बाकरवडी

वल्लरी's picture
वल्लरी in पाककृती
4 Oct 2008 - 9:10 am

साहित्यः-

बाकरवडी मसाला साठी:-
१ कप सुके खोबरे
१/२ कप शेन्गदाणे
३ चम्चे तीळ
१/२ चम्चा हळ्द
१ चम्चा लाल तिखट
१ चम्चा जिरे
२ चम्चे गरम मसाला
१ चम्चा धणे + जिरे पावडर
१ चम्चा आले लसुण पेस्ट
१/२ कप चिन्चचे दाट पाणी
१ चम्चा साखर
१/२ कप बारिक शेव
बारीक चिरलेली कोथीम्बीर
चवीपुर्ते मीठ

बाकरवडी कवर साठी:-
२ कप मैदा
१/२ चम्चा जिरे
बेकिन्ग सोडा
१ चम्चा तेल
चिमुटभर हळ्द + लाल तिखट
चवीपुर्ते मीठ

कृती:-
१.एका बाऊल मध्ये मैदा+जिरे+बेकिन्ग सोडा+चिमुटभर हळ्द + लाल तिखट आणि तेल कडक्डीत गरम करुन चान्गले मिक्स करावे आणि कोमटपाण्यात पीठ छान मळुन घेणे
२. सुके खोबरे +शेन्गदाणे+तीळ थोडे भाजुन घेऊन बारीक वाटुन घेणे
३.एक पसरट भान्डे गरम करुन त्यात ३ चम्चे तेल घ्यावे नी त्यात जिरे टाकावे,जिरे तडतड्ले कि १ चम्चा आले लसुण पेस्ट,हळ्द,लाल तिखट,बारीक वाट्लेले सुके खोबरे +शेन्गदाणे+तीळ घालुन चान्गले परतुन घेणे
४.आता त्यात गरम मसाला,धणे + जिरे पावडर,साखर,चवीपुर्ते मीठ आणि बारीक चिरलेली कोथीम्बीर घालुन चान्गले मिक्स करावे.
५.मळ्लेल्या पीठाचे ५ /६ भाग करुन आयताकृती लाम्ब पटी लाटुन घेणे
६.आता त्यावर चिन्चचे दाट पाणी सर्व्त्र पसरावे-पातळ थर , त्यावर वरील बाकरवडी मसाला सर्वत्र सारखा पसरवा आणि वरुन बारिक शेव टाका.नि घट्ट ऱोल करा.आता दोन्हि बाजुनी रोल ची टोके थोडे पाणी लाऊन सील करा.
७.आता रोल कापा १ -१ इन्चाचे तुकडे करा नि मन्द आचेवर तळा

बाकरवडी तयार आहे............
टिपः-हवाबन्द ड्ब्यात बाकरवडी ठेवल्यास ती ४-५ कुरकरीत राहाते

प्रतिक्रिया

येडा खवीस's picture

4 Oct 2008 - 9:16 am | येडा खवीस

"भाकरवडी" हाच शब्द आहे का? इतके दिवस मी "बाकरवडी" असंच समजत होतो....चितळेंच्या बोर्डावर पण बाकरवडी असंच लिहिलेले आहे म्हणुन्....आपला एक प्रश्न?

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2008 - 9:42 am | प्रभाकर पेठकर

माझ्या माहिती नुसार 'बाखरवडी' किंवा 'बाकरवडी' असा शब्द आहे. 'बाखर' किंवा 'बाकर' म्हणजे ह्या वडीतील 'सारण'.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

सायली पानसे's picture

6 Oct 2008 - 5:21 pm | सायली पानसे

भाकरवडी म्हणा बाकरवडी खाताना छान लगते ना... मग फरक काय पडतो?
चितळे कडे गेल्यावर बाकरवडी एवजी भाकरवडी मागीतली तर देत नाहित का ते? कि पुणेरी खविस पणे आम्ही भाकरवडी विकत नाही असे सांगतात?
इतका वेळ खर्चुन कोणी तरी इतकी छान receipe लीहिल्यावर त्यात खविस पणे आपला एक प्रश्न ? असे लिहिले आहेस म्हणुन उत्तर द्यावेसे वाटले इतकच.
शेवटी नावात काय आहे.. नाही का?

