देशाचा अपमान

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
5 Jan 2017 - 10:14 pm

"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती.
"इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक.
.
.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अ‍ॅक्शन रिप्ले.
"तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?)
"असंच, मला माहिती आहे." थोरली पाती.
"अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?"
"गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो."
.
.
वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच. आम्हालाही नवीन पिढी कोणत्या जगात वावरते हे कळते.
.
.
"आधी मला सांग देश म्हणजे काय?" मी. उगाचच शहाणपणा.
"अम्म्म... भारत."
"भारत म्हणजे काय?"
"अम्म... देश"
"भारतदेश म्हणजे काय?"
"अम्म्म्म्म्म्म्म्म........ नाशिक"
"बरं." जास्त ताणण्यात अर्थ नव्हता. देश काय हे समजण्याचं वय नाहीये हो. चला पुडं.
"अपमान म्हणजे काय?" ह्यात तरी त्याला नक्की काय समजलं हे समजायला हवं.
"अम्म्म्म.. त्रास!"
"हां... ठिक आहे."
.
.
.
"बरं, मग केव्हा म्हटलं पाहिजे जन-गण-मन तू सांग?" अस्मादिक.
"ताई सांगतील तेव्हा. शाळेत."
"..............."
.
.
.
खरं तर माझ्याकडे तन्मयला सांगायला खूप काही आहे. पण मी गप्प आहे.
.
.
देशभक्ती, देश, मान-अपमान, राष्ट्रगीत, काय कुठे केव्हा कसे म्हणायचे, कोणाचे ऐकायचे, नाही ऐकायचे, स्वातंत्र्य म्हणजे काय, अधिकार, कर्तव्ये, इत्यादी इत्यादी.
खूप बोजा आहे हो देशाचा नागरिक असण्याचा! एवढ्या लवकर कुठे?
.
.
सध्या मनाच्या आभाळात सृजनाची पाखरे भीरभीरतात. इवल्याशा खांद्यांवर कोवळ्या स्वप्नांचा भार पुरेसा आहे.

मुक्तकअनुभवप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

होय, सध्या नकोच! तसंही आजकाल लहान मुलांवर त्यांच्या वयापेक्षा जास्त बोजा पडत असतोच!

पिलीयन रायडर's picture

5 Jan 2017 - 11:12 pm | पिलीयन रायडर

दंगल मध्ये जेव्हा गीता जिंकते तेव्हा राष्ट्रगीत वाजतं. इकडे सगळं पब्लिक खाडकन उठुन उभं राहिलं. नियम काय आहेत ते माहिती नाही. पण राष्ट्रगीत लागलं की उभं रहायचं एवढं कळतं. आम्ही टिव्ही समोरही उभे रहायचो (तशी गरज नसते बहुदा).

मला मुलांना राष्ट्रगीत ही आदर करण्याची गोष्ट आहे हे समजलं तरी पुरे असं वाटतं. अबीर संध्याकाळी शुभं करोती सोबत "जन गण मन" म्हणायला लावायचा. आम्ही देवासमोर उभं राहुन म्हणायचो. त्याला हे एक महत्वाचं गाणं आहे हे समजलं ना, पुरे झालं!

आता बाकी नागरिक म्हणुन जबाबदार्‍या वगैरे आपोआपच समजुन येतील. देशप्रेम आहे. ते महत्वाचं!

प्रसाद गोडबोले's picture

6 Jan 2017 - 9:00 am | प्रसाद गोडबोले

डांगे भाऊ ,

भारी लिहिले आहे !
मीही एकदा चित्रपट बघायला गेलो होतो तेव्हा मित्राला म्हणालो कि राष्ट्रगीताला उभे राहिले पाहिजे अशी सक्ती नाही , केवळ आदर दाखवला पाहिजे इतकीच सक्ती आहे। मी बसूनही आदर दाखवू शकतो , तर तेवढ्या वरून मित्र एकदम हमरातुमारी वर उतरला !!
मग मीच माघार घेत म्हणालो - बरं बाबा , तू जा आत आणि राहा राष्ट्रगीताला उभा । मी तेवढ्यात मूत्रालयात जाऊन येतो !
बस तेवढ्यावर वाद मिटला !

