गोंधळ

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
4 Dec 2016 - 6:02 pm

दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड

नाशिबाचा फेरा कोणा चुकला
कर्माची फळं जीवाच्या पदरा
तुझ्या कृपाळु नजरेचा भुकेला

दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड

पैशाचा भुकेला मनुष्य जाहला
नात्याच्या भुकेला शोष पडला
वेळेअभावि एकटा पडला

दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड

तुझ्या दारी कोणी वेगळा नाही
चरणी तुझ्या जीव धन्यच होई
बये घे पदरी... हे करुणाई

दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड

तुझ्या प्रेमाची भूक लागली
मनाची माझ्या काहिली होई
दर्शन दे मज माझे तुकाई

दार उघड बये दार उघड
तुझा गोंधळ मांडिला
दार उघड

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

शार्दुल_हातोळकर's picture

5 Dec 2016 - 7:17 pm | शार्दुल_हातोळकर

गोंधळातील कडव्यांमधे तीन ऐवजी चार ओळी असत्या तर सूरात म्हणताना अधिकच छान वाटले असते, असे मला वाटले.