हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
11 Oct 2016 - 8:50 am

"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुस‍र्‍यांदा जिंकली.

२००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला.
डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा.

आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला,
"She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter."

म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ?

"होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता."

"त्यामानाने अमेरिकन स्त्रीया जरा बावळटच आहेत नाही का रे भाऊ?"

"तसं नव्हे रे, आपल्या भारतीय स्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या फाल्तूगीरी चालवून घेणार नाहीत.इमिग्रेशनमुळे निरनीराळ्या संस्काराच्या स्त्रीया इकडे आहेत.त्यामुळे इकडच्या स्त्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या आता निवडणूकीत
त्याला धडा शिकावतील.७२ टक्के स्त्रीया अगोदरच डॉनाल्डच्या विरोधात गेल्या आहेत असं ऐकतो."

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

हेमन्त वाघे's picture

11 Oct 2016 - 9:59 am | हेमन्त वाघे

आपण अमेरिकेचे नागरिक आहेत का? ( मतदान करू शणारे )

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Oct 2016 - 7:07 am | श्रीकृष्ण सामंत

होय,मी अमेरिकन सिटीझन आहे.बिल क्लिन्टनच्या निवडणूकी पासून मी मतदानात भाग घेत आलो आहे.

गामा पैलवान's picture

12 Oct 2016 - 11:45 am | गामा पैलवान

श्रीकृष्ण सामंत,

तुम्ही अमेरिकी नागरिक आहात म्हणजे अमेरिकी घटनेला बांधील आहात. मग भ्रष्ट हिलरीने आणि तिच्या महाभ्रष्ट नवऱ्याने अमेरिकी सुरक्षेची केलेली वाताहात तुम्हाला दिसंत नाही? की जाणूनबुजूनदुर्लक्ष करताय?

आ.न.,
-गा.पै.

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Oct 2016 - 7:34 am | श्रीकृष्ण सामंत

"तुम्ही अमेरिकी नागरिक आहात म्हणजे अमेरिकी घटनेला बांधील आहात"

निस्सन्देह

मग भ्रष्ट हिलरीने............

मला वाटतं आपले हे बे-छूट आरोप आहेत.अमेरिकेची सुरक्षता इतकी फाल्तू नाही.आणि अमेरिकन नागरिक,मग तो कुणीही नागरिक असो,देशाला गहाण ठेवणार नाही.प्रेसिडेंटच्या पदावरचा तर नाहीच नाही.इथे सूर्याजीपिसाळ अजूनतरी जन्माला आलेले नाहीत.

यशोधरा's picture

13 Oct 2016 - 7:47 am | यशोधरा

इथे सूर्याजीपिसाळ अजूनतरी जन्माला आलेले नाहीत.

Please don't be so sure Kaka. :)

घ्या अमेरिकन सूर्याजी पिसाळांची लिस्ट.

एडवर्ड स्नोडन.
रॉबर्ट हॅन्सन.
आझम द अमेरिकन (Adam Yahiye Gadahn)
जुलिअस आणि एथेल रोझेनबर्ग
जॉन वॉकर , ज्यु.
बेनेडिक्ट अर्नॉल्ड

सद्ध्या इतकी पुरेत, मला वाटते.

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Oct 2016 - 11:08 am | श्रीकृष्ण सामंत

यशोधराताईस,

घ्या अमेरिकन सूर्याजी पिसाळांची लिस्ट. वगैरे

सूर्याजी पिसाळ म्हणजेच Traitor अशा अर्थाने सर्व साधारण समज असल्याने आपण जी लिस्ट दिली आहे ती मलाही माहित आहे.गुगल करून मी ही ती मोठ्ठी लिस्ट पाहिलेली होती. आपल्या प्रयत्नाबद्दल आपले आभार.

पण खरा अर्थ सूर्याजी पिसाळ म्हणजे,
’साम्राज्याला राजकीय विरोध करणारी व्यक्ती" ती सूर्याजी पिसाळ असा आहे.

"सूर्याजी पिसाळ आपल्या राजकीय कारकिर्दीत मोगलांच्या पक्षात सामील झाला. आणि मोगलांच्या राजकीय धोरणांना अनुसरत शिवाजीच्या वाढत्या मराठा साम्राज्याला त्याने राजकीय विरोध केला."
अशी व्यक्ती ती सूर्याजी पिसाळ म्हणून खर्‍या अर्थाने समजली जाते.

कुठचाही,
"अमेरिकन नागरिक,मग तो कुणीही नागरिक असो,देशाला गहाण ठेवणार नाही.प्रेसिडेंटच्या पदावरचा तर नाहीच नाही."
ह्या अनुषंगाने मी त्या व्यक्तीला "सूर्याजी पिसाळ" असं संबोधल होतं.आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रेसिडेंटसकट कुणाही राजकीय नागरीकाने साम्राज्याशी गद्दारी केलेली नाही असा त्याचा अर्थ आहे.("भ्रष्ट हिलरी,भ्रष्ट तिचा नवरा" ह्या लिहीण्यावर.)

आपण दिलेली लिस्ट ही स्पाईझ,म्हणजेच स्वतःच्या आर्थीक स्वार्थासाठी देशाची गद्दारी केलेले लोक होते.

आपल्या माहितीसाठी सांगतो,
मात्र एडवर्ड स्नोडन हा स्पाय आहे असं बर्‍याच अमेरिकनना वाटत नाही.फक्त ओबामा सरकारला वाटतो.सरकारची लुच्चेगीरी उघड करण्यासाठी आणि नागरिकाना जागृत करण्यासाठी व्हिसल-बोअर होण्याचं काम त्याने केलं.स्वसंरक्षणासाठी तो रशियात पळून गेला आणि त्याला रशियाने आधारही दिला.पण तो स्पाय नव्हता असं
बरेच अमेरिकन नागरिक समजतात.असो.
स्पष्टीकरण थोडं लांबलं.बद्द्ल क्षमस्व.

काका, तुमचा अट्टाहासच असला तर असूदेत बापडा.

यशोधरा's picture

13 Oct 2016 - 11:20 am | यशोधरा

आणि सूर्याजी पिसाळ ह्या शब्दसमूहाच्या तुमच्या अर्थानुसार हा एक सूर्याजी पिसाळ -Aaron Burr - अमेरिकन वाईस प्रेसिडेंट.

