आर्थिक स्वावलंबन - स्वप्नांच्या वाटेवर

Primary tabs

इडली डोसा's picture
इडली डोसा in लेखमाला
8 Mar 2017 - 6:08 am

.

"ए राजा, ऊठ"

"झोपू दे गं आई अजून थोडं..."

"अरे, शाळेत जायला उशीर होईल."

"होऊ दे.

दररोज मी का जायचं शाळेत याची दोन चांगली कारणं दे, तरच उठतो."

"एक म्हणजे तू आता पन्नास वर्षांचा घोडा आहेस आणि दुसरं म्हणजे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस." हा विनोद आपण पूर्वी ऐकला असेल आणि हसून सोडून दिला असेल किंवा मनात असंही आलं असेल कदाचित की हो ना राव, मलाही नाही जायचं रोज उठून काम करायला.

मला माझा आवडता छंद जोपासायचा आहे, माझ्या जोडीदाराबरोबर, छकुल्यांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे..... पण जगण्यासाठी आणि कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी नोकरी तर केलीच पाहिजे. मग काय, लागतो आपण त्याच मार्गाला आणि करतो नोकरी इमानेइतबारे आयुष्यभर. कारण आयुष्यभर काम केलं, तरच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतील असा एक पगडा आपल्या मनावर असतो. माझ्या कुटुंबासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आरामदायक जीवनासाठी मला आत्ता झटून काम केलंच पाहिजे ह्या विचाराचं मनावर इतकं पक्कं गारूड असतं की नोकरी कायमस्वरूपी टिकवण्याच्या ध्यासाने आपण पछाडले जातो. मग ऑफिसमधला वेळ वाढतो, प्राणप्रिय छंदांनाही आठवड्यातून एकदा / महिन्यातून एकदा अशी टाइमलाईन येते. माझ्या आवडत्या गोष्टींना मला वेळ द्यायचा आहे, कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा आहे, मनसोक्त भटकायचं आहे आणि हवं तेव्हा हवं ते करायचं आहे हे विचार 'निवृत्तीनंतर करू, तेव्हा वेळच वेळ असेल' असं म्हणत हळूहळू बाजूला पडतात.

खरं तर आपण निवृत्तीपर्यंत काम का करतो? कारण बऱ्याचदा आपण गृहीतच धरलेलं असतं की आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यभरात ज्या काही सगळ्या गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला नियमानुसार ठरवून दिलेल्या निवृत्तीचा दिवस येईपर्यंत काम केलंच पाहिजे. अशा वेळी जर तुम्हाला कोणी म्हणालं की "तुम्ही तुमच्या तिशीत, चाळीशीत किंवा आपण काम करण्याचं जे सर्वमान्य वय ठरवलं आहे, त्यापेक्षा लवकरच नोकरी सोडून देऊ शकता आणि आणि जे काही इमले मनात रचले आहेत, ते पूर्ण करू शकता", तर तुम्ही अशा वक्तव्यावर काय म्हणाल? "कसं शक्य आहे हे?" "सडाफटिंग लोकांना शक्य असेल, संसारी लोकांना कसं जमेल?" , "हम्म्म... असेल, पण मला शक्य होईल असं मला वाटत नाही" असं काहीतरी, की "खरंच, काय बरं करावं लागेल यासाठी? बघू या तरी आपल्याला जमतंय का?" असं काही? चला तर मग बघूच या हा प्रकार काय आहे.

आपण नोकरी करतो ते दर महिना ठरावीक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी. मग नोकरी न करता असं ठरावीक उत्पन्न आपल्याला मिळालं, तर त्याचा अर्थ आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीवर विसंबून राहायची गरज नाही. आर्थिक बाबतीत आता आपण स्वावलंबी झालो. म्हणजेच आपण जर नोकरी ही केवळ अर्थार्जनासाठी करत असू, तर ती करण्याची काही गरज अशा वेळी राहत नाही. 'आर्थिक स्वावलंबन' हे आपलं अंतिम ध्येय नसून आपल्याला गोष्टी हव्या तेव्हा करता येणं हे आहे. अर्थातच आर्थिक स्वावलंबन हा अंतिम ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता आहे. मात्र आर्थिक स्वावलंबनापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्पे आहेत. सगळ्यात आधी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्यांवर कोणकोणत्या गोष्टींना प्राध्यान्य आहे हे ठरवणं. प्राधान्य असणाऱ्या या गोष्टींपैकी पैसा किती गोष्टींसाठी लागणार आहे, किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे? याप्रमाणे नजीकच्या आणि लांबच्या काळातल्या गरजा यांसाठी किती रक्कम लागेल? अशा प्रकारे साधारण रूपरेषा ठरली की त्यानुसार पैशाची तरतूद कशी करायची ते बघता येतं.

आमच्या बाबतीत सांगायचं झालं, तर आम्ही तसं उशिराच - म्हणजे तिशी ओलांडताना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा विचार करू लागलो. मी मुलीच्या जन्माच्या वेळी भारतात गेले असताना आम्ही - म्हणजे मुख्यत्वे माझा नवरा गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी बरीच पुस्तकं वाचत होता आणि आंतरजालावरही शोध घेत होता. लग्नापूर्वी त्याने शेअर मार्केटमध्ये आणि मी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती, पण ती फारशी काही फलदायी ठरली नव्हती. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय शोधायला हवा, ही जाणीव झाल्यामुळे जास्त परतावा देणाऱ्या आणि तुलनेने भरवशाच्या अशा गुंतवणूक पर्यायांचा शोध सुरू झाला होता.

