एक शून्य तीन ..... नक्की पहावे असे रहस्य....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
10 Jan 2017 - 9:03 pm

नाटकाचा सफाईदार प्रयोग म्हणजे काय हे जर अनुभवायचे असेल तर सुदीप मोडक लिखीत " एक शून्य तीन " हे मराठी नाटक आवर्जून पहावे.
सदानंद केळकर हे आंबोली गावातील एक वयस्कर उद्योजक. त्यांच्या वाढदिवशी दर वर्षी येणारे ते एक पत्र या वर्षी का आले नाही म्हणून चिंतेत आहेत अनिता या त्यांच्या पुतणीचा अपहरणकर्ता हे पत्र पाठवत असावा आणि त्यातून पुतणी अजून जिवंत आहे हा संदेश तो देत असावा असे त्याना वाटतय . त्या पत्राचा / पत्र पाठवणाराचा आणि पर्यायाने अनिताचे नक्की काय झाले हा शोध घेण्यासाठी त्यानी पत्रकार अजित चिटणीस कडे ही केस सोपवायचे ठरवले आहे.
अजित चिटणीस त्या प्रमाणे आम्बोलीत दाखल होतो.
नेहा सबनीस हीची वेगळीच कहाणी .ती परिस्थितीची शिकार झालेली आहे. स्वतःचेच पैसे मिळवण्यासाठी तिला अत्याचार सहन करावे लागतात. त्यातुनही ती बुद्धीमत्तेने आनि धाडसाने वाट काढते. इकडे आंबोलीत बर्‍याच घटना घडतात. अजित चिटणीस ला काही बंद होत जाणारे मार्ग मिळतात. मदतीसाठी म्हणून अजित हॅकिंग मध्ये एक्सपर्ट असलेल्या नेहा सबनीस ला बोलावुन घेतो. नेहा अनेक दुवे शोधते. केळकर इंडस्ट्रीज ची काही बंद गुपिते उघड होत जातात. दरम्यान अजित च्या हातात अनिता ची डायरी लागते. त्यात काही गूढ आकडे दिलेले आहेत. अनिता गायब होण्यामागचे रहस्य अधीकच गडद होते.
आकड्याम्चा मागोवा घेताना अजित च्या हातात आणखी काही दुवे लागतात. दरम्यान सदानंद केलकरांवर जीवघेणा हल्ला होतो.
रहस्या च्या जवळ पोहोचलोय असे वाटत असतानाच अजितच्या वरही खूनी हल्ला होतो. प्रेक्षक रहस्याचा शोध घेत दंग होतो.
कमालीच्या वेगाने घडणा-या घटना आणि बांधीव कथानक यामुळे कथेतील रहस्य मस्त खुलते.
सुमीत राघवनचा सहज सुंदर अभिनय , स्वानंदी टिकेकरची नेहा सबनीस हे या नाटकातील महत्वाचे खांब. सदानंद केळकर झालेल्या गुरुराज अवधानींनी त्यांच्या आवाजा खूपच सुंदर वापर केलाय. केवळ आवाजातून त्यानी इंडस्ट्रीयलिस्ट केळकर आणि आजार पणानंतरचे केळकर खूपच ताकदीने साकारले आहेत.
रेखीव म्हणावे अशा नेपथ्यातुन सदानंदचे केळकरांचे ऑफिस , आउट हाऊस, किशोर चे घर खूपच सुंदर साकारले आहेत. पार्ष्व संगीत ही या नाटकाचे आणखी एक जमेची बाजू. रहस्य प्रधान नाटकाला आवश्यक प्रकाश योजना.
नेहा सबनीस ची भूमीका लेखकाने अजून योग्य पद्धतीन मांडली असती तर नाटकाला अधीक उंची लाभली असती हा अपवाद सोडला तर वेगाने घडणार्‍या घटना , प्रसंगांची मांडणी , नेपथ्य , संगीत , प्रकाश योजना यांचा असा काही मस्त मेळ जमलाय की एखादे ब्रॉड वे वर चे नाटक पहातोय असे वाटते
मराठी मधे रहस्य प्रधान नाटकांची परंपरा तशी कमी आहे . एक शून्य तीन या नाटकाचा उद्देश केवळ रहस्या तून होणारे मनोरंजन हा नाही. प्रत्येक स्त्रीने , मुलीने आणि पुरुषाने घ्यावा असा एक महत्वाचा संदेश देते. नाटकाचे नाव हे एका कायद्यातील कलमाचे नाव आहे. या क्लूवरुन काही रहस्य सापडू शकेल. पण खरे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर नाटकच पहायला हवे.
एक शून्य तीन ... लेखक : सुदीप मोडक.
दिग्दर्शक : सुदीप मोडक / नीरज शिरवईकर
संगीत : रोहित प्रधान
प्रकाश : जयदीप आपटे
वेशभूषा :दीपा मेहता
रंगभूषा : संदीप नगरकर.
व्यवस्थापक : अमीत सुर्वे.

नेहा सबनीस :स्वानंदी टिकेकर.
सदानम्द : गुरुराज अवधानी.
शिंदे : संजय देशपांडे
किशोरःसागरः आठलेकर
मंदार : सुदीप मोडक
अनिता : नम्रता कदम
अजितः सुमीत राघवन

नाट्यसमीक्षा

प्रतिक्रिया

कोणत्या पुस्तकावरून कथा ढापली आहे हे विचारायचं नाय. किमान "आधारित" असल्याचा नामोल्लेख तरी आहे का?

हॅत तेरी की! पहिल्या वाक्यावरूनच कळाले कोणत्या 'गर्ल...' ची कॉपी मारली आहे ते. भ्रमनिरास! बरं झालं सुमित राघवनचं नाटक म्हणून पाहायला गेलो नाही ते... :-( रहस्य कळालं. किमान ते अनिता हे नाव एका पात्राचं बदलून दुसऱ्या पात्राला ठेवलंय ते तरी टाळायला हवं होतं!

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2017 - 3:17 pm | श्रीगुरुजी

चांगला परिचय!

नाटक नक्की बघणार आहे.