पाऊस

bhavana kale's picture
bhavana kale in जे न देखे रवी...
6 Sep 2016 - 3:16 pm

काल खूप दिवसांनी
तुला पावसात चिंब भिजताना पाहिलं..
आणि छत्री मध्ये असूनसुद्धा
माझा मन भलतंच शहारलं.......

जोरदार वाऱ्याने
त्यात अजून कहर करावा
छत्रीचे तीन तेरा वाजवून
त्याने आपला इरादा स्पष्ट करावा....

समोरचा अथांग सागर
जणू पावसाने कुशीत घेतलेला
आता नजरेसमोर फक्त तू...
आणि नजरेत तुझ्या प्रेमाचा ओलावा...

समोरून बेफाम लाटा..
वरून चिंब धारा..
पायाखाली गुदगुल्या करणारी वाळू
अन सर्वांगला शहारणारा वारा...

पूर्ण निसर्गचं आपल्या साथीला असतांना
कॅमेरा क्लिक ची गरजच कशाला...
निथळलेला तुझा तो चेहरा
माझ्या नजरेत मी कधीच टिपलेला...

पापण्यांवर जमलेले थेंब
हळुवार गालावरून ओघळत होते....
उगाच केसांना दिलेल्या झटक्याने
ते बिचारे गडबडले होते...

पुढचा पूर्ण वेळ माझं मन..
त्या थेंबातलाच एक भाग बनून राहिला...

काल खूप दिवसांनी
तुला चिंब भिजताना पाहिलं...
आणि छत्री मध्ये असून सुद्धा
माझं मन भलताच शहारलं....

माझं पहिलाच प्रयत्न आहे मिपावर काही खरडण्याचा म्हणून सांभाळून घ्यावे हि विनंती..मी मिपा गेली तीन वर्षांपासून वाचतेय तर बरेच मिपा सदस्य ओळखीचेच वाटायला लागलेत..असो.. धन्यवाद..

कविता

प्रतिक्रिया

पाटीलभाऊ's picture

6 Sep 2016 - 4:02 pm | पाटीलभाऊ

चांगली सुरुवात...पुढील वाटचालीस शुभेच्छा..!

मिसळलेला काव्यप्रेमी यांना विशेष धन्यवाद ...धाग्यातील चुका सुधारणेसाठी..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Sep 2016 - 4:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान कविता
धन्यवाद कसले? कामचं आहे ते आमचं! :)

पापण्यांवर जमलेले थेंब
हळुवार गालावरून ओघळत होते....
उगाच केसांना दिलेल्या झटक्याने
ते बिचारे गडबडले होते...

खासच. पुलेशु.

पैसा's picture

6 Sep 2016 - 4:37 pm | पैसा

कविता आवडली!

जव्हेरगंज's picture

6 Sep 2016 - 5:02 pm | जव्हेरगंज

भारी कविता!

अजुन लिहा!!

रेवती's picture

6 Sep 2016 - 5:10 pm | रेवती

कविता आवडली.

प्रभास's picture

6 Sep 2016 - 5:45 pm | प्रभास

छानच...

एक एकटा एकटाच's picture

6 Sep 2016 - 8:59 pm | एक एकटा एकटाच

पूर्ण निसर्गचं आपल्या साथीला असतांना
कॅमेरा क्लिक ची गरजच कशाला...
निथळलेला तुझा तो चेहरा
माझ्या नजरेत मी कधीच टिपलेला...

वाल्मिक's picture

6 Sep 2016 - 11:42 pm | वाल्मिक

छान कविता

रुपी's picture

7 Sep 2016 - 12:18 am | रुपी

छान कविता. आवडली :)

पथिक's picture

7 Sep 2016 - 11:57 am | पथिक

छान आहे कविता. आवडली.

धन्यवाद सगळ्यांना...प्रयन्त करेन पुन्हा काहीतरी लिहिण्याचा..

अंतरा आनंद's picture

7 Sep 2016 - 2:15 pm | अंतरा आनंद

खुप आवडली कविता.