अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक २.......

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
30 Nov 2016 - 10:05 am

चला...
नोव्हे. २०१६ दुपारचे २. ओलाने पुणे स्थानकासाठी प्रस्थान. १५२० ला पुणे जयपूर एस्क्प्रेसचे प्रस्थान. रात्रीची न येणारी झोप रेल्वेत. सकाळी जाग आल्यावर बाहेर पहातो ते रतलाम स्थानक आलेले. गाडी पुन्हा मार्ग क्रमित दौडतेय. आता बाहेर एक मजा दिसू लागलेय. मधेच सिमेन्टच्या कारखान्याचा पसारा. मधेच शेती. आपण कुठेतरी पातळ दगडांच्या सहवासात आलो आहोत याची जाणीव जशी दक्षिणेत शहाबाद ,बागलकोट भागात होऊ लागते इथे तेच. पण तिथला रंग वेगळा इथला वेगळा. इथे बदामीसर रंगाच्या फरशांची पाच पाच फूट उंचीची कुंपणे शेताभोवती. एका स्लाईसचा रंग दुसरीहून भिन्न. दगडी दुपटं जणु उभं वाळत घातलेलं.
सौंदर्य पहाणार्‍याच्या नजरेत असते त्याचा अनुभव येऊ लागला. पहाता पहातो कोटा स्टेशन आले. आपल्या स्वयंपाक घरात हटकून दिसणारा कोटा दगड इथे घरांच्या भिंतीत आडवा विसावलेला दिसतो. ती भिंत पाहायला ही मजा येते. अशा उघड्या भिंती पहायची आपल्या शहरी प्लास्टर वाल्याना संवय नाही ना ? पुढ मग मागचाच सीन पुढे.मधुनच तपकिरी रंगाच्या मोठमोठ्या स्लाईस उभ्या करून रचून ठेवलेले मोठ मोठे डेपो. काही ट्मदार अगदी साफसुधरी रेलेवे स्टेशन. आपल्या कडील देशावरील घाण खेडेगावांच्या तुलनेत खूप मस्त खेडी. सगळीकडे बदामी वाळू मातीतून डोकावून आपल्या कडे बघतेयशी. असे करता जयपूर जवळ येते. कोटा स्टेशनवर फार॑ चविष्ट बटाटेवडा खायला मिळतो.असा वडा मी तरी वडयाच्या
माहेरघरी आपल्याकडे खाल्लेला आठवत नाही. मधेच गाडीत पेरूवाला येतो. पेरू कापायची पद्धत वेगळी. पेरू आडवा कापायचा मग उभा कापून त्याचे फ्रूट डीश करून द्यायची पद्धत. मसाला आपल्यापेक्षा वेगळा व चविष्ट. पेरूची चव काय म्हणून सांगू.? आपल्याकडे असा पेरू फारच क्वचित मिळतो. तिकडे सर्व पेरू मोठे गोल व लेमन यलो रंगाचे. व स्वस्त ३० रू किलो. ५० रू किलो .दौलताबादच्या किल्याच्या प्रवेशद्वारात असा चविष्ट पेरू खाल्याचे आठवते.

दुपारचा एक वाजल्याचा सुमार होत जातो. जयपूर जवळ येउ लागते. अजमेर रोडचा ओव्हरब्रिज पार करीत रेलेवे स्टेशनात स्टेशनात शिरते. बाहेर ही गर्दी. होटेलने पिकपचे पैसे बिलात लावलेले असतात.लाल भडक रंगाच्या इन्डिगो मधून पाच मिनिटात होटेल. नेहमी प्रमाणे किती रहाणार काय पाहाणार अशी ड्रायव्हर कडून चाचपणी.
चेक इन चा उपचार पुरता झाल्यावर खोलीत प्रवेश. व वेब साईटवर न दाखवलेली खोली मिळायाचा अनुभव. जाउ द्या असे समजून स्नान वगेरे उरकणे सुरू.

