विंगेत गलबला - अप्सरेचा पदन्यास - अर्चना जोगळेकर

रोशनी's picture
रोशनी in लेखमाला
18 Jan 2017 - 7:16 am

*/

अर्चना जोगळेकर! मराठी चित्रपट सृष्टीतलं आणि कथ्थकच्या जगतातलं एक वलयांकित नाव.

त्या गेले अनेक वर्ष न्यू जर्सी मध्ये राहत असून, "अर्चना नृत्यालय" चालवत आहेत.

त्या हो म्हणतील असं खरं तर वाटलंच नव्हतं. एवढी मोठी व्यक्ती आपल्या लहानशा उपक्रमाला कशाला वेळ देईल असंही वाटलं. पण प्रत्यक्षात मात्र त्या अत्यंत गोड आहेत! अर्थात आम्ही मुलाखत घेताना प्रचंड घाबरलेलो होतोच! पण त्या अगदी भरभरून बोलल्या.

आमच्या सोबत माझं पिलूही सोबत होतं. तिला "गप्प बसून राहा" ही गयावया करून केलेली विनंती सुद्धा तिच्यासाठी खूप धक्कादायक होती. तिने ५ व्या मिनिटाला किरकिर सुरू केली. ३ वेळा मुलाखत थांबवावी लागली. आम्हीच खूप टेन्शनमध्ये आलो पण अर्चना अगदी शांत होत्या. आणि अगदी सहजतेने पुन्हा सुरुवात करत होत्या.

कॅमेरा, अँगल, फ्रेम..सगळं सेट करण्यापासून ते पिलूला चॉकोलेट आणि फुगा देईपर्यंत... प्रत्येक क्षणी आम्ही थक्क होत होतो इतक्या त्या साध्या आहेत. आपला "स्टारडम" कुठेही त्या जाणवू देत नाहीत.
ही मुलाखत घेणं हा खूप छान अनुभव होता.

अर्चना ह्यांचे मनापासून आभार!

कॅमेरावरः रोशनी
मुलाखतकारः पिलीयन रायडर

प्रतिक्रिया

लाल टोपी's picture

18 Jan 2017 - 9:04 am | लाल टोपी

छान मुलाखत ओघावत्या भाषेत आणि उत्तम मराठीत साधलेला संवाद खूप आवडला.

कसल्या भारी दिसतायेत त्या अजुनही मस्त मस्त मस्त !

सामान्य वाचक's picture

18 Jan 2017 - 9:57 am | सामान्य वाचक

अर्चना जोगलेकरांना निवडुंग आणि खिचडी या सिनेमात पाहिले होते,

सुंदर चेहरा, सुंदर केस आणि सुंदर नाच.

माझी अत्यंत आवडती अभिनेत्री.

अर्चना जोगळेकर सुंदर चेहरा आणि नृत्य यामुळे कायम लक्शात रहातात.छान झालिये मुलाखत.

सस्नेह's picture

18 Jan 2017 - 12:59 pm | सस्नेह

अस्सल सौंदर्यवती आणि गुणी अभिनेत्रीची प्रांजळ मुलाखत आवडली !

स्वीट टॉकर's picture

18 Jan 2017 - 1:46 pm | स्वीट टॉकर

रोशनी आणि पिलियन रायडर,
तुम्हा दोघींचं अभिनंदन

सही मुलाखत!

व्वाह्ह..!! अभिनंदन रोशनी आणि पिरा.

पद्मावति's picture

18 Jan 2017 - 3:11 pm | पद्मावति
पद्मावति's picture

18 Jan 2017 - 3:11 pm | पद्मावति

खूप सुंदर मुलाखत. मनमोकळी आणि ओघवत्या भाषेत बोलणं.
सौंदर्य, कला आणि वाकचातुर्य याचा सुंदर मिलाफ _^_

psajid's picture

18 Jan 2017 - 3:34 pm | psajid

अजून एक त्यांचा "राणीनं डाव जिंकला" हा अतिशय छान चित्रपट होता. त्यातील 'गगनाचा छायेखाली घर हे आपुले छान' हे अवीट गोडीचे गीत खूप सुंदर होते

आदूबाळ's picture

18 Jan 2017 - 4:08 pm | आदूबाळ

मस्त मुलाखत! मध्येच आवाज कमीजास्त होतोय का माझ्या मोबाईलचा लाडिक चाळा आहे?

