गांधी जयंति निमित्ताने (आम्हि कपाळ करंटे महात्माजींची क्षमा मागतो)

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
2 Oct 2008 - 11:09 am

मी हि भोंदू तुहि भोंदू
आपण दोघे भोंदू
जे जे नाहित भोंदू
ते आहेत सारे गांडू

बोले त्यैसा चाले
तयाचि कापून टाकु पावूले
सत्याचे जे उदघोष करिती
तयांचे दाबून टाकु गळे

गांधी जरीका पुन्हा जन्मला
आम्हि मारून टाकु त्याला
कार्य तुझेरे संपले केव्हाच
पुन्हा कशाला आला..........?

परतन्त्र होईल देश जेव्हा हा
बोलवु तुला रे पुन्हा
सत्य अहिंसा आहे येथे
सध्या तरी रे गुन्हा.....!

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

2 Oct 2008 - 12:46 pm | सखाराम_गटणे™

चान आहे.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

आनंदयात्री's picture

2 Oct 2008 - 12:54 pm | आनंदयात्री

प्रकाटाआ.

ऋषिकेश's picture

2 Oct 2008 - 1:02 pm | ऋषिकेश

अतिशय बोलकी ,उपहासात्मक, बोचरी कविता..

परतन्त्र होईल देश जेव्हा हा
बोलवु तुला रे पुन्हा

हे आवडले

कार्य तुझेरे संपले केव्हाच
पुन्हा कशाला आला..........?

यात उपहास असला तरी गांघीना असे विचारलेले पाहून फारच बोचले.

-(गांधीजी अतिशय आवडणारा)ऋषिकेश