आमच्या गुंतवणुकीची गाडी योग्य मार्गाला लावण्याचं सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते. वेळोवेळी वेगवेगळी पुस्तकं आणि जालावरच्या या विषयावरचे ब्लॉग्स वाचून त्यानेच आमच्या बचतीची आणि गुंतवणुकीची रूपरेषा ठरवली. इतकंच नाही, तर या सगळ्या किचकट गोष्टी मला सोप्या भाषेत समजावून सांगून पैशाच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत नेहमी माझं मतही घेतलं. यातूनच आम्हाला ओळख झाली ती आर्थिक स्वावलंबनाची आणि मग सुरू झाला प्रवास एका ध्येयाकडे. आपण नोकरी का करतोय असा प्रश्न स्वतःला विचारला, तेव्हा खरं तर 'एवढं शिकलो ते यासाठीच ना? नाहीतर मग कशाला केली असती एवढी धडपड?' हा पहिला विचार होता. पण योगायोग असा की दोघंही ज्या विषयाचे पदवीधर आहोत, त्या विषयाशी संबंधित अगदी कमी काम करतो. निदान माझा नवरा त्याच्या पदव्युत्तर क्षेत्रात काम करतो. माझ्या कामाचा आणि माझ्या पदवीच्या विषयाचा आता काही संबंध उरलेला नाही. अनेकांचं होत असेल असं आणि ते ठरवून असेल तर उत्तमच आहे. पण माझ्या बाबतीत तरी अर्थार्जन या एकाच हेतूने मी नोकरीची कास धरलेली आहे आणि मला नोकरी न करण्याचा पर्याय मिळाला तर काय करता येईल, अशा चार-पाच गोष्टी तरी मनात नक्कीच आहेत. नवऱ्याला त्याचं काम आवडतं, पण अमेरिकेत आल्यापासून त्याने काही छंद जोपासले आहेत, ज्यासाठी जास्त वेळ द्यायला त्याला नक्कीच आवडेल. शिवाय आमची मुलगी हे मुख्य कारण आहेच. आम्हाला तिला भरपूर वेळ द्यायचा आहे, तिच्यासोबत भरपूर भटकायचं आहे आणि तिला अनुभवसमृद्ध करून त्यातून तिचं जीवन फुलवायचं आहे.... असा सगळा विचार करता करता लक्षात आलं की हे सगळं करायचं, तर आधी आर्थिक स्वावलंबन हवं.

सुरुवात केली ती आमचा महिन्याचा खर्च लिहून काढण्यापासून. किती खर्च होतो आणि किती बचत होते, याचा साधारण अंदाज घेतला. बचत वाढवण्यासाठी खर्चात कुठे कुठे कपात करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. शिवाय कंपनीकडून उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयींचा पुरेपूर फायदा घेतला. सगळ्या टॅक्सपूर्व खात्यांची मर्यादा कमाल केली. आमच्या सुदैवाने अमेरिकेत आम्ही ज्या गावात राहत होतो, ते साधारण पन्नास हजार लोकवस्तीचं गाव होतं, त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहण्याचा खर्च आणि रोजचा कामासाठी प्रवास वगैरे गोष्टींसाठी लागणारा खर्च मोठ्या शहरात राहण्याच्या मानाने कमी होता. इथे आमच्या मित्रपरिवारातली बरीच कुटुंबं आमच्या दोघांसारखीच एकाच कंपनीत काम करणारी होती. एकाच कंपनीत असलो, तरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिस लोकेशन्समध्ये कामाला होतो. गाव छोटं असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक अगदी नगण्य म्हणण्याइतपत होती. तासाला एक बस अशी बसची वारंवारता होती. आमच्यासारख्याच परिस्थितीत असणाऱ्या इतर बऱ्याच कुटुंबांमध्ये नवरा-बायको दोघांकडे वेगवेगळ्या गाड्या होत्या. आम्ही मात्र दोघांत एकच गाडी वापरायचा निर्णय घेतला. गाव छोटं असल्यामुळे एक जण दुसऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून सहज आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत जाऊ शकत होता. क्वचित प्रसंगी थोडी कसरत करावी लागली, तरी जोपर्यंत आम्ही तिथे राहत होतो, तोपर्यंत ही व्यवस्था आमच्यासाठी कामी आली. शिवाय तिथे नोकरी सुरू झाली की लगेच घर घेण्याचा सर्वसाधारण कल होता. दोघांना नोकरी आहे, घराची किंमत आवाक्यात, गृहकर्ज कमी व्याजदरात उपलब्ध आहेत, शिवाय घरभाडं देत छोट्या अपार्टमेंटमध्ये राहण्यापेक्षा महिन्याला तेवढाच हप्ता भरून स्वतःच्या मोठ्या घरात राहता येत असेल तर घर का घेऊ नये? असा सर्वसाधारण समज होता. यामुळे आम्हाला घर न घेण्यावरून बरीच विचारणा होता असे. पण घर घेणं म्हणजे एक मोठी आर्थिक जबाबदारी घेण्यासारखे होतं. थोडी शोधाशोध केल्यावर न्यूयॉर्क टाइम्सचा एक धागा सापडला, ज्यात त्यांनी घर भाड्याने घ्यावं की विकत याचा निर्णय घेण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला होता. एका तक्त्यात घर विकत घेणं आणि भाड्याने घेणं या संदर्भातले वेगवेगळे आकडे (उदा., वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, विकत घेऊ पाहणाऱ्या घराचा प्रकार, घरभाडे, राहण्याचं ठिकाण इ.) टाकले, की त्या गावात घर विकत घ्यायचं असेल तर ती गुंतवणूक फलदायी ठरण्यासाठी साधारण किती वर्षं त्या घरात राहणं आवश्यक आहे, याचे आकडे मिळत होते. त्यानुसार आम्ही घर घेतलं, तर आम्हाला त्या ठिकाणी साधारण पाच-सहा वर्षं तरी राहणं गरजेचं होतं. अमेरिकेत मिडवेस्ट भागातल्या या ठिकाणी आम्ही तेवढा काळ राहू याची आम्हाला खातरी नव्हती, शिवाय कामाच्या ठिकाणी दर दोन-तीन वर्षांतून होणारी मनुष्यबळ कपात यासारख्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घर विकत न घेण्याचाच निर्णय घेतला. या झाल्या मोठ्या गोष्टी. आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बचत कशी होईल ते पाहतो. मोबाइल फोनचं बिल आम्हा दोघांचं मिळून साधारण महिन्याला शंभर डॉलर येत असे. थोडी शोधाशोध करून प्लॅन आणि सुविधा देणारी कंपनी बदलून ते चाळीसवर आणलं. यात एक विशिष्ट प्रकारचा फोनच वापरायचा आणि किती डेटा वापरायचा यावर मर्यादा होत्या, पण आमच्या आवश्यक गरजा यातून पूर्ण होत होत्या, त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीला मुकतोय असं कधीच वाटलं नाही. शिवाय शक्य होईल तेवढं घरून डबा घेऊन जाणं आणि कँटीनमध्ये विकत घेऊन खाणं टाळलं. याचा दुहेरी फायदा होतो - पैसे तर वाचतातच, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जास्त आरोग्यदायक गोष्टीही खाल्ल्या जातात. अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी करून खर्चावर मर्यादा आणता येते. प्रत्येक गोष्ट करताना 'हे आपल्या ध्येयाला धरून आहे ना?' असा प्रश्न करत असतो. त्यामुळे वायफळ खर्चाला आपोआप चाप बसतो.