मदनबाण's picture

13 Oct 2016 - 11:30 am | मदनबाण

यशो तै... एकदा "दुर्गा" म्हंटले ना ? मग झालं तर ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India can’t ban Chinese products but individuals can decide not to buy: Manohar Parrikar

नाखु's picture

13 Oct 2016 - 2:31 pm | नाखु

दुर्गा उत्सव होणार असेल तर मिपावरच्या (अमेरिका स्थित) नास्तींकाचे कसे होणार ते अमेरिकेला श्या देनार का नेहमीप्रमाणे भारताने अम्रिका बिघडवली असे म्हणन्नार.

या इंडीयात सगळं कसं वाईट्ट आणि अंधश्रद्दाच यू नो

अश्या कळपाच्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे.

बाकी सल्ल्याबाबत बाणाशी सहमत आहे,मैय्या मान्य करून टाका एकदा दुर्गा म्हणून.

मैय्या मान्य करून टाका एकदा दुर्गा म्हणून.

नाय, नो, नेव्हर.

दुर्गा कोल्ड कॉफी म्हण मैय्या
काय बिघडते?

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Oct 2016 - 7:31 am | श्रीकृष्ण सामंत

हा एक सूर्याजी पिसाळ -Aaron Burr - अमेरिकन वाईस प्रेसिडेंट.

यशोधराताई,
आपण लिहीतां ते खरं नाही हो!आपण सरळ Aaron Burr - अमेरिकन वाईस प्रेसिडेंटला सूर्याजी पिसाळ म्हणून टाकलंत. माझा कसलाच अट्टाहास नाही.फक्त हे वाचा.

Historians Nancy Isenberg and Andrew Burstein write that Burr:
was not guilty of treason, nor was he ever convicted, because there was no evidence, not one credible piece of testimony, and the star witness for the prosecution had to admit that he had doctored a letter implicating Burr.[51]

आणि माझं खरं नाही वाटत तर कृपया ही लिंक वाचावी...

https://en.wikipedia.org/wiki/Aaron_Burr

यशोधरा's picture

14 Oct 2016 - 7:54 am | यशोधरा

ओके काका. ठीक आहे, वाचते.

गामा पैलवान's picture

14 Oct 2016 - 12:50 pm | गामा पैलवान

श्रीकृष्ण सामंत,

आयसेनबर्ग या आडनावावरून अंदाज बांधला की उंदराला मांजर साक्षी!

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2016 - 2:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

कॉन्फेड्रेट्स कोण होते??

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2016 - 2:28 pm | श्रीगुरुजी

घ्या अमेरिकन सूर्याजी पिसाळांची लिस्ट.

या यादीत नोएम चोस्कीला टाकता येईल का?

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2016 - 10:09 am | टवाळ कार्टा

खिक्क, असे वाटत असेल तर झापडे बंद केली आहेत तुम्ही

सतिश गावडे's picture

11 Oct 2016 - 10:01 pm | सतिश गावडे

ह्याह्याह्या.

आपल्याकडे भाष्यकार ग्रंथावर टीका करताना, प्रवचनकार ओवीवर निरुपण करताना, किर्तनकार पुर्वरंगाचा अभंग खुलवून सांगताना मुळ साहीत्यकृतीच्या निर्मात्याला अभिप्रेत नसलेला अर्थ जसा श्रोत्यांच्या कानावर फेकतात तसे झाले हे.

कपिलमुनी's picture

11 Oct 2016 - 10:43 pm | कपिलमुनी

बर्मंगठ्ठीव्का

पिलीयन रायडर's picture

11 Oct 2016 - 11:10 pm | पिलीयन रायडर

काका, कबुली वगैरे काही नव्हती ती. शेवटी प्रश्न विचारला की "तुम्हाला तुमच्या विरोधकामधला कोणता गुण प्रशंसनीय वाटतो" त्याला उत्तर दिलं त्याने.

हिलरीनेही असंच काही बाही उत्तर दिलंच.

ट्रम्प मुर्खच आहे, त्यात वाद नाही. पण हिलरीसुद्धा काही धुतल्या तांदुळासारखी नाही..

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Oct 2016 - 9:06 am | श्रीकृष्ण सामंत

"ट्रम्प मुर्खच आहे, त्यात वाद नाही. पण हिलरीसुद्धा काही धुतल्या तांदुळासारखी नाही."

तीस वर्ष राजकारणात राहून आणि ते सुद्धा एका बाईने आणि ते सुद्धा अमेरिकेतल्या राजकारणात,जिथे टुम्पसारखे बहुतांश पुरूष (तिचा नवरा धरून), बाई ही एक मजा करण्याची वस्तू आहे, असं मनोमनी समजतात अशा ठिकाणी आणि अशा पुरूषांशी दोन हात करायची पाळी आल्यावर "धुत्तल्या तांदळासारखं"
रहाणं महा कठीण आहे.तिच्याकडून चांगल्या गोष्टी झाल्या आहेत हे कधीच कुणी हायलाईट करत नाहीत.स्त्रीयांच हिलरीची जास्त अवहेलना करतात असं दिसून येतं.हे जलसी म्हणून नव्हे ना?

हिलरी क्लिंटन ने ट्रंपबद्दल काहीतरी चांगले बोलण्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना , त्याच्या मुलांबद्दल चांगले उद्गार काढले.

मदनबाण's picture

12 Oct 2016 - 9:54 am | मदनबाण

सामांत काका हिलरी सारखी पाताळयंत्री,खोटारडी आणि युद्धखोरीला पोसणारे व्यक्तिमत्व असणारी स्त्री असुन तिची तुलना दुर्गा देवीशी करावी ? हा तर दुर्गा देवीचा घोर अपमान झाला ! तिला हवे तर शुर्पणखा / पुतना इं इं इं काहीही,म्हणा.

"होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता."
हँहँहँ... मोनिका लेविंस्की ची तुम्हाला आठवण आली नाही का ? याच हिलरी बाईचा पतीदेव क्लिंटन मजा मारत होता ना ? तसेही क्लिंटन असल्या उध्योगांसाठीच प्रसिद्ध पावले ना ? ज्या राष्ट्राला व्यभिचारी राष्ट्राधक्ष चालतो तिथे ट्रंप्म ने नुसते उद्गार काढले तरी आज तिकडच्या जनतेला नितिमत्तेची चाड निर्माण होते काय ? बरं जे शब्द ट्रंप्म यांनी उच्चरले आहेत अगदी त्या शब्दाच्यांच अर्थाची कॄती बिल क्लिंटन यांनी एका एअर हॉस्टेस बरोबर केली आहे हे आपणास ठावुक आहे का ? याचा व्हिडियो तू-नळीवर उपलब्ध आहे. याच बरोबर हिलरीची ऑडियो टेप सुद्धा आहे, भुतकाळात वकिली करताना एका रेपिस्टचा खटला चालवताना या हिलरी ने काय उद्गार काढले आहेत ते जरा पडताळुन पहा !

बाकी अमेरिकन मिडिया आणि हिलरी यांचे सख्य लिक्स मधुन बाहेर आले आहेत तेव्हा हिलरीचा तुम्ही जयजयकार करत आहात यात नवलं वाटले नाही, झापडं उघडुन आणि ते काय म्हणतात ते मीठाची { इथे मुठभर चालेल } चिमटी टाकुन तिच्या यशोगाथा वाचाव्यात !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts

गंम्बा's picture

12 Oct 2016 - 11:55 am | गंम्बा

सामांत काका हिलरी सारखी पाताळयंत्री,खोटारडी आणि युद्धखोरीला पोसणारे व्यक्तिमत्व असणारी स्त्री असुन तिची तुलना दुर्गा देवीशी करावी ? हा तर दुर्गा देवीचा घोर अपमान झाला ! तिला हवे तर शुर्पणखा

सहमत. अतिशय वाईट बाई आहे हिलरी. पण अमेरीकी जनतेला पॉलिटीकली करेक्ट रहाण्याचे जे वेड लागले आहे ते बघता तिच निवडुन येणार हे नक्की.

सगळी यंत्राणा तिच्या मदतीला आहे, फंड देणारे , मिडिया , वॉलस्ट्रीट इंइंइं... ट्रंप्म यांना नविन वादग्रस्त विधाने करुन तरी प्रकाश झोतात राहता येइल का ? असा विचार येत असावा !
देव अमेरिकेच्या बुडत्या नावे चे रक्षण करो !
आमेन !

आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Oct 2016 - 8:07 am | श्रीकृष्ण सामंत

सामांत काका हिलरी सारखी पाताळयंत्री,खोटारडी आणि युद्धखोरीला पोसणारे व्यक्तिमत्व असणारी स्त्री असुन तिची तुलना दुर्गा देवीशी करावी ? हा तर दुर्गा देवीचा घोर अपमान झाला ! तिला हवे तर शुर्पणखा / पुतना इं इं इं काहीही,म्हणा.

नऊ नव्हेंबर २०१६ची वाट पहावी लागेल.अमेरिकन जनता दूर्गेलाच निवडून देईल.
"पुतण्याला" नाही.

हिलरीचा तुम्ही जयजयकार करत आहात...झापडं, मिठाची चिमटी....यशोगाथा ...वगैरे वगैरे

अहो,मी आपल्या विचाराचा सन्मान करतो.पण आपल्यासारखाच माझा विचार असावा हा आपला अट्टाहास अंमळ लय झाला आहे.

अमेरिकन जनता दूर्गेलाच निवडून देईल.
क्रुकेड हिलरी जिंकली तर अर्थातच नवल वाटणार नाही ! आम्हाला ना क्रुकेड हिलरी बद्धल ममत्व आहे ना ट्रप्म बद्धल फक्त या दोघांन मध्ये ट्रंप्म हिलरी इतका करप्ट नक्कीच नाही हे या घडीला तरी नक्कीच माहित आहे !

मी आपल्या विचाराचा सन्मान करतो.पण आपल्यासारखाच माझा विचार असावा हा आपला अट्टाहास अंमळ लय झाला आहे.
मी फक्त सत्य आणि वस्तुस्थिती काय आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न केला, आपणास आपले विचार प्रकट करण्याचे आणि "योग्य" व्यक्तिला मत ध्यायचे स्वातंत्र्य आहेच...

जाता जाता :-

किंवा
https://www.youtube.com/watch?v=wK2K5v5bm0Q

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India can’t ban Chinese products but individuals can decide not to buy: Manohar Parrikar

मृत्युन्जय's picture

12 Oct 2016 - 10:52 am | मृत्युन्जय

ट्रम्प मरतय एकुण असे दिसते. त्याचे निवडुन येण्याचे चांसेस कमी झाले आहेत. दुर्दैवाने यावेळेस अमेरिकेला २ अयोग्य उमेद्वारांमधुन एक निवडायचा आहे. हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदाला अयोग्य आहे असे माझे तरी वैयक्तिक मत आहे. अर्थात माझ्झ्या मताला न्युयोर्क मुनिस्पाल्टीच्या गटारातल्या उंदरांच्या राज्यात सुद्धा महत्व नाही ही गोष्ट वेगळी. पण क्लिंटन अमेरिकेच्या बाई राष्ट्राध्यक्ष होणे भारतीयांसाठी काही फार चांगले नसेल हे खरे.

दुर्दैवाने यावेळेस अमेरिकेला २ अयोग्य उमेद्वारांमधुन एक निवडायचा आहे.

सहमत !

नाखु's picture

12 Oct 2016 - 12:26 pm | नाखु

नगरसेवक पदासाठी गेली १०-१२ वर्षे चालू आहे. नक्की कोण महामस्तवाल तेच कळेना.

नाटोवर ठाम असलेला नाखु

तुमच्या वक्तव्यावरून तुमचा प्रभाग कोणता हे ओळखावं म्हटलं तर एकदम चार-पाचशे प्रभाग डोळ्यासमोर येऊन गेले राव..:-)

थोडक्यात, कोणत्या चोराला आपण लूटायची परवानगी द्यायची ते ठरवतो आपण.

