निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज

Primary tabs

अनुप ढेरे's picture
अनुप ढेरे in राजकारण
13 Jan 2017 - 3:41 pm

निवडणुकांचा नवा सीझन थोड्याच दिवसांत सुरू होईल. त्याच्या चर्चा आणि अंदाज यासाठी हा धागा. महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका आहेतच पण त्याहून महत्वाच्या निवडणुका इतर पाच राज्यांच्या विधानसभांसाठी आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका पुढल्या महिन्यात ४ तारखेपासून सुरू होतील. निकाल ११मार्चला लागतील.

आम आदमी पार्टीसाठी गोवा आणि पंजाब अत्यंत महत्वाचे असतील. पार्टी दोन्ही राज्यात जोरदार प्रयत्न करत आहे असं दिसतय. ग्लोरिफाईड मुंसिपाल्टीचे मुख्यमंत्री केजरीवालांना आपलंचं महत्त्व वाढवायला ही सोनेरी संधी आहे.

काँग्रेससाठी पंजाब महत्वाचं असेल कारण त्याच एकाठिकाणी त्यांना जिंकायचे चांन्सेस आहेत. उ.प्र.मध्ये काँग्रेसची अखिलेश बरोबर युती होईल असा अंदाज आहे. मुख्यतः तिरंगी लढतीत काँग्रेसच्या ५-६% मतांनी स.पा.ला भरपूर फायदा होऊ शकेल.

भाजपासाठी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अत्यंत महत्वाचे असतील. उत्तराखंडमध्ये भाजपा जिंकायची शक्यत असताना उत्तर प्रदेशात काय होईल हे कोणाच्या बा ला नक्की सांगता येणार नाही. २०१४मध्ये ७४ सीट घेणार्‍या भाजपा+ ला इथे हारणं लाजिरवाणं ठरेल. इथला पराभव हा थेट मोदी आणि डिमनिटायझेशनवर प्रश्न उपस्थित करेल. ( गेल्या दोन वर्षातल्या प्रत्येक निवड्णुकीबद्दल हेच म्हटलं गेलय की त्या मोदींच्या परिक्षा होत्या. पण यावेळी हे खरच आहे असं वाटतय. मोदी स्वतः उ.प्र. मधले खासदार आहेत.)

समाजवादी पक्षातल्या यादवीचा भाजपावर काय परिणाम होईल त्याचा वेध घेणारा लेख वाचला.

http://www.thehindu.com/news/national/other-states/BJP-watches-Yadav-feu...

लेखात म्हटलय की भाजपाला एकत्र स.पाशी लढायला आवडेल. त्रिकोणी लढत भाजपाला हवी आहे. हे पटलं नाही. माझ्यामते स.पा. तले तुकडे भाजपाच्या पथ्यावर पडतील.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

30 Jan 2017 - 11:55 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

पण १९६२ च्या चीन युद्धानंतर डीएमकेला समजले की आपले भवितव्य भारत देशाशीच निगडीत आहे त्यामुळे अण्णादुराईंनी १९६२ च्या युध्दानंतर ती मागणी सोडून दिली आणि तो पक्ष मुख्य प्रवाहात आला. पुढे १९६७ मध्ये अण्णादुराई राज्याचे मुख्यमंत्रीही झाले.

याचं आजून एक कारण आहे. ते म्हणजे श्रीलंकेतल्या तामिळींचा होणारा छळ. १९५६ पासून या छळास सुरुवात झाली. पुढे दहाएक वर्षांत त्याने उग्र स्वरूप धारण केलं. तामिळींना भारताचा पाठिंबा हवा असेल तर उर्वरित भारतापासून स्वतंत्र होण्याची खाज आवरली पाहिजे. हे दिव्यज्ञान नायकरांना झालं खरं, पण यासाठी श्रीलंकी तामिळींना भरपूर किंमत मोजावी लागली. :-(

आ.न.,
-गा.पै.

हारलेल्या देशाशी भवितव्य का निगडीत होते? जिंकणाराची भलावण करायची ना? भूमिका कळली नाही त्यांची.

Ranapratap's picture

31 Jan 2017 - 6:59 pm | Ranapratap

कोणत्याही निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळणार नाही. एक मोदी सोडले तर या पक्षाकडे योग्य चेहेरा नाही.

बाकी पक्षांकडे अल्बमच्या अल्बम खचाखच भरून पडले आहेत?

गॅरी ट्रुमन,

त्यांना आपल्याबरोबर एक देश म्हणून राहायचे नव्हते हे उघड होते

ही साफ चुकीची धारणा आहे. आपण ज्याला पाकिस्तान म्हणतो तिथे राहणाऱ्या मुस्लिमांनाही वेगळा पाकिस्तान नको होता. कसं ते पाहूया :

१. पंजाब मध्ये सिकंदर ह्यत खान (पै.वासी) याची युनियानिस्ट पार्टी सत्तेत होती. नावंच तिचं मुळी युनियानिस्ट! तिचा भारतातून फुटून जायला विरोध होता. तिथे जिनाने दंगे करून ते सरकार पाडलं.

२. सिंध प्रांतिक समितीने (= स्टेट असेंब्ली = हल्लीच्या भाषेत विधानसभा) भारतास जोडून राहायचा निर्णय घेतला होता. सिंधमध्ये तसेच दंगे घडवून आणू म्हणून धमक्या देऊन जिनाने हा निर्णय बदलण्यास भाग पाडलं. ज्या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी जी.एम.सईद यांच्या नेतृत्वाखाली जियो सिंध चळवळ सुरू झाली.

३. बलुची स्वत:ला स्वतंत्र समजत होते. तसे ते आजही स्वत:ला पाकिस्तानी मानंत नाहीत.

४. पख्तुनी लोकांना पाकिस्तानात आजीबात जायचं नव्हतं. त्यांचे नेते खान अब्दुल गफारखान (=सरहद्द गांधी) यांनी मोहनदास गांधी व नेहरूंची निर्भर्त्सना केली. तुम्ही आम्हांस लांडग्यांच्या तोंडी दिलंय, असे उद्गार काढले. हे उद्गार पुढे पाकिस्तानी सरकारने सार्थ केले!

