व.. व... व्हिडिओचा! ऊर्फ मिपा फिल्लम इन्स्टिट्युट!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in जनातलं, मनातलं
18 Nov 2016 - 12:51 am

राम राम!

तर आता आपलं मिपा युट्युब चॅनल सुरु झालेलं आहे. आणि त्यावर दंगा करायला नवा उपक्रमही येत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अनेकांना आहे की हे व्हिडिओ बनवायचे कसे?!

काही नाही हो.. इयत्ता दुशली ब चा कार्यानुभवचा वर्ग आहे!

आम्ही मिपा युट्युब चॅनलवर अजुन दोन व्हिडिओज आणलेत.

१. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल
२. हा व्हिडिओ विंडोज मुव्ही मेकर मध्ये कसा बनवला ह्याची झलक

धागा उघडायला जड जाऊ नये म्हणुन केवळ लिंक्स देत आहोत, प्रतिसादांमध्ये व्हिडिओ टाकु!

आणि हो.. अर्धे मिपाकर हापिसातुन चोरुन चोरुन मिपा बघतात हे आम्हाला माहिती असल्याने, एक क्विक समरी सुद्धा इथे देत आहोत.

व्हिडिओ बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येकाचे काही फायदे आणि तोटेही आहेत.

१. विंडोज मुव्हि मेकर

WMM

हे एक चकटफु आणि चांगल्या दर्जाचं सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही व्हिडिओ एडीटर मध्ये आधी विषयाशी अनुरुप फोटो टाकावे लागतात, मग त्याच्या मागे ऑडिओ फाईल टाकावी लागते. अगदी बेसिक व्हिडिओ बनवायला हे पुरेसं आहे.

पण तुम्हाला हवं असेल तर फोटोंचा सिक्वेन्स बदलणे, टाईमिंग देणे, अ‍ॅनिमेशन्स देणे, ऑडिओ फाईल स्प्लिट करणे, तिला फेड इन - फेड आउट देणे इ. कामे करता येतात. फोटोंच्या खाली टेक्स्ट टाकुन त्यालाही खाली-वर-गोल-गोल वगैरे फिरवता येतं. पिक्चर सुरु होताना जशी नावं येतात तसंच करायचं असेल तर ते टेम्प्लेटही उपलब्ध आहेत.

फायदे -
१. वापरायला अत्यंत सोपे आणि सुटसुटीत. युझर इंटरफेस उत्तम
२. ऑफलाईन काम करु शकता. फोटो आणि ऑडिओ असला तर इंटरनेट वगैरेची गरज नाही.

तोटे-
१. सॉफ्टवेअर डालो करावे लागते आणि मग फक्त त्याच लॅपटॉप / कॉम्पुटरवर काम करावे लागते.
२. फार काही हाय-फाय ऑप्शन्स नाहीत. स्क्रिन कॅप्चर फिचर किंवा स्वतःची ऑडिओ लायब्ररी वगैरे उपलब्ध नाही.

२. युट्युब व्हिडिओ एडिटर

YouTube

युट्युब मध्ये डॅशबोर्डमध्ये गेलात, की क्रिएट मध्ये व्हिडिओ हा पर्याय निवडा. इथे तुम्हाला व्हिडीओ बनवता येतो. सगळी पद्धत वर सांगितली तशीच आहे. फोटो घ्या आणि त्यामागे तुमची ऑडिओ फाईल लावा. इथेही अ‍ॅनिमेशनचे पर्याय आहेतच.

फायदे
१. इंटरनेट हाताशी असेल तर काहीही डाऊनलोड न करता जगात कुठुनही काम करता येते. आणि ते तुमच्या अकाऊंट्ला सेव्ह होत रहाते.
२. तुमच्या गुगल ड्राईव्ह मधले फोटो इथे आपोआप लिंक होत असल्याने, अल्बममधुन हवे ते फोटो सरळ व्हिडिओ मध्ये ड्रॅग करता येतात.