मृत्युन्जय's picture

12 Oct 2016 - 10:52 am | मृत्युन्जय

..... क्लिंटन बाई अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होणे.... असे वाचावे

महासंग्राम's picture

12 Oct 2016 - 12:00 pm | महासंग्राम

हिलरी बै मला जर 'गिरण कार्ड' देत तर मी पण मोर्चा काढीन त्यांच्या साठी बॉं !!!

कोण आलं तर मॅक स्वस्त होतील?

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Oct 2016 - 1:49 pm | अनिरुद्ध.वैद्य

मॅक स्वस्त होण्यासाठी रुप्या मजबुत करा लागन न भो! अ‍ॅपल काय सोस्त नाय करत मॅकले.

चिनार's picture

12 Oct 2016 - 1:58 pm | चिनार

आपला एक जवळचा मानुस याप्पलमंदी ज्वाईन व्हनार हाय लवकरच..त्येच्याकडून काय सेटींग लागते का पायतो..

बोका-ए-आझम's picture

12 Oct 2016 - 3:30 pm | बोका-ए-आझम

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 Oct 2016 - 1:56 pm | अनिरुद्ध.वैद्य

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!

महासंग्राम's picture

21 Oct 2016 - 9:39 am | महासंग्राम

कोथरूड-कर्वेनगर सह वेगळा विदर्भ झालाच पाहिजे

महासंग्राम's picture

12 Oct 2016 - 3:41 pm | महासंग्राम

बावा तुमीच माये दोस्त ....

रुपी's picture

12 Oct 2016 - 11:46 pm | रुपी

हो हो.. त्यांना १० की १५ % डिस्कौंट मिळतो म्हणे.

महासंग्राम's picture

12 Oct 2016 - 4:23 pm | महासंग्राम

ओहो, अगदी हुच्चभ्रू प्रतिसाद ... अमेरिकेचे भावी नेतृत्व आणि मॅक चे भाव : एक परस्पर कारण संबंध या विषयावर आपणासोबत एक वेळ बसून चर्चा करावी लागेल

चालेल. त्यानंतर चर्चेतून काही निष्पन्न न झाल्यास 'काही फायदातोटा/सहभाग नसताना आपण अशी चर्चा करावी का?' ह्या विषयावर चर्चेला लगेच बसू.

थांबा ना बे पोट्टेहो..निस्ता कल्ला करू नका..मानसाले अगदूर जाऊ तरी देसान का नाही तटी...सार्यांचीच सेटींग लावाची हाय...

संदीप डांगे's picture

12 Oct 2016 - 5:10 pm | संदीप डांगे

मी काय म्हणतो, पोट्यापाट्याइले आंदी बसू द्या, म्होटी माणसं बस्तीन मांगुन... ;)

हा बराब्बर..थेच आपली नेहमीची स्टॅण्डर शीसटीम

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 Oct 2016 - 1:56 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

माझीही शॅम्पेन's picture

12 Oct 2016 - 6:38 pm | माझीही शॅम्पेन

चला म्हणजे एक गोष्ट सिद्ध झाली भक्त असण किंवा रुग्ण असण हा फिनोमिना खर्या अर्थाने ग्लोबल आहे :)

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2016 - 10:08 am | टवाळ कार्टा

खी खी खी, आता बुलेट येईल

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 Oct 2016 - 1:56 pm | अनिरुद्ध.वैद्य

आम्रिकेत? नाका वो. मानवाय्चं नाय येवढ चक्क्चकित रोड बुलेटले.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2016 - 2:31 pm | श्रीगुरुजी

ट्रंपने आयकर बुडविला आहे, तो महिलांबद्दल वाईट बोलतो इ. गोष्टींना माझ्या दृष्टीने महत्त्व नाही. भारतासाठी जो/जी चांगला/चांगली आहे (किंवा कमी वाईट आहे) तो/ती निवडून यावा/वी. एकंदरीत हिलरीच्या तुलनेत ट्रंप भारतासाठी जास्त चांगला (किंवा कमी वाईट वाटतो). म्हणून तोच निवडून यावा.

चिनार's picture

13 Oct 2016 - 2:35 pm | चिनार

हिलरीच्या तुलनेत ट्रंप भारतासाठी जास्त चांगला (किंवा कमी वाईट वाटतो).

ह्यावर जरा प्रकाश टाकाल का ?

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2016 - 3:20 pm | श्रीगुरुजी

हिलरी बाकी कशीही असली तरी तिचे सौदी अरेबिया प्रेम भारतासाठी चांगले नाही. सौदी अरेबियाने क्लिंटन फाऊंडेशनला बरीच मदत केल्याचे बाहेर आले होते. त्याबदल्यात सौदीला फायटर जेट देण्याचा सौदा पार पाडला गेला. काही दिवसांपूर्वीच ९/११ साठी सौदीकडून नुकसानभरपाई मागण्याच्या मागणीला ओबामाने नकाराधिकार वापरून थोपवून धरले होते. एकंदरीत हिलरी व डेमोक्रॅटीक पक्षाचे सौदी प्रेम उघड दिसत आहे. सौदी अरबिया आज जगात इस्लामीकरणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवित आहे. इस्लाम प्रसार, धर्मांतर व दहशतवाद्यांना मदत यासाठी सौदी भारतासह अनेक देशात निधी पुरवित असतो. त्यामुळे हिलरी निवडून आली तर सौदीला पाठबळ मिळेल व पर्यायाने ते भारतासाठी त्रासदायक ठरेल.

ट्रंप मूर्ख असला तरी धाकट्या बुशप्रमाणे कट्टर इस्लामविरोधी वाटतो. बिल क्लिंटनच्या तुलनेत धाकटा बुश भारतासाठी चांगला ठरला होता. तसेच ट्रंप हिलरीच्या तुलनेत भारतासाठी चांगला ठरेल.

या दोघांची बाकी तुलना इतर काही धाग्यांवर झालेलीच आहे.

बोका-ए-आझम's picture

13 Oct 2016 - 6:43 pm | बोका-ए-आझम

पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा निर्णय हा काँग्रेसने मान्य करावा लागतो, बरोबर? तिथे सध्या रिपब्लिकन पक्ष बहुमतात आहे. मग हिलरी जर निवडून आली तरी तिला सौदीधार्जिणी धोरणं अवलंबता येणं इतकंही सहज शक्य होता येणार नाही. हे माझं मत बरोबर का चूक?