ठरलेल्या प्लानप्रमाणे दु. साडे तीन ला बाहेर पडलो. रिक्षावाल्याने आम्ही जिथे सांगितले त्याऐवजी एका एम्पोरियम मधे सोडले. '.आरं तिज्या मारी ! ह्यानं इकडं कुठं सोडलं ?' असा प्रश्न पडला. आमच्या पोटात कावळे व त्यांच्या मनांत विक्री. आमचे महिला मंडळ त्या रजया ई ई पाहयला बसले. पाच हजार ,दहा हजार ! बहुदा त्यानी आमची पादत्राणे पाहिली नसावीत. ती पाहिली असती तर त्यानी आम्हाला आत देखील घेतले असते की नाही श़ंका. कळस म्हणजे त्याने १५ हजाराची रजई दाखविली. मी आपला कॅशियर शी गप्पा ठोकित उभा. " हम हप्तेमे एक ही दिन ये होलसेल दुकान रिटेल के लिये खुला रखते है ! " तो सांगत होता. मी मनात म्हटले " लेका काय थापा मारतो ! सेटअप तर होल्सेल दुकानसारखा दिसतच नव्हता " . तो रिक्षावाला ५० एन्ट्री देता झाला की त्याला एक गिफ्ट दिली जाते. अशी त्याने माहिती दिल्यावर मला ते रिक्षावाल्याचे " घाई "कोडे उलगडले.
लुटुपुटूच्या खरेदीत मग्न झालेल्या आमच्या मंम ला जरा आवाज चढवूनच बाहेर काढले. एक दुसरा रिक्षावाला गाठला . " चलो बिर्ला मंदिर" असा हुकूम झाल्यावर अनेक सुरेख रस्त्याना चौकाना पार करीत रिक्षा " एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या प्रशस्त रत्याच्या कडेला उभी राहिली.
.
ही टेकडी म्हणजे.मोती डुंगरी. त्या टेकडीवर स्कॉटिश पद्धतीची एक गढी आहे. ती लाईम स्टोन मधे बांधण्यात आली असून त्यात गणपतीचे एक मंदीर ही आहे.
.
टेकडीव्या पायथ्याचा काही भाग सपाट करून त्यावर १९८८ मधे बिर्ला उद्योग समूहाने हे मंदीर पूर्णपणे उच्च दर्जाच्या सफेद संगमरवर दगडात बांधले आहे. ( या बिर्लाना मार्बल काय फुकट मिळतो की काय ? अशी रास्त श़ंका .)आत लक्ष्मी व नारायण यांच्या रेखीव व देखण्या मूर्ती आपले लक्ष वेधून घेतात.
.

बाहेर मंदिरसमोर मोठी आकर्षक फरसबंदी आहे. त्यावर विसावून मंदिराकडे पाहण्याचा आनंद लुटत आम्ही काही फोटो काढले.एव्हाना सांज होत आली होती.रस्ता अखंडपणे वहात होता. पोटात भूक असल्याने मन्दिरासमोरच एका ठेल्यावर गेलो. पाव भाजी फस्त करीत पोटाला शांत केले. आता आमचा प्लानमधे "जवाहर सर्कल" हे नाव पुढे आले.

