जादूचं घर

अमलताश_'s picture
अमलताश_ in जनातलं, मनातलं
6 Feb 2017 - 4:11 pm

माझ्या घरात कौलारू छपरातून एक तिरीप यायची. जमिनीवर निट वर्तुळ काढणारी. आणि तिच्यात असंख्य रंगीबेरंगी पऱ्या रहायाच्या. घराला माळा होता. त्यावर जुनी पुस्तकं , नारळ , भांडी, ट्रंका असं काहिही शोधताना खजिन्याचा मालक असल्या सारखं वाटायचं . लपाछपी च्या खेळात सतत जिंकवण्या साठी असंख्य जागा अपोआप तयार व्हायच्या . फटाक्यांची पिशवी अडकवायला फक्त ताई चाच हात पोचेल असा मोठा खिळा होता . चौकात आंधळी कोशिंबीर कितीही मुलं खेळू शकतील एवढी जागा होती. पडवी वरच्या सोप्या सारखा सुबक सोपा मी कुठेही बघितला नाही आणि पडवी वरच्या रांगोळी सारखी रांगोळी कधीही कुठेच सजली नाही . घरात खूप कोनाडे होते. त्यातले बहुतेक सगळेच गूढ दिसायचे . काहीतरी लपवून ठेवल्यासारखे . फुलं , उदबत्ती आणि चुलीतल्या जाळ णा चा एकत्र गूढ वास यायचा . पावसात कौलांवर मैफिल वाजायची . पाऊस इतर सर्वां सारखाच आपुलकीने घरात हि यायचा . त्या घरात काहीतरी जादू होती . जादूचं ते घर एवढ्या सहज कसं काय पडलं काय माहित .

पण त्या बरोबर जगातली सर्वात सुंदर पडवी , सर्वात मायाळू भिंत , विचित्र गुढ कोनाडे , ओल्या मातीचा वर्ष भर येणारा वास, पऱ्यांची तिरीप, खजिना , सगळंच गेलं . आता पऱ्या चं घर फक्त स्वप्नात . आणि सारवलेल्या मातीचा आणि ओल्या भिंतीचा वास… आठवणीत . फक्त

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Feb 2017 - 4:49 pm | पैसा

छान लिहिलंय

सानझरी's picture

6 Feb 2017 - 4:55 pm | सानझरी

+१

अमलताश_'s picture

7 Feb 2017 - 4:40 pm | अमलताश_

धन्यवाद . मी पा वरील पहिलं लिखाण केलंय. प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटलं. लिहीत राहीन.

खूप छान! आणखी वाचावेसे वाटत होते.

अमलताश_'s picture

7 Feb 2017 - 4:41 pm | अमलताश_

धन्यवाद . मी पा वरील पहिलं लिखाण केलंय. प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटलं. लिहीत राहीन.

कंजूस's picture

6 Feb 2017 - 5:27 pm | कंजूस

हम्म।

आताच मी माझ्या गावातील जुन्या घराची फरशी बदलली आणि रंग रंगोटी केली. एवढा खर्च केला पण मजा येत नाहीए त्या घराला पाहून.

छान लिहलंय, ते पण नेमकं अश्यावेळी वाचायला मिळाले जेव्हा माझ्या घराच्या नव्या लूक ला पाहून भावनांचा कललोळ दाटलं होतं.

धन्यवाद . आमचं घर मोडून नवीन घर बांधायला घेतलंय. खूपच इमोशनल क्षण होता.

उगा काहितरीच's picture

6 Feb 2017 - 7:51 pm | उगा काहितरीच

हळवं केलत राव ! मस्त लिहीलय एकदम !

फार सुंदर लिहिलंय. थोडं अजून असायला पाहिजे होतं.

अमलताश_'s picture

7 Feb 2017 - 4:41 pm | अमलताश_

धन्यवाद . मी पा वरील पहिलं लिखाण केलंय. प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटलं. लिहीत राहीन.

sagarpdy's picture

7 Feb 2017 - 10:14 am | sagarpdy

गावच्या जुन्या घराची आठवण झाली.