तोटे
१. इंटरनेट आवश्यक आहे. ते नसेल तर एडिट कराण्याचे पर्याय कदाचित वापरता येतील पण काम सेव्ह करता येणार नाही.
२. ऑडिओ एडीट (ट्र्म, स्प्लिट, फेड इन-आउट) करण्याचे पर्याय मला तरी अजुन सापडले नाहीत.

ह्या व्यतिरिक्त अजुनही खुप पर्याय आहेत, थोड्या जास्त करामती करायच्या असतील तर इतर सोफ्टवेअरचा आधार घ्यावा लगतो.. आम्ही ते प्रतिसादांमधुन टाकत राहुच.

आपल्या "गोष्ट तशी छोटी..!" उपक्रमात ह्याचा कसा उपयोग करुन घेता येईल?

१. कोणताही लेख ज्यात खुप सार्‍या चित्रांचा समावेश आहे, तो लेख हिडिओ आर्टिकल मध्ये जास्त भारी वाटेल. जसं की एखाद्या पिक्चरची ओळख करुन देताना, त्या पिक्चर मधले सीन कट करुन मध्ये टाकले आणि त्यावर टिपण्णी केली तर वाचकांना नक्की काय घडले हे इमॅजिन करत बसावे लागत नाही. सेट, मेकप, लोकेशन इ. "दाखवायच्या" गोष्टी व्हिडिओ आर्टिकल मध्ये मस्त उलगडतील.

२. समजा तुम्हाला "रोसेश साराभाई - एक अनवट कवी" ह्यावर बोलायचं असेल, तर रोसेशचा आवाज, शब्दफेक, "मॉमा" अशी आर्त हाक ह्या शब्दातीत गोष्टींना तुम्ही लेखात कसं बरं बसवणार?! अशा वेळेला साराभाईमधला रोसेशचा व्हिडिओ क्रॉप करुन तो वापरला तर विचार करा प्रेक्षकांच्या मनावर किती ठसतील त्या कविता! अशी अनेक "रसग्रहणं" अशा पद्धतीने व्हिडिओ क्रॉप करुन होऊ शकतात.

३. ज्या मुलाखती आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातुन इथे प्रकाशित करतो, त्याच व्हिडिओ शुट करुनही इथे टाकता येतील. किंवा निर्मिती संस्थाची माहिती तिथले काम दाखवुन देता येईल. मेकप आर्टिस्टची मुलाखत असेल तर ती "आर्टिस्ट अ‍ॅट वर्क" असेल तरच खुलुन दिसेल. त्याचेही शुटींग अथवा फोटो टाकता येतील.

४. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कठपुतलीचा खेळ बघत असाल आणि पटकन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेवत असाल, तर लगे हाथो दोन शब्द त्या कलाकारांशीही बोला. असं मनोगत आणि त्यांच्या कार्यक्रमाचं शुट एकत्र करुन छोटीशी डॉक्युमेंटरी सुद्धा होऊ शकते.

ही झाली काही उदाहरणं! तुमच्या डोक्यातुन अजुन सुपीक कल्पना येतीलच.

फक्त काहीही करताना आपण कॉपीराईटचा भंग होऊ देत नाही आहोत ना, हे जरूर तपासा!

समांतरः-

गोष्ट तशी छोटी - म्हणजे काय रे भाऊ?
नवीन उपक्रम : गोष्ट तशी छोटी..! - आवाहन

कथामाहिती

प्रतिक्रिया

म्हया बिलंदर's picture

25 Nov 2016 - 6:01 pm | म्हया बिलंदर

चित्रकाराला जवळ ब्रश, पेन्सिल, कॅनवास, साधा कागद देखिल भेटु नये, किंवा एखाद्या कविला अकाउंट्स च्या फर्म मधे नोकरी मिळावी असं काहिसं झालय. मी काही स्वत:ला मोठा एडिटर म्हणत नाही पण एडिटींग चे पिनॅकल पासुन एफ्.सी.पी. पर्यंत सगळे सॉफ्ट्वेअर्स हाताळलेत. स्टुडिओ ते चॅनल, आय मॅक ते मॅक प्रो वर काही वर्षे एडिटींग चा अनुभव, थोडं ब्रश अप करावं लागेल. आणी आता........... असो. काही सुचवु शकलो तर नक्कि सुचवेन.
ता.क. - मी पुण्यात राहतो. जवळ डेस्कटॉप/लॅपटॉप नसल्याने काही करता येत नाही. कोणासही मदत लागल्यास सेवा घरपोच नि:शुल्क मिळेल(माझ्या सवडीनुसार(आवड आहे हो प्रचंड, सवडच भेटत नाही)).

