ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
14 Nov 2016 - 3:22 am
गाभा: 

नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.

या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :

१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.

२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.

३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.

माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...

काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.

त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.

बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.

केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.

इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.

मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.

हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.

आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.

परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

प्रतिक्रिया

मिहिर's picture

14 Nov 2016 - 4:02 am | मिहिर

पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे.

ते कोकणीत आहे. हिंदीत 'दो हज़ार रुपये' असे मोठ्या फाँटमध्ये छापले आहेच.

प्रीत-मोहर's picture

14 Nov 2016 - 10:09 am | प्रीत-मोहर

Exactly दोन हजार रुपया हे कोकणीत लिहिलय.
ती चुक नाहीये. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

अच्छा असं आहे काय ? मी टिव्हीवरच्या बातमीत नोट दाखवून सांगितले ते लिहिले होते. टिव्ही अत्यंत अविश्वासी माध्यम बनले आहे याचा हा अजून एक पुरावा ! म्हणजे आता फक्त एक शाईचा मुद्दा राहिला, तोही टेक्निकल आहे.

स्वधर्म's picture

14 Nov 2016 - 6:42 pm | स्वधर्म

नाही. ती चूकच असावी असे वाटते. कोकणीत रुपया असे म्हणत नाहीत, रुपे असे म्हणतात, हे whatsapp वर वाचले अाहे.

पैसा's picture

14 Nov 2016 - 7:19 pm | पैसा

आम्ही कोकणी बोलणारे सांगतोय की ते कोंकणी आहे. रुपे नक्कीच म्हणत नाहीत. रुपय, रुपये. रुपै, रुपया असे बरेच उच्चार कोंकणीत होतात.

यशोधरा's picture

14 Nov 2016 - 7:22 pm | यशोधरा

+१

स्वधर्म's picture

15 Nov 2016 - 12:46 pm | स्वधर्म

धन्यवाद पैसा ताई व पिशी अबोली.

पिशी अबोली's picture

14 Nov 2016 - 10:10 pm | पिशी अबोली

जुन्या चालत असलेल्या नसलेल्या नोटा बघा की. असंच लिहितात.

मोहनराव's picture

14 Nov 2016 - 9:46 pm | मोहनराव
डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या कापदाने घासून आणि पाण्यात भिजवून रंग जात आहे असे दाखवत होते. त्याशिवाय एक भूतकाळात टंकसाळीत क्वालिटी कंट्रोल करणारी व्यक्ती आनली आहे असे सांगून तिच्याकरवी ते खरे आहे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या आरबीआयच्या अधिकार्‍यावर खटला भरावा असे वदवून घेत होते.

ही अफवा पसरवण्यासाठी केलेली बदमाषी असल्यास त्या वाहिनीवर कायदेशीर कारवाई करायला हवी.

दुर्दैवाने त्या वाहिनीचे नाव लक्षात नाही. पण हे अनेक लोकांनी पाहिलेले असल्याने ती वाहिनी सापडायला कठीण नाही.

यशोधरा's picture

15 Nov 2016 - 10:25 am | यशोधरा

अबप तुमची का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Nov 2016 - 11:25 am | डॉ सुहास म्हात्रे

बहुतेक. पण वाहीन्यासर्फिंग करताना बातमी पाहिली आणि वाहिनीचे नाव बघितले नाही. नेहमी न पाहिली जाणारी वाहिनी होती.

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 11:53 am | मार्मिक गोडसे

काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या कापदाने घासून आणि पाण्यात भिजवून रंग जात आहे असे दाखवत होते.

२००० च्या नोटेचा रंग जातोय ही बातमी खरी आहे, मी प्रत्यक्ष करून बघितलं आहे. फक्त नोट ओली झाल्यामुळे नोटेचा रंग इतरत्र पसरत नाही.

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 9:19 pm | मार्मिक गोडसे

ही अफवा पसरवण्यासाठी केलेली बदमाषी असल्यास त्या वाहिनीवर कायदेशीर कारवाई करायला हवी.

खुद्द RBI ने एका वृत्तवाहीनीवर सांगितले की, ज्या नोटेचा रंग जातो तीच नोट खरी आहे. वित्त मंत्रालयाने वृत्तपत्रात २००० व ५०० नोटेच्या दिलेल्या जाहिरातीत ह्या नोटांच्या खास व सामान्य वैशिष्ट्यांत रंग जाण्याबद्दलची माहीती का दिली नाही? सरकार गोंधळलेले आहे हे नक्की.

कपिलमुनी's picture

15 Nov 2016 - 11:06 am | कपिलमुनी

ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.

बॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र,
बाकीच्या वाहिन्या धुतल्या तांदळा प्रमाणे आहेत जणू !

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 6:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

माफ करा साहेब बाकी चालू द्या, फक्त झी न्यूज भाजप धार्जिणी आहे ह्यात बाकीच्या वाहिन्या धुतल्या तांदळाच्या आहेत हे कसे ठरले ?? बाकी तुमचे कपिलमुनींसोबत काही जुने स्कोर सेटल करायचे असले तर असो,मला त्यातही रस नाही फक्त 'क बीजेपी धार्जिणा आहे असे म्हणणे म्हणजे ख हा धुतल्या तांदळाप्रमाणे म्हणण्या बरोबर आहे' हे कसे ठरले ते समजून घ्यायला आवडेल :)

प्रसाद_१९८२'s picture

15 Nov 2016 - 6:20 pm | प्रसाद_१९८२

ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 6:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओके तुम्हाला बहुदा कळलेले नसावे म्हणून परत एकदा आकड्यात बोलायचा प्रयत्न करतो दादा, (कमुच्या मते, माझे मत तेच असेल असे अजिबात नाही हे आगाऊ नोंदवतो) जर झी न्यूज सर्वात खोटारडी आहे म्हणजे आकड्यात १००% खोटारडी आहे ? मान्य ? आता ती १००% खोटारडी आहे म्हणले म्हणजे दुसऱ्या वाहिनी गेला बाजार एबीपी, आजतक, एनडीटीव्ही, टाइम्स नाऊ ० % आहेत असे म्हणणे कितपत बरोबर असेल तुमच्यामते? कपिलमुनींनी वरचेच गृहितक म्हणले आहे असे तुम्हाला वाटते का? उत्तर होय असल्यास कुठल्या तर्काने ही सिस्टिम बायनरी झाली ते विश्लेषण आपण करू शकाल का? मला ते समजून घेण्यात रस आहे.

परत एकदा क्वालिटेटिव्ह+क्वांटीटेटिव्ह मांडतो.

एखाद्याच्या मते, अ एखाद्या बाबतीत १००% आहे तर त्याचा अर्थ दुसरे शून्यच आहेत हे कसे म्हणता येईल ? उरलेल्यांसाठी ०-१००% इतकी रेंज ओपन नसेल का? तरीही एक १०० म्हणजे बाकी शून्य ह्याच्या मागचे तुम्ही वर्कआऊट केलेले सिलोजिझम समजून घ्यायला आवडेल :)

धन्यवाद

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 6:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

०-९९% रेंज असे वाचावे

आगाऊ आभार _/\_

जोन's picture

14 Nov 2016 - 5:51 am | जोन

धन्यवाद सर.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2016 - 7:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन हजार रूपयांची नोट बाजारात आणायला नको होती. एखाद्याला मोठी रक्कम द्यायची आहे तेव्हा तिचा उपयोग होईल परन्तु लहान खरेदीसाठी ती फारशी उपयोगाची नाही. डुप्लीकेट नोट जर तशी बाजारात आली तर आगीतुन फ़ूफ़ाट्यात पडन्यासारखे आहे. आपण म्हणता तसे नव्या पाचशेच्या हजाराची नवी नोट मुबलक प्रमाणात आल्यावर हळूहळू मार्केट मधून काढून घेणे हे चांगलेच आहे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

दोन हजार रूपयांची नोट बाजारात आणायला नको होती. एखाद्याला मोठी रक्कम द्यायची आहे तेव्हा तिचा उपयोग होईल परन्तु लहान खरेदीसाठी ती फारशी उपयोगाची नाही

यावर श्री बोकिल (अर्थक्रांतीचे प्रणेते) यांचे स्पष्टीकरण असे की. एखाद्या रस्तावरचे खड्डे बुजवण्यासाठी दुसरा तात्पुरता रस्ता उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. जे त्यांनी २००० च्या नोटेने केले. तसेच पुर्वीच्या तुलनेत २००० च्या खूप कमी नोटा बाजारात येणार आहेत. (उदा. १००० रु. च्या १०० नोटांच्या बदल्यात २००० च्या ५० नोटा यायला हव्या. पण प्रत्यक्षात १० नोटाच येतील.) त्यामुळे काळ्या बाजार करु इच्छीणार्‍यांना त्या कमी उपलब्ध असतील.
पुढे जाउन सरकार २००० च्या नोटा रद्द करणारच नाही याची शाश्वती नाही. सद्याची नोटेची प्रत पहाता लवकरच २००० ची नोट रद्द होइल असेच वाटतेय...

विवेकपटाईत's picture

14 Nov 2016 - 8:52 am | विवेकपटाईत

नमोजी परल्या दर्जाचे इमानदार आहे, जो माणूस आपल्या पत्नीला सरकारी गाडी देऊ शकत नाही त्याला कुणाचे सुख सहन होणार. (दिल्लीकरांची प्रतिक्रिया). शिवाय या वर्षी १,२८,००० कोटींचे काळे धन बाहेर काढून सरकारी खजाण्यात ४५,००० कोटींचा वर कर व जुर्माना जमा झाला असेल. नोट छापण्याचा खर्च ३.१७ रुपयाच्या हिशोबाने जास्तीस जास्त 6००० कोटी होईल.सरकारला काही नुकसान नाही. शिवाय एकट्या महाराष्ट्रात शेकडो कोटींचे सरकारी कर भरल्या गेले. सर्व राज्य सरकारांचे काही प्रमाणात खजाने भरले. काही दिवसात बघा १०० च्या नोटा हि बाद होतील. घरी पैसा ठेवण्यापेक्षा बँकेत ठेवा आणि रूपे/डेबिट कार्ड वापरा हेच योग्य.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 8:29 am | कैलासवासी सोन्याबापु

तिकडे जातिवंत सीए असलेल्या प्रभूंनी सुद्धा बूच मारल्याचे ऐकिवात येते आहे. काळा पैसा वाले लोक पुंड, नोटा चेंज करायला रेल्वेची तिकिटे बुक करू लागले, अर्थातच त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानीचा फर्स्ट एसी पॅक झाला अश्याने, हे ट्रेंड लक्षात येताच प्रभूंजीनी शक्कल लढवली, त्यांनी स्पष्ट केले आहे की आता तिकिटे रद्द करायची असल्यास पेमेंट NEFT किंवा चेकने(च) करतो, तरीही जर कोणाला कॅश हवीच असेल त्याने तिकीट बारीवर आपले पॅनकार्ड घेऊन यावे, कॅश मिळेल ! बघू आता कोण किती तिकिटे कॅन्सल करतंय ते =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 8:32 am | कैलासवासी सोन्याबापु

अजून काही एअरलाईन्स ने नोटा कॅन्सल नोटिफिकेशन आल्यानंतरच्या काही दिवसात (१२ नोव्हेंबर पर्यंत) बुक केलेली सगळी फ्लाईट तिकिट्स नॉन रिफंडेबल सेगमेंट मध्ये कन्व्हर्ट करून टाकली! भांडा तिच्यायला कोण भांडतोय ते =))

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 10:04 am | संदीप डांगे

ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक झेपलं नाही, कुणाला समजलं असेल तर नीट समजावून सांगा हि विनंती.