बाकी ह्याच असल्याचं कारणासाठी आपल्याला हमेरिका लय आवडते , राष्ट्रभक्ती च्या नावाखाली उन्माद नाही , राष्ट्रध्वजाची बिनधास्त चड्डी शिवून आणि ती घालून तुम्ही गावभर फिरू शकता :)

थॉर माणूस's picture

6 Jan 2017 - 10:12 am | थॉर माणूस

आपल्या देशात एकूणच राष्ट्रभक्तांची अफाट असल्याने आणि त्यांची राष्ट्रभक्ती हीच खरी राष्ट्रभक्ती हे अशा लोकांचे ठाम मत असल्याने अशा विषयांवर चारचौघात चर्चा करणेसुद्धा अवघड असते. मी सुद्धा कित्येकदा लोकांना अक्षरशः कायदा काय सांगतो हे त्या शब्दात सांगितल्यावर देखील त्यांचे मत "तू राष्ट्रगीताला उभे रहायलाच हवे" असेच पडते.

कायद्यानुसार तुम्ही राष्ट्रगीताचा मान राखणे अपेक्षीत आहे आणि Ministry of Home Affairs च्या एका पत्रकानुसार उभे रहाणे अपेक्षीत आहे. यात कुठेही असा नियम असल्याचे किंवा असे न करणे गुन्हा असल्याचे लिहीलेले नाही.

नुकताच दंगल पहाताना अशा अर्धवट ज्ञानी पण प्रखर राष्ट्रभक्त झूंडीचा अनुभव घेतला. नियमानुसार...
when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem.

पण आपण उभे न राहील्यास आजूबाजूचे लोक तुम्ही जणू पाकिस्तानातून थेट इथे भारताचा अपमान करायलाच आला आहात असे पहातात, त्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला देखील उभे रहावे लागले.

असो... मुले मोठी होताना अर्थशास्त्र आणि नागरीकशास्त्र ऑप्शनला टाकतीलच, तेव्हा चिंता नसावी. ;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Jan 2017 - 12:12 pm | हतोळकरांचा प्रसाद

सहमत आहे! राष्ट्रभक्ती दाखवण्याच्या ज्या काही "मोजक्या" संधी मिळतात काही लोकांना त्यातली चित्रपट हि एक. पण आपण वर जो नियम सांगितला तोही तितकासा स्पष्ट नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला जे राष्ट्रगीत लावलं जातं ते चित्रपटाच्या रिळचा पार्ट असते का? आणि त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला व्यत्यय येतो का? दंगल मधील चित्रपटात असणाऱ्या राष्ट्रगीताबाबत वरील नियम लागू होताना दिसतो.

खरं सांगायचं तर ५२ सेकंद उभे राहण्यावरून राष्ट्रभक्ती/राष्ट्रद्रोह वगैरे गोष्टींवर चर्चा जरा हास्यास्पदच वाटते. बरेच लोक याला "म्हातारी मेल्याचं दुःख नाही...." या सदरात टाकत असले तरी मी मात्र बहुमताचा आदर करून ५२ सेकंदांत राष्ट्रभक्तीतचा अनुभव घेणे पसंद करतो.

फेदरवेट साहेब's picture

6 Jan 2017 - 4:07 pm | फेदरवेट साहेब

साला, ५२ सेकंद उबा राहूनश्यानी कवा राह्यल्यामुळे पॅट्रीऑट अन ट्रेटर वर चर्चा करने जर लाफेबल असल, तर ते ५२ सेकंद शांत बसूनश्यानी कोनला बी डिस्टर्ब न करता कोन बसले तर तेच्या अंगावर पब्लिक ब्लड हाऊण्डवानी का जात असल?

नियम फक्त एक्सपेक्टशन सांगते, कंपल्शन डिफाईन करत नाय, तसा तर नियम एक्सस्पेक्टेशन लै गोष्ट मंदी सांगते, ५२ सेकंद मंदी राष्ट्रभक्तीचा आनंद घेनारी किती जनता समदे पूर्ण करते

फझी इझन्ट इट?

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Jan 2017 - 5:03 pm | हतोळकरांचा प्रसाद

बसाकी फेदरवेटसाहेब, आपलं तर काहीच म्हणणं नाही! मी फक्त मी काय करतो एवढं सांगितलं! आणि ते तसं करण्याने माझं बिघडत काहीच नाही, उलट मला छानच वाटत! शिवाय शेवटी ते भारत माता कि जय म्हणतो त्याने तर मी नॉस्टॅल्जीकवगैरे होऊन जातो!

नियम कंपल्शन नसतात असं म्हणायचं आहे का आपल्याला? मग त्याला नियमच म्हणता येणार नाही ना! त्यामुळे वरील नियम आहे का अपेक्षा याबद्दल कोणाला माहिती असल्यास सांगावी! बाकी नियम आणि एक्सपेक्टेशन यातला घोळ योग्य त्या संस्थेने दूर करावाच की! पण कसं आहे कि काही गोष्टी या अलिखित नियम या प्रकारात पण मोडत असतात याची जाण ठेवावी.

