नमस्कार मिपाकर्स !!
बरेच दिवस झाले विचार करत होतो की ,
आवडणारा खाद्य प्रकार तुम्हा सर्वा सोबत शेयर करावा !!!
आणी आज आम्ही कॄती करत आहेत !!!!(आळशीपणाची हद्द म्हणा ,हव तर !!)
चायना मध्ये आल्या पासुन तीन चार प्रांतातील चायनीज खाण्याचा योग आला !!
साधारणपणे आपल्या ला न जमणारे हे प्रकार आहेत !!
पण सिचुअन पद्धतीच फूड आपल्याला खास करून आवडते !!
वर छायाचित्रात दिलेले आहे ते माझ सर्वात आवडत डीश !!!
१) सुजीतो ::
म्हणजे एक प्रकारची शेंग (नेमक नाव आपल्याला माहिती नाहीये .....)
आधी अर्धवट शिजवून मग मस्त फ्राय केलेली असते ....
२) कूंपाव चितींग ::
चिकन आणी शेंगदाने एकत्र अर्धवट शिजवुन नंतर फ्राय केलेले असतात .......
३) गूंसाव थूदो ::
हा खास आपला महाराष्ट्रीयन सारखाच पदार्थ ...
अर्थात तीखट बटाटा .........
सोबत सफेद भात ......
आणी चायनीज टी असतोच......
तर मंडळी कशी काय वाटली चायनीज डीश !!!!!!!
प्रतिक्रिया
2 Oct 2008 - 3:28 pm | अनिल हटेला
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
3 Oct 2008 - 3:10 am | टग्या (not verified)
...प्रतिसादाचा मथळा आवडला.
पूर्वीच्या काळी चिनी लोक झुरळ खातात अशी किंवदंता होती. बैलसुद्धा खातात काय? चित्रातील पदार्थ ही बैलाची पाककृती आहे काय?
2 Oct 2008 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रे मस्त आणि आमंत्रीत करणारी आहेत. (त्या कोपर्यातल्या शेंगा फोटो काढायच्या आधीच थोड्या खाल्ल्या का?)
छायाचित्रांसमवेत 'रेशिप्या' दिल्या असत्या तर अधिक मजा आली असती.
2 Oct 2008 - 4:42 pm | टारझन
त्या कोपर्यातल्या शेंगा फोटो काढायच्या आधीच थोड्या खाल्ल्या का?
=)) =)) =)) __/\__
आर्र बैला कुढं कुचाट चायनिज खातु ? आपली पाकृ कशी असावी ? खालील प्रमाणे
साहित्य : एक हिरव्या लुसलुशीत गवताचा पेंढा, कडबा कुट्टी , सरकी पेंड , अजुन एक प्रकारची सरकी पेंड , आणिक एक प्रकारची सरकी पेंड , गरजे नुसार पाणी ...
कृती : एक मोठं घमेलं घ्याव .. एक पेंढा घ्यावा ... त्याला जाडा भरडा चिरावा, त्यात कडबाकुट्टी आणि विविध मसालेदार सरकी पेंड्स टाकुन मस्त रेंदा करावा ... आणि रात्र भर घमेलं झाकून ठेवाव. तापमान ४० डीग्री असल्यास उत्तम .. मग सकाळी सकाळी मस्त वास येतो .. असे कोमट कोमट आंबोण सकाळी दात न घासता खावं ...
चायनिज गोर्हाचा मित्र आणि आफ्रिकन सांड )
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
5 Jul 2010 - 7:54 pm | जागु
वा हटकेच आहे टारझन तुमची रेसिपी. पण ही म्हशींसाठी असते का ?
15 May 2010 - 7:03 pm | पर्नल नेने मराठे
त्या कोपर्यातल्या शेंगा फोटो काढायच्या आधीच थोड्या खाल्ल्या का?