विशाखा राऊत's picture

18 Jan 2017 - 4:15 pm | विशाखा राऊत

मनमोकळ्या गप्पा खुप आवडल्या

खटपट्या's picture

18 Jan 2017 - 4:27 pm | खटपट्या

खूप सुंदर. चीरतरुण आहेत.

रच्याकने - प्र्श्नकर्त्या कोण आहेत?

राघवेंद्र's picture

18 Jan 2017 - 10:22 pm | राघवेंद्र

रच्याकने - प्र्श्नकर्त्या कोण आहेत?

हा प्रश्न विचारल्याने, खटपट्या भाऊ तुम्ही तुमचे सदस्यत्व धोक्यात आणले आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jan 2017 - 9:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम !

पिरा, खूप सुंदर मुलाखत घेतली आहे.

मुलाखत आवडली अर्चना जोगळेकर यांचे अमेरिकेतील कार्य नव्यानेच कळले. खूप धन्यवाद !!!!
लवकरच सिनेमा क्षेत्रातील त्यांचे स्वप्न आम्हाला पाहण्यास मिळो.

अनरँडम's picture

18 Jan 2017 - 11:26 pm | अनरँडम

मी फक्त पहिला भाग पाहिला. (त्यानंतर आवाज अचानक कमी झाला.) अर्चना जोगळेकरांचा फक्त 'निवडुंग' हा एकच चित्रपट आठवतो. त्यांच्या बोलण्यात अमेरिकेत राहत असूनही इंग्रजी शब्द/ वाक्यं क्वचितच आढळली. हे विशेष आवडले.

पिलीयन रायडर's picture

19 Jan 2017 - 11:19 am | पिलीयन रायडर

हे आवाजाचं काय झालंय ते पहाते. थोडा वेळ लागेल फक्त..

कौशी's picture

19 Jan 2017 - 3:58 am | कौशी

छान मुलाखत....पिरा आणि रोशनी अभिनंद्न.

चौकटराजा's picture

19 Jan 2017 - 8:35 am | चौकटराजा

चिन्चवड येथे अर्चना यांचा बहारदार कार्यक्रम झाला होता. काही परिचय नसतानाही त्यांच्या आई यांच्याशी थोडी बातचित झाली होती. त्यानी मला आडनांव विचारल्यावर मी सांगितले तसे त्यांचा प्रश्न आला " आपल्यात कोणी चांगला मुलगा अर्चनासाठी असल्यास सांगा !" मी हसलो. मनात म्हटले हिच्यासाठी पोरांच्या उड्या पडतील हो !

ज्योति अळवणी's picture

19 Jan 2017 - 9:27 am | ज्योति अळवणी

गेल्या वर्षी त्यांचा performsnce बघण्याचा योग आला होता. अजूनही अप्रतिम नृत्य करतात त्या. ह्या मुलाखती मधून त्यांच्याबद्दल अजूनही बरेच काही कळले

मुलाखत खास आहे. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे अतिशय नितळ मराठीत संवाद साधल्याने छान वाटले.

मुलाखत खास आहे. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे अतिशय नितळ मराठीत संवाद साधल्याने छान वाटले.

चैत्रबन's picture

19 Jan 2017 - 4:45 pm | चैत्रबन

पिरा व रोशनी चे अभिनंदन..

सुंदर मुलाखत !! बुद्ध गयेतला किस्सा आवडला. अशा शेलक्या प्रतिक्रिया देणारी एक दोन शिक्षक मंडळी आठवली.

नित्य नुतन's picture

20 Jan 2017 - 1:22 pm | नित्य नुतन

मस्त झालीय मुलाखत...त्यांचे अमेरिकेतील कार्य प्रथमच कळले..
आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी असल्याने विशेष ओढ वाटते त्यांच्याबद्दल ...
मुख्य म्हणजे त्यांचा attitude प्रचंड भावला...
पिरा ... अमेरिकेत जाऊन तू इतक्या भराभर इतकं छान काम करतेस... खूप कौतुक आहे तुझं. धन्यवाद !!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Jan 2017 - 1:27 pm | भाग्यश्री कुलकर्णी

घरी जाऊन ऐकते. पिरा,रोशनी मस्त. मेजवानीच की ही आम्हाला.

