निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज
पण १९६२ च्या चीन युद्धानंतर डीएमकेला समजले की आपले भवितव्य भारत देशाशीच निगडीत आहे त्यामुळे अण्णादुराईंनी १९६२ च्या युध्दानंतर ती मागणी सोडून दिली आणि तो पक्ष मुख्य प्रवाहात आला. पुढे १९६७ मध्ये अण्णादुराई राज्याचे मुख्यमंत्रीही झाले.याचं आजून एक कारण आहे. ते म्हणजे श्रीलंकेतल्या तामिळींचा होणारा छळ. १९५६ पासून या छळास सुरुवात झाली. पुढे दहाएक वर्षांत त्याने उग्र स्वरूप धारण केलं. तामिळींना भारताचा पाठिंबा हवा असेल तर उर्वरित भारतापासून स्वतंत्र होण्याची खाज आवरली पाहिजे. हे दिव्यज्ञान नायकरांना झालं खरं, पण यासाठी श्रीलंकी तामिळींना भरपूर किंमत मोजावी लागली. :-( आ.न., -गा.पै.
In reply to गॅरी ट्रुमन, by गामा पैलवान
In reply to भा ज पा by Ranapratap
In reply to बाकी पक्षांकडे अल्बमच्या by arunjoshi123
त्यांना आपल्याबरोबर एक देश म्हणून राहायचे नव्हते हे उघड होतेही साफ चुकीची धारणा आहे. आपण ज्याला पाकिस्तान म्हणतो तिथे राहणाऱ्या मुस्लिमांनाही वेगळा पाकिस्तान नको होता. कसं ते पाहूया : १. पंजाब मध्ये सिकंदर ह्यत खान (पै.वासी) याची युनियानिस्ट पार्टी सत्तेत होती. नावंच तिचं मुळी युनियानिस्ट! तिचा भारतातून फुटून जायला विरोध होता. तिथे जिनाने दंगे करून ते सरकार पाडलं. २. सिंध प्रांतिक समितीने (= स्टेट असेंब्ली = हल्लीच्या भाषेत विधानसभा) भारतास जोडून राहायचा निर्णय घेतला होता. सिंधमध्ये तसेच दंगे घडवून आणू म्हणून धमक्या देऊन जिनाने हा निर्णय बदलण्यास भाग पाडलं. ज्या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी जी.एम.सईद यांच्या नेतृत्वाखाली जियो सिंध चळवळ सुरू झाली. ३. बलुची स्वत:ला स्वतंत्र समजत होते. तसे ते आजही स्वत:ला पाकिस्तानी मानंत नाहीत. ४. पख्तुनी लोकांना पाकिस्तानात आजीबात जायचं नव्हतं. त्यांचे नेते खान अब्दुल गफारखान (=सरहद्द गांधी) यांनी मोहनदास गांधी व नेहरूंची निर्भर्त्सना केली. तुम्ही आम्हांस लांडग्यांच्या तोंडी दिलंय, असे उद्गार काढले. हे उद्गार पुढे पाकिस्तानी सरकारने सार्थ केले! ५. बंगालात सुहारावार्दी सत्तेत होता. त्याला स्वतंत्र बंगाल हवा होता. त्याला जिनाने कसाबसा काही आश्वासने देऊन फोडला. पण लोकसंख्येच्या आधारे पाकिस्तानात निवडणुका होतील ही मागणी त्यानं पदरात पडून घेतली. कारण की पूर्व बंगालची लोकसंख्या उर्वरित पाकिस्तानपेक्षा अधिक होती. बघा, ही घाण नसून भारताचे हितैषी होते. त्यांना दूर लोटून आपण काय मिळवलं? आ.न., -गा.पै.