बाकी, चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावणे हा प्रकार बंद करावा असं माझं मत आहे. त्याबरोबरच जेव्हा राष्ट्रगीत योग्य ठिकाणी असेल तेव्हा मात्र त्याचा प्रोटोकॉल कंपल्शन या प्रकारात पक्का असावा.

फेदरवेट साहेब's picture

7 Jan 2017 - 8:22 am | फेदरवेट साहेब

सन "मला बसायचा हाय" असा आपुन कुठेच बोललेला न्हाय हा भावसाहेब. तेच्यामुळे ते "बसाकी" वगैरे सिम्स औट ऑफ विंडो, असो.

बीजी गोस्ट म्हंजी, नियम कंपल्शन असतेत, पण "गाईडलाईन्स" ना नियम म्हंजीच कम्पलसरी मानत असले तुमी तर लेट मी नो अबाउट इट. बिकॉज आपुन गाईडलाईनला कंपल्शन (नियम) मानत नाही.

गोस्ट नंबर त्रण , काही गोस्टी अलिखित नियम मंदी मोडते म्हंजी अनरिटन कोड असते, ते ठीक हाय पर अनरिटन कोड फॉलो न केल्यास न करणाऱ्या बद्दल जजमेंटल होण्याबद्दल काय मत हाय तुमचे ? रिजन हा आहे का, अलिखित नियम इज अ डायसी कन्सेप्ट सन. इट्स अ फिल्दी ब्लडी एक्स्क्यूज टू हेट समवन. "नियम अलिखित हाय" म्हणले का समोरच्याचा द्वेष करने सोपे राहते असे वाटते. अलिखित नियम आर सस्टेनेबल ओन्ली इफ रिटन इन फॉर युवर पर्सनल सेल्फ. पब्लिक प्लेस वरती ते एक पळवाट असते , टू कॉर्नर एनी वन, टू अब्युज एनी वन, टू जस्ट ब्याश एनीवन एंड से " ही डीड नॉट फोलोड द अलिखित नियम, अनरिटन कोड ....."

पिलीयन रायडर's picture

7 Jan 2017 - 10:24 am | पिलीयन रायडर

तुम्ही फेदरवेट आहात की पेस्तनकाका??

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2017 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते फेदरवेट पेस्तनकाका असू शकतात ना ?! =))

पेस्तनकाकांना एका ठराविक वजनात अडकवून त्यांच्या मान्वी हक्कांवर गदा आण्ल्याबद्द्ल टुम्चा टीव्र णीषेढ =)) =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Jan 2017 - 12:57 pm | हतोळकरांचा प्रसाद

ओके! म्हणजे ते "कोनला बी" मंदी फेदरवेट नव्हते तर! आय माय स्वारी बर्र्र्रका फेदरवेटसाहेब! मी तरी कुठे कोनला बी बसू नका म्हणालो? पण ते राहूदे!

मी तेच तर विचारले कि वर लिहिलेला नियम आहे कि गाईडलाईन? आणि यात काही संदिग्धता असेल तर ती संबंधित संस्थेने काढून टाकावी! पण म्हणणं एवढंच आहे कि समजा त्या संस्थेने हि गोष्ट नियम किंवा कायदा म्हणून आणली तर मात्र मग अशी जबरदस्तीची देशभक्ती नको वगैरे गळे काढू नये.

बाकी ते कॉर्नर, अब्युज वगैरे सरसकटीकरण कशाला? ते जेव्हा ज्या नियमाच्या बाबतीत जिथे घडतं त्या संदर्भात तिथे त्याच्यावर टीका/विरोध करावा. ५२ सेकंड्स उभे राहण्यापेक्षा मी बसणेच कसे योग्य आहे आणि असं उभा राहून माझी देशभक्ती दिसते का वगैरे फोल मुद्दे मांडून उगाचच स्वतःच्या हेकेखोरपणाला कुरवाळणाऱ्या लोकांना काही समजावून सांगण्यास जाऊच नये असं माझं मत आहे. उलट जसं बसून अशा माणसाने आपला हेकेखोरपणा सिद्ध केलेला असतो तसं इतरांनी उभं राहून आपली देशभक्ती दाखवावी आणि फार्फारतर नंतर त्या बसलेल्याकडे सगळ्यांनी त्याला जाणवेल असा एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकावा. अंगावर वगैरे जाणे असले हायपर प्रकार करण्याचं काही एक कारण नसावं!

