स्वप्न मनाचे

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
25 Sep 2016 - 10:41 am

असंख्य स्वप्ने मनी उद्याची
पंख जरी हे इवले इवले,
ध्येय गाठण्या आतुरलेले
हृदयाचे पाऊल कोवळे..

तरूणपणाची चढता झालर
मुक्त मनाला बसे ना आवर,
स्वप्न कुठे अन मार्ग कुठे
उगाच अंगी नसती पावर..

तिशी उलटता भरते अंगण
गळ्यात पडते नसते बंधन,
सांभाळताना नाती गोती
करी स्वप्नांना दुरून वंदन..

वर्षा मागुन वर्षही सरते,
स्वप्नांची ती यादच उरते,
मुलाबाळांचे स्वप्न उद्याचे
पुन्हा नव्याने मनात भरते..

कसले स्वप्न नी कसली आस
उगाच मनाचे सारे भास
जीवन सुंदर जगण्याचा हा
मात्र एक स्वच्छंद प्रवास...
          -  महेश नायकुडे

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

राजेंद्र देवी's picture

30 Sep 2016 - 3:37 pm | राजेंद्र देवी

आवडली...

एक वाटसरू's picture

1 Oct 2016 - 11:13 pm | एक वाटसरू

छान...