In reply to पाकिस्तानी जनतेचं पाकिस्ताननिर्मितीत योगदान by गामा पैलवान
ही घाण नसून भारताचे हितैषी होते.अरे बापरे. ते भारताचे हितैषी असते तर मुळात पाकिस्तान निर्माणच का झाला? इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्तपात का झाला?बरं असे म्हटले की ते सगळे अगदी मूठभर लोकांनी घडवून आणले पण मग जर बहुतांश लोक भारताचे हितैषी असतील तर मग पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एवढा वैरभाव कसा काय राहिला? पाकिस्तानातील सगळे लोक नक्कीच हिंदूविरोधी दंगलींमध्ये सामील नव्हते.पण तरीही भारताचा द्वेष केला नाही तरी आपल्याला हिंदूंबरोबर राहायचे नाही (कारण एकत्र राहिल्यास हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढे म्हणून वरचढ ठरतील) म्हणून आपल्याला आपला वेगळा देश हवा या उद्देशाने तरी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले? दुसरे म्हणजे आपापसात ते कितीही भांडले तरी त्यांचा कॉमन शत्रू हिंदू होता त्यामुळे त्या कॉमन शत्रूला पिटाळून लावीपर्यंत ते एकत्र होते पण नंतर भांडायला लागले. अशी कित्येक उदाहरणे बघायला मिळतील. अफगाणिस्तानात रशियन असेपर्यंत सगळे अफगाण रशियनांविरूध्द लढत होते. पण एकदा रशियन परत गेल्यावर कोणी पश्तून होता तर कोणी ताजिक आणि त्यांच्यातच यादवी सुरू झाली. त्यांच्यात यादवी सुरू झाली म्हणून ते रशियनांचे हितैषी होते असे म्हणता कसे येईल? तुम्ही युनियनिस्ट पार्टीच्या सरकारविषयी बोलत आहात. ते युतीचे सरकार होते. पंजाबमधील १७३ जागांपैकी मुस्लिम लीगला ७५ जागा होत्या आणि सर्वात मोठा पक्ष तोच होता आणि युनियनिस्ट पार्टीला केवळ २० जागा होत्या. त्यांचा सिकंदर हयात खान हा नेता जास्त लोकप्रिय होता या कारणाने म्हणा की अन्य कारणाने मुख्यमंत्री युनियनिस्ट पक्षाचा झाला. त्या सरकारला युनियनिस्ट सरकार म्हणता येणार नाही. आणि ते भारताचे हितैषीच असतील तर मग भारत-पाकिस्तान एकत्र यायला काही हरकत नसावी, काय म्हणता?
In reply to पाकिस्तानी जनतेचं पाकिस्ताननिर्मितीत योगदान by गामा पैलवान
In reply to १९४७ च्या आधीच्या फुटिरतावादी by संदीप डांगे
तेव्हा संस्थाने खालसा करुन इंग्रजांनी देश (आयमीटुसे प्रशासनव्यवस्था) एकत्र बांधली होती.का हो, इंग्रजांनी भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले असे कायसे देखिल काही आहे काय?
ते भारताचे हितैषी असते तर मुळात पाकिस्तान निर्माणच का झाला?त्यांना फसवून. आणि खोट्यानाट्या कथा रंगवून. खुद्द (खरा) गामा पैलवान भारतातलं ठीकठाक जीवन सोडून पाकिस्तानात राहायला गेला आणि विपन्नावस्थेत मरण पावला. २.
जर बहुतांश लोक भारताचे हितैषी असतील तर मग पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एवढा वैरभाव कसा काय राहिला?पाकिस्तानी प्रस्थापितांना राज्य करायला मिळावं म्हणून. ३.
भारताचा द्वेष केला नाही तरी आपल्याला हिंदूंबरोबर राहायचे नाही (कारण एकत्र राहिल्यास हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढे म्हणून वरचढ ठरतील) म्हणून आपल्याला आपला वेगळा देश हवा या उद्देशाने तरी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले?तेंव्हाही हिंदू जास्त सुशिक्षित आणि व्यापारउद्योगात पुढेच होते. स्वातंत्र्योत्तर फारसा फरक पडला नसता. उलट उद्यमशील हिंदूंना हाकलून लावल्याने पाकिस्तानची अपरिमित हानीच झाली आहे. ४.
दुसरे म्हणजे आपापसात ते कितीही भांडले तरी त्यांचा कॉमन शत्रू हिंदू होतातसा तो नव्हता. जर तसा धरला तर प्रत्येक गावागावाची फाळणी करायला लागली असती. त्यामुळे हे काही भारत तोडायचं समर्थन होऊ शकंत नाही. शिवाय भारतात जे मुस्लीम राहतात ते शत्रू असल्याने त्यांना ठार मारावं वा हाकलून द्यावं असा तुमच्या विधानातून अर्थ निघतो. हा अर्थ तुम्हाला मान्य आहे का? ५.
