बाकरवडी
साहित्यः-
बाकरवडी मसाला साठी:-
१ कप सुके खोबरे
१/२ कप शेन्गदाणे
३ चम्चे तीळ
१/२ चम्चा हळ्द
१ चम्चा लाल तिखट
१ चम्चा जिरे
२ चम्चे गरम मसाला
१ चम्चा धणे + जिरे पावडर
१ चम्चा आले लसुण पेस्ट
१/२ कप चिन्चचे दाट पाणी
१ चम्चा साखर
१/२ कप बारिक शेव
बारीक चिरलेली कोथीम्बीर
चवीपुर्ते मीठ
बाकरवडी कवर साठी:-
२ कप मैदा
१/२ चम्चा जिरे
बेकिन्ग सोडा
१ चम्चा तेल
चिमुटभर हळ्द + लाल तिखट
चवीपुर्ते मीठ
कृती:-
१.एका बाऊल मध्ये मैदा+जिरे+बेकिन्ग सोडा+चिमुटभर हळ्द + लाल तिखट आणि तेल कडक्डीत गरम करुन चान्गले मिक्स करावे आणि कोमटपाण्यात पीठ छान मळुन घेणे
२. सुके खोबरे +शेन्गदाणे+तीळ थोडे भाजुन घेऊन बारीक वाटुन घेणे
३.एक पसरट भान्डे गरम करुन त्यात ३ चम्चे तेल घ्यावे नी त्यात जिरे टाकावे,जिरे तडतड्ले कि १ चम्चा आले लसुण पेस्ट,हळ्द,लाल तिखट,बारीक वाट्लेले सुके खोबरे +शेन्गदाणे+तीळ घालुन चान्गले परतुन घेणे
४.आता त्यात गरम मसाला,धणे + जिरे पावडर,साखर,चवीपुर्ते मीठ आणि बारीक चिरलेली कोथीम्बीर घालुन चान्गले मिक्स करावे.
५.मळ्लेल्या पीठाचे ५ /६ भाग करुन आयताकृती लाम्ब पटी लाटुन घेणे
६.आता त्यावर चिन्चचे दाट पाणी सर्व्त्र पसरावे-पातळ थर , त्यावर वरील बाकरवडी मसाला सर्वत्र सारखा पसरवा आणि वरुन बारिक शेव टाका.नि घट्ट ऱोल करा.आता दोन्हि बाजुनी रोल ची टोके थोडे पाणी लाऊन सील करा.
७.आता रोल कापा १ -१ इन्चाचे तुकडे करा नि मन्द आचेवर तळा
बाकरवडी तयार आहे............
टिपः-हवाबन्द ड्ब्यात बाकरवडी ठेवल्यास ती ४-५ कुरकरीत राहाते
वाचने
18158
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
"भाकरवडी"
In reply to "भाकरवडी" by येडा खवीस
माझ्या मते..
In reply to "भाकरवडी" by येडा खवीस
भाकरवडी
In reply to भाकरवडी by सायली पानसे
आभारी आहे
In reply to आभारी आहे by वल्लरी
:-)
In reply to :-) by सायली पानसे
मला बोलाव...
In reply to मला बोलाव... by बिपिन कार्यकर्ते
नक्की
+१
बाकरवडी
चुक
वा! सुंदर
वा!
मी स्वतः
खूप आवडते.
बाकरवडी
In reply to बाकरवडी by समीर गोखले
ते चितळेंचं पेटंट आहे..
In reply to ते चितळेंचं पेटंट आहे.. by प्राजु
क्रिस्पी स्पाइसी स्प्रिंग रोल्स
In reply to क्रिस्पी स्पाइसी स्प्रिंग रोल्स by बेसनलाडू
हे मी कसं सांगणार?
In reply to हे मी कसं सांगणार? by प्राजु
आणि
In reply to ते चितळेंचं पेटंट आहे.. by प्राजु
बाकरवडीचा
मस्त रेसिपी..