संदीप डांगे's picture

7 Jan 2017 - 1:55 pm | संदीप डांगे

जसं बसून अशा माणसाने आपला हेकेखोरपणा सिद्ध केलेला असतो तसं इतरांनी उभं राहून आपली देशभक्ती दाखवावी आणि फार्फारतर नंतर त्या बसलेल्याकडे सगळ्यांनी त्याला जाणवेल असा एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकावा.

ही हिंसाच आहे महोदय. बसलेला माणूस हेकेखोरच आहे हे न्यायदान करायचा अधिकार इतरांना कोणी दिला. आपआपले बघावे, नै का?

रच्याकने, आमच्या शाळेत मी सातवी-आठवीत असतांना २६ जानेवारीला राष्ट्रगीत म्हणण्यासाठी महिनाभर आधी रोज तासभर प्रॅक्टीस चालायची. तयारीचा उद्देश होता, स्पष्ट शब्द, योग्य उच्चार आणि ५२ सेकंदांची वेळ, तालासुरात गायकी. ह्यासाठी आम्ही मैदानात तासभर बसून राष्ट्रगीत गायचो. अर्थात बैठे बैठे सावधान होऊन. राष्ट्रगीत झालं की बैठे बैठे विश्राम. परत सावधान-राष्ट्रगीत-विश्राम. असा क्रम चालायचा. तेव्हाही मला राष्ट्रगीत उभं राहूनच म्हणायचे असते, खाली बसल्याने चालतंच नाही ह्या गोष्टीचा भयंकर पगडा होता. पण शिक्षक असे सांगतात म्हणजे योग्यच असेल म्हणून समजून घेतले. तेव्हाची माझी भावना म्हणजे अगदी तुझी आई ही तुझी खरी आई नाही, तुला कचर्‍याच्या डव्यातून उचलून आणलंय असं म्हटल्यावर जसं फील होईल तसं वाटायचं खाली बसून राष्ट्रगीत म्हणतांना.

पुढे कळलं की आदर करणे महत्त्वाचे. तो 'व्यक्तच केला पाहिजे' व व्यक्त करण्याची सक्ती आहे का ते माहित नाही.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत हा तद्दन बकवास प्रकार आहे. तो लागू करणारे न्यायालय स्वत:च्या कार्यालयांत किंवा इतर कुठेही त्याची सक्ती करायला तयार नाही यातच सर्व आले.

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Jan 2017 - 2:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही. बसून म्हणा उठून म्हणा कसंही म्हणा, नियमात राहून म्हणा हे मत आहे माझं! आता बसलेला माणूस देशद्रोही आहे हेकेखोर आहे कि अजून काय आहे हे वैयक्तिकरित्या ठरवण्याचा स्वातंत्र्य हा देश नक्की देतो आपल्याला. त्यावरची वैयक्तिक हिंसारहित प्रतिक्रियासुद्धा स्वातंत्र्यच आहे. महोदय, जसे बसणाऱ्याला बसून मी कसा श्रेष्ठ देशभक्त आहे/नाही, मी कसा लॉजिकल आहे/नाही हे सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य आहे तसे उभे राहणार्यांना कटाक्ष टाकून आपण कसे चांगले देशभक्त आहोत/लॉजिकल आहोत हे दाखवण्याचाही संपूर्ण अधिकार/स्वातंत्र्य आहे. त्यावेळी बसलेल्याने आपापले बघावे, नै का? उगाच मी कोणाकडे कसे पहिले वगैरे म्हणजे हिंसा म्हणाल्याने मुद्दा सिद्ध होत नाही.

बाकी, बसला म्हणून त्याच्या अंगावर जाणे वगैरे, किंवा मुद्दलात चित्रपटात राष्ट्रगीत लावणे वगैरे योग्य नाही हे तर मी वर म्हटले आहेच की!

संदीप डांगे's picture

7 Jan 2017 - 3:43 pm | संदीप डांगे

साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही. बसून म्हणा उठून म्हणा कसंही म्हणा, नियमात राहून म्हणा हे मत आहे माझं!

>> कोणता नियम सांगत आहात तुम्ही? मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदा ह्यात क्लॅरिटी हवी.

As provided in Section 3 of the Act, whoever intentionally prevents the singing of the Jana Gana Mana or causes disturbances to any assembly engaged in such singing shall be punished with imprisonment for a term, which may extend to three years, or with fine, or with both.

वरील प्रमाणे कोणीही एखाद्या समुदायातर्फे सादर होणारे राष्ट्रगीत गायन रोखले, त्यास अडथळा निर्माण केला तर त्यास दंड व तुरूंगवास ठोठावला जाईल.