तुम्ही युनियनिस्ट पार्टीच्या सरकारविषयी बोलत आहात. ते युतीचे सरकार होते. पंजाबमधील १७३ जागांपैकी मुस्लिम लीगला ७५ जागा होत्या आणि सर्वात मोठा पक्ष तोच होता आणि युनियनिस्ट पार्टीला केवळ २० जागा होत्या.काँग्रेस आणि इतर पक्ष फाळणीच्या विरोधात होते. मग मुस्लीम लीगला इतकं महत्त्व कशाला दिलं गेलं? मोठा पक्ष असली तरी ती बहुमतात नव्हती. बहुमतातलं लोकनियुक्त शासन दंगली करून पाडण्यात आलेलं दिसतंय ना? मग फाळणी मान्य करणं म्हणजे दंगेखोरांसमोर गुढघे टेकणं आहे. युक्रेनमध्ये २०१४ साली यानुकोव्हिच निवडणुकीत पराभूत झाला. खुद्द पुतीन यांनीही त्याला बाजूला व्हायला सांगितलं. तो लोकशाही मार्गाने चुपचाप निघाला असतांना दंगेखोरांनी रशियाच्या सीमेवर दंगली सुरू केल्या. काय कारण होतं त्यामागे? लोकांना फाट्यावर मारून दहशत फैलावून सत्ता हातात घेणं हेच ना? पुतीनने मग लगोलग क्रीमियात हस्तक्षेप केला. तिथल्या लोकांना रशिया की युक्रेन अशी निवड करायला मिळाली. अगोदर दंगली शांत मगच निवडणूक. मात्र पंजाबात बरोबर उलटं घडलं. आधी निवडणूक मग दंगली. आज अमेरिकेतही हेच घडतंय. पुतीन आणि ट्रंप दंगेखोरांचे लाड करणारे नाहीत. पण आपले नेहरू पंतप्रधान बनायला निघाले होते ना! मग पंजाबातल्या दंगली काबूत आणायच्या कोणी? ६.
आणि ते भारताचे हितैषीच असतील तर मग भारत-पाकिस्तान एकत्र यायला काही हरकत नसावी, काय म्हणता?यायलाच पाहिजे. मात्र ते भारताच्या (म्हणजे हिंदूंच्या) पुढाकाराने आणि भारताच्या नेतृत्वाखालीच व्हायला हवं. आ.न., -गा.पै.
In reply to फाळणी आणि एकीकरण by गामा पैलवान
तसा तो नव्हता. जर तसा धरला तर प्रत्येक गावागावाची फाळणी करायला लागली असती. त्यामुळे हे काही भारत तोडायचं समर्थन होऊ शकंत नाही. शिवाय भारतात जे मुस्लीम राहतात ते शत्रू असल्याने त्यांना ठार मारावं वा हाकलून द्यावं असा तुमच्या विधानातून अर्थ निघतो. हा अर्थ तुम्हाला मान्य आहे का?कसा काय? जिथे मुस्लिम बहुसंख्या होती (आणि जो भाग पाकिस्तानचा भाग होऊ शकला असता) त्या भागातील मुस्लिम हिंदूंना कॉमन शत्रू मानत होते यावरून भारतातील हिंदू मुस्लिमांना कॉमन शत्रू मानत होते असा अर्थ कसा निघतो?
यायलाच पाहिजे. मात्र ते भारताच्या (म्हणजे हिंदूंच्या) पुढाकाराने आणि भारताच्या नेतृत्वाखालीच व्हायला हवं.तुमचे हे म्हणणे तुम्हालाच लखलाभ असो. मला व्यक्तिशः त्या घाणीबरोबर राहायची अजिबात इच्छा नाही.
In reply to सोव्हिएट रशियासारख्या पोलादी by गॅरी ट्रुमन
मला व्यक्तिशः त्या घाणीबरोबर राहायची अजिबात इच्छा नाही.पण तरीही तुम्हाला बांगलादेशी घाणीसोबत रहावंच लागतं. मग आपणंच पुढाकार घेऊन सगळीच घाण साफ केलेली काय वाईट? एका फटक्यात करायची गरज नाही. २.
