गाभा:
सर्व औरंगाबादकर मंडळींना नमस्कार!
माझ्या मनात असा विचार आला की यत्कदाचित भविष्यात औरंगाबादकरांचा मिपाकट्टा करायचा ठरला तर तो यशस्वी व्हावा यासाठी एक कायअप्पा समुह बनवला तर चालेल का?
मिपाची परंपरा काय! वगैरे बाबी मला माहित नाही त्यामुळे आपले मत काय ते सांगा. कायअप्पा समुहासाठी सहमत असाल तर येथे टीचकी मारा
प्रतिक्रिया
2 Nov 2016 - 5:04 pm | अभ्या..
वैभव, टिचकीची लिंक गंडली राव. एक झलक दिसती औरंगाबाद ग्रुपची आणि नंतर अॅड्रेस वॉजन्ट अन्डरस्टुड म्हणतंय.
2 Nov 2016 - 5:21 pm | वैभव पवार
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Gl1xYSfpA8b60rPDVQq0Ww
2 Nov 2016 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा इथेच मिपावर टाकून सर्व मिपाकरांना त्याची माहिती दिली तर ते जास्त चांगले होईल.
कारण त्यामुळे विशिष्ट कायप्पागृपवर नसलेल्या स्थानिकांना, परगावाहून येऊ इच्छिणार्यांना * किंवा परगावच्या पण कर्मधर्मसंयोगाने कट्ट्याच्या जागेजवळ असणार्यांनाही कट्ट्यात भाग घेता येईल. शिवाय वाचनमात्र मिपाकरांना भेटण्याची आणि त्यांना मिपापरिवारात अधिक घट्ट सामावून घ्यायची संधीही मिळेल.
* : ८ तास चारचाकी चालवत कट्ट्याला येऊन कट्टा संपल्यावर लगेच परत ८ तास चारचाकी चालवत परतीचा प्रवास करण्याचा स्पृहणिय विक्रम करणारे लोक मिपापरिवारात आहेत, काय समजलात ! :)
2 Nov 2016 - 9:17 pm | वैभव पवार
ठीक आहे सर नविन धागा काढतो!
2 Nov 2016 - 11:23 pm | अभ्या..
ओ एक्काकाका, ते विक्रम परदेशातल्या मख्खन रस्त्यावर, भारी भारी एसी गाडी आणि शिस्तीत ट्राफिकमध्ये.
म्या कट्ट्यासाठी टूव्हीलरवर, पावसात भिजत, सोलापूर ते पुण्यातल्या दिव्य ट्राफिकात ५ तास चालवून आलोय, आणि परत गेलोय. काय समजलात ;)
2 Nov 2016 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
मग तर माझा मुद्दा अजूनच जास्त ठामपणे सिद्ध झाला नाही का ?
भारतातले ५ तास पावसात दुचाकी चालवणे => अम्रिकेतले ८ तास चारचाकी चालवणे... हाकानाका ! ;) :)
2 Nov 2016 - 11:31 pm | अभ्या..
पन मी औरंगाबादला जाणार नाही.
(सरांनी बोलावल्याशिवाय. ते नाराज हैत)
3 Nov 2016 - 8:32 am | नाखु
लोकांनी मध्यवर्ती ठिकाणी (अर्थात पुणे किंवा नगर इथे कट्टा करावा ) हजेरी लावू.नगरच्या जवळ काही लेणी-मंदीरे आहेत का? म्हणजे आम्चे गडकरी येतील.
महानगरी नागरीक नाखु