जयपूर पिन्कसिटी हा भागाचे "मान पोळ" दरवाजा मधून उतरेस पि़ंकसिटीकडे चौडा रास्ता हा रस्ता जातो तर याच ठिकाणावरून दक्षिणेकडे जवाहरलाल नेहरू मार्ग जातो. या मार्गावर मेडिकल कॉलेज, डॉल म्युझियम, बिर्ला मन्दिर, राजस्थान विद्यापीठ ,वर्ल्ड ट्रेड पार्क अशी स्थाने घेत हा रस्ता एका मोठ्या उद्यानासमोर संपतो. हे बिशाल गोलाकार उद्यान सद्या संक्रमणावस्थेत आहे. याचे अत्यंत देखणे असे प्रवेशद्वार तयार झालेय. व आतमधे काही सुधारणा करून आणखी आकर्षक पर्यटन स्थळ कसे होईल त्याचे प्रयत्न चालू आहेत.आम्ही गेलो तेंव्हा चांगलाच अंधार झाला होता. व दुरूस्ती कामामुळे उद्यानातील बरेचसे दिवे बन्द होते. हे असले कसले उद्यान असे वाटत होते. इथला कारंजाचा शो चालू व्हायला पाउण तास तरी अजून जायचा होता. काय करावे म्ह॑णून बाहेर आलो.समोर आईस क्रीमच्या गाड्या उभ्या. मस्त टाईम पास झाला. मधुमेह आहे हे सात दिवस विसरायचे ठरवले होतेच.

जवाहर सर्कल हे आशियातील सर्वात मोठे सर्कल पार्क आहे असा स्थानिकांचा दावा आहे त्याचा व्यास ४५२ मीटर असून मधे एक तलाव आहे त्यात आम्ही पहाणार असलेला लाईट एन फाउंटन चा शो दाखविला जातो. वेळ संध्या ७ ते ७.३०. प्रवेशमुल्य
नाही.
सातच्या आधी जागा पटकावून बसलो.पण शो सुरू होताच सगळे जागेवरून उठून तलावाभोवतीच्या रेलिंगला भिडले. मधोमध पाण्याच्या तुषारांचा पडदा त्यावर देशभक्तीपर गीते असलेले व्हिडिओ. हे प्रकरण दहा एक मिनिटात सम्पल्यावर मग कारंजांचे नॉझल्स त्याना आखून दिलेल्या सेटप प्रमाणे आजूबाजूला किंवा उंच असे फवारे फेकू लागले.
.
.
.

.

.

अनेकाना माहीत असेल की हे सारे निरनिराळे रिले वापरून केलेले तंत्र असते. पाण्याचा प्रवाह व दाब तसेच नॉझलची दिशा यांत अनेक बदल करून निरनिराळे आकारात पाणी उडवायचे व त्यावर विविध रंगाचे झोत टाकून ही मजा द्विगुणित करायची असा प्रकार असतो. त्यात लेझर चा समावेश झाला तर सोनेपे सुहागा. पण इथे अजून तरी लेझरला प्रवेश नाही दिसला.
संपूर्ण शो मधे संगीत व कारंजाचे डिझाईन त्याचा वेग याचा काही संबंध आहे असे वा॑टत नव्हते. एका बाजूला संगीत ढाण ढण वाजत होते. त्याची काही दखल न घेता कारंजी बागडत होती. एकूण सरकारी कारंजे आहे चालायचेच असो म्हणून बाहेर पडलो.

बाहेर आल्यावर आजचा शेवटचा मुद्दा म्हणजे वर्ल्ड ट्रेड पार्क पहायचे ठरवून रिक्षा केली. राजस्थानच्या रिक्षात चार माणसे आरामात एकाच लाईन मधे बसतात. पाचेक मिनिटात वर्ल्ड ट्रेड पार्क च्या प्रांगणात येऊन दाखल झालो.
.
हा एक मॉल आहे.नोर्थ विंग वा साउथ विंग से दोन टॉवर एकमेकाना ब्रिज ने जोडलेले आहेत.
सदर चित्र जालावरून साभार
.
.

.
.
.
.
आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी या इमारतीवर एरवी असलेले फ्लड लाईट बन्द होते .तळमजल्यावरची कारंजी चालू होती व ती विलोभनीय दिसत होती.
.

.

.

.