खटपट्या's picture

14 Nov 2016 - 11:32 am | खटपट्या

साहेब,

२००० हजार ची नोट ही तात्पुरती आहे असा अंदाज आहे. जी कामे मोठ्या नोटेनेच होतात ती कामे सद्या आलेल्या २००० च्या नोटेने करावीत. या नोटा खूप कमी असणार आहेत. त्यांची क्वालीटी पहाता त्या जास्त दीवस टीकतील का ही शंका आहे.

हायवे चे लॉजीक असे की, हायवेवरचे खड्डे बुजवायचे असतील तर रस्ता बंद करुन चालत नाही. म्हणून पर्यायी मार्ग (२००० ची नोट) मुळ रस्ता चांगला झाला की पर्यायी रस्ता बंद करता येइल...

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 2:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

रद्द केलेल्या नोटांच्या बदल्यात द्यायल्या लागणार्‍या १०० च्या नोटा गुप्तता ठेऊन छापणे अशक्य होते आणि त्यांचे सर्व बँकांच्या खात्यात वितरण करणे (हिशेब ठेवणे, वाहतूकीच्या गाड्यांचा आकडा, इ) हा अत्यंत मोठा गोंधळ विकत घेणारा व्यवहार झाला असता.

शिवाय त्यामुळे, गडबडीचा काळ संपल्यावर, बाजारात मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट होणार्‍या रु१०० च्या नोटा कमी करण्याचा एक मोठा प्रकल्प करावा लागला असता. या सगळ्यासाठी खर्चही अनेक पटींनी मोठा झाला असता.

त्यापेक्षा रु२००० च्या नोटांमुळे वरच्या सर्व कृतींचा खर्च (कागद, शाई, वाहतूक, हिशेब, वितरण, बाजारातून परत काढून घेणे, इ) अत्यंत कमी झालेला आहे. शिवाय, हे सगळे कारवाई गुप्त ठेवून कमी वेळात करण्यासाठी आवश्यक होते.

यामुळे, उघड न दिसणारा फार मोठा फायदा म्हणजे, आयएसआयला बसलेला दणदणीत दणका त्याला कायमचा आठवणीत राहील:

(अ) त्याला नवीन कागद, नवीन छपाई, नवीन किंमतीच्या असणार्‍या खोट्या नोटा छापायला काही वर्षे लागतील.

(आ) काही बातम्यांप्रमाणे काश्मीर समस्या वाढविण्यासाठी आणि भारतातल्या नजीकच्या निवडणुकींत हस्तक्षेप करण्यासाठी आएसआयने नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणावर रु५०० व रु१०००च्या खोट्या नोटा छापल्या होत्या. त्या सगळ्या सिंधु नदीच्या दोन बँकांच्या मध्ये जमा करायला लागणार आहेत ;)

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 3:23 pm | मराठी कथालेखक

हे सगळं ५०० च्याच नव्या नोटेने साध्य झालं असतं. त्यासाठी तात्कालिक अशी २००० ची नोट गरजेची नव्हती. २००० ची नोट चालवण्यात अनेक व्याहवारिक अडचणी येवू शकतात

अमु१२३'s picture

14 Nov 2016 - 4:26 pm | अमु१२३

???

मार्मिक गोडसे's picture

14 Nov 2016 - 4:29 pm | मार्मिक गोडसे

हे सगळं ५०० च्याच नव्या नोटेने साध्य झालं असतं.

नाही हो, बायपासही हायवेसारखा प्रशस्त हवा, भले अर्धवट बांधलेला का असेना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 9:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

याचे उत्तर वर आहे.

त्यापेक्षा रु२००० च्या नोटांमुळे वरच्या सर्व कृतींचा खर्च (कागद, शाई, वाहतूक, हिशेब, वितरण, बाजारातून परत काढून घेणे, इ) अत्यंत कमी झालेला आहे. शिवाय, हे सगळे कारवाई गुप्त ठेवून कमी वेळात करण्यासाठी आवश्यक होते.

दर २०००च्या नोटेमागे चार ५००च्या नोटा छापायला लागल्या असत्या. त्यासाठी पैसे, श्रम आणि वेळ चौपट लागले असते. त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, हे जेवढे जास्त तेवढे ही कारवाई गुप्त राहण्याची शक्यता कमी. ही कारवाई गुप्त राहणे तिचा जीव होता.

"सिंधु नदीच्या दोन बँकांच्या मध्ये" अतिशय समर्पक

सुबोध खरे's picture

14 Nov 2016 - 10:18 am | सुबोध खरे

दुसऱ्या धाग्यावर बेनामी मालमत्तेबद्दल पारित झालेल्या कायद्याबद्दल आणि या नोटा रद्द करण्याच्या अचूक वेळेबद्दल" लिहिलेला प्रतिसाद येथे परत उद्धृत करीत आहे.
काळा पैसे फक्त नोटांमध्ये असतो इतरही अनेक मार्गानी लपवला जातो सरकारला हे कळत नाही का? सामान्य माणसांना त्रास द्यायची गरज काय असा उच्चरवा ने टाहो फोडणार्यांचे लक्ष मी बेनामी मालमत्तेबद्दल आताच पारित झालेल्या कायद्याकडे वेधू इच्छितो.
http://www.prsindia.org/uploads/media/Benami/Benami%20Transactions%20Act...
भारत सरकार का असामान्य राजपत्र. extraordinary Gazzette of India मध्ये प्रसारित झालेले आहे.
जाणकारांनी आणि जिज्ञासूंनी पाहून घ्यावे.
सरकारने "रोकड नोटा" या एकाच मार्गावर बंदी आणली नसून बेनामी मालमत्ता हा सर्वात मोठा अवैध संपत्तीचा मार्ग बंद करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. श्री मोदींच्या कालच्या गोव्याच्या भाषणात याचे पडसाद उमटलेले आहेत हे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास लक्षात येईल.
५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ हि अतिशय काळजीपूर्वक निवडलेली होती. दिवाळी झाल्यामुळे सामान्य लोकांनी बोनसची रक्कम आपल्या दिवाळीच्या खरेदी साठी वापरलेली होती. हि रक्कम व्यापाऱ्यांच्या खिशात आहे पण बँकेत भरलेली नाही. ७ तारीख होऊन गेल्यामुळे लोकांचे पगार झालेले होते. तेंव्हा आपल्या सेवकवर्गाला पगार देण्यासाठी पैसे नाहीत हा आरडा ओरडा मालक वर्गाला करता आला नाही.
बहुसंख्य लोकांच्या हातात रोख पैसे पगार झाल्यामुळे होता. दिवाळीची सुट्टीवरून लोक आणि बँकेचे कर्मचारीही परत आलेले होते. लग्न साराय साठी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरला जाण्याची शक्यता होती. दिवाळी नंतर स्थावर मालमत्तेची बरीच देवाणघेवाण रोखीच्या/ काळ्या पैशाच्या माध्यमातून होणार होती. अशा अतिशय काळजीपूर्वक निवडलेल्या वेळेत केलेल्या शल्यक्रियेमुळे बऱ्याच लोकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे.
सामान्य माणसाला त्रास होतो आहेच परंतु त्यासाठी सामान्य माणसांनी कोठेही आंदोलने इ केलेली नाहीत. राजकारणी लोक अशी चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत असले तरीही सामान्य जनता अशा भूल थापांना अजून तरी बळी पडलेली नाही. त्यासाठी मी मिसळपाव वरील आपल्या मित्रांना विनंती करतो कि व्हॉट्स अँप वर फिरणाऱ्या अफवा आपण तरी पुढे पाठवू नका.

चौकटराजा's picture

14 Nov 2016 - 10:33 am | चौकटराजा

आज मय महसूस कर रहां हू मित्रों , कि डॉ खरे और डॉ म्हात्रे इनका फॅन बननेमे मय्ने कोई गलती नही की !

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2016 - 10:48 am | संजय क्षीरसागर

व्हॉट्स अँप वर फिरणाऱ्या अफवा आपण तरी पुढे पाठवू नका.

ब्लॅक मनीवर फ्लॅट ३०.९% टॅक्स (मॅक्सिमम मार्जीनल रेट) आणि २००% पेनाल्टी म्हणजे साधारण ९३% पैसे जातील. त्यामुळे ५ लाख रुपये अवैध असतील तर पहिले २.५० लाख वजा जाता पुढच्या २.५० लाखावर दंडासकट २,३१,७५० इतकी रक्कम भरावी लागेल. शिवाय व्याज वगैरे भानगडी आहेत. तस्मात, ५ लाखावर ७५,००० रुपये भरावे लागतील हा वॉटस अ‍ॅप मेसेज चुकीचा आहे.

अर्थतज्ञ आहेत आणि विरोध करणारे राजकारणी आहेत. यावरून काय ते समजून घ्या.

गॅरी ट्रुमन's picture

14 Nov 2016 - 10:30 am | गॅरी ट्रुमन

नेहमीप्रमाणे मस्त लेख.

माझ्यासारख्या सामान्यांना काही दिवस त्रास सहन करावा लागत आहे ही सत्य परिस्थिती आहे. पण हा त्रास निदान मी तरी आनंदाने सहन करत आहे.कारण मला माहित आहे की काळ्या पैशावर खरोखरच नियंत्रण आले तर त्यातून सरकारचा करातून महसूल वाढेल, सरकारला कमी पैसे कर्जाऊ उचलावे लागतील आणि त्यातूनच व्याजाचे दर कमी होतील.त्यातूनच माझ्यासारख्यांच्या गृहकर्जावरील व्याजाचा बोजा कमी होईल.त्यासाठी थोडी कळ सोसायला काहीच हरकत नाही.आणि तसेही मी जवळपास प्रत्येक विकांताला ५ तास उभे राहून एका क्लासमध्ये शिकवायला जातोच (आणि त्यातून मला फॉर्म-१६ ए मिळतो आणि त्यावरील उत्पन्नावर करही भरतो :) ). जर गृहकर्ज लवकर आटोक्यात आले तर कदाचित मला माझे विकांत विश्रांतीसाठी वापरता येतील. त्यासाठी आठवड्यातून दोन तास रांगेत उभे राहायला लागले तर माझी अजिबात ना नाही.उलट भविष्यात होणारा फायदा लक्षात घेता मी ते आनंदाने करेन.

मला कधीकधी वाटते की दुसर्‍या महायुध्दात रशियन लोकांनी ज्या परिस्थितीचा सामना केला तशी परिस्थिती आपल्यावर आली तर आपले पळपुटे लोक नक्की काय करतील? शहरेच्या शहरे बेचिराख होत आहेत, लाखांनी लोक मारले जात आहेत, खायला मिळायची मारामार, त्यातच रशियातली ती जीवघेणी थंडी. तरीही ते लोक निर्धाराने लढले आणि हिटलरला गाडले.

आणि इथे आपण. दोन दिवसांची गैरसोय आपल्याला सहन होत नाही की रांगेत दोन तास थांबावे लागले तरी आपल्याला कित्ती कित्ती त्रास होतो.अन्यथा आपण लालबागच्या राजाच्या दर्शनाला तासनतास उभे राहू, रिलायन्स जिओचे नवे कनेक्शन मिळवायलाही कितीही वेळ उभे राहू, तिरूपतीच्या बालाजीचे दर्शन १२ तास रांगेत राहून घेतले असे अभिमानाने सांगू पण काळ्या पैशाविरूध्द कडक पाऊल सरकारने उचलले असेल तर त्यासाठी थोडीही गैरसोय आम्हाला नको.या दोन तासांच्या गैरसोयीसाठी आम्ही परत त्यांनाच मत द्यायचा विचार करू ज्यांनी मुळात काळा पैसा निर्माण केला.