५. बंगालात सुहारावार्दी सत्तेत होता. त्याला स्वतंत्र बंगाल हवा होता. त्याला जिनाने कसाबसा काही आश्वासने देऊन फोडला. पण लोकसंख्येच्या आधारे पाकिस्तानात निवडणुका होतील ही मागणी त्यानं पदरात पडून घेतली. कारण की पूर्व बंगालची लोकसंख्या उर्वरित पाकिस्तानपेक्षा अधिक होती.

बघा, ही घाण नसून भारताचे हितैषी होते. त्यांना दूर लोटून आपण काय मिळवलं?

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

3 Feb 2017 - 2:00 pm | गॅरी ट्रुमन

ही घाण नसून भारताचे हितैषी होते.

अरे बापरे. ते भारताचे हितैषी असते तर मुळात पाकिस्तान निर्माणच का झाला? इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्तपात का झाला?बरं असे म्हटले की ते सगळे अगदी मूठभर लोकांनी घडवून आणले पण मग जर बहुतांश लोक भारताचे हितैषी असतील तर मग पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एवढा वैरभाव कसा काय राहिला? पाकिस्तानातील सगळे लोक नक्कीच हिंदूविरोधी दंगलींमध्ये सामील नव्हते.पण तरीही भारताचा द्वेष केला नाही तरी आपल्याला हिंदूंबरोबर राहायचे नाही (कारण एकत्र राहिल्यास हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढे म्हणून वरचढ ठरतील) म्हणून आपल्याला आपला वेगळा देश हवा या उद्देशाने तरी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले?

दुसरे म्हणजे आपापसात ते कितीही भांडले तरी त्यांचा कॉमन शत्रू हिंदू होता त्यामुळे त्या कॉमन शत्रूला पिटाळून लावीपर्यंत ते एकत्र होते पण नंतर भांडायला लागले. अशी कित्येक उदाहरणे बघायला मिळतील. अफगाणिस्तानात रशियन असेपर्यंत सगळे अफगाण रशियनांविरूध्द लढत होते. पण एकदा रशियन परत गेल्यावर कोणी पश्तून होता तर कोणी ताजिक आणि त्यांच्यातच यादवी सुरू झाली. त्यांच्यात यादवी सुरू झाली म्हणून ते रशियनांचे हितैषी होते असे म्हणता कसे येईल?

तुम्ही युनियनिस्ट पार्टीच्या सरकारविषयी बोलत आहात. ते युतीचे सरकार होते. पंजाबमधील १७३ जागांपैकी मुस्लिम लीगला ७५ जागा होत्या आणि सर्वात मोठा पक्ष तोच होता आणि युनियनिस्ट पार्टीला केवळ २० जागा होत्या. त्यांचा सिकंदर हयात खान हा नेता जास्त लोकप्रिय होता या कारणाने म्हणा की अन्य कारणाने मुख्यमंत्री युनियनिस्ट पक्षाचा झाला. त्या सरकारला युनियनिस्ट सरकार म्हणता येणार नाही.

आणि ते भारताचे हितैषीच असतील तर मग भारत-पाकिस्तान एकत्र यायला काही हरकत नसावी, काय म्हणता?

arunjoshi123's picture

3 Feb 2017 - 3:00 pm | arunjoshi123

अतिप्रचंड सहमत.

संदीप डांगे's picture

3 Feb 2017 - 3:12 pm | संदीप डांगे

१९४७ च्या आधीच्या फुटिरतावादी चळवळींकडे आपण २०१७ च्या परिप्र्येक्षातून का पाहत आहोत? तेव्हा संस्थाने खालसा करुन इंग्रजांनी देश (आयमीटुसे प्रशासनव्यवस्था) एकत्र बांधली होती. इंग्रज यायच्या आधी जशी वेगवेगळी सत्ताकेंद्रे होती तशीच इंग्रज गेल्यावर होतील असा काही भाव तेव्हा असावा काय? त्यामुळे इतक्या वेगवेगळ्य लोकांनी आपआपले भूभाग वेगळे मागितले.. वेगळ्या भूभागाच्या इतक्या मागण्या बघून 'भारत एकसंध व एकमत होता, समाज एकमेकांशी सहिष्णुपणे वागत होता' हे पटणे कठिण जाते मग....

काही प्रश्न उभे राहिले या चर्चेमुळे... इंग्रज घालवणे हा स्वातंत्र्यचळवळीचा मुख्य उद्देश असल्याने इंग्रज गेल्यावर नक्की काय चित्र असेल यावर विचार केला नव्हता कोणीच?

चर्चेचा ओघ जिथे न्यायचा आहे ते ठिक आहे पण पण ...

तेव्हा संस्थाने खालसा करुन इंग्रजांनी देश (आयमीटुसे प्रशासनव्यवस्था) एकत्र बांधली होती.

का हो, इंग्रजांनी भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले असे कायसे देखिल काही आहे काय?

गामा पैलवान's picture

3 Feb 2017 - 7:26 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं व्यक्त करेन म्हणतो.

१.

ते भारताचे हितैषी असते तर मुळात पाकिस्तान निर्माणच का झाला?

त्यांना फसवून. आणि खोट्यानाट्या कथा रंगवून. खुद्द (खरा) गामा पैलवान भारतातलं ठीकठाक जीवन सोडून पाकिस्तानात राहायला गेला आणि विपन्नावस्थेत मरण पावला.

२.

जर बहुतांश लोक भारताचे हितैषी असतील तर मग पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एवढा वैरभाव कसा काय राहिला?

पाकिस्तानी प्रस्थापितांना राज्य करायला मिळावं म्हणून.

३.

भारताचा द्वेष केला नाही तरी आपल्याला हिंदूंबरोबर राहायचे नाही (कारण एकत्र राहिल्यास हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढे म्हणून वरचढ ठरतील) म्हणून आपल्याला आपला वेगळा देश हवा या उद्देशाने तरी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले?

तेंव्हाही हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढेच होते. स्वातंत्र्योत्तर फारसा फरक पडला नसता. उलट उद्यमशील हिंदूंना हाकलून लावल्याने पाकिस्तानची अपरिमित हानीच झाली आहे.

४.