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2016 - 7:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान साहेबांनी म्हणजेच मोदिजींनी सौदी सोबत खूप सौहार्द्र्पूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत आधी होते त्याच्यापेक्षा असे वाटते अन वाचल्याचे स्मरते. कुठेतरी (तुम्हीच लिहिलेले का ते आठवत नाही) सौदीला मैत्रीचा हात देणे म्हणजे पाकिस्तानला एकटे पाडायची उत्कृष्ट खेळी असल्याचेही वाचल्याचे स्मरते. मग हिलरी जर आली सत्तेत (असे होऊ नये ही मनःपूर्वक इच्छा) तर त्याने भारत सौदी संबंधांवर काय फरक पडेल म्हणता ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Oct 2016 - 9:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान साहेबांनी म्हणजेच मोदिजींनी सौदी सोबत खूप सौहार्द्र्पूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत आधी होते त्याच्यापेक्षा असे वाटते अन वाचल्याचे स्मरते. कुठेतरी (तुम्हीच लिहिलेले का ते आठवत नाही) सौदीला मैत्रीचा हात देणे म्हणजे पाकिस्तानला एकटे पाडायची उत्कृष्ट खेळी असल्याचेही वाचल्याचे स्मरते.

हे मुत्सद्दी काम वर वर दिसते आहे त्यापेक्षा जास्त खोलवर व जास्त चांगल्या प्रकारे झाले आहे / होत आहे. आणि ते भारताच्या फायद्याचेच आहे.

एप्रिल २०१६ मध्ये सौदी अरेबियाच्या भेटीच्या वेळी सौदी अरेबियाने मोदींना (highest civilian honour) सर्वोच्च मुलकी सन्मान दिला आहे.
http://www.narendramodi.in/pm-modi-conferred-saudi-arabia-s-highest-civi...

संयुक्त अरब अमिरातही भारताचे आताइतके वजन कधीच नव्हते.

या दोन्ही राष्ट्रांकडून पाकिस्तानने "इस्लामिक अजेंडा" व " इस्लामिक अण्वस्त्रे" हे मुद्दे पुढे करून बरेच बिलियन्समध्ये डॉलर्स लाटले आहेत. त्या बदल्यात त्या राष्ट्रांना केवळ पाकिस्तानकडून अरेरावी, त्यांच्या भूमीचा गुन्हेगारी कारणांसाठी वापर व उलट मदतीच्या बाबतीत ठेंगाच मिळाला आहे. इस्लामी राष्ट्रांत सामरिकरित्या समर्थाच्या पुढे नांगी टाकायची प्रथा फार पूर्वीपासून आहे. शहाचा पर्शिया, सद्दामचा इराक, नासर-सादात-मुबारकचा इजिप्त, इत्यादींचा त्यांच्या प्रत्येकाच्या उत्कर्षकाळातला मुस्लिम जगतातला दबदबा आठवत असेलच.

खाडी राष्ट्रे कितीही श्रीमंत असली तरी 'जुजुबी सामरीक ताकद व कमी लोकसंख्या' ह्या त्यांच्या पडत्या बाजू आहेत. त्यामुळे तुलनेने जास्त लोकसंख्येचा व अण्वस्त्रसज्ज सेना असलेल्या "इस्लामी" पाकिस्तानचा "ब्रदरहूड" त्यांना नाईलाजाने का होईना त्याना जवळचा वाटणारच. त्यामुळे त्या देशांकडून पाकिस्तानकडे अनेक बिलियन डॉलर्सचा अधिकृत व अनधिकृत ओघ अनेक दशके चालू होता व आताही काही प्रमाणात चालू आहे. परंतु, केवळ भारत नव्हे तर जगातील इतर देशांतल्या उघड/गुप्त अतिरेकी कारवायांत पाकिस्तानचा कमीजास्त हात असतो हे आता दिवसेदिवस जास्त जास्त उघड होत आहे. या अवस्थेत खाडी देशांना पाकिस्तानला "ब्रदर" म्हणून मागे घालणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या इस्लामिक छबीला आणि आपल्या सिंहासनाला धोका न पोचता पाकिस्तानपासून दोन हात दूर राहता आले तर त्यांना ते हवेच आहे.

त्यातच, इतके दिवस 'इस्लामी सैन्य' बलवान करण्यासाठी बिलियन्समधे डॉलर्स घेऊनही, शिया इराणचा पाठींबा असलेल्या येमेनमधल्या बंडखोरांवर हल्ला करण्यासाठी तयार केलेल्या सुन्नी खाडी देशांच्या संयुक्त सैन्यात सहभाग घेण्यास पाकिस्तानने २०१५ च्या सुरुवातीस स्पष्ट नकार दिला. ही घटना उंटाची पाठ मोडणारी शेवटची काडी ठरली आहे.

पाकिस्तानकडून त्यांच्या देशांतर्गत होणारी ढवळाढवळ ही त्यांच्याकरिता "बोलता येत नाही, पण सहनही होत नाही" असा मुका मार होता/आहे. त्यामुळे, वर वर स्पष्टपणे दाखवणे तितकेसे सोईचे नसले तरी खाडी राष्ट्रांतील सत्ताधार्‍यांना अमेरिका-भारत अ‍ॅक्सिसकडे झुकणे गेल्या काही दिवसांपासून सोईचे वाटत आहे. यापैकी अमेरिकेवर अवलंबून असणे ही त्या देशांच्या राजकीय सत्ताधार्‍यांना आपापली सिंहासने मजबूत ठेवण्यासाठी गेली अनेक दशके आवश्यक असलेली गोष्ट आहे हे काही गुपित नाही. तसेच, त्यांना भारताची सुधारणारी राजकिय-आर्थिक व समतोल छबी, पाकिस्तानच्या बिघडणार्‍या छ्बीपेक्षा जास्त सुरक्षित व विश्वासू वाटू लागली तर आश्चर्य नाही.