.
जयपूर मधे उंच इमारती कमी आहेत. पसरलेले शहर असे जास्त आहे .नेहरू मार्गावरील ही एक ठळकपणे नजरेत भरणारी वास्तू आहे. टिपिकल मॉल प्रमाणे विक्रीचे स्टॉल्स,खाण्यापिंण्याची दुकाने, सरकते जिने, दिव्यांचा लखलखाट,एक चित्रपट गृह वगरे सर्व मौजूद.
.
फूड कोर्ट कडे जाणारा मार्ग.
.
येथील फूड कोर्ट सर्व स्टॉलसाठी खायला बसण्याची टेबल्स कॉमन आहेत.बर्‍याच मिपाकराना आवडेल असे ठिकाण.. तुर्की, थाई, चायनीज इटालियन सगळे इथे रांगेने उभे आहे.
.

हेच ते सुरेख झुम्बर.
पण दुकाने फारशी चालली आहेत असे दिसत नाही. बरेच लोक इथे टाईमपास म्हणून फक्त विन्डो शॉपिम्गसाठी येताना दिसत होते. आम्ही त्यातलेच एक. पिझा खादना शिवाय आम्ही कोणतीही खरेदी इथे केली नाही. येथे एक दालन असे आहे ज्यात स्टॉल्सना वेगवेगळे आकार म्हणे पिसाचा झुकता मनोरा, जहाज, जपानी देवालय, डवल डेकर असे. वर छतावर एल ई डी च्या उन्हा माळा वरून खाली सोडलेल्या त्यात पाणी पाझरत खाली पडावे असा दिव्यांच्या खाली येण्याचा सिक्वेन्स तयार केलेला. उल्कापाताप्रमाणे काहीसे हे द्र्ष्य दिसते.मोठ्या फॉयरच्या छताला एक भव्य झुम्बर लटकले आहे.

अरूप बरतारिया या तरूणाने पर्यटन व्यापार व मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असलेले एक स्वप्न पाहिले. अनेक कायदेशीर अडचणीना तोंड देत त्याने हे स्वप्न साकार् केले आहे. यातील नॉथ ब्लॉक मधे सोनेरी रंगाची थीम तर साउथ ब्लॉक मधे पांढर्‍या रंगाची थीम वापरण्यात आलीय.येथील छते अगदी अनोखी अशी आहेत. मेक्सिको, पॅरिस, सिस्तीन चॅपल रोम, अशा थीम्स त्यात वापरण्यात आल्या आहेत.
तास दीडतास हा अचाट मनोरंजक अनुभव घेत आम्ही बाहेर पडलो. आत थेट हॉटेलवर जाण्याची वेळ झाली होती.

क्रमशः

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

30 Nov 2016 - 10:14 am | मराठी_माणूस

फक्त वर्ल्ड ट्रेड पार्क चा फोटो दिसत आहे.

अनुप ढेरे's picture

30 Nov 2016 - 10:23 am | अनुप ढेरे

मला पण

माझीही शॅम्पेन's picture

30 Nov 2016 - 12:37 pm | माझीही शॅम्पेन

अगदि + १

खेडूत's picture

30 Nov 2016 - 10:33 am | खेडूत

मस्त.
बाकी जग फिरताना भारतातच कितीतरी उत्तम ठिकाणं पहायची राहून जातात!अता नक्कीच पहाणार.
फोटू दिसत नाहीत.
(सं म.कडून शीर्षकही रिपेर करून घ्यावे.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Nov 2016 - 11:26 am | कैलासवासी सोन्याबापु

जयपूर हल्ली खूप सुरेख केलेले आहे. लाल दगडाचा मुबलक पुरवठा अन वापर उत्तमरीत्या केलेला सापडतो इथे. तशीच राजस्थानातली इतर शहरं (खासकरून पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाची) म्हणजे जोधपूर, अबू रोड, सिरोही, जैसलमेर, बिकानेर, पुष्कर वगैरे सुद्धा आता विकसित होत आहेत. रस्ते अतिशय उत्तम केलेत राजस्थान मध्ये.