जिथे मुस्लिम बहुसंख्या होती (आणि जो भाग पाकिस्तानचा भाग होऊ शकला असता) त्या भागातील मुस्लिम हिंदूंना कॉमन शत्रू मानत होतेमुस्लीम बहुसंख्य नसलेल्या ठिकाणीही (म्हणजे भारतातही) ते हिंदूंना आपला शत्रूच मानतात ना? मग शत्रूचं संख्याबळ खच्ची करायला हवं ना? सगळे मुस्लीम शत्रू नाहीत. यांच्यातल्या सहानुभूतीदारांना आपल्या बाजूला वळवून घ्यायला नको का? खान अब्दुल गफारखानांना आणि बलुचींना गांधीनेहरूंनी वाऱ्यावर सोडलं म्हणून आपणही सोडायचं? ३.
जर भारतप्रेमी तत्वे इतकी बलिष्ठ असती तर त्यांना जवळपास ७० वर्षे पाकिस्तानातील प्रस्थापित ताब्यात ठेऊ शकले असे म्हणायचे आहे तर तुम्हाला!!हो हो हो !!! नेमकं हेच म्हणायचंय मला. भारताने पुढाकार घेतला असता तर आज पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळे राहिले नसते. ४.
लष्करी बळावर कोणाही जनतेला तिच्या इच्छेविरूध्द फार काळ ताब्यात ठेवता येत नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. परक्या देशात तर असे करता येत नाही हे रशियाच्या अफगाणिस्तान आणि चेचेन्यातील उदाहरणावरून, अमेरिकेच्या इराकमधील उदाहरणावरून सिध्द झालेच आहे.१९६५ साली पश्चिम पाकिस्तानातला बराच मोठा गट आणि १९७१ साली सबंध पूर्व बंगाल भारतीय सैन्याला मुक्तिदाते मानंत होते. या परिस्थितीचा फायदा उठवला गेला नाही. याची कारणं वेगळी आहेत. असो. मागे संदीप डांग्यांनी एके ठिकाणी विचारलं होतं की १९४७ च्या आधीच्या फुटिरतावादी चळवळींकडे आपण २०१७ च्या परिप्र्येक्षातून का पाहत आहोत म्हणून. त्याचं उत्तर असं की त्यावेळेस जो खेळ चालू होता नेमका तोच आताही चालू आहे. औवेश्या स्वत:ला प्रति जिना समजतो. त्याला लीगप्रमाणे मुस्लिमांचा एकमेव तारणहार व्हायचं आहे. जेणेकरून भारताचा आजून एक लचका तोडता येईल. १९४२ साली कम्युनिस्टांना भारताचे अनेक तुकडे व्हायला हवे होते (कृपया क्रिप्स मिशन आठवावे.). आजही कम्युनिस्ट जनेवित उघड घोषणा देण्यात येतात की 'भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला इन्शा अल्ला'. मग अशा वेळेस भारताच्या हितचिंतकांना एकत्र बांधायलाच पाहिजे. मग ते पाकिस्तान/बांगलादेश/भारतातले हिंदू असोत, बलुची असोत, वा पठाण, वा आगाखानी खोजे, वा शिया, वा जियोसिंधवाले, वा इतर कोणीही असोत. त्यांची दयनीय अवस्था पालटणं हे आपलं (वैचारिक) कर्तव्य आहे. आ.न., -गा.पै.
In reply to भारताच्या हितचिंतकांची दयनीय अवस्था by गामा पैलवान
In reply to हे इतके सोपे आहे का? by गॅरी ट्रुमन
तेव्हा सरसकट घाऊक प्रमाणात 'भारत-पाकिस्तान एक व्हावेत आणि त्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घ्यायला हवा' असे म्हणताना आपण नक्की कोणाला आपल्याबरोबर घ्यायचे म्हणत आहोत त्याचाही विसर पडू देऊ नये इतकेच.+१. आता असलं करण्यात अर्थ नाही. १९४७ मधे नक्कीच होता.