मोदींनी हे पाऊल उचलून नक्कीच चांगले केले आहे. 'अच्छे दिन' म्हणजे आपण काहीही न करता खाटल्यावर पडून राहायचे आणि कुठलातरी हरी येऊन जेवणाचे ताट हातात आणून देईल अशी काहींची कल्पना झाली असावी.असल्या बांडगुळांनी त्यांची बडबड ताबडतोब बंद करावी. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी हातपाय मारायला तयार नसू तर असेच मॅट्रिक्समध्ये पडून राहा.

प्रसाद_१९८२'s picture

14 Nov 2016 - 11:49 am | प्रसाद_१९८२

असल्या बांडगुळांनी त्यांची बडबड ताबडतोब बंद करावी. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी हातपाय मारायला तयार नसू तर असेच मॅट्रिक्समध्ये पडून राहा.

==

सहमत आहे, छान प्रतिसाद.

ट्रेड मार्क's picture

15 Nov 2016 - 10:06 pm | ट्रेड मार्क

मस्त प्रतिसाद.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला तासनतास उभे राहू, रिलायन्स जिओचे नवे कनेक्शन मिळवायलाही कितीही वेळ उभे राहू, तिरूपतीच्या बालाजीचे दर्शन १२ तास रांगेत राहून घेतले असे अभिमानाने सांगू पण काळ्या पैशाविरूध्द कडक पाऊल सरकारने उचलले असेल तर त्यासाठी थोडीही गैरसोय आम्हाला नको.या दोन तासांच्या गैरसोयीसाठी आम्ही परत त्यांनाच मत द्यायचा विचार करू ज्यांनी मुळात काळा पैसा निर्माण केला.

प्रायॉरिटीज चुकत आहेत असं वाटतं. चांगल्या वाईटाची जाणीव बोथट होऊ लागली आहे.

एखादा निर्णय कशासाठी घेतला गेला, त्यातून नक्की साध्य काय करायचे आहे व त्याचे दूरगामी परिणाम आपल्या जीवनावर काय होणार आहेत याचा विचार न करता फक्त नावं ठेवायची वृत्ती वाढत आहे. त्यात आपला मेडिया सतत नकारात्मक बातम्या दाखवत असतो.

चौकटराजा's picture

14 Nov 2016 - 10:40 am | चौकटराजा

यापूर्वीच मी मिपावर असा अंदाज व्यक्त केला आहे की २००० ची नोट अचानक रद्द होईल. बायपास रस्ता काढून टाकला जाईल.
२००० हा एक सापळा आहे असे मला राहून राहून वाटत आहे. त्या नोटेचा सामान्य माणसाला काही फायदा नाही. माझ्या अंदाजाने १०० च्या नव्या नोटा जुन्या रद्द न करता लवकरच म्हणजे अगदी सहा महिन्यात चलनात येतील. पण या सर्व घडामोडीतून मी काय शिकलो असेन तर मी मॉलमधे नोट वापरणार नाही. सबब मामला कार्ड.ही मोहीम मध्यमवर्गीयानी नेटाने लावून धरली तर खाजगी व्यापारी ग्राहक टिकवून धरण्यासाठी कार्डे स्वीकारू लागतील.

खेडूत's picture

14 Nov 2016 - 1:50 pm | खेडूत

सहमत.
आमचा किराणावाला चौधरी कार्ड पेमेंट घेऊ लागलाय. येत्या वर्षात मंडईसह सर्वत्र असेच होईल..

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 9:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

२००० ची नोट अचानक रद्द होईल ही अफवा असली तरी आता काळाबाजार्‍यांना बसलेल्या धसक्यामुळे तिच्या स्वरूपात काळा पैसा करणे कमी होईल ;) =))

ती १ ते ३ वर्षांत रद्द होईल असा माझा अंदाज आहे.

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 12:26 pm | मराठी कथालेखक

ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

म्हणजे एखादा अधिकारी वा नगरसेवक जो पुर्वी रस्त्याच्या एक कोटींच्या कामासाठी कंत्राटदाराकडून समजा दहा लाख रुपये लाच मागत होता तो आता मागणार नाही का ? 'नको रे बाबा ते काळे धन त्याऐवजी नव्वद लाखात रस्ता बनव' असे कंत्राटदाराला म्हणेल का ? किंवा बिल्डरला NOC देताना संबंधित अधिकारी लाच नाकारुन वर बिल्डरला म्हणेल का की 'आता घराच्या किमती कमी कर. सामान्य नागरिकास फ्लॅट विकत घेणं सोपं झालं पाहिजे' ?
एखादा वाहतूक पोलीस सिग्नल मोडल्यावर , पीयूसी नसल्यावर लाच घेण्याची सवय सोडून देईल का ?
आणि अशाच प्रकारे अनेक पातळींवर चालत असलेला भ्रष्टाचार संपुष्टात येईल.

छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 12:57 pm | संदीप डांगे

असे नेमके प्रश्न विचारायचे नसतात.... इत्यादी,;)

असो.

वाट बघूया!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 10:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला नेमके (किंवा इतरही) प्रश्न प्रश्न विचारले की त्यांना नेमकी उत्तरे मिळतात, हे तुम्हाला माहीत नाही हे माझे दुर्दैव आहे :)

खाली नेमकी उत्तरे दिलेली आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

14 Nov 2016 - 1:06 pm | प्रसाद_१९८२

विचार एव्हढे निगेटिव्ह कसे काय असू शकतात हो? एकादी गोष्ट ह्या आधी कधी झाली नाहि, तर ह्या पुढे ही कधी होणार नाही, असे काहि लॉजिक आहे का ?

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 2:22 pm | मराठी कथालेखक

मी विचारवंत वगैरे असल्याचा दावा कधीच केला नाही.
झालेच तर भ्रष्टाचार/लाचखोरी संपणारच नाही असे मी म्हंटलले नाही.
पण केवळ नोटा बाद केल्याने भ्रष्टाचार संपेल का असा माझा प्रश्न आहे? यावर तुमच्याकडे तार्किक उत्तर असेल तर कृपया द्यावे.
कदाचित भ्रष्टाचार संपणार असेलही , पण नेमका कसा हे एक सामान्य माणूस म्हणून माझ्या आकलनाच्या बाहेरचे असावे, पण तुम्हाला माहीत असल्यास जरुर विश्लेषण करावे.
धन्यवाद

पद्माक्षी's picture

14 Nov 2016 - 4:34 pm | पद्माक्षी

नोटा बंद केल्याने भविष्यातला भ्रष्टाचार संपेल कि नाही माहित नाही. पण एक भीती राहील कि हे परत होऊ शकते.

उदा:- आज एखाद्या सरकारी बाबूकडे १० लाखापेक्षा जास्त रोकड आहे तर ती बाद झाली आहे. कारण पैसे जमा करताना तो या पैशाचा स्रोत काय दाखवणार?
त्यामुळे उद्या परत लाच घेताना 'कदाचित' तो विचार करेल. :)

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 5:01 pm | मराठी कथालेखक

मला नाही तसे वाटत , माझा दुसरा प्रतिसाद बघा.

सुबोध खरे's picture

15 Nov 2016 - 7:49 pm | सुबोध खरे

माणूस हा स्वार्थी आहे त्यामुळे भ्रष्ठाचार जगातून "कधीच" संपणार नाही हि वस्तुस्थिती आहे. अत्यंत कडक आणि अमानवी कायदे असणाऱ्या देशातही गुन्हे थांबलेले नाहीत हि वस्तुस्थिती आहे कारण ती स्वार्थ हि मानवी प्रवृत्ती आहे.
आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे किंवा सामान्य माणसाला भ्रष्टाचार यात काही वावगे वाटत नाही हि खरी शोकांतिका आहे.
गोठा फारच घाण असेल तर त्यात राहणाऱ्या माणसांना त्याची सवय होते असे आहे. मग त्याने आरोग्याला अपाय होत असेल तरीही.
पण कुणी येऊन तो साफ केला आणि त्या माणसांना स्वच्छतेचि सवय लावली तर काही काळाने आपो आप त्यांना त्या स्वच्छ तेचि सवय लागते आणि मग त्यांना हि घाणीची शिसारी येऊ लागते.
समांतर अर्थव्यवस्था सुधारून( ती कायमची नष्ट होईल हा स्वप्नवाद आहे) जितकी कमी करता येईल आणि सर्व सामान्य माणसाने आज भ्रष्टाचार हा अगतिकपणे स्वीकार केला आहे त्यात बदल होईस्तोवर करणे आवश्यक आहे.
आज माणसे मी अमुक इतका कर चुकवला याची शेखी मिरवताना दिसतात या ऐवजी त्यांना त्याची लाज वाटायला लागेल हि स्थिती येणे आवश्यक आहे.

भ्रष्टचार संपणार नाही, पण संपण्यास मदत होईल. किंवा भ्रष्टचार संपण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे.

काहीही नसण्या पेक्षा काहीतरी असणे कधीही चांगले.

हे सरकार प्रयत्न तरी करत आहे, ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक प्रयत्न झाले भ्रष्टचारा विरुद्ध??? कुठल्या हि गोष्टीचा परिणाम व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो, एक रात्रीत ७० वर्षांची घाण साफ करणं केवळ अश्यक्य आहे. चांगल्या प्रयत्नांना शंका काढण्या पेक्षा आपण ह्या उपक्रमात काय हातभार लावू शकतो किंवा अनुकूल वातावरण कसं निर्माण करू शकतो हे महत्वाचं आहे.

मुळात, आपल्या सवयी जर चांगल्या असतील तर, ह्या निर्णयाचा त्रास खूप कमी होईल. जसे कि, मी शक्य तितके व्यवहार ऑनलाईन(मराठी प्रतिशब्द?) किंवा डेबिट कार्ड वापरून करतो. उदाहरणार्थ: वीज बिल, रेल्वे आरक्षण, घर भाडे हे ऑनलाईन भरतो. खरेदीसाठी डेबिट कार्ड वापरतो, अगदीच इ-देवाणघेवाण शक्य नसेल तरच चलन वापरतो.
हा निर्णय जेव्हा घोषित झाला तेव्हा माझ्या कडे फक्त २०० रुपये होते, पण त्याची क्वचितच गरज पडली.

आपण सर्वानी जर इ-देवाणघेवाणची सवय लावली तर काळा पैसा आपोआप कमी होईल, कुठल्या हि व्यहारात आपली फसवणूक होण्याची शक्यता सुद्धा कमी होईल, कारण आपल्या कडे त्याचा पुरावा असेल.

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 1:40 pm | मार्मिक गोडसे

ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक प्रयत्न झाले भ्रष्टचारा विरुद्ध???

निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधारकार्ड सरकारने कशासाठी काढली असं तुम्हाला वाटतं? तुम्ही नक्की भारतीयच आहात ना?

प्रसाद_१९८२'s picture

15 Nov 2016 - 2:16 pm | प्रसाद_१९८२

आणि भ्रष्टाचाराचा काय संबध आहे ??

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 3:20 pm | मार्मिक गोडसे

निवडणूक ओळखपत्रामूळे निवडणुक मतदानात होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसला. पैसे घेवून दुसर्‍याच्या नावावर मतदान करणे कठीण झाले.

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2016 - 3:25 pm | श्रीगुरुजी

पूर्णपणे नाही. बुरखा घातलेल्या मुस्लिम बायका बुरखा न काढता, ओळख पटवून न देता मतदान करू शकतात. तिथे बोगस मतदानाची शक्यता आहे.

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 3:38 pm | मार्मिक गोडसे

कहीतरीच. बुरखा न उघडता ह्यांचे फोटो कसे काढतात निवडणूक ओळखपत्र देताना? पासपोर्ट काढताना?