धर्म हे सिंहासन मजबूत करायला सर्वात उत्तम साधन असते (जगाच्या सुरुवातीपासूनचे सर्व ठिकाणांचे, सगळेच राजे 'देवाचे अवतार होते' किंवा 'देवाज्ञेने झालेले राजे' होते हा काही योगायोग नाही !). तरीही, सार्वकालीक जागतिक सत्य हेच आहे की, कोणत्याही सत्ताधार्‍याला सिंहासन हे धर्मापेक्षा नेहमीच जास्त महत्वाचे असते... जर बुडाखाली सिंहासन नसले तर धर्म काय भाकरीबरोबर मोडून खायच्या उपयोगाचा आहे काय ?! :) ;)

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Oct 2016 - 8:47 am | श्रीकृष्ण सामंत

एकंदरीत हिलरीच्या तुलनेत ट्रंप भारतासाठी जास्त चांगला (किंवा कमी वाईट वाटतो). म्हणून तोच निवडून यावा.

श्रीगुरूजी,
माझ्या वाचनात आलेलं ट्रम्पचं भारताबद्दलचं मत. फक्त एक झलक.

Donald Trump: I hate Indians, Muslims, will throw H-1B visa workers into detention camps

Rajan: But it seems you don’t like Indians too much. Why’s that?

Trump: Listen, it’s nothing really. You got to be practical. Most Indians are fat and ugly. Look at yourself. You look like the last time you worked out was when you crawled on all fours as a baby. Indian women are fat and ugly. I bet your wife and mother is ugly. Ask Rosie O’Donnell what it means to be a fat slob and stuff her mouth with cheeseburgers and fries the whole day. Ask Lying Ted’s wife why she can’t make herself pretty enough. I tell you, if there’s one thing I cannot stand is ugly people. They make me angry. Look at Melania (Trump). You don’t need to read that Greek mythology shit. You see divine beauty right in front of your eyes. Make you feel happy.

वाचा ही लिंक
https://www.americanbazaaronline.com/2016/04/01/donald-trump-hate-indian...

Exclusive interview with GOP presidential frontrunner, at Trump Towers in New York.
By Sujeet Rajan

यशोधरा's picture

14 Oct 2016 - 8:51 am | यशोधरा

अहो काका, मानो या ना मानो बरेच गोरे असा विचार करत असतात फक्त बोलून दाखवत नाहीत. तो येडा बोलतो इतकाच फरक. अर्थात, राष्ट्राध्यक्षाने जरा तारतम्याने बोलायला हवं म्हणा.

अवांतर विचारः आणि भारतीय स्वतः अजूनही काळा - गोरा, जाड- बारीक ह्या भूलभुलैय्यमध्ये स्वतःच इतके आडकलेत की त्यांनी ट्रंपला ह्याबाबतीत काही म्हणणं म्हणजे हिपोक्रसीचा कळस.

असो.

कपिलमुनी's picture

14 Oct 2016 - 9:20 am | कपिलमुनी
यशोधरा's picture

14 Oct 2016 - 9:22 am | यशोधरा

मी लिंक वाचलीच नाही. ट्रंपबद्दल इतके कोण वाचणार! ;)

कपिलमुनी's picture

14 Oct 2016 - 9:21 am | कपिलमुनी

काय काका !!
१ एप्रिल चा पेपर दाखवता आहे ? चु* समजता का काय?
खाली स्पष्ट लिहीला आहे
One more thing: most of you would have realized this interview with Mr. Donald Trump is a piece of pure fiction. For those who didn’t get it: Happy Fool’s Day )

गामा पैलवान's picture

14 Oct 2016 - 12:58 pm | गामा पैलवान
श्रीकृष्ण सामंत's picture

15 Oct 2016 - 8:33 am | श्रीकृष्ण सामंत

राष्ट्राध्यक्षाने जरा तारतम्याने बोलायला हवं म्हणा.

एकदम सहमत

कपिलमुनी's picture

15 Oct 2016 - 11:21 am | कपिलमुनी

एप्रिल फूलबद्दल पण लिहा ना !
तुम्ही ट्रम्पच्या नावावर काहीही खपवताय

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Oct 2016 - 7:42 am | श्रीकृष्ण सामंत

मुनीजी,
खाली,रमेश आठवल्यानी दिलेली ही लिंक वाचा आणि कॉमेन्ट्स ब्लॉक मधल्या कॉमेन्ट्स वाचायला विसरू नका बरं का!
खूप आहेत
http://timesofindia.indiatimes.com/united-states-elections-2016-us-elect...

कपिलमुनी's picture

17 Oct 2016 - 8:39 am | कपिलमुनी

तुम्ही दिलेली लिंक चुकीची होती.
बाकी चालू द्या

कपिलमुनी's picture

14 Oct 2016 - 9:19 am | कपिलमुनी
कपिलमुनी's picture

14 Oct 2016 - 9:20 am | कपिलमुनी
गामा पैलवान's picture

13 Oct 2016 - 4:18 pm | गामा पैलवान

श्रीकृष्ण सामंत,

मला वाटतं आपले हे बे-छूट आरोप आहेत.

मग हिलरीवर एफबीआय ची कसली केस चालली आहे? १५ सप्टेंबरच्या आसपास त्यांनी चौकशीची व्याप्ती वाढवायचा निर्णयही घेतला आहे. हे कशाचं लक्षण आहे?

२.

अमेरिकेची सुरक्षता इतकी फाल्तू नाही.आणि अमेरिकन नागरिक,मग तो कुणीही नागरिक असो,देशाला गहाण ठेवणार नाही.प्रेसिडेंटच्या पदावरचा तर नाहीच नाही.इथे सूर्याजीपिसाळ अजूनतरी जन्माला आलेले नाहीत.

१९९१ साली बीसीसीआय बँक बुडाली तेव्हा सिनेटच्या २८ आणि प्रतिनिधीगृहाच्या १०८ सदस्यांना लाच देऊन गप्प केलं गेलं होतं. या बँकेने अमेरिकी नियम झक्कत पायदळी तुडवून व्यवहार केलेच ना?

१९७६ साली अमेरिका व्हियेतनाम युद्ध कशामुळे हरली? सायगावच्या अमेरिकी दूतावासाच्या छतावरून हेलिकॉप्टरमार्गे शेवटचा सैनिक निघाला. ही महासत्तेच्या सैन्याची माघार घ्यायची पद्धत झाली का? कोणीतरी कुठेतरी कसलीशी फंदफितुरी केली म्हणूनंच अशी वेळ आली ना?

