*
चेह~यावर रेशमी बटा रुळती
का इतकी सुंदर दिसते ती?
*
नवनवे फोटो अपलोड करते ती
प्रत्यक्षात कितीे मोहक असेल ती
*
धवल गुलाबी साडी नेसती ती
जणू गुलाबास पाकळ्यांत लपेटती ती
*
च्याटिंग चा प्रयत्न जरी केला मी
तरी सारखी बिझी का असते ती?
*
कधी ड्रेस,कधी जिनटॉप वापरे ती
पण साडीत अती सुंदर दिसते ती
*
किती गोड कविता लिहिते ती,
त्यात दुखा:चे रंग का भरते ती?
*
भेटलो नाही कधी तिला मी
तरी ओळखीची का वाटते ती ?
*
नाही जरी दोन शब्द बोललो मी
अनामिक ओढ का लावते ती?
प्रतिक्रिया
18 Oct 2016 - 3:01 pm | पुंबा
लोल.. या रे या! लवकर भरभर सारे या!