याचा अर्थ असा नाही की आम्ही काही सगळी मजा बंद करून फक्त पै न पै साठवत बसलो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, कोणत्या गोष्टीला प्रधान्य द्यायचं त्याची एक साधारण यादी सुरुवातीलाच तयार केली होती. त्यात सहकुटुंब वर्षातून एकदा एक मोठी सहल आणि वीकान्ताला जवळपास भटकंती, कँम्पिंग आणि नवऱ्याच्या रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंग या छंदासाठी वाजवी खर्च करण्याची आमची तयारी होती. या सगळ्या गोष्टींसाठी साहित्य घेताना आम्ही नेहमी उत्तम दर्जाचंच घेतो. पण जिथे पैसे वाचवणं शक्य आहे, तिथे या गोष्टी करतानाही वाचवतो. उदा., चांगलं साहित्य घेतानाही कुठे आणि कधी डिस्काउंट मिळतं ते बघून तेव्हा ते घेतो. सहली ठरवताना बऱ्याच आधी ठरवतो, त्यामुळे विमान तिकिटावर जास्तीचा खर्च वाचतो. शिवाय हॉटेल्स बुक करताना 'एअर बी अँड बी'सारख्या साइटवरून शोध घेऊन जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल ते बघतो. बाहेरच्या देशात गेलो, तरी लोकल ट्रान्स्पोर्टने फिरणं, स्वयंपाक करण्याची सुविधा असलेल्या ठिकाणी राहणं अशा गोष्टी केल्याने कमी खर्चात नवनवीन देश आणि जागा पाहण्याची संधीदेखील मिळत आहे. वर्षातून एकदा आम्ही सगळ्या गुंतवणुकीचा आणि खर्चाचा आढावा घेतो. प्रत्येक गोष्ट करतानाच आपल्या अंतिम ध्येयाला अनुसरूनच ही गोष्ट आहे ना, याचा काटेकोरपणे विचार करतो.

वेगवेगळ्या ठिकाणी राहून तिथले अनुभव घेण्यावर कुटुंब म्हणून आमचा कल आहे. शिवाय आउटडोअर गोष्टी करण्याकडे जास्त ओढा असल्यामुळे अशा संधी त्या मानाने कमी उपलब्ध असणाऱ्या मिडवेस्टमधून बाहेर पडण्याचा आमचा विचार चालू होता. आमचं आर्थिक गणित कोलमडू न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून अखेर आम्ही सहा महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झालो. त्या वेळी आढावा घेताना लक्षात आलं की आपण आर्थिक स्वावलंबनाच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. इथेसुद्धा एक गाडी, ऑफिसच्या जवळच भाड्याने घर या गोष्टी तशाच चालू ठेवल्या आहेत. कॅनडामध्ये गुंतवणुकीचे काय चांगले पर्याय आहेत याचा शोध चालू आहे. इथे काही वर्षं राहिल्यानंतर कदाचित आणखी काही गोष्टी कळतील किंवा नव्या संधी समोर येतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल कदाचित बदलतही जाईल. आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. आम्ही चाळीशी गाठेपर्यंत, म्हणजे आणखी पाच-सहा वर्षांत हे होईल अशी अपेक्षा आहे.

एक मजेचा भाग म्हणून आपल्याला आर्थिक स्वावलंबन मिळवायला किती वेळ लागेल हे इथे चटकन बघता येईल. हे गणित कदाचित फक्त अमेरिकेत लागू असेल, भारतात यातल्या गणितात थोडा फार बदल होईल, पण मूळ संकल्पना तशीच राहील.

शेवटी हा लेख म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे. एखाद्याला यातली संकल्पना आवडलीच, तर त्यांनी स्वत: अभ्यास करून यातल्या खाचाखोचा जाणून घ्यायला हव्यात. अमुक अमुक एक गोष्ट करा आणि तुम्ही खातरीशीररित्या आर्थिक दृष्टीने लवकरात लवकर स्वावलंबी व्हाल असं मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेगवेगळ्या. पैसा साठवणं हे अंतिम ध्येय नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वतंत्र्य मिळवणं हे आहे. आम्ही निवडलेला मार्ग हा आम्हाला योग्य वाटलेला मार्ग आहे. प्रत्येकाला तोच पटेल असं नाही. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे.