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2016 - 10:54 pm | श्रीगुरुजी

फोटो फक्त महिलांच्या उपस्थितीत बुरख्याशिवाय काढतात. परंतु मतदान केंद्रात सर्व महिला ठेवणे अशक्य आहे. तिथे बुरखा न काढता बरोबरील पुरुषाने हीच ती बाई अशी खात्री देणे पुरेसे आहे. बुरख्याच्या आत बाप्या असला तरी अधिकाऱ्याला ते कळू शकणार नाही.

विशुमित's picture

7 Dec 2016 - 2:25 pm | विशुमित

हा जावई शोध मी पहिल्यांदाच ऐकतोय...

ग्रेट माहिती...

पैसा's picture

15 Nov 2016 - 5:31 pm | पैसा

कालच एका एटीएमबाहेर बोर्ड पाहिला की हेल्मेट, स्कार्फ किंवा बुरखा घातल्यास एटीएम मधे प्रवेश मिळणार नाही. बुरखा घालणार्‍या महिलांना चेकबुक देऊ नये तसेच बुरखा घालून बँक काउंटरवर आल्यास विथ्ड्रॉवल स्लिप देऊ नये असे निर्देश आहेत.

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 2:39 pm | मराठी कथालेखक

पॅनकार्ड ही अत्यंत महत्वाची पायरी होती. यामुळे एकाच व्यक्तीचे सगळी बॅक खाती आयकर विभागाशी जोडली गेलीत.
पॅनकार्ड कधी अंमलात आले याबद्दल खात्री नाही. पण कोणत्याही पक्षाने आणले असले तरी त्या सरकारास त्याचे श्रेय द्यायला हवे

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 3:24 pm | मार्मिक गोडसे

पॅनकार्ड कधी अंमलात आले याबद्दल खात्री नाही.

नरसिंह राव सरकारच्या काळात पॅन कार्ड अ‍ॅक्ट मध्ये दुरुस्ती करण्यात आली.

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 3:43 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद
एकूणातच नरसिह राव हे एक फार चांगले पंतप्रधान देशाला मिळाले होते असं माझं मत आहे. दुर्देवाने काँग्रेसलादेखील त्यांचा विसर पडलाय.

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 3:48 pm | मार्मिक गोडसे

दुर्देवाने काँग्रेसलादेखील त्यांचा विसर पडलाय.

खरंय. नरसिंह रावांनी धोरणांना प्राधान्य दिले तर काँग्रेसवाल्यांनी व्यक्तीपुजेला. आताही तेच चालू आहे फक्त पक्ष बदलला आहे.

अनुप ढेरे's picture

15 Nov 2016 - 5:50 pm | अनुप ढेरे

नरसिंहराव गेल्यावर त्यांचं पार्थिव कॉंग्रेस मुख्यालयात देखील आणलं गेलं नव्हतं. जनरली मोठा नेता (इथे तर माजी पंतप्रधान) गेल्यावर कार्यकर्त्यांसाठी आणतात पार्थिव. रावांच पार्थिव मुख्यालयाबाहेरपर्यंत आणलं होतं. सोनिया गांधींनी गेट उघडायची परवानगी दिली नाही. तसच परत नेलं.

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 6:56 pm | मार्मिक गोडसे

रावांच पार्थिव मुख्यालयाबाहेरपर्यंत आणलं होतं. सोनिया गांधींनी गेट उघडायची परवानगी दिली नाही. तसच परत नेलं.

हे माहीत नव्हतं. इतक्या पररकोटीच्या द्वेषाची फळं भोगतोय त्यांचा पक्ष.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 7:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

खरंय, पीव्ही नरसिंह राव म्हणजे अक्षरशः आज जो भारत दिसतो त्याचे डेंग झिओ पिंग म्हणवले जावेत असले व्यक्तिमत्व, मराठवाडा मुक्ती आंदोलनाच्या वेळी माझ्या आजोबांनी त्यांच्या सोबत काम केले होते अन कारावास सुद्धा भोगला होता सोबत, रावांना खूपशा भाषा अस्खलित बोलता येत असत असे मी कैकवेळा आजोबांना सांगताना ऐकले आहे

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 7:13 pm | मार्मिक गोडसे

जसे माजी. पंतप्रधान वाजपेयींविषयी विरोधी पक्षातले लोकही आदराने बोलतात तसे नरसिंह रावांविषयी त्यांच्या पक्षाचा प्रमुख विरोधी पक्षवाले कधी आदराने बोललेले आढळले नाही.

सुबोध खरे's picture

15 Nov 2016 - 8:04 pm | सुबोध खरे

काळा चष्मा घातला तर जगही काळेच दिसते. श्री नरसिम्ह राव हे अत्यंत सुसंस्कृत आणि समंजस पंतप्रधान भारताला लाभले होते असे मी सर्व पक्षांच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या वेळेस ऐकले आणि वाचलेले आहे. श्री मनमोहन सिंहांना वित्त मंत्री करणे आणि उदार आर्थिक धोरण हे मूळ श्री नरसिम्हरावांचे धोरण होते पण त्यांना त्याचे श्रेय दिले गेले नाही याबद्दल त्यांना विचारले असताना त्यानं हसून तो विषय टाळला असेही वाचले आहे.
त्यांना शुद्ध मराठीत बोलताना मी टीव्ही वर पाहिले आहे.
माझ्या पाहण्यातील नरसिम्ह राव हा सर्वात जास्त सुसंस्कृत आणि शालीन असा काँग्रेस चा नेता होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 9:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

काळा चष्मा घातला तर जगही काळेच दिसते.

ह्या वाक्याची सलामीला गरज होतीच का डॉक्टर साहेब ? एड होमिनेम न करता मुद्दे मांडले जाऊ शकत नाहीत का ? तुमचे मुद्दे संयुक्तिक होते/आहेत/असतील ही खात्री सुद्धा आहे. तरीही जर अशी शेरेबाजी टाळता आली तर पहा ही विनंती करतो.

बाकी तुमचे जर गोडसे साहेबांसोबत काही वैयक्तिक विषय असले तर खरडवही/ व्यनी आहेतच. राग मानू नये जाणवले म्हणून स्पष्ट बोलतोय.

मार्मिक गोडसे's picture

15 Nov 2016 - 9:49 pm | मार्मिक गोडसे

खरे सरांची मते मला खरोखरंच पटली माझे वाचन, अनुभव व अभ्यास त्यांच्यापेक्षा नक्कीच कमी आहे. मी काळा चष्मा घातला असता तर, वरील एका प्रतिसादात ,हे माहीत नव्हतं. इतक्या पररकोटीच्या द्वेषाची फळं भोगतोय त्यांचा पक्ष. असे मी म्हटले नसते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Nov 2016 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुसर्‍या पक्षातले नरसिंह रावांबद्दल आदराने बोलतात पण त्यांच्या पक्षातले तसे बोलायला घाबरतात... कारण त्यांनी घराणेशाहीला मुजरा करायला नकार दिला होता व तो आचरणात आणला होता.

१९९०-९१ ला भारताची वित्तव्यवस्था खोल गर्तेत असताना नरसिंह राव व मनमोहन ही जोडगोळी भारतात पंतप्रधान व वित्तमंत्री या पदांवर नसते तर भारत आज आहे त्या अर्थिक सुव्यवस्थेत नसता, किंबहुना दुर्बळ व दरिद्री राष्ट्रांच्या रांगेत कोठेतरी मागच्या जागेवर उभा असता. त्या दोघांनी भारताची फिरवलेली (टर्न अराऊंड या अर्थाने) अर्थव्यवस्था हा देशांच्या इतिहासात क्वचित घडणारा सुवर्णक्षण आहे. भारताची आताची स्थिती हा त्या दोघांच्या कृतीने त्यावेळी बनवलेल्या पायावर उभी आहे.

अभिजीत अवलिया's picture

15 Nov 2016 - 10:36 pm | अभिजीत अवलिया

वरील प्रतिसादासाठी +१.
जिथे काम करतो त्या कंपनीतल्या सहकारी पण 'अंध भक्तांना (सर्व पक्षीय) ' हे सांगितले की काहीही विचार न करता अंगावर येतात.

पुष्कर जोशी's picture

5 Dec 2016 - 1:01 am | पुष्कर जोशी

नरसिंहराव हे गुप्त संघस्वयंसेवक होते .. व त्यांना संघाने काॅग्रेस मधे घुसवले होते असे वाटते ..

संदीप डांगे's picture

5 Dec 2016 - 1:17 am | संदीप डांगे

कोण्या जेम्स लेनच्या पुस्तकात तुम्ही हि कुजबुज वाचली... ?

अनुप ढेरे's picture

5 Dec 2016 - 12:16 pm | अनुप ढेरे

शब्दशः नाही पण राव हे संघाचे पहिले पंतप्रधान असं गंमतीनी म्हणतात. ते लुंगीच्या आत खाकी चड्डी घालतात अशी थट्टा होत असे म्ह्णे. काँग्रेस आणि गांधी घराणं त्यांचा द्वेष करण्यामागे हे एक कारण आहे.

सौन्दर्य's picture

15 Nov 2016 - 7:36 pm | सौन्दर्य

काळा पैसा संपविण्यासाठी सरकारने उचलेले हे पाउल अगदी स्तुत्य आहे. पण असेच पाउल १९७८ साली १००० च्या नोटा चलनातून बाद करून उचलले होते मग तरी देखील आजपर्यंत भ्रष्टाचार कसा टिकून राहिला ?

माझ्या मते जोपर्यंत १०० रुपयांवरील सर्व व्यवहार चेकने किंवा क्रेडीट/डेबिट कार्डने करणे बंधनकारक होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार चालूच राहील, जरी कमी झाला तरी.

पण पूर्ण भारत म्हणजे फक्त मोठी मोठी शहरे नव्हेत, आजही वीज, पाणी, रस्ते, इंटरनेट, दळणवळणाची साधने नसलेली अनेक गावे भारतात आहेत. जेथे ह्या मुलभूत सुविधा नसतील तेथे डेबिट/क्रेडीट कार्ड कसे वापरणार ? जेथे अजूनही निरीक्षरता आहे तेथे चेकचे व्यवहार कसे होणार ? समजा एखाद्या गावातल्या माणसाला त्याच्या बैलगाडीचे चाक दुरुस्त करायचे असेल तर तो गावातल्याच किंवा तालुक्यातील लोहाराकडे जातो, तेथे रोखीने पैसे देऊन(किंवा उधार ठेऊन) तो आपले काम करून घेतो. जर काहीही कारणाने त्या माणसाकडे भ्रष्टाचाराने गोळा केलेला पैसा असेल तर असा माणूस ते पैसे निर्धोकपणे वापरू शकतो. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला तरी तो चालूच राहणार ह्यात शंका नाही.

थोडक्यात, रोखीने पैशाचे व्यवहार चालूच राहिले तर आवाक्यात आलेला भ्रष्टाचार थांबणार नाही.

संजय पाटिल's picture

15 Nov 2016 - 5:43 pm | संजय पाटिल

भ्रष्टाचार करण्यासाठी दोन बाजू आवश्यक असतात. देणारा व घेणारा. तुम्ही तुमच्या बाजूने बंद करा..

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 5:49 pm | संदीप डांगे

'तुमच्या'???

ओ मकले, कोणत्या बाजूला असता बावा तुमी?

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 5:58 pm | मराठी कथालेखक

मी का ?
अं ....जिकडून पैसे मिळतील तिकडे जायला तयार आहोत आपण :)
विनोद बाजूला ठेवून.. हो काही वेळा भ्र्ष्टाचारात माझाही सहभाग असतो. जसे हॉटेलवर रहाताना जर टॅक्स मुळे ३००-४०० रुपये (प्रतिदिन भाड्यात) जास्त जाणार असतील तर रोखीने पैसे देवून मी ही पैसे वाचवलेले आहेत.

