विंगेत गलबला - अप्सरेचा पदन्यास - अर्चना जोगळेकर
अर्चना जोगळेकर! मराठी चित्रपट सृष्टीतलं आणि कथ्थकच्या जगतातलं एक वलयांकित नाव. त्या गेले अनेक वर्ष न्यू जर्सी मध्ये राहत असून, "अर्चना नृत्यालय" चालवत आहेत. त्या हो म्हणतील असं खरं तर वाटलंच नव्हतं. एवढी मोठी व्यक्ती आपल्या लहानशा उपक्रमाला कशाला वेळ देईल असंही वाटलं. पण प्रत्यक्षात मात्र त्या अत्यंत गोड आहेत! अर्थात आम्ही मुलाखत घेताना प्रचंड घाबरलेलो होतोच! पण त्या अगदी भरभरून बोलल्या. आमच्या सोबत माझं पिलूही सोबत होतं. तिला "गप्प बसून राहा" ही गयावया करून केलेली विनंती सुद्धा तिच्यासाठी खूप धक्कादायक होती. तिने ५ व्या मिनिटाला किरकिर सुरू केली. ३ वेळा मुलाखत थांबवावी लागली. आम्हीच खूप टेन्शनमध्ये आलो पण अर्चना अगदी शांत होत्या. आणि अगदी सहजतेने पुन्हा सुरुवात करत होत्या. कॅमेरा, अँगल, फ्रेम..सगळं सेट करण्यापासून ते पिलूला चॉकोलेट आणि फुगा देईपर्यंत... प्रत्येक क्षणी आम्ही थक्क होत होतो इतक्या त्या साध्या आहेत. आपला "स्टारडम" कुठेही त्या जाणवू देत नाहीत. ही मुलाखत घेणं हा खूप छान अनुभव होता. अर्चना ह्यांचे मनापासून आभार! कॅमेरावरः रोशनी मुलाखतकारः पिलीयन रायडर
In reply to रोशनी आणि पिलियन रायडर, by स्वीट टॉकर
In reply to खूप सुंदर. चीरतरुण आहेत. by खटपट्या
रच्याकने - प्र्श्नकर्त्या कोण आहेत?हा प्रश्न विचारल्याने, खटपट्या भाऊ तुम्ही तुमचे सदस्यत्व धोक्यात आणले आहे?
In reply to चांगली मुलाखत by अनरँडम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माशा अल्लाह माशा अल्लाह :- Asmara { اسمرا - ماشالله } { वरिजिनल ;) }In reply to सुंदर व्यक्तिमत्वाची सुंदर by मदनबाण
तर सर्वप्रथम यांचे सौंदर्भ लक्षात आले ते रावळगावच्या पानपसंद या टॉफीच्या त्यांनी केलेल्या जाहिरातीतुन:) शादी और तुमसे ? कभी नही ! हा संवाद त्याकाळी बराच लोकप्रिय झाला होता.+१००००००
सुरेख!