धनंजय महाराज मोरे -व्यक्ति परिचय

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
22 Jan 2017 - 1:55 pm

विकिपीडियाचे नवीन माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत ग्रामीण क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते.

असाच एक स्वतः बद्दलचा लेख नवे मराठी विकिपीडियन धनंजय महाराज मोरे यांनी स्वतः बद्दल लिहिला. ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बद्दल स्वतंत्र स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत ती माहिती मिसळपाव डॉट कॉमवर स्थानांतरीत करीत आहे.

२० जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक कार्यशाळा झाली. (प्रा.डॉ. दिलीप बिरुटेसर विषयतज्ञ होते) २० जानेवारी धनंजय महाराज मोरे यांची विकिपीडिया वर्कशॉप अटेंडकरण्याची जिद्द एवढी कि १९ तारखेस रात्री भंडारा जिल्ह्यतील कोणत्याश्या खेड्यात त्यांचे किर्तन होते ते आटोपून रातोरात प्रवास करुन सकाळी औरंगाबादेतील कार्यशाळेस त्यांनी हजेरी लावली. असो. त्यांचा परिचय त्यांच्याच शब्दात :

dhanajaya maharaj more kirtankar
''धनंजय महाराज मोरे''' यांचा जन्म १८/०७/१९७४ ला मांगवाडी (मंगलवाडी) ता. [[रिसोड]] जिल्हा [[वाशिम]] (विदर्भ) येथे [[वारकरी संप्रदाय|वारकरी]] घराण्यात विश्वासराव रामराव [[मोरे]] यांच्या पोटी एकूण ६ भावंडा पैकी ३ ऱ्या नंबर ला झाला. मांगवाडी हे गांव रामायणातील शबरीचे गुरु मातंग /मतंग ऋषी चे ठिकाण म्हणून मानण्यात येते.
[[चित्र:धनंजय_महाराज_मोरे.jpg|thumb|धनंजय_महाराज_मोरे.jpg]]
गावामध्ये हनुमंताचे मंदिर असून तेथे दररोज सकाळी ५ ते ६ काकडा ६:१५ ला आरती व सायंकाळी हरिपाठ म्हटला जातो. दर पंधरा दिवसाला एकादशीचा जागर व सकाळी अन्नदान व्दादशी चे पारणे होते.

अश्या मांगवाडी गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्म गांवी मांगवाडी (मंगलवाडी) येथे झाले.

== शालेय शिक्षण ==
प्राथमिक शिक्षणा नंतर पुढील शिक्षण जन्म गांव मांगवाडी (मंगलवाडी) येथून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भारत माध्यमिक शाळा रिसोड ता. रिसोड जिल्हा वाशीम येथील येथे झाले.

== श्री क्षेत्र आळंदी येथे गमन ==
आणि १९८६ ला श्री वै. सोपानकाका टाले खुडज कर यांच्यागावी खुडज ता. सेनगाव जिल्हा हिंगोली येथे वारकरी शिबीर झाले त्यात १ एक महिना [[वारकरी संप्रदाय|वारकरी]] संप्रदायाची दिशा समजण्यास वाव मिळाला.

पुढे १९८९ ला श्री वै. सोपानकाका टाले खुडज कर यांच्या सांगण्यावरून [[कार्तिक]] महिन्यात आळंदी येथे श्री संत [[ज्ञानेश्वर]] महाराज संजीवन समाधी सोहळा यात्रेत वडील विश्वासराव रामराव मोरे यांनी गावचे लोक श्रीराम जाधव साहेब, लक्ष्मण पौळ इत्यादी सोबत [[आळंदी]] येथे वारकरी सांप्रदायिक शिक्षणासाठी पाठविले.

आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे विनामुल्य राहण्याची सोय श्री वै. सोपानकाका टाले खुडजकर यांनी करून दिली.अश्याप्रकारे १९८९ ला आळंदी येथे वारकरी सांप्रदायिक शिक्षण सुरु झाले.

गुरु जवळ असताना अनेक गुरुबंधूंचा सहवास प्राप्त झाला.

== आध्यात्मिक शिक्षणाची सुरवात ==
आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे राहत असताना गुरु गृही अनेक प्रकारची सेवा केली, जास्व, झाडांना पाणी देणे, धर्मशाळेची झाडझूड करणे, गुरूंचे कपडे धुणे, गुरूंचे अंग दाबने, गुरुसाठी भोजन बनविणे, आलेल्या अतिथींची अन्न पाण्याची व्यवस्था करणे, इत्यादी कामे गुरूगृही करत असताना मृदंगाच्या शिक्षणासाठी वै. गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्द यांच्याकडे रितशीर (वर्ग) क्लास लावून मृदंगाचे विधिवत शिक्षण १९९० ते १९९२ पर्यंत केले.