आता बसलेला माणूस देशद्रोही आहे हेकेखोर आहे कि अजून काय आहे हे वैयक्तिकरित्या ठरवण्याचा स्वातंत्र्य हा देश नक्की देतो आपल्याला. त्यावरची वैयक्तिक हिंसारहित प्रतिक्रियासुद्धा स्वातंत्र्यच आहे.

तुमचा गैरसमज आहे व हा लवकरात लवकर मिटवला तर बरे होइल असे वाटते. एखादा नागरिक देशद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य दुसर्‍या नागरिकाला दिले आहे हे कुठं लिहिलंय घटनेत? ठरवणे आणि वाटणे ह्यात फरक असला पाहिजे. कुणाला देशद्रोही ठरवण्याचा अधिकार-स्वातंत्र्य कुणालाही नाही, फक्त न्यायालय ठरवू शकते सबळ पुराव्यांच्या आधारे. एखादा हेकेखोर आहे किंवा नाही ह्यात तुम्ही देशभक्ती कुठून घुसडता? अत्यंत वैयक्तिक आहे हे.

वैयक्तिक मत च्या नावाखाली कसलेही विचार खपत नाहीत. विशेषतः जेव्हा त्यात कायदेशीर बाबी इन्वॉल्व असतात.

एक प्रश्न विचारतो: तुम्ही थेटरात आहात, एकजण राष्ट्रगीतास उभा राहिला नाही, दुसर्‍या एकाने त्याला बुकलून काढले तर तुम्ही कोणाच्या बाजूने असाल?

महोदय, जसे बसणाऱ्याला बसून मी कसा श्रेष्ठ देशभक्त आहे/नाही, मी कसा लॉजिकल आहे/नाही हे सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य आहे तसे उभे राहणार्यांना कटाक्ष टाकून आपण कसे चांगले देशभक्त आहोत/लॉजिकल आहोत हे दाखवण्याचाही संपूर्ण अधिकार/स्वातंत्र्य आहे. त्यावेळी बसलेल्याने आपापले बघावे, नै का? उगाच मी कोणाकडे कसे पहिले वगैरे म्हणजे हिंसा म्हणाल्याने मुद्दा सिद्ध होत नाही.

ही फार गडबड विचारसरणी आहे साहेव. माझ्या वाक्यांसारखी रचना करुनही तुमचा मुद्दा सिद्ध होणार नाही. मुळात 'उभं राहिल्यने देशभक्ती, बसल्याने देशद्रोह-हेकेखोरपणा' हा तुमचा तुम्ही शोधून काढलेला विचार आहे. त्याला विरोध झाला म्हणून तुम्ही परत तशीच वाक्ये म्हणताय जी मी म्हटली. वैयक्तिक संबंध नसतांना कोणालाही जाणूनबुजून हिणवणे हे आक्षेपार्ह आहे.

मी तर थेटरात बसत नाही राष्ट्रगीताला, पण बसलो यदाकदाचित तर असले कटाक्ष टाकणारांना कुणी अधिकार दिला माझा अपमान करण्याचा? आणि मी कोण आहे काय आहे ते शष्प माहित नसतांना मला देशद्रोही सिद्ध करण्याची गरज काय?

कोणाला काही सिद्ध करायची गरज नसते. उभं राहल्याने देशभक्ती सिद्ध झाली, बसल्याने देशद्रोह सिद्ध झाला वगैरे चित्रपटगृहात करायच्या गोष्टी नाहीत. तुमचे देशभक्तीबद्दलचे बेसिक्स क्लिअर करुन घ्यावे आधी असे सुचवतो. नंतर मुद्दे सिद्ध वगैरे होतात की नाही त्याकडे वळू.

फारच त्रास होत असेल तर रितसर पोलिस कम्प्लेंट करावी. तो एक विधायक आणि परिणाम देणारा मार्ग आहे. पण पोलिस असल्या गोष्टींमधे थेट देशद्रोह्याचे कलम लावतात जे अयोग्य आहे. तेव्हा तिथेही चुकीचे वर्तन पोलिसांकडून घडले तर त्याची जबाबदारी घ्याल काय? तुम्ही इथे म्हणताय की हिंसारहित प्रतिक्रिया दिली पाहिजे, पण त्याचे हिंसेत रुपांतर झाले तर त्याची जबाबदारी घ्याल काय? कारण आधी विचार जन्मतो, मग क्रिया घडते. कटाक्ष टाकूनही लोक सुधरत नाहीत म्हटल्यावर चिडून मारहाणीपर्यंत गोष्ट जाऊ शकते. असे होते कारण त्याच्या मूळाशी असलेला विचार. तुम्ही चारचौघात हे बोलुन दाखवत आहात, अशा विचारांना वेळीच रोखलेलं बरं असं माझं मत आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Jan 2017 - 6:55 pm | हतोळकरांचा प्रसाद

(लांब प्रतिसादाबद्दल क्षमा मागून)
अत्यंत असंबद्ध आणि विस्कळीत प्रतिसाद! शिवाय वैयक्तिक तर का हे काही अजून न सुटलेले कोडे आहे! माझ्या विचारसरणीत गडबड आहे, माझे बेसिक्स क्लिअर नाहीत, माझी मतं गैरसमज आहेत हे मांडण्याची काहीच आवश्यकता नाही हो! असो!