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 6:02 pm | संदीप डांगे

श्या, तिकडे सैनिक सीमेवर उभे असताना तुम्ही हाटेलात का राहता, रस्त्यावर उभं राहायचं, सगळेच पैसे वाचतील, आणि ब्रष्टाचार न केल्याने देशभक्तीही होईल!

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 7:30 pm | मराठी कथालेखक

असं नसतं हो... सर्व काही करायचं आणि नंतर फेसबूकवर/व्हाटस अप्वर सैनिकांबद्दल कळवळा असणारे संदेश प्रसारित करायचे म्हणजे झाली देशभक्ती !!

सुबोध खरे's picture

15 Nov 2016 - 8:30 pm | सुबोध खरे

मकले आणि डांगे अण्णा
प्रत्येक वेळेस सैनिकाला/ लष्कराला या वादात ओढायचे कारण काय?
कोणताही प्रामाणिकपणे काम करणारा भारतीय हा काय कमी देशभक्त आहे का ?

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 10:09 pm | संदीप डांगे

हा हा, हे तुम्ही मला म्हणताय?

अगदी हेच जिथे तिथे सैनिकांचे दाखले देणाऱ्यांना बोला डॉक्टर साहेब!

माझा प्रतिसाद उपरोधिक आहे अशाच लोकांसाठी, लोकांनी जरा म्हटले त्रास होतो की हे भक्त लोक लगेच सैनिकवाला मुद्दा काढत आहेत, हवे असेल तर जरा चेपुवर चक्कर मारून या,

मराठी कथालेखक's picture

16 Nov 2016 - 1:09 pm | मराठी कथालेखक

मी पण उपरोधानेच बोललो.
खूप लोकांचे असे पोस्ट्स वाचलेत 'सीमेवर सैनिक लढत आहेत, तुम्हाला काही वेळ रांगेत उभे रहायला काय त्रास' वगैरे.. उबग आला असल्या पोस्ट्सचा.

फेसबूकवर मी एक वयस्कर गृहस्थ माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये होते. [हे माझ्या एका सरांचे मित्र. माझे सर आणि हे गृहस्थ दोघेही अनेकविध विषयांवर आपली मते फेसबूकवर टाकत असत/असतात. दोघांचीही फ्रेंड/फॉलोअर लिस्ट प्रचंड मोठी. माझे सर काही काळापुर्वि निर्वतलेत.] तर या गृहस्थांनी अशीच काहीतरी पोस्ट टाकली. त्यावर कुणा एकाने 'सैनिकांना त्यांच्या कामाचा मोठा पगार मिळतो' अशा अर्थाची काहीशी प्रतिक्रिया दिली. मी त्या प्रतिक्रियेला 'लाईक' दिले , तसेच 'अशी तुलना गरजेची नव्हती' अशी प्रतिक्रिया मूळ पोस्टवर दिली. या गृहस्थांनी पाच मिनटातच त्या दुसर्‍या व्यक्तिला आणि मला 'अनफ्रेंड' केले !!

डॉक्टरसाहेब तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपले काम प्रामाणिकपणे , चोखपणे करणारा कुणीही व्यक्ती सैनिकच आहे. मग तो शाळेत मन लावून शिकवणारा शिक्षक असेल, गटारात उतरणारा सफाई कामगार असो की कोणतीही किळस न बाळगता रुग्णसेवा, त्यांची स्वच्छता करणारे नर्स/मामा/मावशी असतील..अशा अनेकांना ना जास्त पगार मिळतो ना समाजात चांगला मान...गटारात विषारी वायूमुळे गुदमरुन मेलेल्या कामगारास कुणी हुतात्माही म्हणत नाही.

मृत्युन्जय's picture

14 Nov 2016 - 2:36 pm | मृत्युन्जय

भ्रष्टाचार नाहिच थांबायचा हो. पुर्वी लोक १००० च्या नोटेत साचवायचे आता २००० च्या नोटेत साचवतील इतकेच. लाच पुर्वीही खात होते. आताही खातील (आता नव्या नोटा मागतील इतकेच). पण २ गोष्ती नक्की साध्य होतीलः

१. सध्याचा बराच काळा पैसा सर्क्युलेशन मधुन बाहेर जाइल (अथवा येइल)
२. खोट्ञा नोटा सर्क्युलेशन बाहेर जातील (यामुळे दहशतवादी कारवायांना आणि देशविघातक वृत्तींना (काही काळ) चाप बसेल.

भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी अजुन बराच वेळ जाइल. मोदींच्या पिढीच्या हयातीत शक्य होइल असे वाटत नाही (माझ्या पिढीच्या हयातीत तरी होइल की नाही कुणास ठाउक). तुम्हाला खरेच असे वाटते का की या सगळ्या खटाटोपाचा उद्देश भ्रष्टाचारावर मात करणे हा आहे?

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 3:31 pm | मराठी कथालेखक

तुमचे दोन्ही मुद्दे मान्य.
खोट्या नोटांचा प्रश्न बराच काळासाठी निकालात निघेल हे तर आहेच.
शिवाय काही काळ बाजारातला काळा पैसा कमी झाल्याने महागाई कमी होईल. खास करुन स्थावर मालमत्तांचे भाव कमी होवू शकतील असे वाटते.
पण यापुढे भ्रष्टाचार होणार नाही किंवा त्याचे प्रमाण खूप कमी होईल असे मानणे भाबडेपणाचे वाटते.
समजा एक भ्रष्ट अधिकारी आहे. त्याचे 'वरचे' मासिक उत्पन्न सुमारे दोन लाख रुपये महिना आहे. त्याने घरात सुमारे सात-आठ लाख साठवले होते.
नोटा रद्द झाल्याने त्याला समजा त्याने काही मार्गाने काही नोटा बदलून घेतल्या आणि पैसा वाचवला असे मानू. पण तरी त्याचे तीन-चार लाखांचे नुकसान झाले तर पुढच्या महिन्यात तो काय विचार करेल ? "नको मला तो काळा पैसा, नको ती लाच वगैरे" की "xxx बरंच नुकसान झालं की ..हे नुकसान भरुन काढायला आता 'रेट' वाढवायला हवा ..."

मृत्युन्जय's picture

14 Nov 2016 - 6:33 pm | मृत्युन्जय

भ्रष्टाचार नाहिच हो कमी होणार

भ्रष्ट अधिकारी आता १०० आणि २००० च्या नोटांमध्ये पैसे खातील. आजच कुणलातरी २००० च्या नोटांंअध्ये लाच घेताना पकडले. हे चक्र चालुच राहणार. एकदा हा स्ट्राइक करुन मग दर काही काळाने नविन उपाययोजना आणुन या सर्व प्रकाराला आळा घालणे एवढेच काम सरकार करु शकते. तुर्तास जे उद्देश साध्य झाले आहेत ते महत्वाचे आहेत. या आणी अश्या उपायांनीच भ्रष्टाचार हळु हळु कमी होइल. उद्या सकाळी भार भ्रष्टाचारमुक्त झाला असेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 7:04 pm | मराठी कथालेखक

बरोबर आहे.
मुळात 'सामान्य' माणसाला भ्रष्टाचार नको आहे हे गृहितक तरी खरं आहे का ?
किंबहूना भ्रष्टाचारी आणि सामान्य माणूस असं वर्गीकरण तरी कितपत योग्य आहे ?

मला वाटतं आपल्या सोयीचा असलेला भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे.
तुम्ही रस्त्यानं आपल्या वाहनानं चालला आहात आणि एखादा नियम मोडलात आणि पकडले गेलात तर समोरच्या पोलिसाने नियमाप्रमाणे दंड न घेता कमी पैशात तडजोड करावी हीच तुमची (म्हणजे अनेकांची ) अपेक्षा असते ना ?
मी पुर्वि जिथे रहात होतो तिथून जवळच एक कमी उत्पन्न गटासाठीची जूनी वसाहत होती. या लोकांना सरकारी योजनेतून स्वस्तात घरे मिळाली. पूढे अनेकांनी समोरच्या रस्त्यावरील जागेत अतिक्रमण केलेत. आता एखादा प्रामाणिक , कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त येवून त्याने ही सगळी अतिक्रमणं पाडलीत तर या 'सामान्य' लोकांना आवडणार/चालणार आहे का ?
मीटर न टाकणारा रिक्षावालाही सामान्यच असतो ना ? त्याला कर्तव्यदक्ष अंमलबजावणी अधिकारी आलेला आवडेल का ?
छोटे मोठे दुकानदार उत्पन्नाचे कर प्रामाणिकपणे भरतात का ? शहराच्या थोडं बाहेर गेलं की अनेक 'सामान्य' दुकानदार शीतपेय छापील किमतीपेक्षा दोन-तीन रुपये जास्त घेवून विकताना दिसतील. हा देखील भ्रष्टाचारच ना ?
आतादेखील अनेक 'सरळमार्गी सामान्य' लोक (म्हणजे पर्याय नसल्याने मारुन मुटकून टॅक्स भरणारे-खरं तर तो आधीच कापला जातो म्हणा) आपल्या 'काळे पैसे' बाळगणार्‍या नातेवाईक वा मित्रांना 'दोन लाख आपल्या खात्यात' भरुन देत आहेत वा त्या विचारात आहेत.
अनेक उदाहरणं सापडतील.
भारत भ्रष्टाचार मुक्त तेव्हाच होईल जेव्हा 'मी भ्रष्टाचार करणार नाही वा भ्रष्टाचारास कोणत्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही' अशी मनोवृत्ति असणारे लोक भ्रष्टाचार करु पहाणार्‍यांपेक्षा संख्येने खूप जास्त आणि सर्व वर्गात असतील.

नितिन थत्ते's picture

14 Nov 2016 - 9:35 pm | नितिन थत्ते

>>मुळात 'सामान्य' माणसाला भ्रष्टाचार नको आहे हे गृहितक तरी खरं आहे का ?
>>किंबहूना भ्रष्टाचारी आणि सामान्य माणूस असं वर्गीकरण तरी कितपत योग्य आहे ?
>>मला वाटतं आपल्या सोयीचा असलेला भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे.

सहमत आहे.

>>छोटे मोठे दुकानदार उत्पन्नाचे कर प्रामाणिकपणे भरतात का ?

सामान्य माणसं अजाणतेपणे(?) त्यांना हे करायला उद्युक्त करतात किंवा त्यात साथ देतात.
समजा एकाद्या दुकानातून पाचशे रुपयांची खरेदी केली. त्यावर बिल द्या असे म्हटल्यावर तो व्यापारी म्हणतो,"बिल हवे असेल तर १३ टक्के टॅक्स पडेल. ५६५ रुपये लागतील". त्यावर हा सामान्य माणूस क्षणाचाही विलंब न लावता बिल नसले तरी चालेल असे सांगेल. (म्हणाजे ज्या वस्तूत वॉरंटी वगैरे भानगड नसेल अशा वस्तूच्या बाबतीत).

पक्षी's picture

15 Nov 2016 - 1:34 pm | पक्षी

We can say that we have won the BATTLE, but not the WAR
War is still going on or may be will continue forever.

वगिश's picture

15 Nov 2016 - 8:31 am | वगिश

आपण ईतर प्रगत राष्ट्रांप्रमाने रोखी मुक्त व्यवहार करण्याकडे वाटचाल करीत आहोत. अतिशय नगण्य भ्रष्टाचार हा त्याचा एक फायदा ( अनेक पैकी) फायदा आहे.
2000 ची नोट तात्पुरती व्यवस्था आहे.

http://blogs.timesofindia.indiatimes.com/voices/demonetisation-issue-an-...

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 3:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

या तुम्ही उधृत केलेल्या वाक्यातील ही व पुढच्या पायर्‍या हे शब्द तुमच्या नजरेतून अनवधानाने निसटले, की अवधानाने दुर्लक्षित केले गेले, हे ठरवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहे :) ;)

"काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !!

छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!