मला जरी या विषयातलं खूप जास्त ज्ञान नसलं, तरी आम्ही (म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यत्वे माझ्या नवऱ्याने) खालील पुस्तकं आणि ब्लॉग्ज फोरम्स वाचले / अजूनही वाचत आहोत :

आर्थिक स्वावलंबन, मुदतपूर्व निवृत्ती आणि गुंतवणूक यासाठी वाचलेल्या पुस्तकांची यादी.

- इंटेलिजंट इन्व्हेस्टर - बेंजामिन ग्रॅहम
- बॉगलहेड्स,गाईड टु इन्व्हेस्टींग
- कॉमन स्टॉक्स फॉर अनकॉमन प्रॉफिट्स
- अर्ली रिटायरमेंट एक्स्ट्रीम
- सिंपल पाथ टू वेल्थ
- द वेल्दी बार्बर
- द वेल्दी रेंटर
- हाऊ टू रिटायर हॅपी, वाईल्ड अँड फ्री

यू एस ब्लॉग्स / फोरम्स
१.एमएमएम
२. बॉगलहेड्स फोरम
३. मॅडफिएन्टिस्ट

भारतातल्या गुंतवणुकीसाठी आम्ही खालील संस्थळांचा वापर केला :
१. जागो इन्व्हेस्टर
२. सुब्रमनी
३. फ्री फिन कॅल

कॅनडा ब्लॉग्स / फोरम्स
१. फायनान्शिअल विस्डम
२. केनेडिअन काउच पोटेटो

तुम्हीसुद्धा असं काही करत असाल किंवा करायची इच्छा असेल, तर तुमचे अनुभव इथे शेअर करा. या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचंही स्वागत आहे.

धन्यवाद!

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Mar 2017 - 9:47 am | पैसा

सुरेख लेख. ही केवळ पोच आहे. अजून खूप लिहायचे आहे.

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 11:47 am | सविता००१

बेस्टच. आम्ही पण असा विचार करतोय. पण नीटशी दिशा नव्हती मिळत. या लेखामुळे आता मला बरंच काही पाहता येइल, शिकता येइल. धन्स.
फार आवडला लेख

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 12:30 pm | प्रीत-मोहर

खूप सुंदर लेख. माझ्यासाठी अत्यंत गरजेचा. याचं प्रिंट माझ्या फाईलला लागलय :)

मून्शाईन अग्ग या लेखाला सुट होणार होणारे हेडर फुटर्स !! अगदी क्लास. त्यातल ते स्वप्ने दर्शवणारी सोनेरी पान आणि पैसे दाखवणारं खोड आणि त्यात तु टाकलेला रुपी सिंबॉल __/\__

मंडळ आभारी आहे पण अगं मी फक्त संकलन केले, जालावर शोधून घेतले आहे ते झाड आणि सोनेरी पाने. :)

पद्मावति's picture

9 Mar 2017 - 2:30 pm | पद्मावति

खुप सुन्दर आणि उपयुक्त लेख.

इनिगोय's picture

9 Mar 2017 - 3:16 pm | इनिगोय

अतिशय उपयुक्त दृष्टिकोन.
एक सूचना.. तुझ्या मुलीला लवकरच यात सामिल करून घे. ती अजून लहान आहे, असा विचार न करता तिलाही गुंतवणुकीचे बेसिक धडे द्यायला सुरूवात कर. याचे फायदे मी अनुभवत आहे.

लेख प्रत्येकासाठी उपयोगी आहे. लिंक्स देऊन एक मोठं काम केलं आहे. ज्यांना या वाटेवर चालायचे असेल त्यांना लिंक्स उपयोगी पडतील.
तुमची ही अर्थकथा फार आवडली आहे.

स्नेहांकिता's picture

10 Mar 2017 - 12:13 pm | स्नेहांकिता

संकल्पना उपयुक्त आहे. अमेरिकेतील उत्पन्नात ही स्टेज चाळीसच्या दरम्यान गाठता येईल, पण भारतात कठीण आहे, असं वाटतं.

मनिमौ's picture

10 Mar 2017 - 12:27 pm | मनिमौ

पण स्नेहा म्हणते तस भारतात हे ध्येय गाठायला नक्कीच जास्त वेळ लागेल. आर्थिक स्वावलंबन लौकर मिळवण्यासाठी ठराविक काळाने नोकरी बदलणे हा पण एक पर्याय आहे. नवीन नोकरीच्या ठिकाणी जास्त हाईक मिळते आणी वाढलेल्या पगारातून जास्तीची बचत करता येते

अजया's picture

10 Mar 2017 - 2:08 pm | अजया

फारच छान आहे लेख.
पैशाचं झाड _/\_!

इडली डोसा's picture

10 Mar 2017 - 11:59 pm | इडली डोसा

मला वाटतं कि आपल्या गरजा मर्यादेत ठेवल्या आणि उत्पनापेक्षा खर्च कमी असेल तर तुम्ही कोणत्या देशात आहे त्याने फारसा फरक पडु नये.

अमेरीकेत उत्पन्न जास्त तसे खर्चही जास्त अहेतच आणि शिवाय तुम्ही कशा प्रकारची जीवनशैली अंगिकारता यावरही बरचं काही अवलंबुन आहे. लाइफस्टाइल अपग्रेड म्हणजे पगारा बरोबर राहणिमान उंचावणे हे जर करत राहिलं तर कितीही पगार वाढला तरी जस्तीचा पैसा सुधारलेल्या रहणिमानावर खर्च होण्याचा संभव जास्त आहे. (उदा. कमी पगार असताना २ चाकी गाडी वापरणे आणि उत्पन्न वाढल्यावर ४ चाकी घेणे , इथे जास्तीचा पैसा राहणीमान उंचावण्यावर गेला आणि पगार वाढला तरी बचत नाही वाढली.)

