शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पाऊलखुणा?

बरखा's picture
बरखा in जनातलं, मनातलं
10 Feb 2017 - 6:42 am

aa

'आज महीना होऊन गेला आमच्या भेटीला'. तिचा फोनही बंद आहे. तिच्या मर्जी शिवाय तिच्या घरी जायचे नाही अशी ताकीद आहे.
काय करावे कळत नाहीये ? मी मात्र रोज ठरल्यावेळी ईथे येतो, समुद्रकिनारी तासन तास तिची वाट बघतो.
आज अचानक ती आली! बराच वेळ काहीच बोलत न्हवती. मी फक्त तिच्याकडे बघत होतो.
मन एकदम गत आठवणीत गेल. 'किनार्‍यावर उमटलेल्या आमच्या पाऊलखुणांना पाण्याचा स्पर्श होईपर्यन्त आम्ही गप्पा मारायचो.'
"मला विसरून जा, परत कधीही न भेटण्यासाठी", एवढच बोलून ती निघुन गेली.
मी भानावर आलो. जाताना तिच्या नेहमीच्या पाउलखुणा उमटल्या न्हवत्या ; आता कधीच त्या उमटणार नाहीत.
एव्हाना ती व्हिलचेअरवरून माझ्यापासुन दूर गेली होती.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

10 Feb 2017 - 11:19 am | मराठी कथालेखक

आवडली