दुसरे म्हणजे आपापसात ते कितीही भांडले तरी त्यांचा कॉमन शत्रू हिंदू होता

तसा तो नव्हता. जर तसा धरला तर प्रत्येक गावागावाची फाळणी करायला लागली असती. त्यामुळे हे काही भारत तोडायचं समर्थन होऊ शकंत नाही. शिवाय भारतात जे मुस्लीम राहतात ते शत्रू असल्याने त्यांना ठार मारावं वा हाकलून द्यावं असा तुमच्या विधानातून अर्थ निघतो. हा अर्थ तुम्हाला मान्य आहे का?

५.

तुम्ही युनियनिस्ट पार्टीच्या सरकारविषयी बोलत आहात. ते युतीचे सरकार होते. पंजाबमधील १७३ जागांपैकी मुस्लिम लीगला ७५ जागा होत्या आणि सर्वात मोठा पक्ष तोच होता आणि युनियनिस्ट पार्टीला केवळ २० जागा होत्या.

काँग्रेस आणि इतर पक्ष फाळणीच्या विरोधात होते. मग मुस्लीम लीगला इतकं महत्त्व कशाला दिलं गेलं? मोठा पक्ष असली तरी ती बहुमतात नव्हती. बहुमतातलं लोकनियुक्त शासन दंगली करून पाडण्यात आलेलं दिसतंय ना? मग फाळणी मान्य करणं म्हणजे दंगेखोरांसमोर गुढघे टेकणं आहे.

युक्रेनमध्ये २०१४ साली यानुकोव्हिच निवडणुकीत पराभूत झाला. खुद्द पुतीन यांनीही त्याला बाजूला व्हायला सांगितलं. तो लोकशाही मार्गाने चुपचाप निघाला असतांना दंगेखोरांनी रशियाच्या सीमेवर दंगली सुरू केल्या. काय कारण होतं त्यामागे? लोकांना फाट्यावर मारून दहशत फैलावून सत्ता हातात घेणं हेच ना? पुतीनने मग लगोलग क्रीमियात हस्तक्षेप केला. तिथल्या लोकांना रशिया की युक्रेन अशी निवड करायला मिळाली. अगोदर दंगली शांत मगच निवडणूक.

मात्र पंजाबात बरोबर उलटं घडलं. आधी निवडणूक मग दंगली. आज अमेरिकेतही हेच घडतंय. पुतीन आणि ट्रंप दंगेखोरांचे लाड करणारे नाहीत. पण आपले नेहरू पंतप्रधान बनायला निघाले होते ना! मग पंजाबातल्या दंगली काबूत आणायच्या कोणी?

६.

आणि ते भारताचे हितैषीच असतील तर मग भारत-पाकिस्तान एकत्र यायला काही हरकत नसावी, काय म्हणता?

यायलाच पाहिजे. मात्र ते भारताच्या (म्हणजे हिंदूंच्या) पुढाकाराने आणि भारताच्या नेतृत्वाखालीच व्हायला हवं.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

4 Feb 2017 - 10:47 pm | गॅरी ट्रुमन

सोव्हिएट रशियासारख्या पोलादी पंज्यातील प्रस्थापितही त्यांची सत्ता ७० वर्षेच टिकवू शकले. त्या मानाने पाकिस्तानी प्रस्थापितांची ताकद आणि देशातील दहशत कमीच आहे. १९७१ सारख्या प्रसंगी पाकिस्तानचा पराभव झाला आहे, बांगलादेश वेगळा झाला आहे, नियाझीने शरणागती पत्करली आहे, हजारो युध्दकैदी भारताच्या ताब्यात आहेत अशी परिस्थिती असतानाही मग पाकिस्तानातील तथाकथित भारतप्रेमी लोकांच्या दबावापुढे उरलासुरला पाकिस्तानही कोलॅप्स झाला असता. तो अगदी १९७१ मध्येही झाला नाही ते का?

रच्याकने लष्करी बळावर कोणाही जनतेला तिच्या इच्छेविरूध्द फार काळ ताब्यात ठेवता येत नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. परक्या देशात तर असे करता येत नाही हे रशियाच्या अफगाणिस्तान आणि चेचेन्यातील उदाहरणावरून, अमेरिकेच्या इराकमधील उदाहरणावरून सिध्द झालेच आहे. आपल्या देशातील जनतेला अशा बळाने फार काळ नियंत्रित करता येत नाही हे रशिया आणि पूर्व युरोपातील उदाहरणावरून सिध्द झाले आहे. अशा परिस्थितीत जर भारतप्रेमी तत्वे इतकी बलिष्ठ असती तर त्यांना जवळपास ७० वर्षे पाकिस्तानातील प्रस्थापित ताब्यात ठेऊ शकले असे म्हणायचे आहे तर तुम्हाला!!

तसा तो नव्हता. जर तसा धरला तर प्रत्येक गावागावाची फाळणी करायला लागली असती. त्यामुळे हे काही भारत तोडायचं समर्थन होऊ शकंत नाही. शिवाय भारतात जे मुस्लीम राहतात ते शत्रू असल्याने त्यांना ठार मारावं वा हाकलून द्यावं असा तुमच्या विधानातून अर्थ निघतो. हा अर्थ तुम्हाला मान्य आहे का?

कसा काय? जिथे मुस्लिम बहुसंख्या होती (आणि जो भाग पाकिस्तानचा भाग होऊ शकला असता) त्या भागातील मुस्लिम हिंदूंना कॉमन शत्रू मानत होते यावरून भारतातील हिंदू मुस्लिमांना कॉमन शत्रू मानत होते असा अर्थ कसा निघतो?

यायलाच पाहिजे. मात्र ते भारताच्या (म्हणजे हिंदूंच्या) पुढाकाराने आणि भारताच्या नेतृत्वाखालीच व्हायला हवं.

तुमचे हे म्हणणे तुम्हालाच लखलाभ असो. मला व्यक्तिशः त्या घाणीबरोबर राहायची अजिबात इच्छा नाही.

गॅरी ट्रुमन,

१.

मला व्यक्तिशः त्या घाणीबरोबर राहायची अजिबात इच्छा नाही.