लेखन आवडले. झाडाचे चित्र गोड आहे. घरखरेदीबाबत सहमत. दिलेल्या लिंका वाचते.

खुप उप्युक्त लेख आहे हा धन्स धन्स धन्स !!! आनी ते झाडाच चित्र खुप समर्पक आहे :)

थंबरुल: घराच्या किमतीच्या १% किंवा त्यापेक्षा स्वस्तात घर भाड्याने मिळत असेल तर भाड्याच्या घरात रहावे.

अमेरिकेत DRIP, 401(k), Roth 401(k) if available, Roth IRA (if eligible) यांचा उपयोग करून घ्यावा. कॅनडात RRSP, TFSA यांचा उपयोग करून घ्यावा.

लवकर निवृत्त होता येईल का यासाठी FIRECalc आणि early-retirement या साइट्स चांगल्या आहेत.

इडली डोसा's picture

14 Mar 2017 - 10:44 pm | इडली डोसा

यु एस मध्ये 401(k), IRA, Roth IRA मध्ये गुंतवणुक करत होतो. RRSP साठी अजुन eligible झालो नाहिये. TFSA यावर्षी करु आता.

तुम्ही सुचवलेल्या साइट्स चाळल्या आहेत. अजुन डिटेलमध्ये हळू हळू वाचेन.

मितान's picture

13 Mar 2017 - 11:40 am | मितान

उपयुक्त लेख इडो !!!

पण व्यक्त केलेला विचार, या मूळ उद्देशाप्रत : 'आर्थिक स्वावलंबन' हे आपलं अंतिम ध्येय नसून आपल्याला गोष्टी हव्या तेव्हा करता येणं हे आहे. ... कधीही नेऊ शकणार नाही कारण आपल्याला हव्या त्या गोष्टी हव्या तेव्हा करायची वेळ कायम `आता' आहे !

आणि लेखात म्हटलंय : आमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट रक्कम आमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा झाली की आम्हाला नोकरी संदर्भात वेगवेगळे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळेल हे नक्की. आम्ही चाळीशी गाठेपर्यंत, म्हणजे आणखी पाच-सहा वर्षांत हे होईल अशी अपेक्षा आहे.

आणखी पाच/सहा वर्षांनी मन नव्या आणि वाढीव खर्चाची दहशत घालून, भांडवल कमी पडतंय या सबबीखाली पुढची तारीख घ्यायला लावेल.

जोपर्यंत आता आहे त्या आर्थिक परिस्थितीत हवं ते करण्याचं साहस येत नाही तोपर्यंत ते स्वातंत्र्य कधीही मिळू शकत नाही.

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 2:49 pm | संजय क्षीरसागर

आर्थिक स्वावलंबन या `स्वप्नांच्या वाटेवर' कितीही चाललात तरी मुक्काम येणार नाही. कारण स्वातंत्र्याचा अर्थच `कशावरही अवलंबून नसणं' आहे.

उदय's picture

15 Mar 2017 - 4:22 am | उदय

आर्थिक स्वावलंबन या `स्वप्नांच्या वाटेवर' कितीही चाललात तरी मुक्काम येणार नाही. कारण स्वातंत्र्याचा अर्थच `कशावरही अवलंबून नसणं' आहे.

तुमचे लॉजिक गंडले आहे, इतकेच म्हणू शकतो.

संजय क्षीरसागर's picture

15 Mar 2017 - 11:51 am | संजय क्षीरसागर

मिळवलं असेल तर

१) तुमच्या दिनक्रमात सकाळी पहिली गोष्ट काय असते?
२) तुमचे छंद काय आहेत ?
३) तुमचा एकूणात दिनक्रम काय असतो ?
४) अर्थप्राप्तीसाठी दिवसातला किती वेळ तुम्ही व्यतीत करता?
५) दिवसातल्या कोणत्याही वेळी जर एखादं अनपेक्षित आनंदाचं प्रपोजल आलं (उदा. नाटक, सिनेमा, सहल, संगीताचा कार्यक्रम, पत्नी किंवा मित्रांबरोबर जेवायला बाहेर जाणं, एखादं आवडलेलं पुस्तक बिनधास्त वाचत बसणं....वगैरे) तर ते तुम्ही लगेच ऑप्ट करु शकता का?

इडली डोसा's picture

16 Mar 2017 - 12:13 am | इडली डोसा

संजयजी लेख पुन्हा एकदा वाचा. तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही.

संजय क्षीरसागर's picture

16 Mar 2017 - 10:21 am | संजय क्षीरसागर

संजयजी लेख पुन्हा एकदा वाचा. तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही

तुम्ही जे स्वप्नं पाहातायं ते प्रत्यक्षात उतरवलेले माझे अनेक मित्र आणि क्लायंटस आहेत. पण एकालाही अजून मन मानेल तसं जगता येत नाही. ते अजूनही (म्हणजे गेली वीस वर्ष) मलाच विचारतात की तुझ्यासारखं बिनधास्त जगायला नक्की किती पैसे लागतात !

तुम्ही अजून पाच / सहा वर्षांनी याच लूपमधे असाल.

तुम्हाला एकही दिसला नाही, म्हणजे "आर्थिक स्वावलंबन" ही फक्त "स्वप्नांची वाट" होत नाही.

भारतात किती पैसे लागतील ते मला माहीत नाही, पण डॅनियल काहनेमनच्या मतानुसार अमेरिकेत $७५,००० वार्षिक उत्पन्न पुरावेत.
Not having enough money causes emotional pain and unhappiness, the researchers found. But the happiness tipping point is about $75,000 – more money than that doesn't make a person cheerier, though it can help people view their lives as successful or better.