बाकी, तुम्हाला ओरछा, झांसी, ललीतपुर वगैरे आवडले का? ग्वालियर कानपुर (लखनऊ) हायवे ह्या पूर्ण भागातून जातो, अनवट ग्रामीण जीवन अन स्वच्छ खेडी पहायची मजा ह्या भागात प्रचंड येते, खासकरून थंडीत. गरम उबदार ऊन, रस्त्याच्या दोन्हीबाजूला हिरवीकंच गहू शेती (हाच तो मध्यप्रदेशातील प्रसिद्ध टपोऱ्या दाण्याचा सीहोर गहू) अन मध्ये मध्ये छोटी छोटी खेडी. खाण्यापिण्याची चंगळ असलेला भाग, वाह! मजा आली वाचून

(ग्वालियर अन अकादमीच्या आठवणीत अंमळ हळवा) बाप्या

एकनाथ जाधव's picture

30 Nov 2016 - 11:51 am | एकनाथ जाधव

फोटो दिसत नाही

फोटो दिसले नाहीत, वर्ल्ड ट्रेड सेन्टर चा फोटो वगळता.

लॉरी टांगटूंगकर's picture

30 Nov 2016 - 12:10 pm | लॉरी टांगटूंगकर

फोटोच्या बाबतीत गणेशा,
कमाल वर्णन! _/\_

छानच लिहिलेय आणि वर्ल्ड ट्रेड सेन्टर चा फोटो फक्त दिसला.

प्रचेतस's picture

30 Nov 2016 - 4:23 pm | प्रचेतस

वर्णनाची शैली खूपच छान. पण वर्ल्ड ट्रेड सेन्टरचा फोटो सोडून एकही दिसेना.

चौकटराजा's picture

30 Nov 2016 - 4:43 pm | चौकटराजा

फटू दिसतात का आता ?

असंका's picture

30 Nov 2016 - 4:47 pm | असंका

होय..

आणि फार सुरेख आहेत!

धन्यवाद!

प्रचेतस's picture

30 Nov 2016 - 4:48 pm | प्रचेतस

दिसले काकाश्री

यशोधरा's picture

30 Nov 2016 - 5:09 pm | यशोधरा

फोटो दिसले.

सूड's picture

30 Nov 2016 - 6:43 pm | सूड

वाचतोय.

अगले समय आप हमारे गाइड. मजा आली. फोटो बहार!!!

चित्रगुप्त's picture

30 Nov 2016 - 8:26 pm | चित्रगुप्त

प्रवासवर्णन झोकात चालले आहे, वाचायला मजा येत आहे.
जयपूरला मी चार-पाचदा गेलेलो असेन. १९८२ च्या सुमारास गेलेलो असताना आमेरच्या किल्ल्यवर (आणि वरती जयगढ किल्ल्यात) मी अक्षरशः एकटाच तिथे होतो त्यामुळे अतिशय अद्भुत, अविस्मरणीय एकांत-भ्रमण अनुभवले होते. पुढे हळूहळू गर्दी वाढत जाऊन आता २-३ वर्षांपूर्वी आमेरच्या किल्ल्यावर आपण कश्याला झक मारायला आलो, असे वाटले. मुंबईच्या लोकल स्टेशनसारखी गर्दी तिथे होती.
बाकी ते कारंजे, ट्रेड सेंटर वगैरेसारख्या जागा बघायला मी जातच नाही. हे सर्व प्रकार म्हणजे भारतीय समाजमनाला आलेली सूज आहे, असे 'यांचे' (म्हणजे आमचेच) म्हणणे.

पैसा's picture

30 Nov 2016 - 11:52 pm | पैसा

मस्तच लिहिलंय!

चौथा कोनाडा's picture

26 Jan 2019 - 5:18 pm | चौथा कोनाडा

मला फोटो दिसत नाहीयत.

असं का होतंय.

जाला वरच्या फोटोज ची एक्सपायरी झालीय का ?