पण तरीही तुम्हाला बांगलादेशी घाणीसोबत रहावंच लागतं. मग आपणंच पुढाकार घेऊन सगळीच घाण साफ केलेली काय वाईट? एका फटक्यात करायची गरज नाही.

२.

जिथे मुस्लिम बहुसंख्या होती (आणि जो भाग पाकिस्तानचा भाग होऊ शकला असता) त्या भागातील मुस्लिम हिंदूंना कॉमन शत्रू मानत होते

मुस्लीम बहुसंख्य नसलेल्या ठिकाणीही (म्हणजे भारतातही) ते हिंदूंना आपला शत्रूच मानतात ना? मग शत्रूचं संख्याबळ खच्ची करायला हवं ना? सगळे मुस्लीम शत्रू नाहीत. यांच्यातल्या सहानुभूतीदारांना आपल्या बाजूला वळवून घ्यायला नको का? खान अब्दुल गफारखानांना आणि बलुचींना गांधीनेहरूंनी वाऱ्यावर सोडलं म्हणून आपणही सोडायचं?

३.

जर भारतप्रेमी तत्वे इतकी बलिष्ठ असती तर त्यांना जवळपास ७० वर्षे पाकिस्तानातील प्रस्थापित ताब्यात ठेऊ शकले असे म्हणायचे आहे तर तुम्हाला!!

हो हो हो !!! नेमकं हेच म्हणायचंय मला. भारताने पुढाकार घेतला असता तर आज पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळे राहिले नसते.

४.

लष्करी बळावर कोणाही जनतेला तिच्या इच्छेविरूध्द फार काळ ताब्यात ठेवता येत नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. परक्या देशात तर असे करता येत नाही हे रशियाच्या अफगाणिस्तान आणि चेचेन्यातील उदाहरणावरून, अमेरिकेच्या इराकमधील उदाहरणावरून सिध्द झालेच आहे.

१९६५ साली पश्चिम पाकिस्तानातला बराच मोठा गट आणि १९७१ साली सबंध पूर्व बंगाल भारतीय सैन्याला मुक्तिदाते मानंत होते. या परिस्थितीचा फायदा उठवला गेला नाही. याची कारणं वेगळी आहेत.

असो.

मागे संदीप डांग्यांनी एके ठिकाणी विचारलं होतं की १९४७ च्या आधीच्या फुटिरतावादी चळवळींकडे आपण २०१७ च्या परिप्र्येक्षातून का पाहत आहोत म्हणून. त्याचं उत्तर असं की त्यावेळेस जो खेळ चालू होता नेमका तोच आताही चालू आहे. औवेश्या स्वत:ला प्रति जिना समजतो. त्याला लीगप्रमाणे मुस्लिमांचा एकमेव तारणहार व्हायचं आहे. जेणेकरून भारताचा आजून एक लचका तोडता येईल. १९४२ साली कम्युनिस्टांना भारताचे अनेक तुकडे व्हायला हवे होते (कृपया क्रिप्स मिशन आठवावे.). आजही कम्युनिस्ट जनेवित उघड घोषणा देण्यात येतात की 'भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला इन्शा अल्ला'.

मग अशा वेळेस भारताच्या हितचिंतकांना एकत्र बांधायलाच पाहिजे. मग ते पाकिस्तान/बांगलादेश/भारतातले हिंदू असोत, बलुची असोत, वा पठाण, वा आगाखानी खोजे, वा शिया, वा जियोसिंधवाले, वा इतर कोणीही असोत. त्यांची दयनीय अवस्था पालटणं हे आपलं (वैचारिक) कर्तव्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

5 Feb 2017 - 10:21 pm | गॅरी ट्रुमन

हे सगळे इतके सोपे आहे का गापै? सुरवातीच्या काळात कराचीमध्ये पाकिस्तानला कटकटी निर्माण करतो म्हणून एम.क्यू.एम विषयी फार चांगले मत होते. पण नंतर झाले काय? त्याच एम.क्यू.एम आणि कट्टर भारतद्वेष्टा परवेझ मुशर्रफ यांचेच गुळपीठ जमले. भारतातून गेलेले मोहाजीर आणि सिंधी एकमेकांविरूध्द ठाकले. म्हणावे तर सिंधी पाकिस्तानविरूध्द आणि मोहाजीरही पाकिस्तानविरूध्द. त्यांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेण्यात फार काही गैर नाही. पण ते फार भारतप्रेमी आहेत असे मानायचेही काही कारण नाही.

एक प्रश्नः हा खरं तर यापूर्वीच विचारायला हवा होता. हिंदू आणि शीख पाकिस्तानातून भारतात आले आणि जवळपास तितकेच मुस्लिम भारतातून (विशेषतः पंजाब आणि उत्तर भारताच्या इतर भागांमधून) पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतप्रेमी लोक असतील तर त्यापैकी कोणीही (मुस्लिम धर्मीय) फाळणीच्या वेळी भारतात कसे स्थलांतरीत झाले नाहीत? असे कोणी लोक तुम्हाला माहित आहेत का? एक जालिंदर जलालाबादी सोडले तर मला असे कोणीही माहित नाही. याविषयी काही लिहिलेत तर बरे होईल.

शत्रूचे संख्याबळ नक्कीच खच्ची करायला हवे. पाकिस्तानातील खरोखरच तिथल्या प्रकाराला कंटाळलेले आणि भारतात यायची खरोखरची इच्छा असलेल्यांबरोबर जरूर हातमिळवणी करावी. पण त्याचवेळी एक लक्षात ठेवायला हवे की खान अब्दुल गफार खानांच्याच वायव्य सरहद्द प्रांतात आज तालिबानला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. तेव्हा सरसकट घाऊक प्रमाणात 'भारत-पाकिस्तान एक व्हावेत आणि त्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घ्यायला हवा' असे म्हणताना आपण नक्की कोणाला आपल्याबरोबर घ्यायचे म्हणत आहोत त्याचाही विसर पडू देऊ नये इतकेच.

तेव्हा सरसकट घाऊक प्रमाणात 'भारत-पाकिस्तान एक व्हावेत आणि त्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घ्यायला हवा' असे म्हणताना आपण नक्की कोणाला आपल्याबरोबर घ्यायचे म्हणत आहोत त्याचाही विसर पडू देऊ नये इतकेच.