१९४३ साली दुसरं महायुद्ध ऐन भरात असतांना डॅडी बुशचा बाप प्रेस्कट बुश अमेरिकेचा शत्रू नाझी जर्मनीशी व्यापार करीत असे. त्या आरोपावरून त्याला अटकही करण्यात आली होती. कोण सूर्याजी पिसाळ आहे ते कळतं यातून.

मला वाटतं इतकी उदाहरणं पुरेशी आहेत. जरा शोधाशोध केली तर पुष्कळ सापडतील. पण शोधायची इच्छा हवी.

आ.न.,
-गा.पै.

महासंग्राम's picture

13 Oct 2016 - 4:44 pm | महासंग्राम

गा. पै. काकांनी आधीच स्पष्ट केलंय कि ते अमेरिकेचे नागरिक आहेत. तेव्हा समजून घ्या

राजाभाऊ's picture

13 Oct 2016 - 7:23 pm | राजाभाऊ

पैलवान, सामंत काका बिल क्लिंटनपासुन मतदान करतायत, तरीहि क्लिंटन दांपत्यांबाबत त्याच्या मनात ओलावा आहे. उगाच तुम्हि डोकेफोड करु नका... :)

गामा पैलवान's picture

13 Oct 2016 - 8:39 pm | गामा पैलवान

राजाभाऊ,

कसं बरोबर बोललात बघा. विशीतल्या नवथर युवकाने असं काही लिहिलं तर आपण समजू शकतो. पण इतके पावसाळे पाहिलेली वयोवृद्ध व्यक्ती जेव्हा हिलरीस दुर्गा वगैरे म्हणू लागते, तेव्हा वेगळीच शंका येते. मग हिलरीपेक्षा सेरा पेलिन काय वाईट आहे, असाही प्रश्न पडतो. ;-)

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

14 Oct 2016 - 9:16 am | कपिलमुनी

दुर्गा म्हणण्यामागची कारणे संदर्भासहीत स्पष्ट करा -- ८ गुण

मदनबाण's picture

14 Oct 2016 - 12:05 pm | मदनबाण

१} बहुधा ट्रंप्म ने चुकुन पछाडलेला चित्रपट पाहिला असावा आणि सारखा ओरड फिरत असावा...
सूड घेइन मी दुर्गे.. सूड.. हा हा हा.. तुला व्हाईट हाऊस मध्ये शिरु देणार नाही मी.. सूड घेईन मी दुर्गे सूसूसूसूसूड.

उरलेली ७ कारणे बाकीच्यांनी आपापल्या कल्पना शक्तीने ध्यावीत ! ;)

जाता जाता :- एप्रिल फूल ? छ्या काहीतरीच मुनी ! दुर्गेचा कोप होईल हो अशाने ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरे :- Boycotting our goods will damage ties, China’s state media warns India

चिनार's picture

14 Oct 2016 - 1:12 pm | चिनार

तसं नाय ते..
कोठेही शाखा नसलेल्या दुर्गा कॉफीची एक शाखा न्यूयॉर्कला सुरु झाली (घ्या घ्या..मोदींच्या परदेश दौऱ्यांचे फलित विचारता ना नेहमी..हे घ्या आता !!).
तिथली कॉफी पिताना, त्या कपात ट्रम्पला हिलरींचा चेहरा दिसला..म्ह्णून झाली ती दुर्गा !!!

नाखु's picture

14 Oct 2016 - 2:20 pm | नाखु

असे आमचा बोंबील्वाडीचा वार्ताहर कळवितो (अगदी आतल्या गोठ्यातून).

ट्रम्पला कोंबडी खायची ईच्छा झाली ती ही भारतीय उपहारगृहात्,गेला झोकात दिली आर्डर (कटाक्षाने कोंबडाच द्या खायला म्हणून सांगीतलेकी पठ्ठ्याने) आणि वेटरला बिल ठेवताना ऐकले एक मुर्गा आणि पाव-रोटी ५ नंबर टेबल.

झालं ट्रंपला वाटल वेटर आपल्यालाच काहीतरी म्हणाला आणि अपभ्रंशाने मुर्गा चा दुर्गा केला. वेटर पडला बंगाली, ज्याम चिडला "टुम गोरा लोग मुर्गा को दुर्गा बोलते है तुम्हारा अभ्भी खिमा करेगा हम बाबु म्हणून सुरा परजत मागे लागला"

तसही गोर्यांना अर्धेच ऐकायची सवय असल्याने मुर्गा विसरला आणि दुर्गा हेच लक्ष्यात ठेऊन तेच दूषण समजून हिलरीम्ना दिले. अता खरा अर्थ कळल्यावर स्वतः मुर्ग्यासारखा पळतोय इकडे तिकडे.

h

महासंग्राम's picture

14 Oct 2016 - 3:09 pm | महासंग्राम

ट्रम्प

रमेश आठवले's picture

15 Oct 2016 - 4:22 am | रमेश आठवले

गेली जवळ जवळ आठ वर्षे एक अश्वेतवर्णीय पुरुष पहिल्यांदाच अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आता हिलरी क्लिंटन या अध्यक्ष होण्याची दाट शक्यता असल्याने एक महिला अमेरिकीची पहिल्यांदाच अध्यक्षा होईल असे दिसते आहे. या दोन्ही गोष्टी चांगला पायंडा पाडत आहेत. तरीही हिलरी यांच्या बाबत एका भारतीयांच्या दृष्टिकोनातून संशयाची पाल चुकचुकते. त्याचे कारण -
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई, हिलरी क्लिंटन बाईंच्या प्रमुख सहायक म्हणून कैक वर्षा पासून कार्यरत आहेत. या बाई नवीन अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अगदी नजीकच्या गोटात वावरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
https://en.wikipedia.org/wiki/Huma_अबेदीं
भारताच्या हित लक्षात घेऊन येत्या निवडणुकीत मतदार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक या बाबत विचार करतील असे वाटते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणीबाणीची परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकतेआणि अणू युद्ध पेटू शकते . कारगिलचे उदाहरण घेतले तर पाकिस्तान अणुशस्त्र वापरायला तयार झाला आहे अशी बातमी समजताच बिल क्लिंटन यांनी नवाझ शरीफ यांना तातडीने वाशिंग्टनला बोलावून घेतले आणि दबाव आणून अनर्थ टाळला. या दोन देशात आणीबाणीची परिस्थिती पुन्हा उभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तत्कालीन अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका पुन्हा महत्वाची ठरेल. आत्ता पर्यंतच्या ऐतिहासिक अनुभवा वरून मुस्लिम धर्मीय हुमा पाकिस्तानच्या खबऱ्या म्हणून कटोकटीच्या वेळी काम करणार नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय ?