=)) =)) =))
चुचु
2 Oct 2008 - 4:23 pm | अनिल हटेला
>>छायाचित्रे मस्त आणि आमंत्रीत करणारी आहेत
म्हणुन तर दिलीत ....
>>त्या कोपर्यातल्या शेंगा फोटो काढायच्या आधीच थोड्या खाल्ल्या का?
फूटू काढे पर्यंत दम नाय निघाला बॉ..
>>छायाचित्रांसमवेत 'रेशिप्या' दिल्या असत्या तर अधिक मजा आली असती.
नक्की !! पूढील वेळेस ट्राय मारतो !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
2 Oct 2008 - 4:46 pm | विसोबा खेचर
आम्हाला चायनीज पाकृ फार क्वचितच आवडतात..
2 Oct 2008 - 5:09 pm | प्रभाकर पेठकर
तात्या,
पुण्यात आलात की 'चिकन हॉट्-पॅन' ची आठवण करून द्या तुम्हाला नक्कीच आवडेल. माझा कूक छान बनवितो.
2 Oct 2008 - 5:24 pm | टारझन
असं आहे का ? आजकाल मलाही 'तात्या' म्हणतात लोक्स .. येतोच लवकर पुण्याला :)
(चिकन*.* चा फॅन)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
2 Oct 2008 - 5:28 pm | प्रभाकर पेठकर
तुम्हीच विसोबा खेचर असाल तर तुम्हालाही तात्या म्हणून. (जसे आत्याबाईला मिशा असत्या तर...).
असो पण आमंत्रण सर्वांना आहे. तुम्ही ही आलात की फोन करा. ९८५०५ ८३००५.
2 Oct 2008 - 5:34 pm | टारझन
पण आमंत्रण सर्वांना आहे. तुम्ही ही आलात की फोन करा. ९८५०५ ८३००५
आम्ही फुकट चिकन खाण्यासाठी खास आमच्या नावाचा उच्चार व्हावा असा मानभावी पणा करत नाही.. तुमचा नंबर सेव्हवला आहे. कधीही फोन येउ शकतो ... फक्त एक किलो चिकन जास्त सांगावे :)
( तात्याटारझन ऊर्फ तात्याखवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
2 Oct 2008 - 8:08 pm | विसोबा खेचर
येत्या शनिवारी कट्ट्याला येणारच आहे.. :)
तात्या.
2 Oct 2008 - 8:34 pm | प्रभाकर पेठकर
दुपारच्या जेवणाला माझ्या कँटीनला या. कारण ही डीश पॅक करून नंतर खाण्यात मजा नाही.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
3 Oct 2008 - 12:25 am | विसोबा खेचर
धन्यवाद पेठकरसाहेब,
नक्की आलो असतो परंतु दुपारी आमच्या मामांकडे उतरणार आहे त्यामुळे शक्य नाही..
आमचे मामासाहेब, (म्हातारीचे धाकले बंधु) आमच्याकरता जेवायचे थांबणार आहेत..त्यामुळे पुन्हा कधितरी! :)
आपला,
(लाडका भाचा) तात्या.
2 Oct 2008 - 4:53 pm | अनिल हटेला
>>असे कोमट कोमट आंबोण सकाळी दात न घासता खावं ...
आरे हे खाउन खाउन कटाळलो .....
आणी इकडे पेंढा , सरकी वगैरे सार मेड इन चायना ,
ते आपल्याला नाय जमत ....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
2 Oct 2008 - 9:59 pm | भाग्यश्री
वा.. मस्त फोटोज आहेत!! भुक लागली.. :)
कंगपाओ चिकन मलाही अतिशय आवडतं! मधे मी मिपावर कंगपाओ 'टोफु' ची रेसिपी दिली होती..
3 Oct 2008 - 6:47 am | मीनल
कशाला आठवण करून दिलीस ?
अस्सल चायनिज मिस करते आहे अमेरिकेत.