In reply to तेव्हा सरसकट घाऊक प्रमाणात by arunjoshi123
In reply to हे इतके सोपे आहे का? by गॅरी ट्रुमन
सुरवातीच्या काळात कराचीमध्ये पाकिस्तानला कटकटी निर्माण करतो म्हणून एम.क्यू.एम विषयी फार चांगले मत होते. पण नंतर झाले काय? त्याच एम.क्यू.एम आणि कट्टर भारतद्वेष्टा परवेझ मुशर्रफ यांचेच गुळपीठ जमले. भारतातून गेलेले मोहाजीर आणि सिंधी एकमेकांविरूध्द ठाकले. म्हणावे तर सिंधी पाकिस्तानविरूध्द आणि मोहाजीरही पाकिस्तानविरूध्द. त्यांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेण्यात फार काही गैर नाही. पण ते फार भारतप्रेमी आहेत असे मानायचेही काही कारण नाही.मलाही हेच सांगायचं होतं. यांचा वापर आपल्या राजकारणासाठी घ्यायला हवा. २.
हे सगळे इतके सोपे आहे का गापै?आजीबात सोपं नाहीये. म्हणूनंच करायला हवंय. कठीण गोष्टी केल्याने आत्मविश्वास येतो. ३.
पाकिस्तानात इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतप्रेमी लोक असतील तर त्यापैकी कोणीही (मुस्लिम धर्मीय) फाळणीच्या वेळी भारतात कसे स्थलांतरीत झाले नाहीत?भारताला अनुकूल असलेला मुस्लीम प्रत्यक्षात भारताकडे स्थलांतर करेलच असं नाही. तसंही पाहता पाकिस्तानातनं भारतात आलेले हिंदू स्वखुशीने आलेले नव्हते. शक्य झालं असतं तर त्यांना तिथेच राहायचं होतं. अशी संधी मिळून जर ते तिथे राहिले असते, तर त्याचा अर्थ ते पाकिस्तानधार्जिणे होते असा लावता कामा नये. ४.
खान अब्दुल गफार खानांच्याच वायव्य सरहद्द प्रांतात आज तालिबानला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे.मी इथे इंग्लंडमध्ये एका अफगाणी निर्वासिताच्या तोंडून तालिबानबद्दल वाईट गोष्टीच ऐकल्या आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी तालिबानपेक्षा जास्त भ्रष्ट आणि बेभरवशाचे आहेत. म्हणून तालिबानला पाठींबा मिळतो. दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार आहे. शिवाय तालिबान = अमेरिका हे समीकरण अफगाण्यांच्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे. त्यामुळे तालिबान्यांप्रती सहानुभूती भारताकडे वळवणं अगदी अशक्य नाही. ५.
आता असलं करण्यात अर्थ नाही. १९४७ मधे नक्कीच होता.१९४७ साली आपला खंडप्राय भारत घिसाडघाईने कापण्यात आला. तेव्हा हिंदूंना वेळ मिळाला नाही. त्यामुळे आत्ताच खरी संधी आहे. कारण की पाकिस्तान जिच्या जोरावर टिमकी वाजवत होता ती अमेरिका नामे शक्ती उघडपणे इस्लामविरोधी भूमिका घेऊ इच्छितेय.
In reply to गॅरी ट्रुमन व अरुण जोशींना प्रतिसाद by गामा पैलवान
भारताला अनुकूल असलेला मुस्लीम प्रत्यक्षात भारताकडे स्थलांतर करेलच असं नाही. तसंही पाहता पाकिस्तानातनं भारतात आलेले हिंदू स्वखुशीने आलेले नव्हते. शक्य झालं असतं तर त्यांना तिथेच राहायचं होतं. अशी संधी मिळून जर ते तिथे राहिले असते, तर त्याचा अर्थ ते पाकिस्तानधार्जिणे होते असा लावता कामा नये.तरीही हा पूर्णपणे वन-वे स्ट्रीटच होता. हिंदू आणि शिखांचे स्थलांतर भारताकडे आणि मुस्लिमांचे पाकिस्तानकडे असे आणि असेच होते. आणि तसे करणार्यांचा आकडाही थोडा नव्हता. दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी ७० लाख इतका मोठा आकडा होता तो. असे असताना अगदी एकही मुस्लिम तिथून इथे आला नाही हे कसे काय?