आता थोडी सर्वमान्य व्यावहारीक माहिती...

१. व्यवस्थापनाचा महत्वाचा नियम... "जगावेगळे उत्तम यश मिळविण्यासाठी प्रथम जगावेगळी उत्तम स्वप्ने पाहणे जरूर असते... आणि ध्येय माहीत असेल तरच ते सत्यात आणण्यासाठी रननीति बनवणे शक्य होते. खुजे ध्येय केवळ सामान्यत्वाकडेच नेऊ शकते आणि कोठे जायचे हेच माहीत नसले की दिशाविहीन भरकटणे नशिबी येते."

२. Henry David Thoreau : If you have built castles in the air, your work need not be lost; that is where they should be. Now put the foundations under them.

३. विकसित देशांतील विकास व सुस्थिती आकाशातून पडलेली नाही, किंवा कोणत्या हरीने खाटल्यावर बसलेल्या जनतेला दिलेली भेटही नाही. तो, तेथिल सरकारचे काही वर्षांचे प्रयत्न आणि जनतेचे सहकार्य, यांच्या एकत्रित परिणाम आहे.

================

महत्वाची सूचना :

भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यावर केलेली सुचना पसंत पडली तर त्याबद्दल स्वतः माहिती घेण्यासाठी पंतप्रधान वेळ देतात असा इतिहास आहे. या संधीचा जरूर फायदा घ्या व आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी हातभार लावा. त्याचा सर्व भारतियांना फायदाच होईल... त्यात तुम्ही-आम्ही आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही फायदा होईल. बघा पटते का.

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 3:58 pm | मराठी कथालेखक

त्या पुढच्या पायर्‍या काय आहेत ते ही तुम्ही सांगा,
माझ्यामते पुढच्या पायर्‍या म्हणजे जमा झालेल्या धनावर टॅक्स, पेनल्टी वसूल करणे. यामुळे बाजारातला काळा पैसा कमी होईल हे निश्चित (दुसर्‍या एका प्रतिक्रियेत मी ते मान्य केले आहेच). पण यापुढे भ्रष्टाचार होणार नाही ते कसे ?
बाकी इकडचे तिकडचे quotes टाकण्यापेक्षा तुम्ही जे म्हणताय ते म्हणजे 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.

भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे

माझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे.
महत्वाची सूचना :
बाकी मी नेमके प्रश्न विचारले होते , नेमकी उत्तर देता येत आलीत तरे बरे होईल. अन्यथा चालू देत तुमचं

'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.

आधी जमा झालेला काळा पैसा चलनातुन फेकुन देणे आणि ह्यापुढे काळा पैसा निर्माण होणार नाही हे बघणे ह्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या म्युचुअली एस्च्क्लुझीव्ह सुद्धा आहेत.

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 4:23 pm | मराठी कथालेखक

मी ही तेच म्हणतोय. पण मूळ लेखात 'भ्रष्टाचारमूक्त भारत' चा उल्लेख असल्याने माझी ही प्रतिक्रिया होती.
आपण दोघे एकच मुद्दा मांडत आहोत :)

बोका-ए-आझम's picture

14 Nov 2016 - 8:08 pm | बोका-ए-आझम

हे समजलं नाही. म्हणजे काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 4:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या महत्वाच्या सूचनेप्रमाणे तुमच्या प्रतिसादाची नेमकी उत्तरे खालीलप्रमाणे आहेत...

१. माझा वरचा प्रतिसाद, तुमच्या...

छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!

या नेमक्या वाक्याने संपलेल्या प्रतिप्रतिसादाचे, तुम्हाला सोईचे वाटले नसले तरीही, अगदी नेमकेच उत्तर होते. :)

२. भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.

७० वर्षांचा भ्रष्टाचार एका कारवाईत आणि एका रात्रीत संपवता येणार नाही हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे व पटले आहे असे माध्यमांतल्या त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. हे मलाही पटले आहे. तुम्हालाही पटायला हरकत नसावी, असे वाटते.

"आजच पुढच्या सगळ्या पायर्‍या सांगून सावध करून, (अ) त्यांच्याबद्दल काही प्रतिबंधक कारवाई करण्याची भ्रष्टाचार्‍यांना आणि अतिरेक्यांना संधी देण्याइतके हे सरकार बुळे नाही किंवा (आ) भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करणार्‍या वृत्तीचे नाही", असे त्याच्या आतापर्यतच्या कारवायांवरून दिसत आहे... हे देशासाठी चांगलेच आहे. याबाबतीत गेल्या दोन वर्षांत अनेक छोट्यमोठ्या पायाभूत कारवाया झाल्या आहेत व त्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. अजून काही महत्वाच्या कारवाया भविष्यात चालू राहणार आहेत असे पंतप्रधानांनी स्वतः सार्वजनिक सभेत सांगीतले आहे. तेव्हा "भ्रष्टाचार्‍यांच्या आणि अतिरेक्यांच्या विरुद्धच्या सरकारच्या कारवायांना उघड करा (पक्षी : भ्रष्टाचार्‍यांना आगावू माहिती देवून मदत करा)" असा दुराग्रह न करता, त्या कारवाया जश्या उलगडत जातील तश्या, एक सजग नागरीक म्हणून सहकार्य करणे हेच आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे.

३. माझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे.

असे तुम्हीच म्हणत आहात. अशा अवस्थेत निदान कधी नाही ते एखादे सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध काही कारवाई करत आहे त्याबद्दल समाधान ठेवून त्याच्या प्रत्येक पायरीवर सरकारला सहकार्य करावे हे उत्तम असे मला वाटते. गेली ७० वर्षे भ्रष्टाचाराची सतत वाढ होत असताना त्याविरुद्ध काही दीर्घकालीन ठोस उपाय झाले नाही, त्यापेक्षा हे बरे नाही का ?

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 4:08 pm | मराठी कथालेखक

"काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !!

मी नं व्यक्त केलेलं काहीही तुम्ही माझ्या नावावर खपवू पहात आहात. हा शुद्ध फालतूपणा झाला.

मुळात मी माझ्या प्रतिक्रियेत
१) नोटा रद्द करण्याच्या निर्णायास विरोध केलेला नाही
२) नोटा रद्द करण्याने बनावट नोटांचा बंदोबस्त झाल्याचे अमान्य केलेले नाही
३) तसेच बाजारातील काळा पैसा कमी होईल हे देखील मी अमान्य केले नव्ह्ते. (आणि दुसर्‍या एका प्रतिक्रियेत तर अगदी स्पष्टपणे मान्य केले होते).
पण तरीही तुम्ही नको तो अर्थ काढत असाल तर याला 'खोडसाळपणा' हाच एक शब्द आहे.
माझा मुद्दा एकच आहे. नोटा रद्द करण्याने वरील दोन फायदे मान्य असले तरी 'यापुढे भ्रष्टाचार होणार नाही किंवा झाल तरी फार कमी असेल' असे मला वाटत नाही. यावर मुद्देसूद प्रतिवाद केल्यास बरे.
धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 5:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

खोडसाळपणा किंवा फालतूपणा करणे माझ्या स्वभावात नाही आणि तो सहन करणेही माझ्या स्वभावात नाही.

या प्रतिसादासह वरचे तुमचे प्रतिसाद परत एकदा वाचून पहा ! अनवधानाने काही वाक्यरचना लिहीली गेली असली तरी त्याने वाचकांचा समज-गैरसमज होऊ शकतो. मुक्त संस्थळावरची लिखित वाक्ये तेथे तशीच राहत असल्याने व सगळ्यांना वाचता येत असल्याने, नंतर त्यांचे दडपून समर्थन करणे कठीण जाते. तेव्हा प्रत्येक शब्द नीट विचार करून लिहावा असे माझे मत आहे. तसे तुमचे मत असावे असा माझा आग्रह नाही.

बाकी तुमच्या इतर प्रतिसादांना वर उत्तर दिले आहेच.

माझीही सूचना :)

जर सभ्य भाषेत संवाद चालू ठेवण्याची तयारी असेल तर तो करायला मला नेहमीच आनंद वाटेल. अन्यथा, कर्कश्य व असंवैधानिक भाषेमुळे वितंडवाद होतो, ज्यात मला अजिबात रस नाही. पुढच्या प्रतिसादाला उत्तर आले नाही तर ते का आले नाही (निदान प्रतिवाद सुचत नाही म्हणून तर नाहीच नाही) हे समजावे यासाठी हे शेवटचे विधान आहे.

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 11:56 pm | मराठी कथालेखक

कर्कश भाषा मी सुरु केली नाही.
शिवाय माझा मुद्दाच तुम्हाला कळाला नाही आणि उगाचच मी या 'कारवाई/मोहिमेला विरोध करत आहे' असा तुम्ही समज निर्माण करुन घेतलात. माझा मुद्दा साधा सरळ होता तो म्हणजे उत्साहाच्या भरात या कार्वाईचे नसलेले उद्दिष्ट तुम्ही त्यास चिकटवत आहात.
असो. चर्चा मुद्द्यापासून भरकटत असल्याने अधिक चर्चा करण्यात रस नाही. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Nov 2016 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल.

हा आणि...

ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

हा मजकूर मूळ लेखात आहे. दुसरे विधान तर लेखाच्या शेवटी आणि ठळक अक्षरांत आहे.

असे असतानानी या "एकाच" कारवाईने सगळा भ्रष्ताचार कसा संपणार ? असा प्रश्न लेखासंबधी करून कोण बरे... उत्साहाच्या भरात या कार्वाईचे नसलेले उद्दिष्ट तिला किंवा लेखाला चिकटवत आहे ?

छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!

असा कर्कशपणा कोणी सुरू केला हे तुमच्या ध्यानात आले नाही तरी वाचकांच्या ते ध्यानात येतेच. इथला सगळा मजकूर सगळ्यांना वाचायला इथेच असणार आहे. इथे काहीही कबूल करायची गरज नाही, कारण तो उद्येश नाहीच. फक्त शांतपणे सर्व विचार केला तर सगळे ध्यानात येईल.

लेख नीट न वाचता केल्या जाण्यार्‍या कर्कश्य आणि भरकटवणार्‍या प्रतिक्रिया बंद झाल्या तर त्याचे स्वागतच आहे. धन्यवाद !

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 2:41 pm | मराठी कथालेखक

बरं .. तुमचं(च) खरं... तुम्हीच ते मोठे..
आता खुष ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2016 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद, पण नको धन्यवाद ! (पक्षी : थँक्स, बट नो थँक्स !) :)

आता तुम्ही, कुत्सितपणे का होईना पण, मोठेपणा दिला आहेच, तर त्याचा फायदा घेऊन काही सर्वमान्य विचार खाली देत आहे. ते नवीन नक्कीच नाहीत, पण महत्वाचे जरूर आहेत...

१. सार्वजनिक संस्थळावरचे लेखन (उदा: मिपावरचे लेख व प्रतिसाद) सर्वच वाचकांना दीर्घकाळ वाचायला उपलब्ध राहते, त्यामुळे...

२. आपले प्रतिसाद, लेख किंवा त्यावरच्या इतर प्रतिसादांमधील लेखनावर आधारलेले असावेत; किमान त्याच्या केलेल्या विपर्यासावर किंवा स्वतःच्या कल्पनेने बनवलेला व लेखात/प्रतिसादात नसलेला मुद्दा रेटून केलेल नसावे. (माणुस म्हटले की एखादी चूक होणारच, चुकून तसे झाले तर ते स्विकारण्याइतका मनाचा मोठेपणा बाळगावा.) कारण...

३. आंतरजालावरच्या आभासी जगात, प्रत्येकाची ओळख व पत, त्याच्या लिखाणाच्या नीतीवरून व प्रतीवरून ठरते.