अवांतरः बिहेवियरल इकॉनॉमिक्ससाठी डॅनियल काहनेमन (नोबेल पुरस्कार विजेता, २००२, इकॉनॉमिक्स) याचे Thinking Fast and Slow पुस्तक जरूर वाचावे, अशी शिफारस मी करेन. माझ्यावर ज्या २ पुस्तकांनी प्रचंड इंपॅक्ट केला, त्यापैकी हे दुसरे आहे. पहिले म्हणजे Horse Sense: The Key to Success Is Finding a Horse to Ride. माझ्या मते हे भारतात सहज मिळणार नाही, पण माझी पर्सनल कॉपी मी गेल्यावेळी डॉ.सुबोध खरे यांना खास त्यांच्या मुलांकरिता दिली होती. त्यांना शक्य झाले तर त्यांच्याकडून उधार घेऊन वाचा आणि त्यांना परत करा. :)

संजय क्षीरसागर's picture

16 Mar 2017 - 12:09 pm | संजय क्षीरसागर

भारतात किती पैसे लागतील ते मला माहीत नाही, पण डॅनियल काहनेमनच्या मतानुसार अमेरिकेत $७५,००० वार्षिक उत्पन्न पुरावेत.

डॅनियलच्या म्हणण्याप्रमाणे पुरेसे पैसे नसणं हा इमोशनल पेन आणि दु:ख आहे पण तो स्वतःचच विधान पुढच्या वाक्यात धुळीला मिळवतो : पुरेश्या पैश्यापेक्षा जास्त पैसे असणं माणसाला आनंदी करु शकत नाही आणि नंतर सारवासरवी करायला म्हणतो की आपण यशस्वी झालोत किंवा आपलं बरं चाललंय असं त्या व्यक्तीला वाटू शकतं !

डॅनियलला आनंदी होण्यासाठी पैसा प्राथमिक आहे जे सर्वथा चूक आहे. मनासारखं जगायला तुमच्याकडे पैसा किती आहे यापेक्षा तुमच्यासाठी तो दुय्यम होणं गरजेचं आहे.

तुम्ही अजून पुस्तकंच वाचतांय !

हो आणि मरेपर्यंत वाचणार. तुमच्याकडे पुस्तके वाचायचेपण स्वातंत्र्य नाहीये का? की जगातली सगळी पुस्तके तुमची वाचून झाली आहेत आणि तुमच्याकडे सगळे ज्ञ्यान ऑलरेडी आहे?

उदय's picture

16 Mar 2017 - 4:32 am | उदय

१) दात घासणे
२) काय संबंध?
३) उत्तर २) प्रमाणे
४) ८ तास
५) हो

होय, मी ते स्वातंत्र्य मिळवले आहे. सुखी माणसाचा सदरा हवा असेल तर मी पाठवून द्यायला तयार आहे आणि ते स्वातंत्र्यपण माझ्याकडे आहे.

इडली डोसा's picture

16 Mar 2017 - 5:29 am | इडली डोसा

सुखी माणसाचा सदरा हवा असेल तर मी पाठवून द्यायला तयार आहे आणि ते स्वातंत्र्यपण माझ्याकडे आहे.

आम्हाला पाठवा.

जोक्स आपार्ट, जमल्यास तुमच्या या वाटाचाली बद्दल तुम्हीही लिहा.

प्रश्न :१) तुमच्या दिनक्रमात सकाळी पहिली गोष्ट काय असते?
उत्तर : दात घासणे

शाब्बास ! एकूणात शाब्दिक कोट्या करण्या इतपतच स्वातंत्र्याची मजल दिसते !

प्रश्न : २) तुमचे छंद काय आहेत ?
उत्तर : काय संबंध?

याचा अर्थ तुम्हाला काहीही छंद नसावा. छंदविहीन जगणारा काय घंटा करणार दिवसभरात ?

प्रश्न : ३) तुमचा एकूणात दिनक्रम काय असतो ?
उत्तर : २) प्रमाणे

याचा अर्थ तुमच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही. प्रत्येक दिवस एकसारखा आहे. तुमचा रोजचा दिवस नवे रंग घेऊन येत नाही.

प्रश्न : ४) अर्थप्राप्तीसाठी दिवसातला किती वेळ तुम्ही व्यतीत करता?
उत्तर : ८ तास
मग उरलं काय जगायला ? आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थच तुम्हाला कळलेला नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैसा दुय्यम आहे आणि माझी मर्जी प्रथम आहे.

प्रश्न : ५) दिवसातल्या कोणत्याही वेळी जर एखादं अनपेक्षित आनंदाचं प्रपोजल आलं (उदा. नाटक, सिनेमा, सहल, संगीताचा कार्यक्रम, पत्नी किंवा मित्रांबरोबर जेवायला बाहेर जाणं, एखादं आवडलेलं पुस्तक बिनधास्त वाचत बसणं....वगैरे) तर ते तुम्ही लगेच ऑप्ट करु शकता का?

उत्तर : होय

ही शुद्ध थाप आहे हे तुम्हाला ही आता लक्षात आलं असेल ! रोजचे ८ तास अर्थप्राप्तीत व्यतित करणारी, कोणताही छंद नसणारी व्यक्ती अचानक आलेल्या प्रपोजलचा स्वीकार करण्याचं केवळ स्वप्न पाहू शकेल. प्रत्यक्षात काहीही करु शकणार नाही.

मी ते स्वातंत्र्य मिळवले आहे. सुखी माणसाचा सदरा हवा असेल तर मी पाठवून द्यायला तयार आहे आणि ते स्वातंत्र्यपण माझ्याकडे आहे.

कोण घेणार तुमचा सदरा ? तो तुमच्याकडेच ठेवा !

उदय's picture

16 Mar 2017 - 11:30 am | उदय

Oh, that's interesting!
तुम्ही मला ओळखता का किंवा कधी भेटला आहात का? बरं, तुम्ही स्वतःच्या बाबतीत ही उत्तरं द्याल का?

