शेतकरी राया..

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 7:38 pm

शेतकरी राया...

अपुला शेतकरी राया, शेती प्रेमाची करतो..
अवघ्या भुकेल्या जनांची, ओंजळ प्रितीने भरतो..

अपुला शेतकरी राया, नांगर ओढतो जोमानं..
पिक हलते डुलते, शेती खुलते प्रेमानं..

अपुला शेतकरी राया, धनधान्य खुलवितो..
सार्या जगाचा तो बाप, जगी प्रेम फुलवितो..

अपुला शेतकरी राया, कर्जाखालीच राबतो..
पर्जन्याच्या वाटेवर, तोच एकला थांबतो..

अपुला शेतकरी राया, रोज जगतो मरतो..
जगा धान्य पुरवूनी, पोटी भाकरी भरतो..

अपुला शेतकरी राया, संसाराचे सोने करतो..
जगा सुखी करवूनी, स्वत: गरिबीमधे झुरतो..

अपुला शेतकरी राया, शेवटी आत्महत्या करी..
जगा फुलवूनी सार्या, दैवत्वाचा रस्ता धरी..

प्रिय शेतकरी राया, आत्महत्या नोको करू..
अमुच्या पापी वृत्तीमुळे, नोको स्वर्गाला त्या धरू..

केला आम्ही मोठा गुन्हा, विसरलो तुझे प्रेम..
अमुच्या स्वार्थापायी तुला, दिला कवडीमोल दाम..

सरली माणुसकी आता, विरला आंधळा विश्वास..
आज सर्वांनाच हवा, अजब श्रीमंतीचा घास..

तुच आमचे आयुष्य, तुच आमचा विश्वास..
अवघ्या जगी जनतेचा, तुच असशी तो श्वास..

तूच माऊली अमुची, तुच अमुचा तो बाप..
तुझ्याविना अवघी पृथ्वी, जगी करेल विलाप..

तुझ्या कष्टाची भाकरी, आम्ही प्रेमानं ती खाऊ..
जगा जगवूनी सार्या, नोको सोडून तू जाऊ..

तुझ्यापाशी मी मागतो, तुझ्या जीवाची ती भिक..
तुझा लाडका पोर मी, भारताचा नागरिक..

इतके बोलून थांबतो, संपवतो माफीनामा..
सार्या जनतेची हाक, करतो तुझ्यापायी जमा..

ऐक आमुची ही हाक, ऐक आमुचे गाऱ्हाणे..
अमुच्या संग तुही विण, नवयुगाचे तराणे.. नवयुगाचे तराणे...

समाज

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

21 Oct 2016 - 9:11 pm | चांदणे संदीप

आज या ठिकाणी मुटेसर असते... मुटेसर असते... म्हणजे तसे ते आहेतच ओ फक्त लॉगिन नाहीयेत मिपावर!... तर मुटेसर असते तर तुमचा लकडीपुलावर जाहीर मुका घ्यायला तयार झाले असते आणि जर का तुम्ही लेडीज महिला(नसालच! तरीही...) असाल तर.... ह्या ह्या ह्या... काही नाही तेच ते ... ओटी वगैरे भरली असती त्यांनी! ;)

Sandy

सोहम कामत's picture

21 Oct 2016 - 11:09 pm | सोहम कामत

धन्यवाद...

चाणक्य's picture

21 Oct 2016 - 11:17 pm | चाणक्य

हे यमक लईच आवडलय.