+१.
आता असलं करण्यात अर्थ नाही. १९४७ मधे नक्कीच होता.

गामा पैलवान's picture

9 Feb 2017 - 2:42 am | गामा पैलवान

सर्दीनं डोस्कं भंजाळलंय! नंतर प्रतिसाद लिवतो.
-गा.पै.

गॅरी ट्रुमन,

तुमचा वरील प्रतिसाद तसेच त्याखालची अरुण जोशींची सहमतीही वाचली. माझी मतं सांगतो.

१.

सुरवातीच्या काळात कराचीमध्ये पाकिस्तानला कटकटी निर्माण करतो म्हणून एम.क्यू.एम विषयी फार चांगले मत होते. पण नंतर झाले काय? त्याच एम.क्यू.एम आणि कट्टर भारतद्वेष्टा परवेझ मुशर्रफ यांचेच गुळपीठ जमले. भारतातून गेलेले मोहाजीर आणि सिंधी एकमेकांविरूध्द ठाकले. म्हणावे तर सिंधी पाकिस्तानविरूध्द आणि मोहाजीरही पाकिस्तानविरूध्द. त्यांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेण्यात फार काही गैर नाही. पण ते फार भारतप्रेमी आहेत असे मानायचेही काही कारण नाही.

मलाही हेच सांगायचं होतं. यांचा वापर आपल्या राजकारणासाठी घ्यायला हवा.

२.

हे सगळे इतके सोपे आहे का गापै?

आजीबात सोपं नाहीये. म्हणूनंच करायला हवंय. कठीण गोष्टी केल्याने आत्मविश्वास येतो.

३.

पाकिस्तानात इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतप्रेमी लोक असतील तर त्यापैकी कोणीही (मुस्लिम धर्मीय) फाळणीच्या वेळी भारतात कसे स्थलांतरीत झाले नाहीत?

भारताला अनुकूल असलेला मुस्लीम प्रत्यक्षात भारताकडे स्थलांतर करेलच असं नाही. तसंही पाहता पाकिस्तानातनं भारतात आलेले हिंदू स्वखुशीने आलेले नव्हते. शक्य झालं असतं तर त्यांना तिथेच राहायचं होतं. अशी संधी मिळून जर ते तिथे राहिले असते, तर त्याचा अर्थ ते पाकिस्तानधार्जिणे होते असा लावता कामा नये.

४.

खान अब्दुल गफार खानांच्याच वायव्य सरहद्द प्रांतात आज तालिबानला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे.

मी इथे इंग्लंडमध्ये एका अफगाणी निर्वासिताच्या तोंडून तालिबानबद्दल वाईट गोष्टीच ऐकल्या आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी तालिबानपेक्षा जास्त भ्रष्ट आणि बेभरवशाचे आहेत. म्हणून तालिबानला पाठींबा मिळतो. दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार आहे. शिवाय तालिबान = अमेरिका हे समीकरण अफगाण्यांच्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे. त्यामुळे तालिबान्यांप्रती सहानुभूती भारताकडे वळवणं अगदी अशक्य नाही.

५.

आता असलं करण्यात अर्थ नाही. १९४७ मधे नक्कीच होता.

१९४७ साली आपला खंडप्राय भारत घिसाडघाईने कापण्यात आला. तेव्हा हिंदूंना वेळ मिळाला नाही. त्यामुळे आत्ताच खरी संधी आहे. कारण की पाकिस्तान जिच्या जोरावर टिमकी वाजवत होता ती अमेरिका नामे शक्ती उघडपणे इस्लामविरोधी भूमिका घेऊ इच्छितेय.

गॅरी ट्रुमन's picture

11 Feb 2017 - 6:49 pm | गॅरी ट्रुमन

भारताला अनुकूल असलेला मुस्लीम प्रत्यक्षात भारताकडे स्थलांतर करेलच असं नाही. तसंही पाहता पाकिस्तानातनं भारतात आलेले हिंदू स्वखुशीने आलेले नव्हते. शक्य झालं असतं तर त्यांना तिथेच राहायचं होतं. अशी संधी मिळून जर ते तिथे राहिले असते, तर त्याचा अर्थ ते पाकिस्तानधार्जिणे होते असा लावता कामा नये.

तरीही हा पूर्णपणे वन-वे स्ट्रीटच होता. हिंदू आणि शिखांचे स्थलांतर भारताकडे आणि मुस्लिमांचे पाकिस्तानकडे असे आणि असेच होते. आणि तसे करणार्‍यांचा आकडाही थोडा नव्हता. दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी ७० लाख इतका मोठा आकडा होता तो. असे असताना अगदी एकही मुस्लिम तिथून इथे आला नाही हे कसे काय?

मी इथे इंग्लंडमध्ये एका अफगाणी निर्वासिताच्या तोंडून तालिबानबद्दल वाईट गोष्टीच ऐकल्या आहे.

यातून नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाही. अफगाण लोकांची सहानुभूती पहिल्यापासून पाकिस्तानपेक्षा भारताच्या बाजूलाच होती. आणि तुमचा मुद्दा आहे की भारत आणि पाकिस्तान एकत्र यावा. यात अफगाणिस्तानचा कसा काय उल्लेख झाला? तुम्ही म्हणत आहात की १९४७ मध्ये खान अब्दुल गफार खानांच्या प्रभावामुळे वायव्य सरहद्द प्रांतात भारताविषयी चांगली भावना असलेले लोक होते. यात नाकारण्यासारखे काहीच नाही. भारत की पाकिस्तान याविषयावर तिथे सार्वमत झाले त्यात पाकिस्तानच्या बाजूने थोडीच जास्त मते पडली होती.पण आता २०१७ मध्ये त्याच प्रांतात तालिबानला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. अफगाणिस्तानात तालिबानला पाठिंबा फार नाही हे स्पष्टच आहे. पण त्या मुद्द्याचा या चर्चेशी संबंध नाही.

दुसरे म्हणजे एम.क्यू.एम आणि भारतद्वेष्टा मुशर्रफ यांचे गुळपीठ जमले याविषयी तुम्ही काहीच लिहिले नाहीत.

