू शकाल पण मते नाही...आता, अल्पसंख्य, जातीय वगैरेचे राज-समाजकारण खूप झाले. नौटंकी मुख्यंत्र्यांचा हवाला देणे तर अतिच झाले आहे. हे जेंव्हा समजेल तेंव्हा कुठे एक नजिकच्या काळात एखादा सशक्त विरोधीपक्ष म्हणून आणि खूप पुढच्या भविष्यात समर्थ पर्याय म्हणून उदयाला येऊ शकेल , ज्याची लोकशाहीत गरज आहे.