संजय क्षीरसागर's picture

16 Mar 2017 - 12:29 pm | संजय क्षीरसागर

तुमचा प्रतिसादच पुरेसा बोलका आहे. शिवाय साडे नऊ वर्षांच्या प्रदीर्घ सदस्य कालात तुम्ही लिहीलेले (एकूण) चार लेख तुमचा व्यासंग आणि छंद काय आहेत याची कल्पना देतात.

बरं, तुम्ही स्वतःच्या बाबतीत ही उत्तरं द्याल का?

नक्कीच ! पण पहिल्यांदा तुम्हाला स्वातंत्र्य गवसलेलं नाही हे कबूल कराल तरच .

व्यक्तिगत अ‍ॅटॅकला मी उत्तर देत बसत नाही.
I'm only responsible for what I say, not for what you understand.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आता प्रकरण अंगलट आल्यावर तुमच्याकडे स्वातंत्र्यच नाही हे कबूल करायला अडचण वाटतेयं. इट इज ओके.

होय, मी ते स्वातंत्र्य मिळवले आहे. सुखी माणसाचा सदरा हवा असेल तर मी पाठवून द्यायला तयार आहे आणि ते स्वातंत्र्यपण माझ्याकडे आहे.

हे वाचा. ते माझे मत आहे. का आणि कसे आहे, ते तुम्हाला सांगायला मी बांधील नाही.

कारण तुमच्याकडे उत्तरच नाही !

आठ तास अर्थार्जन म्हणजे दिवसाचा सगळा प्राईम टाइम त्यातच गेला, छंद किंवा व्यासंग लेखनातून व्यक्त होतो पण साडे नऊ वर्षातला व्यासंग काय तर फोटोग्राफीवर केवळ एक लेख. सकाळी उठल्यावर काय करता ? तर म्हणे `दात घासतो!' सुखाची कल्पना काय तर डॅनियल म्हणतो म्हणून $ ७५,००० ची वार्षिक तरतूद ! .....आणि म्हणे `माझ्याकडे सुखी माणसाचा सदरा आहे' ! कुणाच्या कामाचा नाही असला सदरा. ठेवा तुमच्याकडेच.

तुम्हाला मराठी कळत नाही का हो?
तुमची सुखाची कल्पना काय आहे आणि तुम्ही ती कशी अमलात आणताय? इथे मिपावर लेख पाडून आणि काथ्याकूट करून?
काहीही म्हणा, तुमच्याशी निरर्थक वाद घालायला मजा येतेय.

संजय क्षीरसागर's picture

17 Mar 2017 - 11:25 am | संजय क्षीरसागर

लॉजिक गंडलंय लिहीतांना तुम्हाला मराठी वाचता येत होतं ना ? आणि डॅनियलच्या फालतू कल्पनेचा डगला घालून बढाया मारण्यात काही अर्थ नाही. त्यापलिकडे तुमच्या सुखाची कल्पनाच नसेल तर इथेच थांबाल तर बरं.

तुमची सुखाची कल्पना काय आहे आणि तुम्ही ती कशी अमलात आणताय? इथे मिपावर लेख पाडून आणि काथ्याकूट करून?

लेखन अनुभवातून येतं. तरी बरं माझा नेमका लेख तुम्ही नुकताच वाचलांय. ज्याला अनुभवच नाही तो काय लिहीणार कप्पाळ ?

डॅनियलच्या फालतू कल्पनेचा डगला >> तुम्हाला पण नोबेल पुरस्कार मिळालाय काय हो?
माझा नेमका लेख तुम्ही नुकताच वाचलांय. >> तिथे व्यक्तिगत शेरेबाजी हा कांगावा केलात ना, मग आता इथे तुम्ही काय करताय?
तुमची सुखाची कल्पना काय आहे आणि तुम्ही ती कशी अमलात आणताय? >> हे सांगायला तुमची आता दातखीळ का बसली?

म्हणजे मी माझा फुल दिनक्रम देतो हे आधीच सांगितलंय. दातखीळ वगैरेची तर बातच सोडा मला तर लिहायला फार आनंद होईल.

आणि माझं लॉजिक चुकीचं कसं हे सिद्ध करायची जवाबदारी तुमची आहे. जर वर्षाला $ ७५,००० इतकीच तुमची सुखाची कल्पना असेल तर तसं लिहा ! आणि नसेल तर स्वतःची दातखीळ बसली म्हणा.

याचा अर्थ तुम्हाला काहीही छंद नसावा. छंदविहीन जगणारा काय घंटा करणार दिवसभरात ?
याचा अर्थ तुमच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही. प्रत्येक दिवस एकसारखा आहे. तुमचा रोजचा दिवस नवे रंग घेऊन येत नाही.
मग उरलं काय जगायला ? आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थच तुम्हाला कळलेला नाही.
ही शुद्ध थाप आहे हे तुम्हाला ही आता लक्षात आलं असेल !
तुमचा प्रतिसादच पुरेसा बोलका आहे. शिवाय साडे नऊ वर्षांच्या प्रदीर्घ सदस्य कालात तुम्ही लिहीलेले (एकूण) चार लेख तुमचा व्यासंग आणि छंद काय आहेत याची कल्पना देतात.

वरील सर्व वैयक्तिक टीकाटिप्पणी तुम्ही सुरू केली आहे, मी आयुष्यात काय करतो ते शष्प (शब्दअव्हेरः बॅट्या) माहीत नसताना.
तुमची सुखाची कल्पना आणि माझी सुखाची कल्पना वेगळी असू शकते.
मला स्वातंत्र्य नाही, माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काही नाही, हे तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगताय? मग सांगा तुमची सुखाची कल्पना काय आहे आणि तुम्ही ती कशी अमलात आणताय? की तुम्ही सकाळी उठल्यावर सर्वप्रथम दातच घासत नाही?