संदीप डांगे's picture

11 Feb 2017 - 6:55 pm | संदीप डांगे

सहमत आहे.... जेवढ्या लवकर जे काही करता येईल ते करावं...

दुश्यन्त's picture

9 Feb 2017 - 6:39 pm | दुश्यन्त

पंजाब आणि गोव्यात मतदान केव्हाच संपलं आणि निकाल यायला बराच वेळ आहे (११ मार्च!). पोस्ट-वोट एक्झिट पोलची काही बातमी नाही. युपी / उत्तराखंड वगैरे ठिकाणच्या मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आयोगाने बंदी वगैरे घातली नाही ना?मणिपुर'वर तर काहीच फरक पडणार नाही. युपी / उत्तराखंड वर पण खूप प्रभाव पडेल असं नाही. मग नक्की काय कारण असावे. वाहिन्यांनी मतदानोत्तर एक्झिट पोल्स दाखवायला हवेत.

अनुप ढेरे's picture

9 Feb 2017 - 8:10 pm | अनुप ढेरे

एक्झिट पोल ८ मार्च नंतर सांगता येतील. आयोगाचाच नियम आहे.

गामा पैलवान's picture

12 Feb 2017 - 11:17 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

दुसरे म्हणजे एम.क्यू.एम आणि भारतद्वेष्टा मुशर्रफ यांचे गुळपीठ जमले याविषयी तुम्ही काहीच लिहिले नाहीत.

ही तत्कालीन घटना आहे. लांब पल्ल्याच्या धोरणांत अशा घटनांच्या विरुद्ध प्रभावी उपाययोजना करणं (म्हणजे मुशर्रफला आवरणं) फारसं अवघड नाही/नसावं.

२.

अफगाण लोकांची सहानुभूती पहिल्यापासून पाकिस्तानपेक्षा भारताच्या बाजूलाच होती. आणि तुमचा मुद्दा आहे की भारत आणि पाकिस्तान एकत्र यावा. यात अफगाणिस्तानचा कसा काय उल्लेख झाला?

कारण की पाकिस्तान आणि अफगाणिस्थान यांच्यातली ड्युरांड सीमारेषा १९९४ साली कायद्याने कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वायव्य सीमा प्रांताचा (म्हणजे खैबर पख्तूनखवाचा) उल्लेख करतांना गांधारप्रांताचा संबंध येणारंच. शिवाय अफगाण लोकांची पाकिस्तानला आजीबात सहानुभूती नव्हती. तेव्हाही नव्हती, आणि आज तर नाहीच नाही. वायव्य सीमा प्रांतात जे सार्वमत घेण्यात आलं होतं त्यावर खान अब्दुल गफारखानांनी बहिष्कार घातला होता. म्हणून हा भाग पाकिस्तानात गेला. ही खानसाहेबांची भयाण चूक आहे. तिच्या परिणामांपायी त्यांना पुढे आयुष्यभर पाकिस्तानच्या कैदेत राहावं लागलं.

३.

दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी ७० लाख इतका मोठा आकडा होता तो. असे असताना अगदी एकही मुस्लिम तिथून इथे आला नाही हे कसे काय?

प्राणभयाने स्थलांतर करणाऱ्यांची देशभक्ती किंवा आवडनिवड किंवा पसंती वगैरे पाहिल्या जात नसतात. त्यांच्यावरून अंदाज बांधणे निरर्थक आहे.

आ.न.,
-गा.पै.

arunjoshi123's picture

13 Feb 2017 - 8:56 pm | arunjoshi123

बाकी सगळं पटणेबल आहे.

प्राणभयाने स्थलांतर करणाऱ्यांची देशभक्ती किंवा आवडनिवड किंवा पसंती वगैरे पाहिल्या जात नसतात. त्यांच्यावरून अंदाज बांधणे निरर्थक आहे.

हे तर खासच.
पण आम्ही ज्याला होपलेस म्हणालो ते संभव का वाटते यावर विस्ताराने मत हवं. ते या धाग्यावर नको. भारत पाक का एक व्हावेत, होतील का, आता का व्हावेत, कसे व्हावेत, आणि नंतर अखंड भारत कसा असेल, असा नवा धागा असावा.

गॅरी ट्रुमन's picture

14 Feb 2017 - 10:58 am | गॅरी ट्रुमन

एकूणच काय की तिकडच्यांना भारताविषयी प्रेम वाटतच होते आणि काही मूठभर भारतद्वेष्ट्या मंडळींमुळे पाकिस्तान अस्तित्वात आला हाच ग्रह तुम्ही करून घेतलेला दिसतो. जर पाकिस्तानातील बहुसंख्य लोकांना भारताविषयी प्रेम वाटत असेल तर उघडपणे भारताची बाजू घेणारा एकही पक्ष/संघटना अस्तित्वात का आली नाही, उलट हाफिज सईदसारखे लोक लाहोरजवळ मुरिदके सारख्या ठिकाणीही आजही हजारोंचे मेळावे कसे भरवतात, १९७१ मध्ये पाकिस्तानचा मोठा पराभव झाल्यावरही अशा भारतप्रेमी तत्वांचा रेटा कसा बसला नाही, १९४७-४८ मध्ये दंगलींचा पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील भारतप्रेमी लोक इथे आले नाहीत तरी १९६५ पर्यंत भारत-पाकिस्तानात एकमेकांच्या नागरीकांना जायला-यायला आजच्या इतकी आठकाढी नव्हती (ती १९६५ च्या युध्दानंतर आली) अशावेळी तरी हे लोक भारतात कसे आले नाहीत (आपल्या पंजाबचे नंतर मुख्यमंत्री झालेले भीमसेन सच्चर भारतात १९४८ मध्ये आले तर जोगेन्द्रनाथ मंडल त्याहूनही नंतर आले पण तथाकथित भारतप्रेमी मुस्लिम तत्वे का आली नाहीत) इत्यादी सगळ्या प्रश्नांना 'असे काही नाहीच' अशा स्वरूपाचा तुमचा आग्रह दिसतो.