रातराणी's picture

20 Jan 2017 - 11:59 pm | रातराणी

सुंदर मुलाखत! अर्चना नृत्यालयास अनेक शुभेच्छा!

गामा पैलवान's picture

21 Jan 2017 - 2:49 am | गामा पैलवान

रोशनी आणि पिरा,

मुलाखत उत्तम झालीये. अर्चनाताई स्वभावाने साध्या व मनमिळाऊ आहेत हे इतरांकडूनही ऐकून आहे.

आ.न.,
-गा.पै.

रेवती's picture

21 Jan 2017 - 5:20 am | रेवती

मुलाखत आवडली.

सुंदर व्यक्तिमत्वाची सुंदर मुलाखत ! :)
माझ्या आवडत्या मराठी अभिनेत्रीं पैकी एक... मुलाखतीत सांगीतलेली त्यांची मैत्रिण माझी मराठीतील सर्वात आवडती अभिनेत्री आहे:)
हा चेहरा आणि अभिनय मला संसार चित्रपटात भावला... तर सर्वप्रथम यांचे सौंदर्भ लक्षात आले ते रावळगावच्या पानपसंद या टॉफीच्या त्यांनी केलेल्या जाहिरातीतुन:) शादी और तुमसे ? कभी नही ! हा संवाद त्याकाळी बराच लोकप्रिय झाला होता. :) त्यांच्या कथ्थक मधलं योगदान मला थोड्याफार प्रमाणात ठावूक आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माशा अल्लाह माशा अल्लाह :- Asmara { اسمرا - ماشالله } { वरिजिनल ;) }

पद्मावति's picture

21 Jan 2017 - 6:32 pm | पद्मावति

तर सर्वप्रथम यांचे सौंदर्भ लक्षात आले ते रावळगावच्या पानपसंद या टॉफीच्या त्यांनी केलेल्या जाहिरातीतुन:) शादी और तुमसे ? कभी नही ! हा संवाद त्याकाळी बराच लोकप्रिय झाला होता.

+१००००००

केव्हा तरी पहाटे मध्ये किती म्हणजे किती सुरेख दिसते अर्चना..

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2017 - 9:09 pm | पिलीयन रायडर

अत्यंत सुरेख अनुभव होता हा! अर्चनाताई इतक्या मोकळ्या सभावाच्या आहेत की एक दोनदा तर त्यांनी अगदी हक्कानी "गाडी का चालवता येत नाही तुला??" म्हणुन झापलं सुद्धा! पण अर्थात त्यांच्या समोर आम्ही मात्र कायम खुप दडपणाखाली होतो. कितीही नाही म्हणलं तरी एवढ्या मोठया कलाकारासमोर ताण येतोच. हा एक अत्यंत अ‍ॅम्बिशियस प्लान होता ह्या उपक्रमातला. एकतर काही ओळकह नाही, निव्वळ आमच्या एका मेल वर त्या हो म्हणाल्या. (अर्थात मेल्स फार कन्व्हिक्शनने लिहीले होते मी आणि स्रुजाने!) शिवाय काही ना काही कारणाने ही मुलाखत पुढे ढकलल्या जात होती. मुलाखतीच्या दिवशी ट्रेन्मध्ये बसल्यावर त्यांचा मेसेज आला की आत्ता मी बाहेर जातेय येऊ नकोस. म्हणलं अहो निघालेय मी! अखेर ४-५ तास रोशनी कडे वाट बघत बसलो, पण मुलाखत मात्र घेतलीच! जे काही घोळ झालेत ते मी मध्येच प्रश्नच विसरले किंवा पिल्लु थोडं झोपेला आलं म्हणून चिडचिड करत होतं म्हणुन.. अर्चनाताई बोलायला लागल्या की मात्र सलग उत्तम शुट व्हायचं.

बरं हे सगळं कमी होतं म्हणून की काय पण त्यांनी केलेलं पेंटींग पाहुन तर आम्ही थक्क झालो. शेवटी मी तर त्यांना म्हणलं न रहावुन.. की ये बहोत नाईन्साफी है! देव देतो तर सगळं काही एकालाच का देतो?!

आयुष्यातल एक मस्त अनुभव मिळाला!!