घरात रोज बाहेरुन धुळ / कचरा येतच असतो. ती धुळ येणे काही बंद करता येणार नाही म्हणुन आत्ता आज घरात साठलेली धुळ्/कचरा आहे तो स्वच्छच करायचा नाही का?

नविन होणारा भ्र्ष्टाचार थांबणार नाही, पण आधी जमा झालेला काळा पैसा १० टक्क्यानी जरी कमी झाला तरी मी ही योजना यशस्वी झाली असे म्ह्णीन.
नविन होणारा भ्रष्टाचार आणि करचुकवे पणा नक्कीच थोडा कमी होइल कारण त्या लोकांना थोडी धास्ती तर नक्कीच वाटेल.

-------
हे ही लक्षात घ्या की, जितका पैसा जमा होणार नाही, तो थेट आरबीया चा नफा असेल. म्हणजे १४ लाख कोटी पैकी १ लाख कोटी बँकेत भरलेच गेले नाहीत तर आरबीआय ला १ लाख कोटीचा फायदा होइल. बजेट डेफीसीट एकदम कमी होइल.

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2016 - 4:20 pm | मराठी कथालेखक

नविन होणारा भ्र्ष्टाचार थांबणार नाही, पण आधी जमा झालेला काळा पैसा १० टक्क्यानी जरी कमी झाला तरी मी ही योजना यशस्वी झाली असे म्ह्णीन.

मला हेच म्हणायचे आहे. असलेला काळा पैसा कमी करणे , आणि खोट्या नोटांचा बंदोबस्त करणे हा या पूर्ण मोहीमेचा खरा उद्देश आणि तो काही यशस्वी होईल यात शंका नाही.

पण मोहीमेचे स्वागत करताना, उत्साहाच्या भरात नसलेले उद्दिष्ट त्या मोहिमेला चिकटवले जावू नये (भ्रष्टाचारमूक्त भारत) नाहीतर पुढे भ्रष्टाचार होताना पाहिल्यावर ही तुम्हालाच ही मोहीम अयशस्वी वाटण्याची शक्यता निर्माण होते.

झालेच तर या मोहीमेमुळे उत्तरप्रदेश वगैरे राज्यांत निवडणूकांत भाजपला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.
कारण काही धनदांडगे काळ्याचे पांढरे करताना आसपासच्या गरीब मंडळींची मदत घेतील आणि त्यावेळी या गरीबांना काही प्रमाणात मोबदला मिळेल. अगदी लाखाला पाच-दहा हजार इतका मिळाला तरी ती मंडळी , भाजपच्या निर्णयामुळे श्रीमंतांचे काही पैसे आपल्याला मिळाले यामुळे खूष होवून भाजपला मत देण्याची शक्यता आहे.
टीपः मी इथे केवळ एक शक्यता वर्तवत आहे, यात मी चूक्/बरोबर वगैरे भाष्य करत नाहीये किंवा मोदी/भाजपवर आक्षेप घेत नाहीये.

मृत्युन्जय's picture

14 Nov 2016 - 6:35 pm | मृत्युन्जय

मला हेच म्हणायचे आहे. असलेला काळा पैसा कमी करणे , आणि खोट्या नोटांचा बंदोबस्त करणे हा या पूर्ण मोहीमेचा खरा उद्देश आणि तो काही यशस्वी होईल यात शंका नाही.

पण मोहीमेचे स्वागत करताना, उत्साहाच्या भरात नसलेले उद्दिष्ट त्या मोहिमेला चिकटवले जावू नये (भ्रष्टाचारमूक्त भारत) नाहीतर पुढे भ्रष्टाचार होताना पाहिल्यावर ही तुम्हालाच ही मोहीम अयशस्वी वाटण्याची शक्यता निर्माण होते.

परफेक्ट

ट्रेड मार्क's picture

15 Nov 2016 - 10:27 pm | ट्रेड मार्क

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ही एकुलती एक कृती होती असं तुम्हाला वाटतंय का? या आधी आणि यापुढे पुढे काहीच केलं जाणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा कायमच चालू राहणार कारण जो पर्यंत लोकांना भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय आणि तो करणे कसे व का चुकीचे आहे हे कळणार नाही तो पर्यंत सतत भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही ना काही कृती करायला लागणार.

भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवायला काहीच हरकत नाही कारण तेव्हाच स्वप्नपूर्ती कशी करावी याचा विचार होतो. याचा अर्थ लगेच रामराज्य येईल, घरांच्या किंमती कमी होतील व स्वस्ताई येईल असा नाही. पण हे पाऊल उचलणे महत्वाचे होते आणि धाडसाचे पण होते. ते धाडस मोदींनी दाखवले. यामुळे भाजपमधील, विरोधी पक्षातील आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कितीतरी नेत्यांची आणि काळाबाजारयांची अडचण झाली असणार आहे.

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 1:48 pm | संदीप डांगे

ती राजकीय पक्षांच्या फंडात पैसे भरायची काय भानगड आहे माहित आहे का कुणाला? वीस हजार पर्यंत कॅश भरली तर दात्याचे नाव जाहीर केले जात नाही असे ऐकले आहे, तसेच राजकीय पक्ष आपले अकाऊंट्स, देणग्या जाहीर करत असतात काय?

गॅरी ट्रुमन's picture

14 Nov 2016 - 1:55 pm | गॅरी ट्रुमन

तसेच राजकीय पक्ष आपले अकाऊंट्स, देणग्या जाहीर करत असतात काय?

एक राजकीय पक्ष होता. त्याने पक्षाला मिळालेल्या सगळ्या देणग्या वेबसाईटवर टाकल्या होत्या. पण ती यादी आता वेबसाईटवरून नाहिशी झाली आहे असे म्हणतात :)

प्रसाद_१९८२'s picture

14 Nov 2016 - 3:42 pm | प्रसाद_१९८२
अनुप ढेरे's picture

14 Nov 2016 - 1:55 pm | अनुप ढेरे

बरोबर आहे माहिती. सर्व पार्ट्या यात आहेत, आप देखील. भरपूर काळा पैसा जमा होतो यातून. इथे स्ट्राईक केला मोदींनी तर आयुष्यभर मत देईन त्यांना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 3:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

Under Section 13A of the Income Tax Act, political parties are exempt from paying Income Tax but are required to file their Income Tax returns annually to the Income Tax Department. They enjoy 100% tax exemption from all sources of income.

याबद्दल सुलभ प्रकारे अधिक माहिती इथे मिळेल.

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 7:17 pm | संदीप डांगे

या प्रकारे राजकीय पक्षांकडे नक्की किती गंगाजळी आहे व ती कुठून आली याची माहिती जनतेला उपलब्ध होते काय?

सर्वसामान्य जनतेला नाही, पण या गोष्टींचे (ही) फर्स्ट हॅन्ड रिपोर्ट मिळतात असे ऐकून आहे.

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 1:42 am | संदीप डांगे

मोदक भाऊ, तुम्ही खोचक कमेंट्स करत आहात का? असल्यास का व नसल्यास प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्या किंवा इग्नोर मारा, सिम्पले!

का भाजपची गंगाजळी किती हा प्रश्न येईन म्हणून दिशाभ्रम करत आहात?

पैसा's picture

15 Nov 2016 - 10:20 am | पैसा

२०१३-१४ चे ऑडिटेड बॅलन्स शीट मिळतात ब्वा नेटवर.
http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2014/AA%202013-14%20...
http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2014/INC%20Annual%20...
http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2015/Nationalist%20C...
असेच बाकीच्यांचेही मिळतील. बेहिशेबी रोकडा किती मात्र म्हैत नै.

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 10:40 am | संदीप डांगे

धन्स अ लॉट! नेमके उत्तर पाहिजे होते. ;)

अनुप ढेरे's picture

15 Nov 2016 - 10:31 am | अनुप ढेरे

ती कुठून आली याची माहिती जनतेला उपलब्ध होते काय?

२००००च्या आतली रक्कम कॅशने स्वीकारता येते. ती कशी आली याची काहीही माहिती ठेवावी लागत नाही बहुधा. सर्व राजकीय पक्ष काळा पैसा पक्षात असाच आणतात. इथे सर्जिकल स्ट्राईक करणार का मोदी माहिती नाही. केला तर आदर प्रचंड दुणावेल.

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 10:39 am | संदीप डांगे

हेच, इकडे सर्जिकल strike होतो का पाहू! सर्वात आधी इथेच व्हायला पाहिजे होतं, आता 19500 च्या नोटांची भरती पक्षांच्या खात्यात होत असेल तर त्याची काही माहिती पब्लिक डोमेन ला येईल काय देव आणि मोदीच जाणे

कोणत्याच पक्षाची ही माहिती पब्लिक डोमेनमधे येणार नाही. कारण बँकेत पैसे भरताना ते एकदम सगळी कॅश भरतात. प्रत्येक माणसाची वेगळी रिसिट दाखवणार नाहीत. आणि कोणत्याही बँकेचे एकेक एन्ट्री दाखवणारे स्टेटमेंट थर्ड पार्टीला मिळणे शक्य नाही.

अन्नू's picture

14 Nov 2016 - 2:25 pm | अन्नू

आत्ताच मोदींची स्पिच ऐकली त्यातलं एक वाक्य..
"गरीब चैनीत झोपत आहेत आणि श्रीमंत पैसेवाले झोपेच्या गोळ्या घेत आहेत!"
त्यावर एक झलक...
https://www.facebook.com/freethinker/videos/10154697477823609/
कदाचित हे खरबोपती असावेत!

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2016 - 3:18 pm | श्रीगुरुजी

नोटा रद्द करण्याच्या हेतूवर अजिबात शंका नाही. या निर्णयाचे चांगले परीणाम देखील बघायला मिळत आहेत. पुण्यात एकाने १००० च्या ५२ नोटा कचर्‍यात फेकून दिल्या. म्हणजे ५२००० रूपयांचे बेहिशेबी उत्पन्न अर्थव्यवस्थेतून नाहीसे झाले. सोलापूरच्या महापौर बाईंनी अनेक वर्षे मालमत्ता कर भरला नव्हता. नोटा रद्द केल्यावर घरातील ५००-१००० च्या नोटा आणून सव्वा लाख रूपये मालमत्ता करून गेल्या अनेक वर्षांची थकबाकी चुकविली. सर्व महापालिका, नगरपालिकांना थकीत करभरणा मिळत आहे. एकंदरीत असे बरेच चांगले परीणाम दिसत आहेत.

परंतु या चांगल्या निर्णयाच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या आहेत असे दिसते. नोटा रद्द करण्याचा निर्णय ठरल्यानंतर ५०० च्या नवीन नोटा व २००० च्या नोटा ८ नोव्हेंबर पूर्वीच मोठ्या संख्येने तयार करून ठेवायला पाहिजे होत्या. म्हणजे त्यांचे लगेच वितरण होऊन नागरिकांना कमी त्रास झाला असता. एटीम यंत्रांचे कॅलिब्रेशनदेखील आधीच करायला हवे होते. त्यामुळे आता जो गोंधळ सुरू आहे तो कमी प्रमाणात झाला असता.

नाखु's picture

14 Nov 2016 - 3:47 pm | नाखु

आधीच छापुन ठेवल्या नाहीत असेच काल मोदींनी भाषणात सांगीतले आहे.टिप देणारे सरकारी बाबूंनी याचा उपयोग करून घेतला असता आणि जुन्या नोटांची आधीच वासलात लागली असती.

नोटा फेकण्यापेक्षा आपत्ग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात भरा असे मक्याभाऊंनी आवाहन केले आहे. खरेच सरकारी बाबूंनी याचा विचार करावा आणि जमेल तितका दुवा तरी घ्यावा.,

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2016 - 9:06 pm | श्रीगुरुजी

आधी छापून ठेवून तयार ठेवता आल्या असत्या व ९ नोव्हेंबर पासून वितरीत करता आल्या असत्या.