ठिक आहे. अशा मॅट्रिक्समध्ये राहायचे असेल तर काहीच ना नाही पण या विषयावर अजून काही चर्चा करून काही स्वारस्य आहे असे वाटत नाही. त्यामुळे यावर आणखी काही लिहित नाही.

गॅरी ट्रुमन,

समजा कोणी पाकिस्तानात भारतासाठी मेळावा भरवला तर त्याला पाक सरकार जिवंत सोडणार आहे का? हे कार्य भारतालाच हाती घ्यावं लागेल. लोकांना भ्रामक स्वप्नं दाखवून पाकिस्तान ओरबाडून घेतला गेला आहे. तो चालवायची जराही अक्कल तिथल्या राज्यकर्त्यांना नाही. याला जर तुम्ही लोकांची निवड म्हणंत असाल तर ते मला पटंत नाही.

शिवाय, भारताकडे कल असणे म्हणजे नेमके काय? इंडोनेशियामध्ये भारतमाता की जय अशी घोषणा देणे राष्ट्रद्रोह मानला जात नाही. तसाच पाकिस्तानही जोडून घ्यावा लागेल. हे तुम्हाला मान्य होत नसेल तर आपापले मार्ग वेगळे आहेत असं म्हणूया.

आ.न.,
-गा.पै.

अनुप ढेरे's picture

14 Feb 2017 - 10:36 am | अनुप ढेरे

दैनिक जागरणवर गुन्हा आणि छापे पडले आहेत. Exit polls प्रसिद्ध करायला बंदी असून देखील यांनी पहिल्या टप्प्यात भाजपा वरचढ आहे दाखवणारा पोल प्रसिद्ध केला. (चुकून झाला असं पेपरचं म्हणणं आहे. :) ) या बातमीचा भाजपाला नक्की फायदा होऊ शकेल कारण भाजपाची हवा आहे असा संदेश पुढील टप्प्यात लोकांना मिळू शकतो. म्हणूनच पोलीस इतक्या तत्परतेने छापे घालत आहेत.

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2017 - 3:37 pm | श्रीगुरुजी

जागरणच्या संपादकांना अटक झाली असून इतर २-३ वार्ताहरांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

अर्धवटराव's picture

15 Feb 2017 - 4:46 am | अर्धवटराव

काय होईल ते नुकसान भरुन देण्याची तयारी, आणि त्यावर बर्‍यापैकी बिदागी, अशा भांडवलावर असे रिपोर्ट्स प्रसवणं काहि कठीण नाहि... :)

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 9:57 am | संदीप डांगे

सरळ आहे. चार दोन पत्रकारांवर तोंडदेखली कारवाई होईल.... प्रोपगंडा प्रकाशित झाला त्याला दुनिया की कोई भी ताकत रिवर्स करु शकत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते हेच दिसून येत आहे. हे तर उघड उघड होतंय.. पडद्यामागे काय होत असेल अमितशा जाने!

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Feb 2017 - 1:28 pm | हतोळकरांचा प्रसाद

जर असे रिपोर्ट पसरवणे एवढे सरळ सोपे आहे आणि त्याचा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग होत असेल तर मग बाकी मंडळी हा मार्ग का बरे घेत नसतील म्हणे? म्हणजे थोडक्यात भाजप सोडून इतर पक्ष निवडणूक जिंकायला या वरील किंवा त्यापेक्षा खालील थराला जाऊ शकत नाहीत असं म्हणणं आहे आपलं तर! तरी बरे वरील केस मध्ये इतर पक्ष म्हणजे सपा, बसपा आणि काँग्रेस याबद्दल आपण बोलत आहोत. वरील प्रकरणामागची कुठलीही अधिकृत माहिती नसताना फक्त रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल दाखवला आहे म्हणून हा रिपोर्ट भाजपनेच आणला आहे असे म्हणणे म्हणजे कशाचे लक्षण मानावे बरे?

अवांतर : भाजपला कडवी टक्कर देतोय किंवा हरवू शकतो म्हणून भाजपविरोधक येणाऱ्या काळात सपा आणि अखिलेश यांचे युपीमध्ये केलेल्या विकासासाठी गोडवे गाताना दिसतील असे मला वैयक्तिकरित्या वाटते.

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 1:56 pm | संदीप डांगे

रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल दाखवला आहे म्हणून हा रिपोर्ट भाजपनेच आणला आहे असे म्हणणे म्हणजे कशाचे लक्षण मानावे बरे?

>> संदर्भः दिल्ली निवडणुकीचे एक्झिट पोल्स. जिथे भाजपला २५+ जागा मिळतील असे दाखवत होते 'एक्झिट' पोल. ३ जागा मिळाल्या. आदर्श स्थितीत एक्झिट पोल म्हणजे मतदान केल्यानंतर पोलबूथमधून बाहेर पडणार्‍या मतदारांचा सर्वे असतो. कोणाचे 'खयाली पुलाव' नसतात. २५+ जागा भाजपला मिळतील असे सांगत होते तेव्हा, आणि ६७ सीट मिळवणार्‍या आपबद्दल कोणीही जवळपासचेही भाकित केले नव्हते. आजकाल एक्झिट पोल्स हे पेड असतात हे मानायला भरपूर संदर्भ आहेत. एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल याची तुलना करुन बघावी, मग कोणी त्या पोलसाठी पेमेन्ट केलं ते समजते. या ठिकाणी भाजपला अव्वल दाखवले आहे. सपा-कॉन्ग्रेस, मायावतीला दाखवले असते तर मी तसेही म्हटले असते. दैनिक जागरण ची मागची तीन-चार वर्षातली वाटचाल बघितल्यास असले प्रश्न पडणार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

15 Feb 2017 - 3:16 pm | श्रीगुरुजी

दिल्ली व बिहार या दोन्ही विधानसभा निवडणुकीत मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष एखादा अपवाद वगळता पूर्णपणे चुकलेले होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर एकूण १० वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले होते. त्याव्यतिरिक्त इंडियन एक्सप्रेसचे संपादक सुरजित भल्ला यांनी एक मोठा लेख लिहून स्वत:चा अंदाज दिला होता. त्यांचा अंदाज जवळपास १००% बरोबर आला. १० वृत्तसंस्थांच्या अंदाजापैकी ९ जणांचे अंदाज पूर्ण चुकले होते.

