३० मार्च २०१७: हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्डमध्ये विशेष लगबग होती. अॅन्टी करप्शनच्या मोहिते साहेबांना घरी सोडण्यात येणार होतं. ऑक्टोबर महिन्यात जीवघेण्या अपघातानंतर ते कोमात होते ते काल शुद्धीवर आले. त्यांची अर्धशिक्षित बायको, आई आणि अ॑ठरा वर्षांचा मुलगा किशोर आनंदात होते. साहेबांच्या अपघातानंतर किशोरने मोठं होत घर सांभाळल होतं.
काउंटरवर जाण्यापुर्वी रुममध्येच किशोर खिशातून पैसे काढून मोजू लागला.
"हे काय आहे ? या कोणत्या नोटा आल्या बाजारात ?" साहेबांनी विचारलं.
किशोरने त्यांना मोदींनी केलेले निश्चलनीकरण, काळ्यापैशाविरुद्ध लढाई वगैरे सगळं भरभरुन सांगितलं.
किशोरला माहित नसलेले , घरात लपवलेले आठ कोटी रुपये साहेबांच्या डोळ्यासमोर चमकले आणि साहेब कोसळले.
ऑक्टोबरमध्ये हुकलेले यश मृत्यूने मार्चमध्ये मिळवले.
वाचने
8359
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
अजून पंची होऊ शकली असती!!
मस्तं !
कल्पना उत्तम! आवडली!
हाहा खरच भारी आहे ही कथा अस
येक नंबर!
भारी !
मस्तच
कल्पना चान्गली आहे, अजून
मस्त
आवडली!
भारीये :)
खूप मस्त..
जे ब्बात!! आवडलीच
बेश्ट
मस्त !! +१
छान +१००
छान
मस्त आहे.
कथा आवडली.
आवडली.
मस्त !!
मस्त ...
+१ भन्नाट !
आयला..
चांगली आहे!!
हा हा मस्त
हा हा मस्त
खूप भारी