त्या नंतर वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) यांच्या संस्थेत १९९२ प्रवेश परीक्षा १०० पैकी ९७ मार्क घेऊन पास झाले. आणि याप्रमाणे संस्थेचा अभ्यास सुरु झाला.१९९३ ला वारकरी शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सव आळंदीला फार मोठ्या उत्साहात संपन्न झाला तेथे सुद्धा सक्रीय सेवा केली.

==तीर्थयात्रा ==
आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे राहत असताना १९९२ ला पहिल्यांदा तीर्थयात्रा करण्याचा योग आला.

== कार्य ==
dhanajaya maharaj more kirtankar
आधुनिक टेक्नोलॉजी चा उपयोग करून अनेक धार्मिक सॉफ्टवेअर ची निर्मिती केली आहे.
# वारकरी भजनी मालिका PDF फाईल >>. [https://drive.google.com/open?id=0B_b_vSokDvswdG9vajdMXzJ6WXM येथून डाऊनलोड करा]
# वारकरी भजनी मालिका अँड्रॉइड aap ची निर्मिती >> [https://drive.google.com/file/d/0B_b_vSokDvswdkE5U25KMXJKaU0/view?usp=sh... येथून डाऊनलोड करा]
# AMACHI MANGWADI APP >> [https://drive.google.com/file/d/0B_b_vSokDvswQVg2amcwOVg1cWc/view?usp=sh... येथून डाऊनलोड करा]
# वारकरी संत चरित्र निर्मिती
# वारकरी संत चरित्र निर्मिती
# संत तुकाराम अभंग गाथा निर्मिती अँड्रॉइड APP

जन्म 0८/०७/१९७४
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे मोरे महाराज. डिजिटल महाराज. धनु महाराज
नागरिकत्व भारतीय
शिक्षण B.A./D.J./D.I.T. मृदंग वादन, किर्तन, प्रवचन. भागवत कथा.
पेशा किर्तन, भागवत, प्रवचन.
ख्याती कीर्तन
धर्म हिंदू
जोडीदार सुनीताबाई धनंजय मोरे (B.A./L.T.C.)
अपत्ये ३
वडील विश्वासराव रामराव मोरे

संस्कृतीधर्म

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2017 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला मराठी विकिपीड़ियावर अहवाल लिहायचा आहे आणि इथेही वृत्तांत लिहायचा आहे.

धनंजय मोरे यांना कार्यशालेत ते विद्यार्थी नसल्यामुळे कसा त्यांचा प्रवेश रोखला पासून ते त्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांची मनोगते. लवकरच लिहितो. (मराठी विकिपीड़ियावर)

आपलेही मन:पूर्वक आभार. आपल्यामुळेच मला विद्यार्थ्यासाठी मराठी विकिपीड़ियाबद्दलची जागृती कार्यशाळा घेता आली. चांगला अनुभव होता.

-दिलीप बिरुटे

आपण आमंत्रण स्विकारलेत या बद्दल खूप खूप आभार, आणि मी स्वतः इच्छा असूनही उपस्थित राहू शकलो नाही या बद्दल क्षमस्व. वृतांत वाचण्यास नक्कीच आवडेल.

धनंजय मोरे यांना कार्यशालेत ते विद्यार्थी नसल्यामुळे कसा त्यांचा प्रवेश रोखला

ह्म्म त्यांना अडचण आली हे माहित नव्हते, प्रशासकी त्यांना प्रवेश मिळण्यास काही एक अडचण येणे स्वाभाविक होते, मी एच ओ डी सरांना कल्पना देऊन ठेवलेली होती किंबहूना एच ओ डी सरांचा विषयही संत साहित्य असल्याचे लक्ष्यात आल्यामुळेच धनंजय मोरेंची मराठी विकिपीडियावरील विनंती एच ओ डी सरांना कळवली होती. आंतरजालावर मराठी लिहिता येणार्‍यांची वानवा असताना धनंजय मोरेंकडून एच ओ डी सरांच्या रुचीच्या विषयावर काही लेखन घडून येऊ शकले तर पहावे असाही विचार होता. अर्थात पुढे काय झाले कल्पना नाही. आपण वृत्तांतात लिहीणारच आहात तस्मात प्रतिक्षा.