बघा पूर्वाश्रमीचे भारतीय अमेरिकेचे नागरिक होताच अमेरिकेबद्दल कित्ती कित्ती आग्रही होतात, देशाभिमानी होतात... (हा उपहास नाही)
च्यायला आणि आमच्यातलया बर्याच जणांचं अजून टेस्टिंग टेस्टिंगच चालूये...

जयन्त बा शिम्पि's picture

20 Oct 2016 - 8:12 pm | जयन्त बा शिम्पि

हिलरी काय भन्नाट आकडे फेकीत होती, ते पहाण्यासारखे होते. त्याविरुद्ध ट्रम्प कडे नुसते ' गोलमाल ' बरळणे होते. त्याने एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिले नाही. प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी, हिलरी कशी खराब आहे, बराक ओबामा यांच्यासहीत, हिलरी ने अमेरिकेची कशी वाट लावली आहे, हेच सांगण्यावर त्याचा भर होता. हिलरी चे मत " बॉर्डर ओपन ठेवणे " याचा अर्थ , कोणालाही सरसकट अमेरिकेत प्रवेश मिळणार असा होतच नाही. हिलरी क्लिंटन बोलत असतांना, मधुन मधुन , ती कसे खोटे सांगत आहे असे बोलण्याची ती संवय जुनीच आहे. तीनेवेळा तर त्याला पाण्याचा घोट घ्यावा लागला, या उलट हिलरी चा आत्मविश्वास, त्याच्या फालतू बोलण्यावर सुचक हंसणे, डिबेटच्या मर्यादा सांभाळणे, अमेरिकेपुढे असलेले नेमके प्रश्न म्हणजे मध्यमवर्गीयांचे वेतन वाढविणे, कर्जात वाढ न करणे,शिक्षणाच्या खर्चाबाबत सवलती देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे,उत्पन्न वाढविण्यासाठी बड्या कंपन्यांना व उद्योगपतींना जादा कर लावणे, महिला व लहान मुलांसाठी कल्याणकारी योजना राबविणे इ.इ.याबाबत तीचे म्हणणे , मतदारांना आकर्षित करणारे होते. ट्रम्पच्या लंपट्पणाबद्दल्,त्याचे नाकारणे हास्यास्पद वाटले. हिलरी वर , बिल क्लिंटनच्या भानगडीचा वार , ट्रम्प कडून फारसा जोरात झालाच नाही. मॉडरेटर सुद्धा हिलरी पेक्षा , ट्रम्पला जास्त बोलण्याची संधी देत होता असे जाणवत होते. थोड्क्यात तिसर्‍या वादविवादात सुद्धा , हिलरीनेच बाजी मारल्याचे दिसून आले.

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 8:18 pm | पिलीयन रायडर

झाल्या तीनही डिबेट्स..

काय वाटतंय? कोण निवडुन येईल?

इथले वातावरण पहाता मला हिलरीच येईल असं वाटतंय. ट्रंपची स्त्रियांना वागणुक ह्या मुद्द्यावर फारच नाचक्की झाली आहे. खरं तर हिलरीचं हसु पाहुन अंगावर काटा येतो, पण स्त्रीयांविषयक मुद्द्यांवर तरी लॉजिकल बोलते. गन कंट्रोल बद्दलही. पण ती भारताच्या दृष्टीने योग्य नसेल तर कसे व्हायचे?

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2016 - 6:36 am | श्रीकृष्ण सामंत

हिलरी जर एक मताने पडणार असेल तर माझं शेवटचं मत तिला जिंकून देईल एव्हडी मला खात्री आहे.

काय हे काका? अमेरिकन अध्यक्श इलेक्टोरल वोट्सने निवडला जातो हे तुम्हाला माहित नाहि का? आणि तुम्हि कांग्रेसमन असण्याची शक्यता जवळजवळ नाहिच... :)

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Oct 2016 - 7:24 am | श्रीकृष्ण सामंत

काय हे काका? अमेरिकन अध्यक्श इलेक्टोरल वोट्सने निवडला जातो हे तुम्हाला माहित नाहि का?

राजाभाऊ,
अहो,मला माहित आहे.आजचा माझा लेख वाचावा.

हिलरी जर एक मताने पडणार असेल तर माझं शेवटचं मत तिला जिंकून देईल एव्हडी मला खात्री आहे.

राजाभाऊ,
वरील माझ्या वाक्याचा आशय कळला असता तरी माझ्या म्हणण्याचं सार्थक झालं असतं.असो.

संदीप डांगे's picture

21 Oct 2016 - 10:26 am | संदीप डांगे

सामंत काका, पोलिटिक्स में इमोशन?

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Oct 2016 - 7:37 am | श्रीकृष्ण सामंत

सामंत काका, पोलिटिक्स में इमोशन?

संदीपजी,
त्याचं असं आहे,पॉलिटिक्स हा पण एक गेम आहे.आता गेम म्हटल्यानंतर चूरस येणार,चूरस आल्यानंतर हार-जीत असणारच,आणि हार-जीतमधे इमोशन येणार नाही का? गेम जरका इमोशन शिवाय पाहिला तर मजाच जातेना

गामा पैलवान's picture

21 Oct 2016 - 12:21 pm | गामा पैलवान

लोकहो,

११ सप्टेंबरच्या एका कार्यक्रमात हिलरी कोसळली आणि कायमची गचकली. सध्या दाखवतात ती तोतयी आहे. तोतयीचे दात आणि नाकाचा शेंडा साफ खऱ्या हिलरीपेक्षा वेगळा आहे. तिचं नाव तेरेसा बार्नवेल असून ती हिलरीची तोतयी बनून भरपूर पैसे कमावते.

आ.न.,
-गा.पै.