अनुप ढेरे's picture

14 Nov 2016 - 3:48 pm | अनुप ढेरे

थकित वीज बिलाच्या भरण्यात दसपट वाढ !

http://energy.economictimes.indiatimes.com/news/power/currency-note-ban-...

गंम्बा's picture

14 Nov 2016 - 4:01 pm | गंम्बा

हा फायदा ही लक्षात घ्यावा टिका करणार्‍यांनी.

पद्माक्षी's picture

14 Nov 2016 - 4:30 pm | पद्माक्षी

हा पण एक फायदा :),
पुण्यात ५ दिवसात एकही घरफोडी नाही.

http://timesofindia.indiatimes.com/city/pune/With-cash-in-banks-house-br...

साधा मुलगा's picture

14 Nov 2016 - 4:36 pm | साधा मुलगा

कालच श्री.अनिल बोकील म्हणाले होते कि २६ जुलै नन्तर मुंबईत ३ दिवस एकही FIR दाखल झाला नाही,
पुण्यात ५ दिवसात एकही घरफोडी नाही.---- हि भारतीय दैवी वृत्ती वर आल्याची पुनरावृत्ती आहे का?

रामराज्य म्हणायचंय का तुम्हाला :-P

साधा मुलगा's picture

14 Nov 2016 - 5:00 pm | साधा मुलगा

तेच हो , काल TV वर झालेल्या श्री. बोकील यांच्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन बोलत आहे, :)

राघवेंद्र's picture

14 Nov 2016 - 8:50 pm | राघवेंद्र

माझे मित्र भारतात जाताना त्यांच्या काही ५००-१००० च्या नोटा त्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी सांगत आहेत. मी सगळ्यांना हो म्हणालो तर एकूण रक्कम ५०,०००-६०,००० होत आहे. माझा प्रश्न असा आहे, विमानतळावर याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का ?

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2016 - 9:01 pm | टवाळ कार्टा

हो...फक्त ७५०० आणायला परवानगी आहे बहुतेक

राघवेंद्र's picture

14 Nov 2016 - 9:20 pm | राघवेंद्र

तोच तर प्रॉब्लेम आहे. रु. ७५०० प्रति माणशी.
काही वेबसाईट म्हणतात की प्रत्येक मित्राची पॅन कार्ड फोटोकॉपी घेऊन नेली तर चालेल. पण खरे खोटे काही माहित नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

आरबीआयच्या संस्थळावर खालील माहिती आहे...

18. While coming into India how much Indian currency can be brought in?

A person coming in to India from abroad can bring in with him Indian currency notes within the limits given below:

a. upto Rs. 5,000 from any country other than Nepal or Bhutan, and

b. any amount in denomination not exceeding Rs.100 from Nepal or Bhutan.

19. While going abroad how much Indian currency can be taken out?

A person going out of India can take out with him Indian currency notes within the limits given below:

a. upto Rs.5000 to any country other than Nepal or Bhutan, and

b. any amount in denomination not exceeding Rs.100 to Nepal or Bhutan.

राघवेंद्र's picture

14 Nov 2016 - 11:35 pm | राघवेंद्र

आता ५००-१००० च्या नोटा बंद झाल्याने त्यात सुद्धा थोडी वाढ करायला पाहिजे.

श्रीरंग_जोशी's picture

15 Nov 2016 - 8:27 am | श्रीरंग_जोशी

रिझर्व बँकेच्या संस्थळावर उपलब्ध असलेल्या १९ जून २०१४ च्या या पत्रकानुसार भारतातून बाहेर* जाताना व बाहेरुन* परत येताना भारतीय चलन नेण्याची व आणण्याची प्रति व्यक्ती कमाल मर्यादा ₹२५,००० इतकी आहे. (*या बाहेरमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व भूतान यांचा समावेश नाही).

रिझर्व बँकेनुसार ₹२५,००० इतकी कमाल मर्यादा असुनही, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कस्टम्स विभागाच्या संस्थळावर ही मर्यादा ₹७,५०० इतकीच आहे.

रिझर्व बँकेच्या ससंस्थळावर या विषयाचे अधिक नवे पत्रक शोधण्याचा प्रयत्न केला असता ते मिळाले नाही. बहुतेक तरी रिझर्व बँकेनी तेव्हाची ₹२५,००० ही कमाल मर्यादा कमी केलेली नाही.

या ठिकाणी रिझर्व बँक जरी नियमन यंत्रणा असली तरी अंमलबजावणी कस्टम्स विभागालाच करायची आहे. आपल्या देशात दुर्दैवाने विविध सरकारी विभागामंध्ये एकवाक्यता नसते.

हे झाले जे लोक ३० डिसेंबर अथवा ३१ मार्चपर्यंत भारतात जाऊ शकणार्‍या मंडळींसाठी. इतरांना स्वतःच्या NRO खात्यात जुन्या नोटा भरायला सांगितले जात आहे परंतु परदेशातून तसे करण्याचा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीये.

१० तारखेला वाचलेल्या एका बातमीनुसार युकेतल्या भारतीय डेप्युटी हाय कमिशनर यांनी परदेशस्थ भारतीयांकडल्या जुन्या ₹५०० व ₹१,००० च्या नोटा बदलून देण्याच्या सोयीस्कर पर्यायांसाठी प्रयत्न करू असे सांगितले आहे. आशा आहे की येत्या काही दिवसात सरकारपातळीवरुन याबाबत काही तरी ठोस पाऊल उचलले जाईल.

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2016 - 6:32 pm | श्रीरंग_जोशी

वरच्या प्रतिसादात मुंबई विमानतळाच्या कस्टम्सच्या संस्थळावर रिझर्व बँकेपेक्षा कमाल मर्यादा बरीच कमी असल्याने मी ही बाब लक्षात आणून देण्यासाठी mumbaiaircustoms@nic.in या पत्त्यावर १७ तारखेला इमेल पाठवला होता. आज त्याचे उत्तर मिळाले. ते असे...

As per the Reserve Bank of India guidelines:-
Any passenger resident in India

  • who had gone out of India on a temporary visit, may bring into India at the time of his return from any place outside India (other than from Nepal and Bhutan), currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
  • Any person resident outside India, not being a citizen of Pakistan, Bangladesh, and visiting India,
    may bring into India currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.

For further clarification, you may visit Reserve Bank of India official website https://www.rbi.org.in/Scripts/FAQView.aspx?Id=66 where the issue is clarified under FAQ no 04.

SUPERINTENDENT OF CUSTOMS
VIGILANCE SECTION, CSI AIRPORT, MUMBAI

मी त्यांना धन्यवाद देताना त्यांच्या संस्थळावरील कमाल मर्यादेत दुरुस्ती करण्यास सुचवले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Nov 2016 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकदम ब्येस्ट केलंत ! धन्यवाद !

केवळ त्रासाबद्दल ओरड न करता सुजाण नागरिकांनी केलेल्या दुसर्‍यांना उपयोगी होऊ शकणार्‍या उत्तम सकारात्मक कृतीचे अजून एक उदाहरण !

खटपट्या's picture

21 Nov 2016 - 10:02 pm | खटपट्या

खूप खूप धन्यवाद श्रीरंग.

इरसाल's picture

23 Nov 2016 - 12:56 pm | इरसाल

हेच तर चुकतं श्री. श्रीरंग जोशी यांच,
असं काही माहित पडल्या पडल्या त्यांनी आधी ट्विटरवर बोंब ठोकायला हवी होती, असतील नसतील तितक्या व्हाट्सप गृप्स वर ठणाणा करायला हवा होता, फेसबुकवर पोस्टी टाकुन शंख करायला हवा होता, मिपावर एक जळजळीत धागा पेटवायला हवा होता गेला बाजार शक्य असल्यास पॉम्प्लेट छापुन विमानतळावरच्या क्स्टमस्च्या ऑफिस समोर ते भिरकावुन रामलीला मैदानीय ठिय्या द्यायला हवा होता.

ह्यांनी काय केलं तर म्हणे तिथे मेल टाकुन दुरुस्ती सुचवुन बाकीच्या लोकांची मदत करायचा चंग बांधला.
ह्यअ‍ॅ....अस कोणी करतं का ????????????
जर पुन्हा तुम्ही असं करताना सापडलात किंवा दिसलात किंवा कळले तर मग बघाच.........

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2016 - 3:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

नायतर काय !

अश्याने राजकारणात येण्याचे चान्सेस शून्य करून घेत आहेत, ते वेगळेच =))

समर्पक's picture

15 Nov 2016 - 3:26 am | समर्पक

उगीच नाही त्या फंदात पडू नका असे मी तरी सांगेन...
स्वतःचे पैसे फक्त बरोबर बाळगा, नसती समाजसेवा अंगाशी येऊ शकते.

भा.री. बँकेच्या म्हणण्याप्रमाणे अनिवासी भारतीय आपापल्या एन आर ओ खात्यात पैसे भरू शकतात.

भा.री. बँक पत्रक : https://rbi.org.in/Scripts/FAQView.aspx?Id=119

बँकांची यादी : https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/pdfs/71206.pdf

दुसऱ्या एका धाग्यात म्हंटल्याप्रमाणे कळत-नकळत 'हम सब चोर है' चे अजून एक उदाहरण म्हणजे अनेक अनिवासी भारतीयांकडे (६ महिन्यांहून अधिक वास्तव्य) एन आर ओ/इ खातेच नाहीये, झूम वगैरे सेवा वापरून आपले भारतातील बचत खात्यात असेच पैसे पाठविले जात आहेत...

Import and Export of Indian Currency are “Restricted”.

However,
(i) any person resident in India is allowed to take outside India currency notes of Government of India and Reserve Bank of India notes upto Rs. 7,500/- per person;
(ii) any person resident in India who had gone out of India on a temporary visit, is allowed to bring into India at the time of his return from any place outside India, currency notes of Government of India and Reserve Bank of India notes upto Rs. 7,500/- per person; and
(iii) a passenger coming from Nepal or Bhutan to India and/or a passenger travelling to Nepal or Bhutan from India, is allowed to carry currency notes of Government of India and Reserve Bank of India notes without any value restriction except notes of denominations of above Rs. 100/- in either case, so long as the same constitutes part of his bonafide baggage.

बंड्याभाय's picture

15 Nov 2016 - 5:01 am | बंड्याभाय

वरील लींक पाहिल्या पण जर एन आर ई खाते असेल तर नक्की काय करता येईल हे स्पष्ट होत नाहीये.
कृपया याबाबतीत अधिक मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Nov 2016 - 6:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

परदेशातून "भारतीय नोटांच्या स्वरूपात" आणलेले पैसे एनआरआय खात्यात जमा करता येत नाहीत, पण एनआरओ खात्यात जमा करता येतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

नोटा रद्द केल्यामुळे अतिरेक्यांच्या काळ्या किंवा खोट्या पैशावर टाच आल्याने काश्मीरच्या समस्येत फरक दिसू लागले आहेत. दगडफेक बंद झाली आहे...

No stone pelting on forces in Kashmir after demonetisation move, says Manohar Parrikar

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2016 - 11:03 pm | श्रीगुरुजी

मराठा मूक मोर्चे देखील थांबलेले दिसतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Nov 2016 - 11:30 pm | अनिरुद्ध.वैद्य

१४ लाख कोटींपैकी २ लाख कोटी जमा झाले बँकेत असे कळले.

२ लाख कोटी जमा झाल्याची प्रेस नोटः
http://finmin.nic.in/press_room/2016/PressReleaseR12112016.pdf

हजार पाचशेंपैकी एकुण रक्कम इथे सापडेलः

http://www.firstpost.com/india/chart-rs-500-rs-1000-notes-form-86-of-tot...