पिलीयन रायडर's picture

27 Nov 2016 - 5:27 am | पिलीयन रायडर

अरे वा!! पुण्यातल्या मिपाकरांनो लक्ष द्या!

खटपट्या's picture

7 Dec 2016 - 11:22 pm | खटपट्या

धन्यवाद. तुमची मदत नक्की घेतली जाइल...

"संगणक,ल्यापटॅाप नसल्याने ----"

- - मोबाइलात त्याहून अधिक करता येतं. कॅम्र्यासह नेताही येतो पण... या फाइल्स जोडून ओडिओ टाकून दहा मिनिटांच्या केल्या की ६०एमबीपेक्षा जास्ती होतात ते अपलोड/डाउनलोड परवडणारं नाही॥

म्हया बिलंदर's picture

25 Nov 2016 - 7:10 pm | म्हया बिलंदर

मोबाइलात त्याहून अधिक करता येत असेल तर "आमचा अनुभव तोकडा" असं आम्ही म्हणू,६० एमबी पेक्षा पण कमी करता येउ शकतात, आता नेमका कम्प्रेसर सांगता नाही येणार पण ते नक्कीच शक्य आहे.

कंजूस's picture

25 Nov 2016 - 9:48 pm | कंजूस

आहे ना कम्प्रेसर पण 720p video ला 240x320 करावं लागतं/होतं.फोटोंचं रेझलुशनस कमी आणणे हेसुद्धा आलंच. काहीच कम्प्रेस न करता केलेली फाइल ब्लुटुथने समोर देऊ शकतो. आपले टिव्ही चानेलचे sd चानेल कार्यक्रम अर्धा तासांचे रेकॅार्ड केले तर 400 mb असतात. जरा बरे क्वॅालटी 900 mb . HDचा विचारच नाही केलाय

पापिलर डिमांडवरुन डेडलाईन १५ पर्यंत पुढे नेत आहोत. लेखकांनी नोंद घ्यावी

( पिराच्या) हुकुमावरुन (गरीब बिचारी) स्रुजा ;)

कालच्या माथेरान ट्रेकचा एक व्हिडिओ बनवलाय ओडिओ कॅमेंटरी जोडून. मूळ व्हिडिओ १२०एमबी होता त्याला १० एमबीपर्यंत कमी केल्याने पिक्चर क्वॅालटी कमी झाली आहे . युट्युबवर टाकून तुम्च्याकडे लिंक पाठवायची का?दीड मिनिटाचा आहे.

पिलीयन रायडर's picture

9 Dec 2016 - 10:56 pm | पिलीयन रायडर

misalpav.channel@gmail.com

इथे व्हिडिओ पाठवाल का?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Dec 2016 - 6:16 am | अत्रुप्त आत्मा

@त्याला १० एमबीपर्यंत कमी केल्याने ››› कसं कमी करतात?

तो ओडिओ मिक्स केलेला व्हिडिओ काल युट्युबवर( माझे अकाउंट) अपलोड करण्याचा प्रयत्न केला पण प्रोसेसिंग मध्येच अडकायचा. आता मिसलपाव जिमेल लाही अटॅच होत नाही. एक करतो - साधा व्हिडिओ आणि जोडण्याचा ओडिओ वेगवेगळे पाठवून बघतो.

व्हिडिओ कम्प्रेसर अॅप असतात( तीनचार एमबीची ) ती ओफलाइन झटकन काम करतात. 1280x.. ,960x.,640x.., videoला 480x..,320x..करतात. त्यामुळे एमबी कमी होतात पण व्हिडिओ क्वालटी ढिसाळ होत जाते.