!! रवानामुळे दिवाळी !!
स्वामी व्हावे तिन्ही जगाचे मनाशी निर्धार केले,
कठोर तपस्या ध्यान लाउनी भ्रमविद्या सध्य केले,
शंकराने दास व्हावे ऐसा तो शिवभक्त झाला,
देव, ऋषी गण हेवा करिती ऐसा महाविद्वान झाला !!१!!
पण विद्वतेचा महामेरू क्षणामध्ये चूर झाला,
पाहुनी साध्वी सीतेला, तव मनाचा तोल गेला,
अपहरुनी पर सौभाग्येला, रावणाने अनर्थ केला,
अहंकाराच्या तिमिरातून, दानवाचा जन्म झाला !!२!!
राम प्रतिज्ञा बद्ध होते, भले-बुर्याचे द्वंद्व झाले,
वध करुनी दशाननाचे, रामाचे "श्री राम" झाले,
घेउनी भार्या-बंधू नी सेना, अयोध्येच्या वाटा निघाले,
लोटुनी सन वर्षे चौदा, रामराज्या आरंभ झाले !!३!!
पाहुनी वर्षांनी राजा, प्रजा आनंदात न्हाली,
स्वागत कराया रघुरामाचे, दिव्यांची आरास केली,
युगे उलटली काळ बदलले, प्रथा मात्र सार्थ झाली,
ना भुलावे बहुजनांनी, रावणामुळे घडली दिवाळी !!४!!
प्रतिक्रिया
3 Oct 2016 - 5:41 pm | मारवा
आपण कुठल्या संघटनेचे कार्यकर्ते आहात का ?
3 Oct 2016 - 5:46 pm | कवि मानव
नाही मुळीच नाही पण का ?
कवितेवर प्रतिक्रिया देण्या ऐवजी माझ्यावर का :))))
3 Oct 2016 - 6:10 pm | मारवा
मी कविते विषयीच विचार करत होतो. अगदी याच विचारसरणीची एक कविता रावणावरचीच मी
एका विशिष्ट संघटनेच्या कार्यकर्त्या कडुन संघटनेच्या विचारसरणीचा प्रचार भाग म्हणुन ऐकली होती.
म्हणुन मला असा गैरसमज झाला की ही कविता त्या संघटनेच्याच विचारप्रणालीचा भाग आहे का ?
यासाठी तुम्हाला वरील प्रश्न विचारला तुमच्या उत्त्तरामुळे खुलासा झाला
त्यासाठी तुमचे अनेक धन्यवाद
कवितेविषयी नो कॉमेंट
3 Oct 2016 - 6:22 pm | कवि मानव
नाही हरकत नाही..हा फक्त योगायोग असेल कदाचित त्याउपर काही नाही.
तुम्हाला कविता आवडली नसेल तरी तुम्ही प्रतिक्रिया द्या...आपण लिहीत असताना, आपण सर्व छान आणि बरंच लिहितो हा गैरसमज नेहमीच असतो :)))
3 Oct 2016 - 6:43 pm | llपुण्याचे पेशवेll
ना भुलावे बहुजनांनी, रावणामुळे घडली दिवाळी !!४!!
म्हणजे दुसर्यांच्या श्त्रीया बळाने हरण करणे आणि बलात्कार करणे ही बहुजन प्रवृत्ती आहे किंवा कसे.. म्हणजे मराठा मोर्चावाले इतर बहुजनांवर आरोप करत आहेत ते खरे काय? का मोर्चेकरी + बहुजन पण असेच आहे?
लेखक काय सुचवू इच्छीतो?
3 Oct 2016 - 8:43 pm | बोका-ए-आझम
कुठलीही कथा ही protagonist पेक्षा antagonist मुळे पुढे जाते हे जे कथा/पटकथा लेखनाचं प्राथमिक तत्व आहे, ते वाल्मिकींनी विकसित केलेलं आहे, हे रामायणावरुन सिद्ध होतं. बाकी त्याची आजच्या परिस्थितीशी जशी संगती लावायची असेल, ते प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे.
3 Oct 2016 - 6:56 pm | कवि मानव
मी लिहिताना खरंच एवढा विचार केला न्हवता ... पण कुठे तरी आपल्या उत्सव साजरे करण्यामागे एका वाईट प्रवृत्तीच्या मानवाचा ही योगदान आहे, पण कवितेत कुठल्या ही प्रवृत्तीचे मार्गदर्शन करावे असा आशय नाही. हे खरे तर एका कथेचे वर्णन म्हणता येईल
3 Oct 2016 - 9:06 pm | कवि मानव
बोका-ए-आझम - मी तुमच्या मताशी सहमत आहे.
रावण खरा तर विधवान पण नक्कीच त्याची कृती आणि अहंकार त्याला घेऊन गेली.