हां तर मुद्दा साधा आहे हो! "एखाद्याला देशद्रोही/हेकेखोर...वगैरे" वाक्यातील "वैयक्तिकरित्या" हा शब्द बाजूला ठेवून उगाचच ह्या मुद्द्याला जनरल "हे बघा राष्ट्रगीताला न उभा राहणाऱ्याला कसे देशद्रोही म्हणतात" ह्या प्रकारात ओढायचा अट्टाहास कशाला? माझा राष्ट्रगीताला उभे राहण्याबद्दलचं आणि विशेषकरून चित्रपटगृहात उभे राहण्याबद्दलचं मत वर मी स्पष्ट मांडलं आहे. ते बाजूला ठेवून उगाच वादासाठी प्रतिवाद आपल्या प्रतिसादात दिसला. एखादी गोष्ट आक्षेपार्ह्य असणे आणि बेकायदेशीर असणे यात फरक आहे याबाबतीतील आपले बेसिक्स जर क्लिअर असतील तर माझेही बेसिक्स क्लिअर करण्यात मदत करा कि मग! राष्ट्रगीताला उभे राहणे हे स्वतःच्या राष्ट्राभिमानाशी जोडून असलेल्या काही लोकांनी बसून असलेल्या एखाद्याला हिंसा न करता तुच्छतेचा कटाक्ष टाकून तू जे काही केलं ते आमच्यामते योग्य नाही असे दाखवून देणे हे आक्षेपार्ह्य असू शकते (अगदी तितकेच जितके बसणे काही लोकांसाठी आक्षेपार्ह्य आहे) पण घटनेने ते स्वातंत्र्य दिलेले नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का? एखाद्या माणसाला "वैयक्तिकरित्या" हेकेखोर किंवा देशद्रोही ठरवण्याचा अधिकार घटनेत कुठे नाकारला आहे हे जरा सांगाल का? आणि ते जर घटनाबाह्य तर मग वेल अँड गुडच! माझा मत त्या केसमध्ये तसे करणे चुकीचे आहे असेच असेल आणि शिवाय पोलिसात तक्रार करण्याचा मार्ग बसलेल्यालाही मोकळा आहेच की!

बाकी तो शेवटचा परिच्छेद तर काहींच्या काही! हिंसारहित बसण्याने आता ज्या प्रतिक्रिया येतात त्याची जबाबदारी बसणारा घेत असतो का? पोलिसात जाऊन काही उपयोग होत नाही म्हणून चिडून गोष्ट मारहाणीपर्यंत जात नसतील का? तुमचीच वाक्ये वापरण्याचा उद्देश त्यातला अर्थ हा तुमच्या मताच्या विरोधी मताच्या बाजूनेही असतो हे दाखवणे असते, त्यावर आक्षेप आहे का आपला?

जाताजाता (रच्याकनेला मराठीत हा शब्द असेल का?), तुमचे "तुम्ही चारचौघात हे बोलुन दाखवत आहात, अशा विचारांना वेळीच रोखलेलं बरं असं माझं मत आहे." हे शेवटचे वाक्य फार आक्षेपार्ह्य आहे! या विषयावरचे माझे मागचे प्रतिसाद माहित असून तुम्ही मला चित्रपटगृहात दांडगाई करणाऱ्यांच्या किंवा करायला पाहिजे असा विचार असणाऱ्यांच्या रांगेत उभा करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करत आहात का?

थॉर माणूस's picture

9 Jan 2017 - 9:33 am | थॉर माणूस

when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem.

तरीही दंगलमधे लागणार्‍या राष्ट्रगीताला उभे राहून मग उभे न रहाणार्‍याकडे तुच्छतादर्शक कटाक्ष टाकणारा वगैरे तुचियाच ठरेल नाही का? नै म्हणजे, आपल्याच देशाचे नियम आपल्याला माहिती नसताना उगाच आपणच कसे देशभक्त आणि तुम्ही कसे देशद्रोही असले कटाक्ष टाकणे कुठल्या मानसिकतेचे लक्षण आहे?