मी इथे इंग्लंडमध्ये एका अफगाणी निर्वासिताच्या तोंडून तालिबानबद्दल वाईट गोष्टीच ऐकल्या आहे.यातून नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाही. अफगाण लोकांची सहानुभूती पहिल्यापासून पाकिस्तानपेक्षा भारताच्या बाजूलाच होती. आणि तुमचा मुद्दा आहे की भारत आणि पाकिस्तान एकत्र यावा. यात अफगाणिस्तानचा कसा काय उल्लेख झाला? तुम्ही म्हणत आहात की १९४७ मध्ये खान अब्दुल गफार खानांच्या प्रभावामुळे वायव्य सरहद्द प्रांतात भारताविषयी चांगली भावना असलेले लोक होते. यात नाकारण्यासारखे काहीच नाही. भारत की पाकिस्तान याविषयावर तिथे सार्वमत झाले त्यात पाकिस्तानच्या बाजूने थोडीच जास्त मते पडली होती.पण आता २०१७ मध्ये त्याच प्रांतात तालिबानला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. अफगाणिस्तानात तालिबानला पाठिंबा फार नाही हे स्पष्टच आहे. पण त्या मुद्द्याचा या चर्चेशी संबंध नाही. दुसरे म्हणजे एम.क्यू.एम आणि भारतद्वेष्टा मुशर्रफ यांचे गुळपीठ जमले याविषयी तुम्ही काहीच लिहिले नाहीत.
In reply to गॅरी ट्रुमन व अरुण जोशींना प्रतिसाद by गामा पैलवान
In reply to पंजाब आणि गोव्यात मतदान by दुश्यन्त
दुसरे म्हणजे एम.क्यू.एम आणि भारतद्वेष्टा मुशर्रफ यांचे गुळपीठ जमले याविषयी तुम्ही काहीच लिहिले नाहीत.ही तत्कालीन घटना आहे. लांब पल्ल्याच्या धोरणांत अशा घटनांच्या विरुद्ध प्रभावी उपाययोजना करणं (म्हणजे मुशर्रफला आवरणं) फारसं अवघड नाही/नसावं. २.
अफगाण लोकांची सहानुभूती पहिल्यापासून पाकिस्तानपेक्षा भारताच्या बाजूलाच होती. आणि तुमचा मुद्दा आहे की भारत आणि पाकिस्तान एकत्र यावा. यात अफगाणिस्तानचा कसा काय उल्लेख झाला?कारण की पाकिस्तान आणि अफगाणिस्थान यांच्यातली ड्युरांड सीमारेषा १९९४ साली कायद्याने कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वायव्य सीमा प्रांताचा (म्हणजे खैबर पख्तूनखवाचा) उल्लेख करतांना गांधारप्रांताचा संबंध येणारंच. शिवाय अफगाण लोकांची पाकिस्तानला आजीबात सहानुभूती नव्हती. तेव्हाही नव्हती, आणि आज तर नाहीच नाही. वायव्य सीमा प्रांतात जे सार्वमत घेण्यात आलं होतं त्यावर खान अब्दुल गफारखानांनी बहिष्कार घातला होता. म्हणून हा भाग पाकिस्तानात गेला. ही खानसाहेबांची भयाण चूक आहे. तिच्या परिणामांपायी त्यांना पुढे आयुष्यभर पाकिस्तानच्या कैदेत राहावं लागलं. ३.
दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी ७० लाख इतका मोठा आकडा होता तो. असे असताना अगदी एकही मुस्लिम तिथून इथे आला नाही हे कसे काय?प्राणभयाने स्थलांतर करणाऱ्यांची देशभक्ती किंवा आवडनिवड किंवा पसंती वगैरे पाहिल्या जात नसतात. त्यांच्यावरून अंदाज बांधणे निरर्थक आहे. आ.न., -गा.पै.