मला व्हेज फूड मिळण इतक कठिण असायच.पण मी चीनी मेंडरिन शिकल्या मुळे मला हव तस करायला लावायची.
ते म्हणायचे ,`` खई खई .मै वंती``.म्हणजे ओके ओके. मै = नाही. वंती =प्रॉब्लेम.मै वंती म्हणजे नो प्रॉब्लेम
पण कूकिंग पॅन सेम वापरल्यामुळे मला सर्व अन्नाला वास यायचा.
पण घरी जेवण करण्यापेक्षा तो वास चालायचा.
मी मा़झ्या आयीला (तिथे मेड ला आई नाही तर आ...यी म्हणतात्)करायला संगायची.
आता ईंडियन तेलकट ,मसालेदार चायनिज खाऊच शकत नाही.
चीन ईज अमेझींग!
ज्याला संधी मिळेल तेव्हा जरूर जरूज जा.
मीनल.
3 Oct 2008 - 6:51 am | ईश्वरी
वा.. मस्त फोटोज. शेंगा आणि चिकनची डिश तर मस्तच दिसतिये.
ईश्वरी
3 Oct 2008 - 6:54 am | मीनल
मँडरिन चीनी मधे --
थँक्यु म्हणजे श्ये श्ये .
आणि नो मेंशन म्हणजे बुकाशी .
ब-याचदा परदेशी (नॉन चिनी )म्हणताना म्हणतात --
शी शी
:
:
:
:
आणि :
:
:
`बुकाशी ` चा नॉन चिनी उच्चार द्यायला हवा का?
मीनल.
3 Oct 2008 - 7:48 am | अनिल हटेला
मीनल ताइ !!
नी खई !!
नी केवो सुइशा !!
चीग ओकेला !!
हाहाहा ~~~~~~
सर्व प्रतीसाद कर्त्यांना शी शे आ!!!!!!
आणी एक जे आपण आज पर्यंत खात आलोये चायनीज म्हणुन ,
त्यात आणी चीन मध्ये बनना-या चायनीज मध्ये फार फार फरक आहे !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
3 Oct 2008 - 8:21 am | ऋचा
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
3 Oct 2008 - 8:31 am | अनिल हटेला
>>पूर्वीच्या काळी चिनी लोक झुरळ खातात अशी किंवदंता होती. बैलसुद्धा खातात काय? चित्रातील पदार्थ ही बैलाची पाककृती आहे काय?
टग्या भाउ ,अस काय करतोस ? बैलाला राग येइन ह्म्म अशाने .......
>>फोटो दिसत नाहीये....
कस काय बुवा!!
रेफ्रेश करून बघ की !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
3 Oct 2008 - 8:38 am | ऋचा
>>रेफ्रेश करून बघ की !!!
केल ना!!
काहीच दिसत नाहीये :(
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
3 Oct 2008 - 11:30 am | मनीषा
हे गुंग बाओ जि डिंग ... आहे का ?
गुंग बाओ हे ही रेसिपी ज्याने प्रथम केली त्या कुक चे नाव , जि म्हणजे चिकन ..
बॅकॉक ला आम्हाला यात शेंगदाण्याच्या ऐवजी काजु घालून दिले होते ...पण बीजींग मधे शेंगदाणे घातलेलीच मिळाली होती
मला खूप आवडते ही डीश
चायनीज टी पण छान असतो.. त्यातला जस्मिन फ्लेवर मला आवडतो
फोटो छानच आहे...
तुमच्याकडे याची पाककृती असेल तर नक्की लिहा
3 Oct 2008 - 5:06 pm | अनिल हटेला
नाय राव !!
त्या साठी चायनीज कूक ला बटर लावाव लागेल !!
आणी यु आर ग्रेट !!
तुम्हाला बरीच माहीती आहे !!
धन्यु प्रतीसादा बद्दल !!
पूढील भागात रेसीपी द्यायचा प्रयत्न करेन !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..