बाकी, आपली मते आणि विचार validate करताना घटना वगैरे आठवते तर मग इतरांनाही तेच अधिकार तीच घटना देते हे विसरून agree to disagree म्हणून पुढे सरकण्याऐवजी public humiliation किंवा त्यापुढे जाऊन त्रास देणे कितपत योग्य वाटते आपल्याला?

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Jan 2017 - 12:11 pm | हतोळकरांचा प्रसाद

माझी मानसिकता वगैरे काढण्यापेक्षा माझे वरचे प्रतिसाद वाचले असतात तर बरे झाले असते. अजूनही वाचावे वाटले तर वाचून घ्या आणि त्यानंतरही जर काही चर्चा करण्यासारखे असेल तर करू कि चर्चा आपण. वाचताना खालील मुद्दे समजा क्लिअर झाले नाहीत तर मी परत माझा स्टॅन्ड स्वच्छपणे मांडेन, कसे?
1. माझा चित्रपटातगृहात राष्ट्रगीत लावण्याला विरोध आहे कि पाठिंबा?
2. सध्याच्या नियमांबाबत मी काय मत वर व्यक्त केले आहे - विरोधात कि बाजूने? खासकरून तुम्ही वर जे काही ठळक करून टाकले आहे त्याबाबतीत.
3. मी "झुंडशाही" मानसिकतेला पाठिंबा दर्शविला आहे कि विरोध?
4. देशभक्त/देशद्रोही याबतीत मी काय मत व्यक्त केले आहे वर तेही पाहून घ्या!

"आपली मते आणि विचार validate करताना घटना वगैरे आठवते तर मग इतरांनाही तेच अधिकार तीच घटना देते हे विसरून" याच्याशी सहमत, सरसकट लागू केले तर!

मराठी कथालेखक's picture

6 Jan 2017 - 1:31 pm | मराठी कथालेखक

ज्यांना उभं रहायचयं ते रहातील आणि ज्यांना नाही रहायचं ते नहि राहणार... पण त्यावरुन इतरांनी फुकट फौजदारी करण्याच काय कारण ते कळत नाही. आणि मुख्य म्हणजे जो देशभक्तीने प्रेरित होवून राष्ट्रगीत वाजताना उभा राहिला आहे त्याचे त्यावेळी 'कुणी बसलेलं आहे का ?' याकडे कसे काय लक्ष जाते हे ही एक कोडेच आहे. असो.

विशुमित's picture

9 Jan 2017 - 12:56 pm | विशुमित

<<<< आणि मुख्य म्हणजे जो देशभक्तीने प्रेरित होवून राष्ट्रगीत वाजताना उभा राहिला आहे त्याचे त्यावेळी 'कुणी बसलेलं आहे का ?' याकडे कसे काय लक्ष जाते हे ही एक कोडेच आहे. असो.>>>
--ठो हसलो...!!!!!

संदीप डांगे's picture

9 Jan 2017 - 1:03 pm | संदीप डांगे

असं काय करता राव!

देशभक्तीने सुजलेला कटाक्ष टाकायला कोणी मिळते का हे बघायला नको! ;) :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Jan 2017 - 1:15 pm | हतोळकरांचा प्रसाद

हो का! राष्ट्रगीताला उभे राहताना काय डोळे बंद करून उभे राहायचे वगैरे आहे काय नियमात? उगाच बोलायचं म्हणून काहींच्या काही मुद्दा मांडायचा! चित्रपटातगृहात राष्ट्रगीत असू नये एवढा साधा मुद्दा आहे तो! तरीही जसा एखाद्याच्या मी बसणारच ह्या भूमिकेवर टाकलेला कटाक्ष "सुजलेल्या देशभक्तीचा" असू शकतो/ठरवता येतो तसा बसण्याचा आडमुठेपणापण सडलेल्या देशद्रोहाचा ठरवण्याचा वैयक्तिक अधिकार द्या कि मग!

संदीप डांगे's picture

9 Jan 2017 - 1:20 pm | संदीप डांगे

चिडायला काय झालं?

हतोळकरांचा प्रसाद's picture

9 Jan 2017 - 1:26 pm | हतोळकरांचा प्रसाद

:):) सांगितलं ना डांगेसाहेब, त्याबाबतीत निश्चित रहा! :)

शेवटचा परिच्छेद छान आहे. आवडला. तन्मयचं कौतुक वाटलं.

पैसा's picture

6 Jan 2017 - 4:25 pm | पैसा

अतिरेकी प्रमाणात माहितीचा मारा आता नकोच. त्याचे त्याला सगळे आपोआप कळेल. मुलांना विचार करायला आणि मनात न्यायबुद्धि कशी जागत ठेवायची एवढेच हळूहळू शिकवले पाहिजे.