In reply to फाळणी आणि अफगाणिस्थान by गामा पैलवान
प्राणभयाने स्थलांतर करणाऱ्यांची देशभक्ती किंवा आवडनिवड किंवा पसंती वगैरे पाहिल्या जात नसतात. त्यांच्यावरून अंदाज बांधणे निरर्थक आहे.हे तर खासच. पण आम्ही ज्याला होपलेस म्हणालो ते संभव का वाटते यावर विस्ताराने मत हवं. ते या धाग्यावर नको. भारत पाक का एक व्हावेत, होतील का, आता का व्हावेत, कसे व्हावेत, आणि नंतर अखंड भारत कसा असेल, असा नवा धागा असावा.
In reply to फाळणी आणि अफगाणिस्थान by गामा पैलवान
In reply to पूर्णविराम by गॅरी ट्रुमन
In reply to दैनिक जागरणवर गुन्हा आणि छापे by अनुप ढेरे
In reply to दैनिक जागरणवर गुन्हा आणि छापे by अनुप ढेरे
In reply to इट्स अ फिक्स !! by अर्धवटराव
In reply to सरळ आहे. चार दोन पत्रकारांवर by संदीप डांगे
In reply to जर असे रिपोर्ट पसरवणे एवढे by हतोळकरांचा प्रसाद
रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल दाखवला आहे म्हणून हा रिपोर्ट भाजपनेच आणला आहे असे म्हणणे म्हणजे कशाचे लक्षण मानावे बरे?>> संदर्भः दिल्ली निवडणुकीचे एक्झिट पोल्स. जिथे भाजपला २५+ जागा मिळतील असे दाखवत होते 'एक्झिट' पोल. ३ जागा मिळाल्या. आदर्श स्थितीत एक्झिट पोल म्हणजे मतदान केल्यानंतर पोलबूथमधून बाहेर पडणार्या मतदारांचा सर्वे असतो. कोणाचे 'खयाली पुलाव' नसतात. २५+ जागा भाजपला मिळतील असे सांगत होते तेव्हा, आणि ६७ सीट मिळवणार्या आपबद्दल कोणीही जवळपासचेही भाकित केले नव्हते. आजकाल एक्झिट पोल्स हे पेड असतात हे मानायला भरपूर संदर्भ आहेत. एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल याची तुलना करुन बघावी, मग कोणी त्या पोलसाठी पेमेन्ट केलं ते समजते. या ठिकाणी भाजपला अव्वल दाखवले आहे. सपा-कॉन्ग्रेस, मायावतीला दाखवले असते तर मी तसेही म्हटले असते. दैनिक जागरण ची मागची तीन-चार वर्षातली वाटचाल बघितल्यास असले प्रश्न पडणार नाहीत.
In reply to रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल by संदीप डांगे
In reply to रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल by संदीप डांगे
In reply to रिपोर्ट मध्ये भाजप अव्वल by संदीप डांगे
In reply to जर असे रिपोर्ट पसरवणे एवढे by हतोळकरांचा प्रसाद
भाजपला कडवी टक्कर देतोय किंवा हरवू शकतो म्हणून भाजपविरोधक येणाऱ्या काळात सपा आणि अखिलेश यांचे युपीमध्ये केलेल्या विकासासाठी गोडवे गाताना दिसतील असे मला वैयक्तिकरित्या वाटते.दीड वर्षापूर्वी जवळपास सगळ्या मोदीविरोधकांनी लालू यादवचा कसा उदोउदो केला होता हे बघितले असेलच. अगदी मोठ्या मोठ्या अभ्यासू लोकांनीही बिहारमध्ये लालू जिंकावा असे म्हटले होते. आता २०१९ मध्ये शिवसेना विरोधी पक्ष म्हणून लढेल आणि सगळे बुबुडाविपुमाधवि "शिवसेना कशी चांगली" असे गोडवे गायला लागतील आणि irony परत एकदा १०० मरणे मरेल.
In reply to जर असे रिपोर्ट पसरवणे एवढे by हतोळकरांचा प्रसाद
खिलेश यांचे युपीमध्ये केलेल्या विकासासाठी गोडवे गाताना दिसतीलभविष्यकाळाची गरज नाही. हे सुरू झालेलं आहे. इकॉनॉमिक टाईम्स वाचा आजकालचा. राजदीप सरदेसाईनी अखिलेश यादवची मुलाखत घेतलेली वाचा.
In reply to खिलेश यांचे युपीमध्ये by अनुप ढेरे
गॅरी ट्रुमन,