वल्लरी's picture

6 Oct 2008 - 5:50 pm | वल्लरी

सायली आभारी आहे ,
मी पहिल्यान्दाच रेसीपी पोस्ट केली Type करताना पटकन सम्जले नाहि बाकरवडी एवजी भाकरवडी Type केले ते ,पण सम्जुन घेत्ल्याबद्द्ल Thank you

सायली पानसे's picture

7 Oct 2008 - 1:25 pm | सायली पानसे

अहो अभार कशाला .... तुम्ही इतकी छान receipe दिली आहे आणि त्यात खडुस पणे कोणी तरी असा लिहिले म्हणुन मला त्यान्ना उत्तर द्यावासा वाटला.
मी नक्की करुन बघीन आणि सांगिन तुम्हाला कशी झाली ते.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2008 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते

मी नक्की करुन बघीन आणि सांगिन तुम्हाला कशी झाली ते.

आणि मला बोलाव खायला. नाही तर मी खविस होऊन येईन तुझ्या कडे ;)

बिपिन.

सायली पानसे's picture

12 Oct 2008 - 12:49 pm | सायली पानसे

जरुर ये .....

मदनबाण's picture

4 Oct 2008 - 9:21 am | मदनबाण

मला पण हेच विचारायचे होते..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

ऋषिकेश's picture

4 Oct 2008 - 9:51 am | ऋषिकेश

वा! बाकरवडी! माझा आवडता पदार्थ..
पण कोणाकडेही केलेल्या घरघुती बाकरवड्या अजून आवडलेल्या नाहित

- ऋषिकेश

वल्लरी's picture

4 Oct 2008 - 9:52 am | वल्लरी

चुक सुधारली आहे
बाकरवडी आहे
चुक भुल द्य्यावी,घ्यावी

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 9:42 am | विसोबा खेचर

वा! सुंदर पाकृ...:)

आपला,
तात्या चितळे.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2008 - 12:50 pm | बिपिन कार्यकर्ते

वा! वा!...

बाकरवडी मस्तच... मी सहसा पाकृ वाचत नाही. उगाच त्रास होतो मनाला... नुसतं वाचायचं, खायला तर मिळत नाही इथे... आठवणी जाग्या होतात... :) बाकरवडी नाव बघितले आणि डोकावलो.

बिपिन.

बाकरवडी's picture

3 Feb 2009 - 5:17 pm | बाकरवडी

मी स्वतः ची काय स्तुती करायची

म्हणून काहीच लिहीत नाही
वल्लरी धन्यवाद.........

प्राजु's picture

4 Feb 2009 - 12:51 am | प्राजु

चितेळेंना किती उचक्या लागत असतील हे ती बाकरवडीच जाणे. :)
मस्त रेसिपी. बर्‍यापैकी सोपी वाटते.
बघू कधी जमते ते करायला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समीर गोखले's picture

4 Feb 2009 - 2:05 am | समीर गोखले

हा मुळचा गुजराती पदार्थ आहे का?

प्राजु's picture

4 Feb 2009 - 2:07 am | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

या नावाने हाच पदार्थ चितळ्यांचे नाव असलेल्या वेष्टनात अमेरिकेत मिळतो. या नावाचेसुद्धा चितळ्यांचे पेटन्ट आहे काय?
(स्वीट)बेसनलाडू

प्राजु's picture

4 Feb 2009 - 3:21 am | प्राजु

ते तर त्यांनाच विचारावं लागेल. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चिरोटा's picture

17 Apr 2009 - 12:07 pm | चिरोटा

आणि ते पण (सोमवार ते शनिवार)सकाळी ९ ते १२ किंवा संध्याकाळी ३ ते ६ ह्या वेळेतच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

शाहरुख's picture

4 Feb 2009 - 3:10 am | शाहरुख

बाकरवडीचा शोध चितळ्यानं लावला की काय ?? (एकारांती आडनावे "एकेरी" करायला अंमळ मजा येते )

काजुकतली's picture

17 Apr 2009 - 11:26 am | काजुकतली

खुप आभार अशी मस्त रेसिपी दिल्याबद्दल..

एक प्रश्न - तळताना बाकर बाहेर येत नाही काय?? की खुप घट्ट वळल्यामुळे आत अडकुन राहते??