निष्पक्ष सदस्य's picture

6 Jan 2017 - 8:28 pm | निष्पक्ष सदस्य

खरं आहे तुमचं म्हणणं,
माझ्या घराशेजारी जवळ-जवळ अंतरावर दोन विद्यालये आहेत,सकाळी जन-गण-मन आणि शाळा संपल्यावर संध्याकाळी वंदे मातरम् चा आवाज ऐकू येतो,दोन्ही शाळेचे असे मिळून चार वेळा उभं रहावे लागते,कारण एकाचं संपलं कि दुसरं चालू होतं,आणि कधी कधी एका वेळेस दोन्ही आवाज मिक्स ऐकू येतात,आता तर मी वैतागून उभं राहायचं सोडून दिलयं.

धर्मराजमुटके's picture

7 Jan 2017 - 10:19 am | धर्मराजमुटके

राष्ट्रगीताला मान दिलाच पायजे . पण मा. न्यायालय चित्रपटगृहात गीत वाजवा म्हणते पण तेच गीत न्यायायलीन कामकाजाच्या सुरुवातीला वाजविण्यासाठी नकार देते हे फारच विंटरेस्टींग हाये.
शीला की जवानी बघताना जवानी आटवायची की राष्ट्रभक्ती हा मुद्दा आहेच. तरीही मला राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यासाठी काही प्रॉब्लेम वाटत नाही. मात्र देशभक्ती टेस्ट करायची असेल तर राष्ट्रगीत हे सुरुवातीला न वाजवता चित्रपट संपल्यावर लावावे आणि किती आई के लाल थांबतात ते बघावे अशी मनापासून विच्छा हाये.

वरुण मोहिते's picture

7 Jan 2017 - 3:30 pm | वरुण मोहिते

आता आहे नियम तर पालन करावं लागणार . १ मिनिट ने उभं राहून आपलं काही जाणार नाही . चित्रपट गृहात आपण नाही उभे राहिलो तरी सगळ्यांना आपलं म्हणणं पटवता येणार नाही . शेवटी आपल्या देशाचे नियम वेगळे आपण कितीही म्हटलं वैयक्तिक स्वतंत्र तरी आपण तिरंग्या चा रुमाल आणि चड्डी तर नाही करू शकत ना ??त्यामुळे मला बसून देशभक्ती दाखवायची आहे हा आडमुठे पणा झाला . अपवाद जेष्ठ आणि अपंग लोकांचा पण तेवढी सुसंकृत अजून आपल्याकडील जनता झाली नाही . बाकी चित्रपट गृहात एक मिनिट उभं राहिल्याने आपलं तर काही जात नाही ना .
अवांतर -लास्ट पॅरा आवडला लेखातला .माझ्या भाच्याला असेच काही प्रश्न पडत असतात पण सध्या लोड नाही द्यायचा आपोआप शिकतात ते .

मराठी कथालेखक's picture

10 Jan 2017 - 4:43 pm | मराठी कथालेखक

दंगल चित्रपटात जेव्हा मध्येच राष्ट्रगीत वाजतं तेव्हा अनेकांना आता राष्ट्रगीत वाजणार आहे हे माहीत नसतं. इथे कुणी काही खात असेल (चित्रपटाची शेवटची काही मिनटंच राहिली आहे म्हणून शक्यता कमी आहे पण तरी शून्य नाही) , चहा/कॉफी किंवा अगदी बाटलीतून पाणी जरी पीत असेल तरी त्या व्यक्तीस सावरुन उभ रहायला काही अवधी लागू शकतो, उभ राहताना हातातल्य गोष्टी खुर्चीवर ठेवणे , ठेवताना काही पडणे असे खूप काही होवू शकते. त्या परिस्थितीचा विचार करता वर "थॉर माणूस" यांनी दिलेला नियम अगदी योग्य वाटतो.

when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem

त्यामुळे निदान दंगलच्या शेवटी वाजणार्‍या राष्ट्रगीताकरिता कुणी उभं राहिलं नाहीतर इतरांनी दंगल करु नये तसेच त्या व्यक्तीला देशद्रोही वगैरे मानण्याची घाई करु नये असे मला वाटते.
बाकी चित्रपटाआधी वाजणार्‍या राष्ट्रगीताकरिता ही कुणी देशभक्त बनून कायदा हातात घ्यावा हे योग्य नाहीच.

संदीप डांगे's picture

15 Jan 2017 - 11:15 pm | संदीप डांगे

एक सुंदर व्हिडियो!