शाब्दिक कोलांट्याउड्या कशा माराव्यात, याबद्दल तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे, याचा आयुष्यात मला कधीतरी नक्कीच फायदा होऊ शकेल. याबद्दल धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

17 Mar 2017 - 12:14 pm | संजय क्षीरसागर

मला स्वातंत्र्य नाही, माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काही नाही, हे तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगताय?

हे मी ऑलरेडी सांगितलंय !

पण तुम्हाला माझं लॉजिक कसं चुकीचंय ते सांगता येत नाहीये. शिवाय सुख ही कल्पना नाही. ते सर्वांना सारखंच आहे पण तुम्ही डॅनियलचा डगला घातल्यामुळे इतकी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये.

मी ऑलरेडी सांगितलंय. माझं लॉजिक कसं चुकीचंय ते सांगता येत नाहीये.

तुम्ही फक्त सांगितलंय, आता तुमचं लॉजिक बरोबर कसं आहे, ते सिद्ध करा ना. मला काही छंद नाहीत, हे तुम्हाला कसं कळलं?
तुमची गृहितके चुकीची आहेत, त्यामुळे निष्कर्श पण चुकीचाच आहे.

शिवाय सुख ही कल्पना नाही. ते सर्वांना सारखंच आहे. >> सुख सर्वांना सारखंच असतं, हे तुमचे गृहितक आहे की निष्कर्श?

सिलेक्टिव्ह रीडिंग कसे करावे, हे पण तुमच्याकडून शिकतोय. त्याबद्दलही आभार.

संजय क्षीरसागर's picture

17 Mar 2017 - 12:58 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसाद खाली दिला आहे.

पिशी अबोली's picture

24 Mar 2017 - 8:35 pm | पिशी अबोली

दात घासणे हे उत्तर आवडलेलं आहे उदयजी. =))

8 तास अर्थप्राप्तीसाठी घालवले, म्हणजे त्या 8 तासांत नावडतंच काम केलं, असं का वाटावं कुणाला काय माहीत! आवडतं काम, आणि त्यातून अर्थार्जनही सहज शक्य आहे. त्यामुळे तुमच्याकडे सुखी माणसाचा सदरा खरोखर असावा, असं वाटून बरं वाटतंय..

पिशी अबोली's picture

13 Mar 2017 - 2:55 pm | पिशी अबोली

अतिशय सांगोपांग विचार करून अनुभवातून, किचकट विषयावर सोप्या भाषेत लिहिलेला छान लेख.

पिशी अबोली's picture

13 Mar 2017 - 2:55 pm | पिशी अबोली

अतिशय सांगोपांग विचार करून अनुभवातून, किचकट विषयावर सोप्या भाषेत लिहिलेला छान लेख.

कविता१९७८'s picture

14 Mar 2017 - 5:37 pm | कविता१९७८

खुप छान माहीती , छान लेख

इडली डोसा's picture

14 Mar 2017 - 10:45 pm | इडली डोसा

_/\_

अमेरिकन त्रिशंकू's picture

15 Mar 2017 - 2:42 am | अमेरिकन त्रिशंकू

https://www.etf.com/docs/IfYouCan.pdf

Introduction to Personal Finance by William Bernstein for beginners.

ट्रेड मार्क's picture

17 Mar 2017 - 3:20 am | ट्रेड मार्क

तुम्ही सगळ्याच्या लिंका दिल्यात हे अजूनच उत्तम.

यातल्या बऱ्याच गोष्टी मी पण पाळतो म्हणजे वायफळ खर्चावर नियंत्रण, खर्च गरजेचा असेल तरी त्यातल्यात्यात कमी पैश्यात कसं होईल ते बघतो. बऱ्याच गोष्टींवर डील्स मिळतात, तसेच उगाच ब्रँडेड कपडे, बूट आम्ही वापरत नाही. अगदी मुलींना पण तशीच सवय लावली आहे. मी जे काही २-३ लेख मिपावर लिहिले आहेत त्यांचा साधारण रोख थोडे हातपाय मारून कसा फायदा मिळवता येतो त्यावरच आहेत. नेटफ्लिक्सवर एक Minimalism नावाची डॉक्युमेंटरी आहे ती पण चांगली आहे.

आर्थिक नियमन ही गोष्ट मुलांना लहानपणापासूनच शिकवणे आवश्यक आहे. गडबडलेलं नियोजन कसं असतं याचं एक ताजं उदाहरण देतो. नुकतंच आमच्या ओळखीच्या एकाने भारतात परत जायचा निर्णय घेतला. गेले २-३ वर्ष ते दोघेही दोलायमान परिस्थितीतच होते. पण तरीही त्यांनी २ वर्षांपूर्वी नवीन BMW X३ घेतली, नंतर लगेचच घर विकत घेतलं. आता परत जाण्याचा निर्णय घेतला म्हणून $४४-४५००० ला घेतलेली गाडी जवळ जवळ $२८००० ला विकली, घरातल्या सगळ्या वस्तू विकल्या आणि घर पण विकायचा प्रयत्न करत आहेत. याउप्पर कमाल म्हणजे तो म्हणतोय की १ वर्ष जाऊन बघतो जमतंय का ते, नाहीतर मग परत येऊ.

पण माझ्यामते नुसते पैसे वाचवून लवकर रिटायरमेंटचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होणार नाही तर ते पैसे तुम्ही कसे गुंतवता हे पण महत्वाचं आहे.

इडली डोसा's picture

19 Mar 2017 - 8:46 am | इडली डोसा

मिनिमलिस्टचा टेड टॉक बघितला होता पुर्वी आणि त्यांचा ब्लॉगही आहे.