दिल्लीतही तसेच झाले होते. काही वृत्तसंस्थांनी तर भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज दिला होता. दिल्लीतीलही सर्वच अंदाज चुकले होते.

दैनिक जागरणचा अंदाज हा पेड आहे का नाही हे अजूनतरी माहित नाही. तो रिपोर्ट भाजपनेच आणला आहे असा निष्कर्ष अजूनतरी काढता येणार नाही. २०१५ च्या कटू अनुभवानंतर मी कोणत्याही सर्वेक्षणाच्या अंदाजावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.

गॅरी ट्रुमन's picture

15 Feb 2017 - 3:53 pm | गॅरी ट्रुमन

चुकीचे आलेले एक्झिट/ओपिनिअन पोल्स हे पैसे देऊन करून घेतलेले असतात असे मानायचे ठरवलेच असेल तर प्रश्नच संपला. पण चुकीचे सॅम्पलिंग केल्यामुळेही एक्झिट/ओपिनिअन पोल्स चुकीचे येऊ शकतात. २०१४ मध्येही कोणाही एक्झिट/ओपिनिअन पोलने उत्तर प्रदेशात भाजपला ८० पैकी ७१ (आणि मित्रपक्षाला २) जागा मिळतील असे भाकित केले नव्हते. म्हणजे या पोलवाल्यांना विरोधी पक्षांनी विकत घेतले होते असे म्हणायचे का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Feb 2017 - 3:56 pm | हतोळकरांचा प्रसाद

गल्लत होतेय डांगेसाहेब! एक्सिट पोल्स कसे होते/आहेत/कसे केले जातात हा विषय वेगळा आहे. वरील सर्वे भाजप ने स्वतःच्या स्वार्थासाठी करवला असे आपले म्हणणे आहे. वरून तुम्ही भाजप कोणत्याही ठरला जाऊ शकतो असेही म्हणत आहात. तर मला असा प्रश्न पडला आहे की मग एवढा सोपा मार्ग बाकी पक्ष का बरे घेत नसतील? आणि भाजप असा कोणत्या ठरला जाऊ शकतो ज्याला सपा, काँग्रेस किंवा बसपा जाऊ शकत नाहीत? भाजप या सगळ्यांपेक्षा खालच्या ठरला जाऊ शकतो याला पुष्टी देणारी काही उदाहरणे दिलीत तर तो मुद्दा समजू शकेल.

आता राहिला मुद्दा दिल्लीच्या एक्सिट पोल्स चा तर तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही. म्हणजे भाजपच्या बाजूने दिलेले पोल्स नंतर चुकीचे आले की ते भाजपने पे केलेले होते असं काहीसं म्हणायचं आहे का? आणि जे बरोबर येतात पोल्स त्यांचं काय? शिवाय तुम्ही दिल्लीच्या उदाहरणाने तुमच्या यूपीच्या प्रकरणाबाबतीतील मताला कॉन्ट्रडीक्ट करत नाहीयेत का?

गॅरी ट्रुमन's picture

15 Feb 2017 - 2:11 pm | गॅरी ट्रुमन

भाजपला कडवी टक्कर देतोय किंवा हरवू शकतो म्हणून भाजपविरोधक येणाऱ्या काळात सपा आणि अखिलेश यांचे युपीमध्ये केलेल्या विकासासाठी गोडवे गाताना दिसतील असे मला वैयक्तिकरित्या वाटते.

दीड वर्षापूर्वी जवळपास सगळ्या मोदीविरोधकांनी लालू यादवचा कसा उदोउदो केला होता हे बघितले असेलच. अगदी मोठ्या मोठ्या अभ्यासू लोकांनीही बिहारमध्ये लालू जिंकावा असे म्हटले होते.

आता २०१९ मध्ये शिवसेना विरोधी पक्ष म्हणून लढेल आणि सगळे बुबुडाविपुमाधवि "शिवसेना कशी चांगली" असे गोडवे गायला लागतील आणि irony परत एकदा १०० मरणे मरेल.

अनुप ढेरे's picture

15 Feb 2017 - 2:21 pm | अनुप ढेरे

खिलेश यांचे युपीमध्ये केलेल्या विकासासाठी गोडवे गाताना दिसतील

भविष्यकाळाची गरज नाही. हे सुरू झालेलं आहे. इकॉनॉमिक टाईम्स वाचा आजकालचा. राजदीप सरदेसाईनी अखिलेश यादवची मुलाखत घेतलेली वाचा.

वरुण मोहिते's picture

15 Feb 2017 - 3:16 pm | वरुण मोहिते

आज अखिलेश ला समर्थन मिळत आहे . यु पी मधील तरुण मुले त्याच्याकडे आकर्षित होत आहेत . अगदी मुंबईतील कुठल्या भैय्या ला विचारलेत तरी तो म्हणतो अखिलेश अच्छा काम कर राहा .ह्या सर्वाना बुद्धीजीवी म्हणणार का?निकाल काहीही असला तरी जनतेची भावनाही महत्वाची आहे ना. अगदी बिहारचाही उदाहरण घेतलात तरी जनतेने निवडून दिलाय ना त्यांना . ह्यात भाजपविरोधी भूमिका अली कुठे ? अथवा बुद्धीजीवी असेच म्हणार हे कुठून आलं ?जनता काय ह्यांच्या मतांवर मतदान करते का? सेम अँप्लिकेबल टू आप . दिल्लीकरांनी निवडून दिलाय काम करतायत. अजून तरी कुठला दिल्लीकर खूपच नाराज आहे कामावर असं पाहण्यात नाही आलंय . त्यामुळे बुद्धिजीवी असेच बोलणार , भाजप विरोधक असेच बोलणार हा ग्रह काढून घ्या .

चष्मेबद्दूर's picture

21 Feb 2017 - 12:03 pm | चष्मेबद्दूर

स.पा. आणि कॉं च्या युती ला जय वीरु ची उपमा दिली आहे. आणि शेवटी जय साहेब च काय होत तसंच होणार असे दिसतंय.

एकुलता एक डॉन's picture

23 Feb 2017 - 8:45 pm | एकुलता एक डॉन

शेवटी निकाल आला